तो तिला बधणार नाही

Submitted by सुप्रिया जाधव. on 27 April, 2018 - 01:36

तो तिला बधणार नाही
तीसुधा हरणार नाही

तो तळपता सूर्य आहे
सावली धरणार नाही

माफ करते हेच चुकते
समजते, वळणार नाही

जन्मली अनिवार्य इच्छा
फारशी जगणार नाही

तो फसवतो जाणते ती
त्यास दाखवणार नाही

ही युगांची आग आहे
काहिली शमणार नाही

आजवर सोशीत आले
ह्यापुढे जमणार नाही

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users