अ‍ॅव्हेंजर - इन्फिनिटी वॉर (थोडासा स्पॉयलर)

Submitted by दत्तू on 27 April, 2018 - 06:56

1 May 2008 रोजी टोनी स्टार्क "आर्यन मॅन" बनुन प्रेक्षकांच्या भेटीस आला. त्या चित्रपटापासून "इन्फिनिटी वॉर"ची सुरुवात झाली. तब्बल १० वर्षांचा अवधी आणि १७ चित्रपटांच्या माध्यमातून इन्फिनिटी वॉरच्या साखळ्या जोडल्या गेल्या आहे. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर पहिल्यांदा एका संकल्पनेवर काम करण्यात आले आहे. प्रत्येक चित्रपटातून एक कडी घेऊन इन्फिनिटी वॉरची जमीन तयार केली गेली. एक एक कॅरेक्टर, घटना यांचा संबंध शेवटी "इन्फिनिटी वॉर" मध्ये एकत्र आणला आहे. मार्व्हल कॉमिक्स चित्रपटांमधे सर्वात महत्त्वाचा चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल.
प्रचंड भव्य आणि १०-१५ सुपर हिरो एकाच चित्रपटात येणे ही सुपरहीरो चित्रपटांच्या प्रेक्षकांसाठी "शेकडो लज्जतदार पदार्थांनी भरलेली राजेशाही थाळी आहे"

तर..

याआधीच्या चित्रपटात "Thor: Ragnarok" दाखवल्याप्रमाणे अ‍ॅसगार्ड आणि म्युनिर नष्ट होऊन सगळ्यांना थोर पृथ्वीवर घेऊन येत असतो. त्याला वाटेत "थॅनोज्/थॅनोस" नामक महाप्रचंड सुपरडुपर व्हिलन गाठतो. थॅनोसला सगळ्या ब्रम्हांडावर राज्य करायचे आहे. (राज्य म्हणण्याऐवजी ते 'संतुलित ठेवायचे आहे' असे म्हणणे योग्य ठरेल) त्यासाठी त्याला इन्फिनिटी स्टोन हवे असतात. हे स्टोन ६ शक्तींचे प्रतिनिधित्व करतात.

१) टेस्सरॅक्ट ( अंतराळ स्टोन) (हा स्टोन कॅप्टन अमेरिका- फर्स्ट अव्हेंजर आणि अ‍ॅव्हेंजर-१ चित्रपटात दाखवला आहे) = या स्टोनच्या वापराने अंतराळातील इतर आयाम उघडता येतात, कुठल्याही स्थानी टेलिपोर्टच्या माध्यमातूनप्रवास करता येतो. भौतिक शास्त्राचे नियम या स्टोनच्या मदतीने सहज तोडता येतात. सध्या हा स्टोन लॉकी ने अ‍ॅसगार्डच्या तळघरातून चोरलेला आहे

२) द ओर्ब (शक्ती स्टोन) ( हा स्टोन गॅलक्सी ऑफ गार्डियन्स-१ चित्रपटात दाखवला आहे)= कुठली शक्तीला दुप्पट करण्याची क्षमता या स्टोन मधे आहे. इतर स्टोनची शक्ती या स्टोन मुळे सहज नियंत्रित केली जाऊ शकते. तसेच इतर शक्तींचा प्रतिकार करण्यात हा स्टोन मदत करतो. सध्या हा स्टोन नोवा ग्रहावर सुरक्षित ठेवलेला आहे

३) अ‍ॅथर (वर्तमान स्टोन) = हा स्टोन थोर- डार्क वर्ल्ड मधे दाखवला गेला आहे.)= या स्टोनमुळे आपल्या इच्छा पुर्ण होण्यास मदत मिळते.याच्या द्वारे आपल्या इच्छेद्वारे एक आभासी दुनिया निर्माण करता येते. सध्या हा स्टोन कलेक्टर नामक एका वस्तुसंग्रहाकाकडे आहे.

४) स्केप्टर ( मानसिक स्टोन) = (हा स्टोन अ‍ॅव्हेन्जर्स -अल्ट्रोन या चित्रपटात पाहिला आहे.) = या स्टोन मुळे समोरच्या व्यक्तीवर नियंत्रण मिळावता येते. याने मेंदूची क्षमता कैकपटीने वाढते व त्याने मोठ्याप्रमाणात ज्ञान हस्तगत केले जाऊ शकते जे सामान्य व्यक्तींना शक्य नाही. हा लॉकीच्या छडीमधे होता जो अल्ट्रोन रोबोटने काढून "व्हिजन" या नविन सुपरहिरोच्या माथी लावला आहे. सध्या तो त्याच्याजवळ आहे

५) आय ऑफ अगामोटो/ टाईमस्टोन)= हा स्टोन डॉक्टर स्ट्रेंज या चित्रपटात दाखवला आहे = या स्टोन मुळे ब्रम्हांडातील काळावर नियंत्रण ठेवता येते. वेळ हवी तशी मागेपुढे करून थांबवून हवे ते करता येते. सध्या हा स्टोन डॉक्टर स्ट्रेंजच्या गळ्यातील लॉकेट मधे आहे.

६) सोअल स्टोन (आत्मा स्टोन) - हा स्टोन अजुन कुठल्या चित्रपटात दाखवला गेला नाही= याने आत्मा नियंत्रित केली जाते. कुणालाही एकसाथ नष्ट करणे, जिवंत करणे इ. यास्टोन द्वारे नियंत्रित होतात. विश्वातील प्रत्येक आत्मा या स्टोन ने जोडली गेली आहे.

या सर्वशक्तीमान स्टोनच्या मागे महाशक्तीशाली थॅनोस लागलेला आहे. ब्रम्हांडावर नियंत्रण मिळवुन त्यात समतोल साधण्याचे त्याचे उदिष्ट आहे. त्यासाठी तो वाट्टेल ते करतो. ग्रह नष्ट करणे, त्यावरचे जनजीवन नष्ट करणे, निसर्ग नष्ट करून पुन्हा नविन उभा करणे इ. कामाद्वारे त्याला वाटते की आपण समतोल साधत आहे. या त्याच्या वेडेपणातून स्वतःचा ग्रह "टायटन" देखील सुटला नाही. हल्क आणि थोर यांना पराभूत करून तो त्यांना अंतराळात फेकून देतो. अ‍ॅसगार्डचा पेहरेदार हैम्डल हल्क ला त्याच्या शक्तीद्वारे पृथ्वीवर पाठवून देतो. परंतू थोरची मदत करता येत नाही. थोर अंतराळात फिरत असताना गॅलक्सी ऑफ गार्डियन या टिम ला सापडतो.
तिकडे हल्क पृथ्वीवर स्ट्रेंजच्या घरात आदळतो. थॅनोसचे स्टोनच्या मागे असणे व त्यासाठी तो पृथ्वीवर देखील येणार आहे हे हल्क डॉक्टर आणि टोनी यांना सांगतो. त्यादरम्यान थॅनोसची लोक पृथ्वीवर माईंडस्टोन आणि टाईमस्टोनसाठी पोहचतात. आर्यन मॅन , डॉ. स्ट्रेंज, हल्क आणि स्पायडरमॅन हे एका टीमला भिडतात. तर दुसरी टीम व्हिजन , वांडा, कॅप्टन अमेरिका, ब्लॅक विडो यांना भिडते. पृथ्वीवर आलेले हे संकट सगळ्या सुपरहिरोंना एकत्रित आणते. पहिल्या टिमचा पाठलाग करत करत आर्यन मॅन स्ट्रेंज स्पायडर मॅन हे टायटन ग्रहावर थॅनोसला रोखण्यासाठी पोहचतात. तर दुसर्‍या टीमचा पराभव कॅप्टन करतो. माईंड स्टोन ला थॅनोस हाती पडण्याआधी नष्ट करण्यासाठी कॅप्टन व्हिजनला "वकांडा"ला घेऊन जातो. पृथ्वीवर हल्ले एकामागोमाग एक होत राहतात.
थोर थॅनोसविरोधात मदत मिळ्वण्याकरीता रॉकेट व ग्रुट यांना घेऊन एका ग्रहावर जातो. तर गार्डियन्स थॅनोसला रोखण्यासाठी टायटनवर येतात.

थॅनोसला स्टोन मिळतात का? पृथ्वीवर होणारे हल्ले सुपरहिरो परतून लावण्यात यशस्वी होतात का? थॅनोस आणि ग्मोअराचे काय नाते आहे.? या युध्दाचे काय परिणाम होतात? इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चित्रपट बघायला हवा.

तुम्ही जर प्रत्येक चित्रपट बघत आला असाल तर हा मस्ट वॉच चित्रपट आहे. एकेक कॅरेक्टरचा बारकाईने अभ्यास करून कमीत कमी दृष्यांमधे त्या कॅरेक्टरचे बॅकग्राऊंड, त्याचे वागणे इ स्पष्ट केले आहे. थॅनोस सुपरडुपर व्हिलन असुन देखील त्याच्या कृत्यांमागे काय उद्देश आहे, तो नेमका आहे कसा हे सर्वकाही व्यवस्थित दाखवले आहे. १५-२० सुपरहिरो असुन सुध्दा प्रत्येकाला व्यवस्थित जागा दिलेली आहे. कुठेही गर्दी झालेली वाटत नाही. सगळ्यांची एंट्री साधी असुन ही ऐन मोक्याच्या क्षणी आल्याने प्रचंड भाव खाऊन जाते. थोर्,हल्क, थॅनोस, स्पायडी यांचे प्रवेश दिमाखदार झाले आहे परंतू सर्वात इफेक्टीव्ह मात्र कॅप्टन अमेरिका - स्टिव्ह रॉजर याची एंट्री आहे. तो जसा पडद्यावर येतो तसे एक पॉझेटीव्ह वातावरण तयार झाल्यासारखे वाटते. आशा निर्माण होते.

चित्रपटाचे अ‍ॅनिमेशन अव्वल दर्जाचे आहे यात वाद नाही. चित्रपटाची पटकथा देखील वेगवान ठेवली आहे. एकामागोमाग एक घटना विविध ठिकाणी घडत आहे तरी प्रेक्षकांना गोंधळायला होत नाही. डायलॉग एकसेएक आहे पंचलाईन योग्य जागी ठेवून दिल्या आहे. धक्कातंत्र प्रत्येक सीन नंतर अनुभवायला मिळतो. सुरुवातीला प्रत्येक सीन वर किंचाळून चिअर्स करणारा प्रेक्षकवर्ग हळूहळू शांत होतो. शेवटीशेवटी तर हाऊसफुल्ल असलेल्या सिनेमागृहात "पिनड्रॉप" शांतता होते. ही या चित्रपटाची खरी ताकद आहे. प्रत्येक प्रेक्षक पडद्यावर चाललेल्या अंतिम युध्दात मनापासून सहभागी होतात. लढाईत कधी पारडे सुपरहिरोंकडे झुकते तर कधी थॅनॉसकडे.. प्रत्येक वेळी एक सप्राईज अ‍ॅलिमेंट येऊन लढाईची बाजू पलटवतो. हि रंगत उत्तरोउत्तर वाढत जाते. समोर दिसत असुन देखील "पुढे काय" हा प्रश्न मनात आपसुक येतो. मनात अपेक्षित असलेले मांडलेले गणित सारखे खोडावे लागते.

अतिभव्य आणि शेकडो कलाकारांना घेऊन त्यांच्यात योग्य समतोल साधून चित्रपट निर्मिती कशी करावी याचा एक आदर्श धडा याचित्रपटातून मिळतो. आपल्या इथे केवळ दोन हिरो अथवा हिरोईन जरी असल्यातर त्यांचे नखरे कॅटफाईट वगैरे सांभाळता सांभाळता दिग्दर्शक निर्मात्यांच्या नाकीनऊ येतात. इथे तर २०-३० मुख्य कलाकार आहे.

जाताजाता :- चित्रपटाच्या क्रेडीट्स नाव वाचावी. शेकडो भारतीयांची नावांचा समावेश विविध फिल्डमधे आहे. प्रोडक्शन लाईनपासून ते अ‍ॅनिमेशन, साऊंड एडिटींग पर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी एक-एक-दोन-दोन तरी नाव वाचली आहे. आणि अजुन एक........... क्रेडीट्स संपल्यानंतरचा दाखवलेला सीन चुकवू नका. मोठे सप्राईज आहे.

महाभारत विषयावर या भव्यतेत चित्रपट बनला असता तर जगभरात प्रचंड गाजला असता. या लोकांनीच या महाकाव्यावर चित्रपट बनवावा ही इच्छा...

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>>>>>>>>>चित्रपटाच्या क्रेडीट्स नाव वाचावी. शेकडो भारतीयांची नावांचा समावेश विविध फिल्डमधे आहे. प्रोडक्शन लाईनपासून ते अ‍ॅनिमेशन, साऊंड एडिटींग पर्यंत जवळपास सर्वच ठिकाणी एक-एक-दोन-दोन तरी नाव वाचली आहे. <<<<<<<<<<

म्हणजे हा चित्रपट पाहण्याआधी इतर चित्रपट बघावे लागतील का?
क्रोनोलॉजीनुसार यादी द्या त्या चित्रपटांची. म्हणजे संगतवार बघता येतील. नाहीतर हे महाकाव्य आम्हाला अभिमन्यू करुन टाकायचं...

सुरुवात वाचूनच गरगरले

माझ्यासाठी अ‍ॅवेंजरची ओळख म्हणजे माझा भाचा सारखे माझ्याकडून पैसे घेऊन काहितरी घेऊन येतो. कधी किचेन, कधी टिशर्ट, कधी हातोडा (खेळण्यातला). हे सगळे या अ‍ॅवेंजर मालिकेतले आहेत.

होय, तजो
आधीची किमान जुजबी माहीती हवी. अन्यथा कोण कुणाचे ठाऊक नाही आणि डायरेक्ट रणांगणावर उडी मारण्याचा प्रकार Happy
इतके हिरो आहे की पहिल्यांदा बघणारा "च्यामायला हे बेण कुठून आलं?" नक्की विचारेल Rofl

टवणे

थोर चा हतोडा " रॅगनॅरोक" चित्रपटात फुटला..

छान लिहिले आहात. Happy मस्त आहे चित्रपट. वैश्विक पातळीवरची भव्यदिव्यता दाखवताना ती दृश्ये अतितांत्रिक होण्याची भीती असते. सुदैवाने तसे इथे झालेले नाही (किंवा प्रमाण कमी आहे) म्हणून चित्रपट खरंच सुंदर झालाय. मी हिंदी व्हर्जन पाहिले. पूर्वी जे हिंदी व्हर्जन्स येत असत ते भाषांतर असे. त्यापेक्षा इंग्लिश बघितलेला परवडला अशी अवस्था Lol पण आजकाल खूपच सुधरणा झालीये. हिंदी संवाद इतके मस्त चपखल झालेत कि "भारतीय" मानसिकतेला अपील होतात. अनेक ठिकाणी पब्लिक खच्चून शिट्ट्या आणि टाळ्या मारते. यातच कळून येते. याशिवाय पूर्वी बच्चनची एन्ट्री झाल्यावर जसे लोक शिट्ट्या हाणत तसे यात स्पायडरमॅन आणि इतर सुपरहिरोंच्या एन्ट्रीला पब्लिक शिट्ट्या हाणत होते Biggrin भारीच!

बाकी हे सहा स्टोन ची जी कल्पना आहे ते का कुणास ठावूक मला सहा वैश्विक स्थिरांक यावर आधारित आहे असे वाटत होते.

>> क्रेडीट्स संपल्यानंतरचा दाखवलेला सीन चुकवू नका. मोठे सप्राईज आहे.

काल थियेटर मध्ये असताना तुमची हि पोष्ट वाचली असती तर बरे झाले असते. तरी चिरंजीव म्हणाले "अरे असा कसा शेवट? हे तर चीटींग आहे" तेंव्हा कुठेतरी मनात वाटत होते कि असेल काहीतरी पाट्या पडल्यानंतर. त्याला म्हणालो सुद्धा जरा थांबूया. पण कसचे काय. शेवटच्या "पाट्या पडत" असताना नेहमीप्रमाणे आपले पब्लिक उठून चालले होते. त्या प्रवाहात आम्ही पण उठून बाहेर आलो. मग हि पोष्ट वाचली आणि रुखरुख ल्गुन राहिली. असो. आता यु ट्यूब वर बघतो Happy धन्यवाद!

फर्स्ट डे फर्स्ट शो, सकाळी आठ वाजता बघायला गेलो होतो, पिक्चर भन्नाट आहे, जवळ जवळ बावीस सुपरहिरो एकत्र येतात, शेवट अनपेक्षित आहे, पोस्ट एन्ड क्रेडिट सिन बघितला, आता पुढे काय होईल ते सांगता येत नाही.

स्पॉयलर
आता ज्वलंत प्रश्न हा आहे की, पोस्ट एन्ड क्रेडिट सिनमध्ये, निक फ्यूरी कोणाला मेसेज करतो?

भाच्याला घेऊन गेलो होतो सिनेमा बघायला. त्यानं बराच समजावले पण मला काहीही कळले नाही. आमच्या गावतालया थेटरात पब्लिक फुल्ल शिट्ट्या टाळ्या हाणत होतं एकेका एंट्रीला त्यावरून ही सिरीज जामच फेमस आहे हे दिसत होतं. सिनेमा संपल्यावर बाहेर पडणाऱ्या पोरांच्या तोंडावर आजी म्या ब्रह्म पाहिले भाव होते.

पाट्या पडायला लागल्यावर लगेचच सिनेमा बंद केला व बाहेर पडायची दारं उघडली. तेव्हा ती शेवटची काय जी गंमत आहे ती पब्लिकला समजली नाही.

जे कोण कोण मेले ते पाहून भाचा तोंड बारीक करून बसला आहे घरात Happy

काल असेच झाले पाट्या पडताना बंद केले... लोकांनी असा दंगा केला गोंअळ माजवला... पुन्हा सुरू करायला लावला...एकही प्रेक्षक उठून गेला नाही..

मी पाहिला .पण दत्तू यांचा बाफ वाचून न गेल्याने पोस्ट क्रेडिट सीन चुकला . आता काय करावे Uhoh

मला ओके ओके वाटला . म्हणजे वाईट अजिबात नाही पण हाईप केला तितका असा बघून aww झालं नाही . अमोराचा सो कॉल्ड बीएफ स्टार लॉर्ड dumb वाटला .
सगळ्यात मजा संवादामुळे . एकदम क्रिस्पी आहेत काही डायलॉग
दत्तुनी लिहिलेलं तस स्टीव्ह रॉजरच्या एण्ट्री वेळेला थेटर मध्ये दंगा झाला .
थोरची फायटिंगच्या वेळेची एंट्री जबरी आहे . तो hulk त्याच्या नॉन hulk अवतारात आवडला .
ऍनिमेशन पण जबरदस्त आहे .

दत्तू तुम्ही फॅन असाल तर आपण सर्व सिनेमांची यादी लिहू या का? पहिल्या पासून? अर्थात गूगल केल्यास नक्की मिळेल मार्वेल युनिवर्स सर्व बघितले तर ह्या सिनेमातील संदर्भ कळतील. गार्डियन्स ऑफ गॅलॅक्सी मधली ग्यांग येते तेव्हाचे म्युझिक एकदम रॉकिंग आहे कि नाही? आय सो लव्ह देम. त्यात तो रॅबिट फॉक्स आणि डोनट सारखी स्पेसशिप.
मी आता पहिल्या पासून परत बघायला सुरू करणार. इथे परत बघायचा प्लॅन आहे ठाण्यात आय मॅक्स थ्रीडी मध्ये. जमल्यास एक तारखेला सुट्टी आहे ना. तेव्हा जाईन. किती लांब्डा सिनेमा आहे. वकांडातील मारामारी पण क्लास आहे.
थॅनोस पोरीसाठी बारकी वाटीत खाउ घेउन येतो तेव्हा अगदी भरून आले.

मी सिंगापुरात पाहिला. तिथे इंटर्व्हल नाही. व रा ष्ट्रगीतासाठी उभे राहणे नाही त्यामुळे जरा चुकल्या चुकल्या सारखे झाले. पण जाहिराती आपल्या इथल्या सारख्याच विनोदी आहेत. गोड गोड चिनीबाळे वगैरे. माझ्या शेजारी एक अगदी वयस्कर चिनी आजोबा एकटेच आले होते. अगदी वाक्यावाक्याला खुदुखुदू हसत मध्ये रडत वगैरे होते. मागे रो वर तरूण पब्लिक बसले होते ते पण शेवट परेन्त बसून लास्ट सीन बघूनच उठले. पब्लिक फुल्टू रिस्पॉन्स देत होती.
चिनी सबटायटल्स. ग्लोबल रीच बघून अगदी मस्त वाटले.

आयर्न मॅनच्या नव्या ड्रेस चे डिझाइन नॅनो टेक्नोलोजीने केले आहे!!!! हाइट ना.
जाला वर भरपूर मीम आली आहेत. एक फार विनोदी वाटले. स्ट्रेंज थॅनोस ला टाइम स्टोन देतो तर वर कॅप्शन आहे
थॅनोस म्हणतो जरा पोट बिघ डले आहे. तर डॉ. म्हणतो हा घे पुदीन हरा!!!! एलोल एलोल.

चांगला आहे सिनेमा. प्रत्येक हीरोच्या एन्ट्रीला शिट्ट्या वगैरे... एकदम माहोल Happy सगळ्या सुपरहीरोजची बांधणी खरंच मस्त केली आहे. थ्री-डीचा आणि स्टोन्सच्या प्रॉपर्टीजचा आणखी चांगला वापर करता आला असता असं वाटलं.
शेवटच्या सीनकरता फार वेळ थांबावे लागते बाबा.. क्रेडिट लिस्टमध्ये ५००० नावं तरी असतील! पण एकदम उत्सुकता क्रियेट करणारा शेवट आहे... या सिनेमाचा सिक्वेल यायच्या आधी शेवटाच्या सीनवर एक सेपरेट सिनेमा येईल आणि मग याच्याशी जोडतील असा बच्चेकंपनीचा अंदाज आहे. त्यांना काय, कितीही सिनेमे आले तरी कमीच आहेत या सिरीजमधले Happy

मस्त लिहीले आहे. छान माहिती. आयर्न मॅन पाहिला होता पण नंतर सतत सुपरहीरोज चा मारा सुरू झाल्यावर कॅच अप करणे अवघड झाले होते. आता जरा नीट पाहायला हवेत. पॅकेजिंग मस्त असते हे आयर्न मॅन मधे जाणवले होते.

हे सगळे मार्व्हलचेच सुपरहीरोज असतात का? डीसी कॉमिक्स वाले वेगळे का? तो एक डेडपूल यात दिसत नाही.

अमा म्हणतात तसे A beginner's guide to superheroes कोणीतरी लिहायला हवे इथे Happy

छान माहिती दत्तू, धन्यवाद. 'गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी' एकही भाग न पाहिल्यामुळे व शेवटचा थॉरपट मिसल्यामुळे मला ही थोडाफार नव्हता झेपत मधे मधे...
<<हे सगळे मार्व्हलचेच सुपरहीरोज असतात का? डीसी कॉमिक्स वाले वेगळे का? तो एक डेडपूल यात दिसत नाही.>>> हो फा, मार्व्हल स्टुडीओच्या सिनेमात त्यांचेच हिरो, हिरविणी. यांच्या सुपरहिरोंच्या 'अ‍ॅव्हेंजर' टीम सारखी त्यांची 'जस्टीस लीग' नावाची समांतर सुरु आहे.
<<अमा म्हणतात तसे A beginner's guide to superheroes कोणीतरी लिहायला हवे इथे >>> अगदी अगदी +१११
हे मार्व्हल वाले काय सगळ्या सुपरहिरोंच्या सिरीज कंन्क्लूड करायलेत का? तिकडे तो क्ष-मानवांतला फेवरेट 'वूल्व्हरीन' पण संपवला आणि इकडे हे असं... Sad

दत्तू - लिहा. आवडेल वाचायला.

अजब - धन्यवाद. आता जरा लेन्स फिरवताना चित्र क्लिअर होते तसे थोडे झाले Happy

मार्वल युनिवर्समधला एकनएक चित्रपट पाहिलेला असल्याने हा चुकवणे शक्य नव्हतेच. पण तरी "वो मजा नही आया".

त्याला काही कारणे आहेतः
१. हा चित्रपट २ भागात येणार हे आधीच कळाले होते, त्यामूळे चित्रपटाचा शेवट हा खरेतर सेकंड अ‍ॅक्ट असणार, म्हणजेच थॅनॉस सगळ्या हिरोना पुरून उरणार ह्याचा आधीच अंदाज आला.
२. थॅनॉस चा बिल्ट-अप कमी पडला, त्याचे आणि गमोराचे नाते यापुर्वी कुठल्याच चित्रपटात फारसे एक्स्प्लोर केले गेले नाही त्यामुळे त्या दोघांच्या सिन्समधे जे इमोशन्स ज्या इंटेंसिटीने पोहोचायला हवे होते ते लोकांपर्यंत पोहोचले नाहीत.
३. थॅनॉसची टीमसुद्धा नीट बिल्ड केली गेली नाही, चिल्ड्रेन ऑफ थॅनॉस यापुर्वी कधीही बिल्ड केले गेले नाहीत. त्यांना असे अचानक आणल्यामुळे बर्‍याच लोकांसाठी ते "थॅनॉसच्या ढीगभर माणसांमधे अजून चार" इतक्यावरच आटोपले. प्रत्यक्षात ते थॅनॉसच्या काही सर्वात घातक अनुयायांपैकी एक होते. कितीतरी लोकांना ग्लेव्ह कोण, मॉ कोण हे सुद्धा ओळखता येणार नाही. त्यांच्या पॉवरतर दुरच राहील्या. ज्यामुळे त्यांच्या विरुद्धच्या लढायांना म्हणावे तसे वजन आले नाही.
४. सोल स्टोनची स्टोरी जाम उरकल्यासारखी वाटली, त्यातच मुद्दा २ मधे लिहिलेल्या प्रॉब्लेममुळे ती आणखीनच सामान्य झाली.
५. थॅनॉसला पॉवर स्टोन कसा मिळाला हे तर दाखवलेच नाही. कारण नोव्हा कॉर्प्स तशी अत्यंत आधुनिक फोर्स दाखवली आहे, आणि नोव्हा कॉर्प्सच्या विशाच्यावेळेस अजून एक हिरो जन्माला येतो (कॉमिकबूक सिरीजमधे) नोवा नावाचा तो पण मिसिंग आहे. कदाचित पुढे मागे कधीतरी आणतील त्याला (४ एक वर्षांनी Happy ).

अर्थात, एकूण चित्रपट चांगला होता, पण १९ चित्रपटांची टाईमलाईन आणि दहा वर्षाचा "याच साठी केला अट्टाहास" वगैरे नंतर ज्या लेवलची अपेक्षा होती ती पूर्ण झाली नाही.

>>>>>>आता 2nd पार्ट येण्या आधी , ANTMAN, ANI HAWKEYE, IRONMAN हे 3 येतील
Submitted by दत्तू on 30 April, 2018 - 06:27

आँ? नक्की? माझ्या माहीतीनुसार पुढच्या मे मधे दुसरा भाग येतोय आणि त्यापुर्वी फक्त २ चित्रपट येणार आहेत, अँटमॅन+वास्प आणि कॅप्टन मार्वल.

तो होता तिथे तुम्हाला दिसला नाही.
Submitted by निलिमा on 30 April, 2018 - 16:56 >>कुठे, कोणत्या सीनमध्ये? मला इन्फिनिटी वॉरमध्ये म्हणायचे होते.
कारण आधीच्या एका चित्रपटात तो कॅपटन अमेरिका सोबत बाकी लोकांशी(आयर्न मॅन, स्पायडरमॅन) लढताना दाखवलाय.

Pages