Playing Marbles अर्थात आपल्या गोट्या.....

Submitted by Shilpa१ on 30 April, 2018 - 08:39

Palying Marbles.jpg

Playing Marbles: 50x80cm अर्थात आपल्या गोट्या.....

ज्या पूर्वी आपण घरात, रस्त्यावर खेळायचो आजकाल आपल्या कामाच्या ठिकाणीपण खेळतो :)... या पेंटिंग मध्ये हेच तीन रंग घेण्याचे काही कारण आहे. हे रंग घेताना मी त्या त्या रंगांच्या गुणधर्मांचा विचार केला. तुम्हाला जो रंग आवडतो त्यानुसार तुमची पेर्सोनालिटी ठरते (म्हणे ). त्यानुसार काहीसा विचार करून मुद्दाम निळ्या रंगाची balanced गोटी मध्यभागी रंगवली. खरे तर गोट्या खेळणे हा माझा प्रांत कधीच नव्हता पण तरीही रंगबिरंगी गोट्या मला तेंव्हाही आवडायच्या आणि आताही. आजही उगीचच मी खूप सगळ्या गोट्यांचा संग्रह केलेला आहे आणि त्यांच्या छटा , आतील बुडबुडे, रंगांमधील बारीक-सारीक बदल अजूनही मला बघायला आवडतात, त्यातील छटांमधे मग्न व्हायला होतं.

कदाचित गोट्यांशी निगडित अश्या तुम्हा सर्वांच्या खूप काही आठवणी असतील , असल्या तर नक्की share करा इथे. न जाणो त्यातून मला/अजून कुणाला एखादा विषय मिळेल लिहायला किंवा काही आर्ट सुरु करायला. आणि तुम्ही या personality traits मध्ये कुठे बसत असाल तरी त्याचा प्रामाणिकपणे विचार करू शकता. जरुरी नाही कि हे सगळे सर्वांनाच जसेच्या तसे लागू होईल, आपली personality खूप सगळ्या वेगवेगळ्या traitsनी बनलेली असूच शकते. यावर असाच विश्वास ठेवावा कि नाही हे हि ज्याचे त्याने ठरवावे पण याचा विचार करून आपण कुठे बसतो हे बघणे हा एक मजेचा भाग असू शकेल नाही का ?!. आणि काही प्रमाणात तरी self analysis करायला आणि त्यानुसार आपल्यात हवे ते बदल करण्यासाठी रंगांची मदत होऊ शकतेच ना !!

वरील पेंटिंगमधील गोट्यांच्या रंगांची मला माहिती असणारी ढोबळ वैशिट्ये खालीलप्रमाणे:

Yellow- You are fun loving, cheerful modern, creative, good at networking but you are impulsive & critical, bitter and sharp-tongued. You can be stubborn, arrogant, pretentious and snobbish.

Blue- You are a balancing person. You are reliable and trustworthy, You are not at all impulsive or spontaneous. You take time to think, act and share your own feelings ! You are genuine and sincere, and you take your responsibilities seriously.

Red- You are extroverted and optimistic, courageous and confident but you are competitive, impulsive and aggressive. You often exhibit violent temper and may appear egoistic and overconfident

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर चित्र काढलंय. मला तिन्ही गोट्यांचे रंग आवडले. वॉटरकलर वापरलेत का?

आजही उगीचच मी खूप सगळ्या गोट्यांचा संग्रह केलेला आहे आणि त्यांच्या छटा , आतील बुडबुडे, रंगांमधील बारीक-सारीक बदल अजूनही मला बघायला आवडतात, त्यातील छटांमधे मग्न व्हायला होतं. >>> हो! मलाही! एव्हढं की त्या छटा पाहून मला गोटी खावीशी वाटते. Lol गोट्यांना हिंदीत कंचे म्हणतात ना!? कंचे किती गोड शब्द आहे.

थँक्स सचिनजी, हो बरोबर कंचेच म्हणतात हिंदीमधे. असे सगळे shades / छटा मलाही भयंकर (फार वाईट उपमा आहे हि नाही ?) आवडतात:))

नाही , हे ऑइल पेंटिंग आहे कॅनव्हासवर केलेले, ५०x ८० cm चा कॅनव्हास वापरला आहे