अ‍ॅव्हेंजर - इन्फिनिटी वॉर (थोडासा स्पॉयलर)

Submitted by दत्तू on 27 April, 2018 - 06:56

1 May 2008 रोजी टोनी स्टार्क "आर्यन मॅन" बनुन प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्या चित्रपटापासून "इन्फिनिटी वॉर"ची सुरुवात झाली. तब्बल १० वर्षांचा अवधी आणि १७ चित्रपटांच्या माध्यमातून इन्फिनिटी वॉरच्या साखळ्या जोडल्या गेल्या आहे. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा एका संकल्पनेवर काम करण्यात आले आहे. प्रत्येक चित्रपटातून एक कडी घेऊन इन्फिनिटी वॉरची जमीन तयार केली गेली. एक एक कॅरेक्टर, घटना यांचा संबंध शेवटी "इन्फिनिटी वॉर" मध्ये एकत्र आणला आहे. मार्व्हल कॉमिक्स चित्रपटांमधे सर्वात महत्त्वाचा चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल.
प्रचंड भव्य आणि १०-१५ सुपर हिरो एकाच चित्रपटात येणे ही सुपरहीरो चित्रपटांच्या प्रेक्षकांसाठी "शेकडो लज्जतदार पदार्थांनी भरलेली राजेशाही थाळी आहे"

तर..

याआधीच्या चित्रपटात "Thor: Ragnarok" दाखवल्याप्रमाणे अ‍ॅसगार्ड आणि म्युनिर नष्ट होऊन सगळ्यांना थोर पृथ्वीवर घेऊन येत असतो. त्याला वाटेत "थॅनोज्/थॅनोस" नामक महाप्रचंड सुपरडुपर व्हिलन गाठतो. थॅनोसला सगळ्या ब्रम्हांडावर राज्य करायचे आहे. (राज्य म्हणण्याऐवजी ते 'संतुलित ठेवायचे आहे' असे म्हणणे योग्य ठरेल) त्यासाठी त्याला इन्फिनिटी स्टोन हवे असतात. हे स्टोन ६ शक्तींचे प्रतिनिधित्व करतात.

१) टेस्सरॅक्ट ( अंतराळ स्टोन) (हा स्टोन कॅप्टन अमेरिका- फर्स्ट अव्हेंजर आणि अ‍ॅव्हेंजर-१ चित्रपटात दाखवला आहे) = या स्टोनच्या वापराने अंतराळातील इतर आयाम उघडता येतात, कुठल्याही स्थानी टेलिपोर्टच्या माध्यमातूनप्रवास करता येतो. भौतिक शास्त्राचे नियम या स्टोनच्या मदतीने सहज तोडता येतात. सध्या हा स्टोन लॉकी ने अ‍ॅसगार्डच्या तळघरातून चोरलेला आहे

२) द ओर्ब (शक्ती स्टोन) ( हा स्टोन गॅलक्सी ऑफ गार्डियन्स-१ चित्रपटात दाखवला आहे)= कुठली शक्तीला दुप्पट करण्याची क्षमता या स्टोन मधे आहे. इतर स्टोनची शक्ती या स्टोन मुळे सहज नियंत्रित केली जाऊ शकते. तसेच इतर शक्तींचा प्रतिकार करण्यात हा स्टोन मदत करतो. सध्या हा स्टोन नोवा ग्रहावर सुरक्षित ठेवलेला आहे

३) अ‍ॅथर (वर्तमान स्टोन) = हा स्टोन थोर- डार्क वर्ल्ड मधे दाखवला गेला आहे.)= या स्टोनमुळे आपल्या इच्छा पुर्ण होण्यास मदत मिळते.याच्या द्वारे आपल्या इच्छेद्वारे एक आभासी दुनिया निर्माण करता येते. सध्या हा स्टोन कलेक्टर नामक एका वस्तुसंग्रहाकाकडे आहे.

४) स्केप्टर ( मानसिक स्टोन) = (हा स्टोन अ‍ॅव्हेन्जर्स -अल्ट्रोन या चित्रपटात पाहिला आहे.) = या स्टोन मुळे समोरच्या व्यक्तीवर नियंत्रण मिळावता येते. याने मेंदूची क्षमता कैकपटीने वाढते व त्याने मोठ्याप्रमाणात ज्ञान हस्तगत केले जाऊ शकते जे सामान्य व्यक्तींना शक्य नाही. हा लॉकीच्या छडीमधे होता जो अल्ट्रोन रोबोटने काढून "व्हिजन" या नविन सुपरहिरोच्या माथी लावला आहे. सध्या तो त्याच्याजवळ आहे

५) आय ऑफ अगामोटो/ टाईमस्टोन)= हा स्टोन डॉक्टर स्ट्रेंज या चित्रपटात दाखवला आहे = या स्टोन मुळे ब्रम्हांडातील काळावर नियंत्रण ठेवता येते. वेळ हवी तशी मागेपुढे करून थांबवून हवे ते करता येते. सध्या हा स्टोन डॉक्टर स्ट्रेंजच्या गळ्यातील लॉकेट मधे आहे.

६) सोअल स्टोन (आत्मा स्टोन) - हा स्टोन अजुन कुठल्या चित्रपटात दाखवला गेला नाही= याने आत्मा नियंत्रित केली जाते. कुणालाही एकसाथ नष्ट करणे, जिवंत करणे इ. यास्टोन द्वारे नियंत्रित होतात. विश्वातील प्रत्येक आत्मा या स्टोन ने जोडली गेली आहे.

या सर्वशक्तीमान स्टोनच्या मागे महाशक्तीशाली थॅनोस लागलेला आहे. ब्रम्हांडावर नियंत्रण मिळवुन त्यात समतोल साधण्याचे त्याचे उदिष्ट आहे. त्यासाठी तो वाट्टेल ते करतो. ग्रह नष्ट करणे, त्यावरचे जनजीवन नष्ट करणे, निसर्ग नष्ट करून पुन्हा नविन उभा करणे इ. कामाद्वारे त्याला वाटते की आपण समतोल साधत आहे. या त्याच्या वेडेपणातून स्वतःचा ग्रह "टायटन" देखील सुटला नाही. हल्क आणि थोर यांना पराभूत करून तो त्यांना अंतराळात फेकून देतो. अ‍ॅसगार्डचा पेहरेदार हैम्डल हल्क ला त्याच्या शक्तीद्वारे पृथ्वीवर पाठवून देतो. परंतू थोरची मदत करता येत नाही. थोर अंतराळात फिरत असताना गॅलक्सी ऑफ गार्डियन या टिम ला सापडतो.
तिकडे हल्क पृथ्वीवर स्ट्रेंजच्या घरात आदळतो. थॅनोसचे स्टोनच्या मागे असणे व त्यासाठी तो पृथ्वीवर देखील येणार आहे हे हल्क डॉक्टर आणि टोनी यांना सांगतो. त्यादरम्यान थॅनोसची लोक पृथ्वीवर माईंडस्टोन आणि टाईमस्टोनसाठी पोहचतात. आर्यन मॅन , डॉ. स्ट्रेंज, हल्क आणि स्पायडरमॅन हे एका टीमला भिडतात. तर दुसरी टीम व्हिजन , वांडा, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक विडो यांना भिडते. पृथ्वीवर आलेले हे संकट सगळ्या सुपरहिरोंना एकत्रित आणते. पहिल्या टिमचा पाठलाग करत करत आर्यन मॅन स्ट्रेंज स्पायडर मॅन हे टायटन ग्रहावर थॅनोसला रोखण्यासाठी पोहचतात. तर दुसर्‍या टीमचा पराभव कॅप्टन करतो. माईंड स्टोन ला थॅनोस हाती पडण्याआधी नष्ट करण्यासाठी कॅप्टन व्हिजनला "वकांडा"ला घेऊन जातो. पृथ्वीवर हल्ले एकामागोमाग एक होत राहतात.
थोर थॅनोसविरोधात मदत मिळ्वण्याकरीता रॉकेट व ग्रुट यांना घेऊन एका ग्रहावर जातो. तर गार्डियन्स थॅनोसला रोखण्यासाठी टायटनवर येतात.

थॅनोसला स्टोन मिळतात का? पृथ्वीवर होणारे हल्ले सुपरहिरो परतून लावण्यात यशस्वी होतात का? थॅनोस आणि ग्मोअराचे काय नाते आहे.? या युध्दाचे काय परिणाम होतात? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चित्रपट बघायला हवा.

तुम्ही जर प्रत्येक चित्रपट बघत आला असाल तर हा मस्ट वॉच चित्रपट आहे. एकेक कॅरेक्टरचा बारकाईने अभ्यास करून कमीत कमी दृष्यांमधे त्या कॅरेक्टरचे बॅकग्राऊंड, त्याचे वागणे इ स्पष्ट केले आहे. थॅनोस सुपरडुपर व्हिलन असुन देखील त्याच्या कृत्यांमागे काय उद्देश आहे, तो नेमका आहे कसा हे सर्वकाही व्यवस्थित दाखवले आहे. १५-२० सुपरहिरो असुन सुध्दा प्रत्येकाला व्यवस्थित जागा दिलेली आहे. कुठेही गर्दी झालेली वाटत नाही. सगळ्यांची एंट्री साधी असुन ही ऐन मोक्याच्या क्षणी आल्याने प्रचंड भाव खाऊन जाते. थोर्,हल्क, थॅनोस, स्पायडी यांचे प्रवेश दिमाखदार झाले आहे परंतू सर्वात इफेक्टीव्ह मात्र कॅप्टन अमेरिका - स्टिव्ह रॉजर याची एंट्री आहे. तो जसा पडद्यावर येतो तसे एक पॉझेटीव्ह वातावरण तयार झाल्यासारखे वाटते. आशा निर्माण होते.

चित्रपटाचे अ‍ॅनिमेशन अव्वल दर्जाचे आहे यात वाद नाही. चित्रपटाची पटकथा देखील वेगवान ठेवली आहे. एकामागोमाग एक घटना विविध ठिकाणी घडत आहे तरी प्रेक्षकांना गोंधळायला होत नाही. डायलॉग एकसेएक आहे पंचलाईन योग्य जागी ठेवून दिल्या आहे. धक्कातंत्र प्रत्येक सीन नंतर अनुभवायला मिळतो. सुरुवातीला प्रत्येक सीन वर किंचाळून चिअर्स करणारा प्रेक्षकवर्ग हळूहळू शांत होतो. शेवटीशेवटी तर हाऊसफुल्ल असलेल्या सिनेमागृहात "पिनड्रॉप" शांतता होते. ही या चित्रपटाची खरी ताकद आहे. प्रत्येक प्रेक्षक पडद्यावर चाललेल्या अंतिम युध्दात मनापासून सहभागी होतात. लढाईत कधी पारडे सुपरहिरोंकडे झुकते तर कधी थॅनॉसकडे.. प्रत्येक वेळी एक सप्राईज अ‍ॅलिमेंट येऊन लढाईची बाजू पलटवतो. हि रंगत उत्तरोउत्तर वाढत जाते. समोर दिसत असुन देखील "पुढे काय" हा प्रश्न मनात आपसुक येतो. मनात अपेक्षित असलेले मांडलेले गणित सारखे खोडावे लागते.

अतिभव्य आणि शेकडो कलाकारांना घेऊन त्यांच्यात योग्य समतोल साधून चित्रपट निर्मिती कशी करावी याचा एक आदर्श धडा याचित्रपटातून मिळतो. आपल्या इथे केवळ दोन हिरो अथवा हिरोईन जरी असल्यातर त्यांचे नखरे कॅटफाईट वगैरे सांभाळता सांभाळता दिग्दर्शक निर्मात्यांच्या नाकीनऊ येतात. इथे तर २०-३० मुख्य कलाकार आहे.

जाताजाता :- चित्रपटाच्या क्रेडीट्स नाव वाचावी. शेकडो भारतीयांची नावांचा समावेश विविध फिल्डमधे आहे. प्रोडक्शन लाईनपासून ते अ‍ॅनिमेशन, साऊंड एडिटींग पर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी एक-एक-दोन-दोन तरी नाव वाचली आहे. आणि अजुन एक........... क्रेडीट्स संपल्यानंतरचा दाखवलेला सीन चुकवू नका. मोठे सप्राईज आहे.

महाभारत विषयावर या भव्यतेत चित्रपट बनला असता तर जगभरात प्रचंड गाजला असता. या लोकांनीच या महाकाव्यावर चित्रपट बनवावा ही इच्छा...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>अर्धे अ‍ॅसगार्डियन यांना मारले आहे. थॉर रॉकेटला सांगतो.
Submitted by दत्तू>>
अहो भले थॉर आणि रॉकेट मधले डायलॉग्स काहीही असो पण technically आपल्याला दिसतंय आणि माहित आहे ना कि थॉर ragnarok मध्ये जेवढे उरले सुरले asguardians होते ते त्या ship वरच होते आणि थेनॉस ने ती ship पूर्णच उध्वस्त केली. त्यामुळे त्यात कोणीही वाचणार नाही अर्थात जर ते सगळे थॉर सारखे नसतील तर..
फिल्मच्या प्लॉटनुसार थॉर ने रॉकेट ला सांगितलेली माहिती कदाचित PIS (plot induced stupidity) or cinema sin सुद्धा असू शकते, म्हणजेच फिल्म मधली directors कडून झालेली एखादी चूक सुद्धा असू शकते.

Pages