भटकंती उत्तरपूर्वीय भारताची...

Submitted by निक्षिपा on 28 April, 2018 - 07:00

पूर्वतयारी_उत्तरपूर्वीय_भारताची - १

एकटीनेच टूरला जाणार!! युहू... हा 'आज में उपर, 'आसाम' निचे' या अवस्थेचा आवेग ओसरल्यावर आणि खरोखरची तयारी करायला घेतल्यावर जाणवतं, फक्त बॅग भरणे म्हणजे सहलीची पूर्वतयारी नाही! आधी मनाचे एकेक कप्पे रिकामे करावे लागतात, त्यातील नाती, जबाबदाऱ्या घडी घालून नीट मार्गी लावाव्या लागतात आणि मग डोकं पूर्ण ताळ्यावर ठेवून सहलीची पूर्वतयारी सुरू करावी लागते!

एक असतं, मनातलं द्वंद्व - माझा मुलगा माझ्याशिवाय दोन आठवडे कसा राहील? इथपासून ओह शीट! तो खरंच आजोळी माझ्याशिवाय आनंदाने राहायला तयार आहे?? कुठे गेले माझ्यावरचे प्रेम??

दुसरं, मनाची चलबिचल - मी निघाल्यावर नवरा दोन दिवसांनी टूरला चाललाय. तो सगळं नीट मॅनेज करेल ना? लाईट पंखे बंद करूनच निघेल ना की पुढचे १० दिवस सगळं चालू???

तिसरं, मॅनेजमेंट - पेपरवाला, दूधवाला, इस्त्रीवाला, कुटुंबसखी यांना सुट्टी द्यायचीये. सासऱ्यांचे पथ्याचे जेवण, सासूची औषधं, मुलाची उनाड सुट्टी, नवऱ्याची टूर हे सगळं मी नसताना मार्गी लावायचंय... How??

अशी अनेक मानसिक आंदोलनं पेलत सगळं मॅनेज करणे ही असते एका लेडी सोलो ट्रॅव्हलरची पूर्वतयारी..?hahaha
बॅग भरणं ही तर खूप दूरची गोष्ट आहे!!

©स्मृती
#SoloTravel #NorthEastIndia #PackingandPreparations #LivetheFullest

Group content visibility: 
Use group defaults

एवढा छोटा भाग ?
एका माऊसस्क्रोल मध्येच संपला लेख !
---
पु.भा.प्र.

छान सुरुवात. नॉर्थ ईस्ट्बद्दल वाचायची उत्सुकता आहे.

मस्त सुरुवात निक्षीपा. मंजूताई, तुमच्या अनुभवाच्या पोतडीतून काय काय निघेल ही उत्सुकता आहे.