हरीच्या नैवेद्याला केली...

Submitted by मनस्विता on 4 May, 2018 - 22:44

लहानपणी कायम भोंडल्याला म्हणलेले हे गाणे. तेव्हाही मला खूप आवडायचे आणि आता म्हणत नसले तरी बऱ्यापैकी आठवते. तर हादग्याला अजून बरेच दिवस असताना, मधेच का बरे मला हे गाणे आठवावे...

तर झाले असे की सकाळी तापवलेले दूध दुपारी तापवले नाही आणि संध्याकाळी तापवायला ठेवायला उशीर झाला. सध्या उन्हाळा इतका निर्मम आहे की ही चूक अक्षम्य ठरली. मग काय, म्हणावे लागले मला "दूध तापवायला झाला उशीर, झाले त्याचे पनीर".

आता इतके वर्षे गृहिणीपद सांभाळत असल्याने, ते दूध काही टाकून देववेना. मग केला विचार की "ठेवेन त्याला आचेवर मंद आणि करेन त्याचा छानसा कलाकंद". मग काय घेतली लोखंडी कढई आणि पेटवला गॅस अन ओतले ते घट्ट झालेले दूध त्यात आणि ढवळायला चालू लागले माझे हात.

त्यात असलेले पाणी आटले आणि मग घातली त्यात थोडी साखर. विरघळली साखर आणि ते मिश्रण सुटू लागले कडेने. अंदाजाने वाटले, झाले पुरेसे कोरडे. मग एका ताटलीला तुपाचा हात लावून पसरले त्यात. त्यावर घातले थोडे बदामाचे पातळ काप अन झाला की कलाकंद झ्याक!    

तळटीप:
१. ही पाककृती म्हणजे बिघडलेले निस्तरायचा प्रयत्न असल्याने सगळा मामला अंदाजपंचे होता. फार काही प्रमाण वगैरे नसल्याने साग्रसंगीत पाककृती दिली नाहीये. पण सांगायचं झालं तर साधारण १/२ लिटरपेक्षा थोडे जास्त दूध होते त्याला मी ४-५ चमचे भरून साखर घातली.
२. दूध जरी नासलेले असले तरी ते इतका वेळ गरम केल्याने त्यातील जे हानिकारक जंतू आहेत ते नष्ट होतात. (हानिकारक जंतू साधारण ७० डिग्री सेल्शियस पुढच्या तापमानाला नष्ट होतात - हे माझं इंटरनेट ज्ञान.)rsz_img_20180505_080750.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त लिहिलंय...

मीही दूध फाटले की हे करते. हे इतके मस्त लागते की कधीकधी दूध फाटावे ही इच्छा होते.

तोंपासू!
लिहिलंय पण मस्त. तुमच्या कोट्या चैतन्य वापरू शकेल नित्याच्या पुढच्या भागात Happy

तोंपासू!
लिहिलंय पण मस्त. + ११

तुमच्या कोट्या चैतन्य वापरू शकेल नित्याच्या पुढच्या भागात >>>>> काही काही अगदी इराची वाक्य वाटतायेत . बाकी आवडत नसल्याने , पदार्थाला माझा पास.

हायला सोप्पंय कि मग हे !! दिसतंय पण भारीच .. कधी कधी दूध तापवताना ढॉ s म् असा आवाज येतो तेव्हासाठी हे लक्षात ठेवायला हवं ! Wink

आज आमच्याकडे ही दुधाचे हे नाटक घडले. ह्या धाग्याची लगेच आठवण आली आणि त्याचा कलाकंद जन्माला आला ही. मस्तच लागतोय.

मनस्विता, थँक यू.

आज आमच्याकडे ही दुधाचे हे नाटक घडले. ह्या धाग्याची लगेच आठवण आली आणि त्याचा कलाकंद जन्माला आला ही. मस्तच लागतोय. >> तुमच्या सारख्या सुगरणी कडून अशी दाद मिळाल्याने फारच आनंद झाला.

आज आमच्याकडे ही दुधाचे हे नाटक घडले. ह्या धाग्याची लगेच आठवण आली आणि त्याचा कलाकंद जन्माला आला ही. मस्तच लागतोय. >> तुमच्या सारख्या सुगरणी कडून अशी दाद मिळाल्याने फारच आनंद झाला. >> Bw ए मी काही फार एक्स्पर्ट वैगेरे नाही ग

मस्त.