उच्च रक्तदाबाचा विकार : एक सर्वसाधारण आरोग्याचा विळखा :भाग १

Submitted by डॉ रवी१ on 14 April, 2018 - 13:33

हा एक दीर्घकालीन अनेक जणांना होणारा विकार,

हृदयविकार, पक्षाघात, मेंदूचे व मूत्रपिंडाचे विकार व इतर रक्तवाहिन्यांच्या गंभीर आजारांना आमंत्रण देतो.

हृदयविकार असणा-या व्यक्तींमधे २० ते ५०% मृत्यु यामुळे होऊ शकतात.

ह्यात वरचा रक्तदाब म्हणजे हृदयाच्या आकुंचनाच्या व खालचा हा प्रसारणाच्या वेळेचा होय.

रक्तदाब म्हणजे काय?: दंडाच्या प्रमुख शुद्ध धामनिमध्ये असणारा पा-याचा मिमी मध्ये असणारा दाब.

प्रकार= वरचा रक्तदाब, खालचा रक्तदाब
नॉर्मल= १२० हून कमी, ८० हून कमी
पूर्व उच्च= १२० ते १३०, ८० ते ९०
उच्च:
प्रथम अवस्था= १४० ते १५९, ९० ते ९९
द्वितीय अवस्थ== १६० किंवा त्यापेक्षा जास्ती, १०० किंवा त्यापेक्षा जास्ती

रक्तदाब बसलेल्या अवस्थेत मोजणे व ३ वेळेस मोजून कमीतकमी आकडा गृहीत धरावा.

एका अशा प्रकारच्या उच्च रक्तदाबात ज्यामध्ये कोणतेही कारण सापडत नाही, ९०% रुग्णांमध्ये तो
आढळून येतो.
दुस-या प्रकारात काही ठराविक इंद्रीयांच्या विकारामुळे तो उद्भवू शकतो.

निम्म्याचा नियम : निम्म्या व्यक्ती नॉर्मल असतात, त्यातील निम्म्यांना हा रोग होतो,
त्यातील निम्म्यांमध्ये निदान होऊ शकते, त्यातील निम्म्यांवर उपचार होत नाही, त्यातील निम्म्यांवर होतो,
त्यातील निम्म्यांवर योग्य उपचार होत नाही, त्यातील निम्म्यांवर योग्य उपचार होऊ शकतो.

प्रमाण: दरवर्षी जगात ७५ लाख व्यक्तीं यामुळे मृत्युमुखी पडतात. भारतात याचे प्रमाण १७ ते २१% आहे.

कारणे:
१. वाढते वय
२. स्त्रियांमध्ये ४५ वयानंतर
३ .जनुकीय कारणे व अनुवांशिकता
४ . स्थूलता
५ मिठाचे जास्ती प्रमाण
६. आहारातील संपृक्त चरबी(तूप,साय)
७. रेषायुक्त पदार्थांची कमतरता
८ मद्याचे अति सेवन,
९ व्यायामाचा अभाव/कमतरता व बैठेपणाची सवय
१० मानसिक ताणामुळे
११ वातावरणातील कारणे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

या भागातली माहिती आणि चर्चा वाचली. संयमाने उत्तरे दिली आहेत हे आवडले. बय्राचदा आपला डॉक्टर असा वेळ देत नाही फक्त ट्याबलेट्स देतो ( त्यामुळे कटवणे म्हणजे ट्याबलेट्स देणे हा वाक्प्रचार रूढ झाला आहे.) तर ते सारे प्रश्न वाचक आणि पेशंटच्या हितचिंतकांनी विचारले आहेत. बघू पुढच्या भागात काय होतय.

Pages