मैत्री भाग - 7

Submitted by ..सिद्धी.. on 16 April, 2018 - 11:18

आधीच्या भागांसाठी खाली दिलेल्या लिंकवर जा.....

भाग-1
https://www.maayboli.com/node/65783

भाग-2
https://www.maayboli.com/node/65793

भाग-3
https://www.maayboli.com/node/65800

भाग - 4
https://www.maayboli.com/node/65807

भाग - 5
https://www.maayboli.com/node/65818

भाग - 6
https://www.maayboli.com/node/65825
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

मागील भागात....

दुसर्याच क्षणी त्याने धावत येऊन राजेशला जोरात धक्का दिला. सगळ्यांना हे अनपेक्षित आणि तितकंच भयानक होतं. दरीत राजेशची एक जोरदार किंकाळी घुमली. सगळे जागीच थिजून उभे होते. महंतांच तर डोकंच चालत नव्हतं. घरून येताना आजीला ते वचन देऊन आलेले की राजेशच्या जिवाला काही धोका होणार नाही. आता काय करायचं हे त्यांच्यासमोर मोठं प्रश्नचिन्ह होतं. समिधाला तर हे सगळं असह्य होऊन तिथेच चक्कर आली. बाबांनी आणि समीरने तिला सावरलं. या सगळ्यात एकटा रोहनच बेफिकीरीने हसत उभा होता......

आता इथून पुढे
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■

तितक्यात दरीतून पुन्हा एक आवाज आला आणि आसमंतात घुमला. तो दुसर्या तिसर्या कोणाचा नसून राजेशने मदतीसाठी ' वाचवा' अशी आर्त हाक मारलेली. समीरने धावत कड्याच्या टोकाशी जाऊन दरीत डोकावलं. समोरचं दृश्य पाहून त्याचा जीव भांड्यात पडला. सगळ्यांना आधी वाटलेलं की राजेशचा दरीत पडून मृत्यू  झाला असेल ...पण तसं नव्हतं..एका झाडाच्या फांदीला त्याचं शर्ट अडकल्यामुळे तो वाचला होता. आजूबाजूच्या झुडूपांना धरून तो वर येण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता..समीरने हे सगळं बघीतलं आणि जोरात ओडून महंतांना सांगितलं. महंतांच्या चेहेर्यावर स्मितहास्य पसरलं. त्यांनी पटकन समीरला हाक मारली आणि त्यांच्या गाडीत असलेला दोरखंड आणायला लावला..राजेशला वर काढायला....

राजेशला दरीत ढकलून त्याला मरणाची अनुभूती करून द्यायची होती. म्हणून महंत आणि रोहनने आखलेला तो प्लॅन होता. काल योजना सांगत असताना महंतांनी मुद्दाम सगळ्यांना अंधारात ठेवलं होतं. रोहनने ठरवलं असतं तर तो खरंच राजेशला ठार मारू शकला असता . पण तो दुष्ट प्रवृत्तीचा नव्हता . म्हणून त्याने त्याला वाचवलं होतं. त्यामुळे तो पुण्यात्मा आहे हे ही सगळ्यांना आता उमगलं होतं.

समीर आणि बाबांनी मिळून राजेशला वर काढलं.नुकतंच स्वतःचं मरण जगून आलेला राजेश नि:शब्द होऊन थरथर कापत रोहनकडे बघत उभा होता. आता अजून आपल्या नशीबात काय मांडलय याचा विचार करत ... शेवटी त्याने रोहनच्या पायावर लोटांगण घेऊन त्याची माफी मागितली. रोहनने राजेशला त्याच्या आई आणि बहीणीला त्यांच बळकावलेलं घर परत द्यायला लावलं. इतकं दरडावल्यावर राजेशनेही जिवाच्या भीतीने सगळं करायचं मान्य केलं. महंतांच्या आज्ञेने सगळ्यांचा निरोप घेऊन रोहन पुन्हा आपल्या दुनियेत परत गेला. पुन्हा एकदा मैत्रीचं नातं वरचढ ठरलं होतं.

सगळं आवरून झाल्यावर महंतासोबत सगळे घरी जायला निघाले. वातावरणातला ताण नाहीसा झाला होता. कोणीही घरी येईपर्यंत एकमेकांशी काहीच बोललं नव्हतं. घरी आल्यावर सगळेजण फ्रेश झाले . महंतांनी राजेशला तिथेच राहण्याविषयी सुचवलं. तोही लगेच तयार झाला. कारण त्याला मिळालेल्या अनोख्या सरप्राईजच्या धक्कयातून तो अजूनही सावरला नव्हता. आणि अशा परिस्थितीत घरी जाऊन त्याला घरच्यांच्या प्रश्नांना सामोरं जायचं नव्हतं. म्हणून मुकाट्याने जेवण करून तो गेस्ट हाऊसमध्ये झोपायला गेला. इथे महंतांनीही घरच्यांना सगळा वृत्तांत सांगितला. सगळ्या शंकांच निरसन करून ते झोपायला गेले..चार आठ दिवस दिवसांनी फिरून सगळेजण परत मुंबईला आले. सगळं कसं छान सुरळीत चाललेलं. समिधा आणि संजना शेवटच्या वर्षात असल्यामुळे जोमाने अभ्यास करत होत्या. समीरही पुन्हा त्याच्या बिझनेसच्या कामात गढून गेला.

या सगळ्यात फक्त राजेश असंतुष्ट होता. भयंकर चवताळलेला तो त्याच्या अशा अपमानामुळे...धक्क्यातून सावरल्यावर दोन दिवस विचार करून त्याने नवीन कारस्थान रचलं...प्लॅन संपूर्ण ठरवल्यावर त्याच्या चेहेर्यावर आसुरी हास्य पसरलं.......

क्रमशः

---- आदिसिद्धी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सांग ना...सुधारणा करता येईल...जसं सुचतं तसे टाकते मी भाग...त्यामुळे माहित नाही किती भाग लागतील...पण फार मोठी नसेल....

मस्त!!!
चांगल रंगवलं आहेस प्रकरण