उच्च रक्तदाबाचा विकार : एक सर्वसाधारण आरोग्याचा विळखा :भाग १

Submitted by डॉ रवी१ on 14 April, 2018 - 13:33

हा एक दीर्घकालीन अनेक जणांना होणारा विकार,

हृदयविकार, पक्षाघात, मेंदूचे व मूत्रपिंडाचे विकार व इतर रक्तवाहिन्यांच्या गंभीर आजारांना आमंत्रण देतो.

हृदयविकार असणा-या व्यक्तींमधे २० ते ५०% मृत्यु यामुळे होऊ शकतात.

ह्यात वरचा रक्तदाब म्हणजे हृदयाच्या आकुंचनाच्या व खालचा हा प्रसारणाच्या वेळेचा होय.

रक्तदाब म्हणजे काय?: दंडाच्या प्रमुख शुद्ध धामनिमध्ये असणारा पा-याचा मिमी मध्ये असणारा दाब.

प्रकार= वरचा रक्तदाब, खालचा रक्तदाब
नॉर्मल= १२० हून कमी, ८० हून कमी
पूर्व उच्च= १२० ते १३०, ८० ते ९०
उच्च:
प्रथम अवस्था= १४० ते १५९, ९० ते ९९
द्वितीय अवस्थ== १६० किंवा त्यापेक्षा जास्ती, १०० किंवा त्यापेक्षा जास्ती

रक्तदाब बसलेल्या अवस्थेत मोजणे व ३ वेळेस मोजून कमीतकमी आकडा गृहीत धरावा.

एका अशा प्रकारच्या उच्च रक्तदाबात ज्यामध्ये कोणतेही कारण सापडत नाही, ९०% रुग्णांमध्ये तो
आढळून येतो.
दुस-या प्रकारात काही ठराविक इंद्रीयांच्या विकारामुळे तो उद्भवू शकतो.

निम्म्याचा नियम : निम्म्या व्यक्ती नॉर्मल असतात, त्यातील निम्म्यांना हा रोग होतो,
त्यातील निम्म्यांमध्ये निदान होऊ शकते, त्यातील निम्म्यांवर उपचार होत नाही, त्यातील निम्म्यांवर होतो,
त्यातील निम्म्यांवर योग्य उपचार होत नाही, त्यातील निम्म्यांवर योग्य उपचार होऊ शकतो.

प्रमाण: दरवर्षी जगात ७५ लाख व्यक्तीं यामुळे मृत्युमुखी पडतात. भारतात याचे प्रमाण १७ ते २१% आहे.

कारणे:
१. वाढते वय
२. स्त्रियांमध्ये ४५ वयानंतर
३ .जनुकीय कारणे व अनुवांशिकता
४ . स्थूलता
५ मिठाचे जास्ती प्रमाण
६. आहारातील संपृक्त चरबी(तूप,साय)
७. रेषायुक्त पदार्थांची कमतरता
८ मद्याचे अति सेवन,
९ व्यायामाचा अभाव/कमतरता व बैठेपणाची सवय
१० मानसिक ताणामुळे
११ वातावरणातील कारणे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगला विषय
सविस्तर येऊद्यात पुढचे भाग .....

रक्तदाब म्हणजे नेमके काय याबद्दल माझ्या डोक्यात थोडा गोंधळ आहे.

रक्तदाब म्हणजे काय?: दंडाच्या प्रमुख शुद्ध धामनिमध्ये असणारा पा-याचा मिमी मध्ये असणारा दाब

आपल्या अंगात पारा नसतो ना? मग हा दाब म्हणजे नेमके काय? की शुद्ध रक्त हृदयाच्या बाहेर ढकलायला हृदयाला जी शक्ती लागते किंवा ज्या ताकदीने हृदय रक्त बाहेर ढकलते ती ताकद?

जर ती शक्ती किंवा ताकद म्हणजे रक्तदाब असेल तर कमी रक्तदाब आहे म्हणजे हृदय त्या ताकदीने रक्त ढकलू शकत नाही किंवा उच्च रक्तदाब म्हणजे हृदय जरा जोरात रक्त ढकलतेय असे आहे का?

असे असल्यास याची कारणे काय? हृदय कमजोर असेल तर समजू शकतो पण जास्त रक्तदाब म्हणजे हृदय जास्त चांगले काम करतेय असे म्हणायला नको का?

अमा आणि साधना, तुम्ही सुंदर प्रश्न विचारीत आहात. अमा, तुमचा प्रश्न मी नंतर घेईन, जेंव्हा उपचार व उपाय यांच्यावर चर्चा होईल. साधना, दंडाच्या मोठया प्रमुख धमनीवर रक्तदाबासाठी वापरत असणाऱ्या उपकरणात जो पट्टा गुंडाळला जातो, बाहेरून पंप करून त्यावर दाब वाढवला जातो. त्याला एक नलिका असते, त्या पट्ट्याची दुसरी नलिका पारा किंवा तत्सम दाब मोजणाऱ्या उपकरणाला जोडलेली असते, हृदयाच्या अकुन्चनाच्या व प्रसारणाच्या वेळेस हृदय ज्याशक्तीने रक्त बाहेर फेकते त्याच्या विरुद्ध पण तेव्हढ्याच शक्तीने दाब पंप करून वाढवला जातो किंवा कमी केला जातो. स्टेथोस्कोपच्या सहाय्याने आवाज सुरु झाला की वरचा रक्तदाब, आणि आवाज बंद झाला की खालचा रक्तदाब. मुळात हृदयाच्या शक्तीने रक्त सर्व शरीराला पुरवले जाते ते अशा प्रकारे उपकरणाच्या सहाय्याने मोजले जाते. समजले का नाही? एक ठराविक हृदयाची रक्त ढकलण्याची शक्ती म्हणजे रक्तदाब. मुळातली शक्ती नॉर्मल म्हणजे १२०/८०.हृदयाला जास्ती शक्ती लागणार असेल तर रक्तदाब वाढत जातो.

लक्षणे १ डोके दुखणे २. चक्कर येणे ३, छातीत दडपण येणे ४. घाबरल्यासारखे वाटणे इ पण सर्वांना ह्या
तक्रारी असतीलच असे नाही. मी सांगितलेला निम्म्याच नियम कृपया बघावा. काही वेळेस तपासण्या करण्याच्या
वेळेस रक्तदाब वाढल्याचे लक्षात येते. अनेक वेळेस रक्तदाब तात्पुरता वाढलेला असू शकतो, उदा काही दिवस पुरेशी
झोप न लागणे इ

@डॉ रवी१
तुम्ही चांगल्या विषयावर मराठीतून समजावून सांगत आहात हे स्तुत्य आहे. पण मराठीकरण करताना थोडी गल्लत होते आहे त्याकडे थोडे अधिक लक्ष दिले तर बरे होईल.
उदा. रक्तदाब म्हणजे काय?:दंडाच्या प्रमुख शुद्ध धामनिमध्ये असणारा पा-याचा मिमी मध्ये असणारा दाब
हे बरोबर नाही असे वाटते.
त्या ऐवजी वर साधना यांनी लिहिल्याप्रमाणे
शुद्ध रक्त हृदयाच्या बाहेर ढकलायला हृदयाला जी शक्ती लागते किंवा ज्या ताकदीने हृदय रक्त बाहेर ढकलते ती ताकद म्हणजे रक्तदाब. हा मोजण्याचे एक सर्वमान्य प्रमाण म्हणजे निर्वात स्थितीत तितकीच ताकद (दाब) पडण्यासाठी पार्‍याच्या स्तंभाची किती मिमि उंची लागेल ?
हे जास्त योग्य होईल.

>निम्म्याचा नियम :
या बद्दल तुम्ही (किंवा इतर वैद्यकीय व्यावसायिक) जरा खोलात जाऊन समजावू शकाल का? वैद्यकीय संशोधन पत्रिकांमधे जगभरात अनेकवेळा "Rule of halves for hypertension" चा उल्लेख आढळतो. पण त्यासाठी असलेला डाटा तपासून पाहिला तर तो डाटा "५०%" च्या कधी जवळ असतो. तर कधी "५०%" पासून पुष्कळ लांब असतो. तरी सगळे जण "Rule of halves is applicable" असा निष्कर्ष कसा काढतात हे माझ्यातल्या अभियंत्याला समजत नाही.
उदा . हे संशोधन पहा.
https://www.researchgate.net/publication/283486878_Current_status_of_the_'rule_of_halves'_of_hypertension_a_survey_among_the_residents_of_slum_resettlement_colony_from_east_Delhi
आणि त्यातला हा डाटा पहा
The Total prevalence of hypertension according to JNC VII was 17.4% . About 48.1% of hypertensive subjects were aware of their hypertensive status. Of the hypertensice subjects only 38.9% were on treatment and difference among male and female was statistically significant. of those on treatment only 18.5% subjects had their blood pressure controlled.

हे काही बाबतीत "५०%" च्या "आसपास" आहे.

  • The Total prevalence of hypertension according to JNC VII was 17.4% (not 50%)
  • About 48.1% of hypertensive subjects were aware of their hypertensive status ( yes close to 50%)
  • Of the hypertensice subjects only 38.9% were on treatment (not 50%)
  • of those on treatment only 18.5% subjects had their blood pressure controlled. (not 50%)

यातून निम्म्याच्या निम्मा असा सरसकट निष्कर्ष कसा निघतोय हे काही मला समजत नाहीये. पण "Rule of halves seems to be holding true in this population" असा निष्कर्ष लिहला आहे. पण फक्त याच शोधनिबंधात नाही पण अनेक शोधनिबंधात असेच दिसते आहे.

तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मला लिहिण्याची एव्हढी सवय नाहीये. मी जास्ती शास्त्रीय खोलात जात नाहीए.
सर्वसाधारण जनतेसाठी माहिती दिली आहे. तुमच्यासारख्या तज्ज्ञांसाठी नाही. माफी असावी.आम्हाला/बहुतेक वैद्यकीय तज्ज्ञांना तुमच्यासारखी मराठीमधून लिहिण्याची सवय अजिबात नसते. तरी मनापासून धन्यवाद! पण खोलात जाऊन माहिती मिळवायला हवी हे खरे आहे.

डो रवी, तुम्ही प्रतिसादांत लिहिताय तसाच हेडरमधला मजकूर स्वतःहून लिहिलंत तर वाचणार्‍यांना चटकन समजेल.

या धाग्यावरही गुगल ट्रान्सलेट वापरून लिहिलेय का? की इंग्रजीतला मजकूर समोर ठेवून शब्दाशब्दाचे भाषांतर केलेत?

तुम्ही एखाद्या मराठी माणसाला (मराठीतून ) तोंडी सांगून समजावाल, त्याच पद्धतीने लिहाल, तर ती भाषा खटकणार नाही.
शक्य झालं, तर समोर कोणताही मजकूर संदर्भासाठी न घेता, तुमच्या मनाने लिहा. लिहिलेलं हवंतर नंतर पडताळून पहा.
शिवाय इथे वाचत असताना इकडच्या तिकडच्या लिंका वाचूनच समजून घ्यायचे असेल, तर मग इथे लिहिण्याची गरजच काय असा प्रश्न पडतो.
लेखनासाठी शुभेच्छा!

भरत, मी गुगल ट्रान्सलेट वापरून अजिबात भाषांतर केले नाहीये, तुमच्या मनातच तसे आहे, पण माझ्या तुम्ही लोकशिक्षणाचे उद्देश नजरेआड करत आहात हे बरोबर नाही. एवढे केले तरी तुम्ही त्यात उणीवा शोधता फक्त हे चुकीचे आहे. मला तोंडी सांगावे तसे लिहीण्यास मर्यादा आहेत, तुम्हीच असे लिहित जा न ,मी म्हणेन आणि सांगा

तुमचा आधीचा लेख गुगल ट्रान्सलेशन वापरून लिहिलेला होता, हे मी पडताळून पाहिलंय.
अशा पद्धतीने लिहिंण्याने तुमचा लोकशिक्षणाचा हेतू साध्य होईल असे मला वाटत नाही.
माझ्या प्रतिसादात लेखन वाचकांना समजण्यासाठी काय करता येईल, हेच लिहिलंय. त्या सकारात्मक सूचनाच आहे. तुम्हाला त्या तशा घेता येत नसतील, तर माझा नाईलाज आहे.
मायबोलीवर आणि मराठीत अन्यत्र (छापील माध्यमांतही) आरोग्य आणि वैद्यकशास्त्राबद्दल लिहिणारे अनेक जण आहेत. त्यामुळे या विषयावर मराठीत लिहिणं खूप कठीण आहे , असंही नाही.
तुम्हाला प्रतिसादात मराठी वाटणारं मराठी लिहिता येतंय्म तसंच मूळ लेखनातही लिहा, असंच मी सुचवलंय.
तुम्हाला माझे प्रतिसाद स्वीकार्य नसल्याने, यापुढे तुमच्या लेखनावर प्रतिसाद देणार नाही.
धन्यवाद.

भरत, तुमच्या सूचना स्वीकारार्य होऊ शकतील, पण तुम्ही अतिशय आक्रमक पध्दतीने मांडता.समोरच्याला अतिशय कमी समजून जरी तुम्ही सकारात्मक लिहिले तर तुम्ही त्या व्यक्तीचा तेजोभंग, काही प्रमाणात दुखवून लिहिता त्यामुळे असे होते. तुमचे म्हणणे तुम्ही सौम्यपणे व आदरभावना राखून लिहावे, तसेच अनेक नामवंत व्यक्तींवर टीका होते, पण अशी झोम्बणारी नसते.तशी असल्यास जशास तसे असे उत्तर मिळते याचे कृपया भान राखावे.

भरत, मी गुगल ट्रान्सलेट वापरून अजिबात भाषांतर केले नाहीये, तुमच्या मनातच तसे आहे, पण माझ्या तुम्ही लोकशिक्षणाचे उद्देश नजरेआड करत आहात हे बरोबर नाही. एवढे केले तरी तुम्ही त्यात उणीवा शोधता फक्त हे चुकीचे आहे. मला तोंडी सांगावे तसे लिहीण्यास मर्यादा आहेत, तुम्हीच असे लिहित जा न ,मी म्हणेन आणि सांगा>>>>

डॉ रवी, तुम्ही लोकशिक्षणासाठी लिहिताय तर सामान्य लोकांना कळेल असे लिहा. तुमचा हा लेख विस्कळीत आहे, वाचून समजून घ्यायला त्रास होतो. मला आधी थोडी माहिती होती पण लेख वाचून त्या माहितीत अजिबात भर पडली नाही असे म्हणावे लागेल. भाग 2 याच्यातच बसवला असता तरी चालले असते.

तुम्ही रक्तदाबाची जी कारणे दिलीत त्यापैकी स्त्रियांना 45 नंतर हे कारण न पटणारे आहे. हल्ली रक्तदाब व मधुमेह एक ठराविक वयानंतर होतातच अशी समजूत लोक स्वतः करून घेतात व डॉक्टरही त्याला अनुमोदन देतात. यामुळे रोगाच्या गांभीर्याकडे थोडे दुर्लक्ष होते.

तुमचा लेख वाचल्यावर मी थोडे शोधले.

हृदय रक्त एका विशिष्ट दाबाने बाहेर फेकते म्हणजे रक्तदाब 120/80 असा असतो तेव्हा बाहेर फेकलेले रक्त शरीराच्या सर्व भागात पोचते.

रक्तदाब कमी असतो म्हणजे हृदयाची ताकद कमी असते तेव्हा शरीराच्या सर्व भागात रक्त पोचत नाही. गाडीला जसे पेट्रोल तसे शरीराच्या सर्व अवयवांना काम करण्यासाठी रक्त. रक्तातून ऑक्सिजनपासून इतर सर्व आवश्यक घटक अवयवांना पोचत राहतात. ही गरज 24 तास असते. तिच्यात पाच मिनिटांचा जरी खंड पडला तरी तो अवयव कायमचा निकामी होण्याची शक्यता असते. फ्रॉस्टबाईट होतो म्हणजे त्या भागातली त्वचा गोठल्यामुळे रक्त पुरवठा थांबतो आणि रक्त नसले की तो भाग मरतो. हा मेलेला भाग कापून टाकला नाही तर तो कुजतो व आजूबाजूच्या भागाला मारायला लागतो. पूर्ण शरीरभर 24 तास रक्त खेळत राहणे किती महत्वाचे आहे हे यावरून लक्षात येते. रक्तदाब कमी म्हणजे फेकण्याची क्षमता कमी, म्हणजेच ते सर्वत्र पोचण्याची गती कमी. म्हणजे काम करायला आवश्यक घटक अवयवांना मिळायची गती कमी/मिळाले तरी हवे तितके न मिळायचे प्रमाण जास्त. त्यामुळे अवयवांचे काम कमी कमी होत शेवटी काम पूर्ण बंद. कमी रक्तदाब असे स्लो पोईजनिंग करून किडनीसारखे अतिमहत्वाचे अवयव मारतो.

उच्च रक्तदाब म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त वेगाने रक्त फेकले जाणे. यामुळे हृदयाला त्याच्या डिजाईन केलेल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागते. याचा अतिरिक्त ताण येऊन हृदयाचे कायमस्वरूपी नुकसान होते ज्याची परिणीती हृदयरोगात होते. रक्त सर्वत्र पोचण्यासाठी वाहिन्यांमधून वाहते, झडपांमधून वाहते. दाब जास्त असल्यास रक्तवाहिन्या व त्यातील झडपांचे वेगाने नुकसान होते (वेअर ऍण्ड टेअर).

या सर्व कारणांमुळे जास्त किंवा कमी दोन्ही प्रकारचे रक्तदाब वाईट. मी कित्येकांना 'लो प्रेशर आहे, एवढे घाबरायची गरज नाही' असे मत प्रदर्शित करताना ऐकले आहे. त्यांना स्वतःला लो प्रेशर म्हणजे काय माहीत नसते. लो व हाय म्हणजे नक्की काय हा प्रश्न ते डॉक्टरला विचारत नाही त्यामुळे डॉक्टर सांगत नाहीत.

हे सगळे तुमच्या लेखात यायला हवे होते हे माझे मत.

रक्तदाबावर सध्या काय औषधे आहेत, जी रक्तदाब नियमित करू शकतात?

सध्या जी औषधे आहेत ती अनियमित दाब का निर्माण झाला याची मीमांसा करत नाहीत, देणारे डॉक्टरही ही मीमांसा फारसे करताना दिसत नाही. जी औषधे आहेत ती चार पाच प्रकारची आहेत. काही औषधे शरीरातले म्हणजे रक्तातले पाणी कमी करतात, त्यामुळे हृदयाला कमी रक्त ढकलावे लागते, काही हृदयाची गती कमी करतात, त्यामुळे रक्त कमी ढकलले जाते. या सगळ्या मेडिकेशन्समुळे रक्तदाब कमी होतो. पण ज्या कारणांमुळे तो वाढलेला ती कारणे तशीच राहतात, त्यामुळे गोळी घेतली नाही की परिस्थिती जैसे थे. यावर उपाय म्हणजे गोळी आयुष्यभर घेत राहणे. याचे वाईट परिणाम काय? मला माहित नाही.

यापेक्षा रक्तदाब वाढवणाऱ्या कारणांवर नियंत्रण आणून स्वतःला निरोगी ठेवणे जास्त योग्य राहील. पण तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून पेशंट गोळी घेतो, त्याच्या दृष्टीने तो औषध घेत असतो पण गोळी ही टेम्पररी योजना आहे हे त्याला माहित नसते, डॉक्टरही त्याचे प्रबोधन करायच्या भानगडीत पडत नाही.

रक्तदाब कमी असेल तर तो कसा वाढवतात मला माहीत नाही, त्यावर औषध आहे का हे मला माहीत नाही. पण वाढलेला कमी करण्यासाठी जर शरीरातील पाणी कमी करत असतील तर तो वाढवण्यासाठी पाणी वाढेल असे काहीतरी करत असावेत. जसे मीठ जास्त खाणे वगैरे.

हे सगळे लेखात यायला हवे होते हे माझे मत. बाकी गुगलवर ढवळून सगळी माहिती मिळतेच की, त्रोटकच लिहायचे तर मायबोलीवर वेगळे लिहायची गरज काय?

हा मोजण्याचे एक सर्वमान्य प्रमाण म्हणजे निर्वात स्थितीत तितकीच ताकद (दाब) पडण्यासाठी पार्‍याच्या स्तंभाची किती मिमि उंची लागेल >>>>

धन्यवाद अजय, हे वाचून आज प्रथमच रक्तदाब कसा मोजतात हे लक्षात आले.

बाकी पाराच का याचे उत्तर शाळेत मिळाले होते. पारा हे सर्वात जड मूलद्रव्य आहे, म्हणून ते वापरतात हे शिकले होते. हृदयाचा दाब खूप जास्त असतो हेही ऐकून माहीत होते, इतका जास्त की हृदयाकडून रक्त घेऊन येणारी रक्तवाहिनी जर कापली गेली तर खूप लांबवर चिळकांडी उडते हे ऐकलेय. ह्या रक्तवाहिन्या ज्यांना मराठीत रोहिणी म्हणतात त्या आत खोलवर असतात. त्वचेच्या पृष्ठभागावर ज्या असतात त्या निला, वापरलेले रक्त घेऊन परतणाऱ्या असतात, पण त्या कापल्यावर ज्या वेगात रक्त वाहते त्यावरून रोहिणीतले रक्त किती वेगात वाहत असेल याची कल्पना केली.

आपल्या रक्ताला शरीरभर पसरेल इतक्या जोराचा धक्का द्यायला पृथ्वीवरील सर्वात जड असलेल्या मूलद्रव्याला 120 मीमी इतक्या उंचीचा स्तंभ लागतो, म्हणजे हृदय किती प्रचंड क्षमतेने काम करते!!! आणि आपल्याला हे माहीत नाही, आपण हृदयाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो!!!!

रवीशेठ, भरत यांनी सोप्या भाषेत लिहिलं आहे. त्यात तुमचा अपमान करण्याचा हेतू दिसला नाही. ते हाडाचे शिक्षक आहेत, त्यांची भाषा प्रेमळपणे समजावून सांगायचीच वाटली. तुम्हीच आपला इगो थोडा बाजूला ठेवून काय ते नीट समजून घ्या. सगळ्यांनाच फायदा होईल त्याचा.

तुम्हाल खरोखरच जनहितासाठी लिहायचे असेल तर ते सामान्य जनतेला समजेल अशा भाषेत असलेच पाहिजे. वरचा लेख अत्यंत त्रोटक वाटला.

ज्ञान वाटण्याची इच्छा असणार्‍याने अशी चिडचिड करु नये बुवा. कोणीही सर्वज्ञानी आणि सर्वशक्तीमान सर्वकलागुणसंपन्न नसतो, इथे माबोवर कुणीच नाही. त्यमुळे एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही म्हणून फ्रस्ट्रेट होऊन चिडखोर प्रतिसाद देणे हे काही सोलुशन नाही. तुम्हाला लिहायला जमत नाही ह्याची कुणीही खिल्ली उडवलेली नाहीये.

मुद्दा फक्त इतकाच आहे की जेव्हा तुम्ही लिहिताय ते आम्हा सामान्यांना समजेल असं असावं. असे कारण नसेल तर जनरली दुसरे कारण फक्त आपल्या ज्ञानाचा शो करणे हे असते. तसं तुम्ही करत आहात असे मला म्हणायचे नाही. गैरसमज नको.

अधिकाधिक लिहिण्यासाठी माझ्याकडून मनापासून शुभेच्छा....

डॉ. रवि, लेख चांगला आहे, धन्यवाद. पण मी देखील भरत मयेकर यांच्याशी सहमत आहे. त्यांनी ते उद्धट्पणाने लिहीलेले नाहीये, उलट तुम्हाला दुसर्‍यांना समजावयाला सोपे जावे हा त्यांचा म्हणण्याचा / लिखाणाचा उद्देश आहे, कृपया गैरसमज नसावा.

तुम्ही रक्तदाबाची जी कारणे दिलीत त्यापैकी स्त्रियांना 45 नंतर हे कारण न पटणारे आहे. >> हे बरोबर आहे. मला तर तिशीतच डि टेक्ट झाले. त्यानंतर मुलाचा जन्म व इतर बायकी जीवनक्रमात ह्याकडे दुर्लक्ष झाले. ४३ - ४४ वयात मी रेगुलर गोळी घ्यायचा प्रयत्न केला पण अतिशयच डोके दुखायचे गोळी घेउन. सोडून दिले. स्ट्रेस कायमच होता. मुंबईत शिफ्ट झाल्यवर कंपनीतर्फे चेकप दर वर्शी होतो. या वर्शी त्यांनी पण गोळी प्रिस्क्राइब केली. पण त्याने काही ढिम्म परिणाम झाल नाही. शेवटी आता फोर्टिस मधील स्पेशालिस्टने जी दिली आहे त्याने उपयोग होत आहे. १२०-७७ आहे
माझ्याकडे बीपी मापक आहे रोज चेकप करते. स्ट्रेस एका लेव्हलच्या पुढे घेत नाही. वर्क लोड हे इतके जास्त आहे कि जमेल तेव्ढेच आठ् तासात करते. कारण एरर स्कोप नाहीच आहे. हेड फोन लावून गाणी ऐकायची सवय आहे मात्र पण त्याचा काय परि णाम होतो आहे ते बघितले पाहिजे. धुम्रपान व मद्य पान नाही. जमेल तसा व्यायाम करते आहारावर कंट्रोल ठेवून वजन कमी करायचा प्रयत्न आहे. लाइफ स्टाइल चेंज.

एक हॅपीनेस यू पाइप अशी काहीतरी फिलॉसोफी वर द इकाँ नॉमिक्स मध्ये लेख वाचला होता त्यात असे होते की प्लंबरचा कसा यु टाइप पाइप असतो तसे सुखाचे आहे पस्तीस ते पंचे चाळीस पन्नास परेन्त सुखाचा आनंदाचा मीटर
खाली खाली जात राहतो. कारण सांसरिक वैयक्तिक जबाबदार्‍या खूप असतात. व डेली जगण्याचा स्ट्रेस खूप जास्त बेसिकली. मुलांचे शाळेचे दिवस, नोकरीत वर चढण्याचे दिवस, आर्थिक जबाबदार्‍या रिलेशन शिप इशूज वगैरे.
पन्नाशी नंतर हा यु बेंड पाइप वर चढू लागतो. मुले कॉलेजात जातात सुटवंग होतात. नोकरी धंद्यात जे व्हायचे ते होउन हे प्रकरण कसे संपणार आहेत ह्याचा साधारण अंदाज येतो. सीइओ होणार का कधीतरी रिटायर होणार असे. कंपनी काढली तर सेलॉफ कर्णार का बँकरप्ट होणार हे आकलन होते. मग आपन असलेल्या ज्ञाना चा उपयोग करोन कन्सल्टन्सी किंवा फ्रीलान्स जॉब्ज ह्या लाइफ कडे जातो. मोस्टली कार्ड पंचिंग व प्रोग्रेस कार्ड् सायनिंग डेज संपले की स्ट्रेस आपोआपच कमी होतो. रिलेशन शिप मधील जोल्ट मॅनेज होतात व कर्जाचे हप्ते संपत येतात.
५५ च्या दरम्यान सर्व हाय बीपी कारक एक्स्टरनल कारणे कमी होउ शकतात इफ यु लिव्ह स्मार्ट. व अंतर्गत कारणे जसे वजन, व्यसने, व्यायामाची कमी. ही सर्व आपण जबाबदारी घेउन मॅनेज करावी लागतात म्हणजे एक क्वालिटी ऑफ लाइफ मेंटेन करता येते. रेग्युलर मॉनिटरिंग आवश्यक आहे. होम हेल्त टाइप सर्विसेस चा आधार घेउन हार्ट अ‍ॅटेक किंवा स्ट्रोक झालायस लगेच इमर्जन्सी मेडिकेअर मिळणे शक्य आहे ना हे गणीत आपण शुद्धीत असताना करून बघावे. व तस्या सूचना शेजारी/ नातेवाइक यांना देउन ठेवावया.

रक्तदाब हा हिडन किलर म्हणतात जेव्हा ह्याचे सिंप्ट्म्स दिसतात व शरीरावर दृश्य परि णा म होतो तेव्हा फारच उशीर झालेला असतो.

मी पूर्णपणे सहमत आहे!, बरेच शिकता आले या चर्चेमुळे, सर्वांना धन्यवाद!परत लिहायचे ठरविले तर याचा खूप उपयोग व फायदा होईल असे वाटते.

डॊ रवी१ यांचा सदस्यत्वाचा कालावधी हा 2 months 2 आठवडे असा आहे व भरत यांचा 8 वर्ष 1 month असा असल्याने ते मायबोलीला सरावले आहेत..शिवाय भरत हे लेखनात सक्रिय व चिकित्सक असतात. त्यामुळे रवी१ असा गैरसमज झाला असावा. रवी१ आपण लिहित जा. वाचकांचा फीडबॆक आपल्या वैद्यकीय अनुभवात नक्कीच भर पाडील असा विश्वास वाटतो.

धन्यवाद प्रकाशराव! मला अशा प्रकारच्या लिखाणाची व सहज सोप्या सुलभ पद्धतीने विशद करण्याची सवय, सखोल व प्रदीर्घ अभ्यास, अनुभव तसेच सुयोग्य लोकारोग्यशिक्षण याची सुसंधी प्राप्त होऊन मीपण भरतसारख्यांच्या पंक्तीत जाऊन बसेन असा मला विश्वास वाटतो. तसेच कुमार१ सारख्यांची आदर्श उदाहरणे डोळ्यासमोर ठेऊन एकलव्यी प्रयत्न करावे लागतील यात शंका नाही.

गेल्या बारा पंधरा वर्षांपासून आहारातील मीठाविषयी मला एक घरातील निरिक्षण नोंदवायचे आहे. साधारण पणे पंधरा वर्षांपुर्वी बायकोच्या सैपाकात मीठाचे प्रमाण जास्त व्हायला लागले. मला व माझ्या मुलीलाही ते जाणवू लागले. बायकोला मात्र ते खारट वाटत नसे. मी सुरवातीला कुरकुर करत असे. पण हे असच चालू राहिले. मी तिच्या हातून मीठ जास्त का पडते हा विचार करु लागलो. अगोदर तर असे होत नव्हते. मग आता असे का व्हायला लागले. मला पुरेसे वाटणारा खारटपणा हा तिच्या दृष्टीने न के बराबर मीठ आहे असे वाटू लागले. कमी मीठ टाकायच असे ठरवले तरी प्रतिक्षिप्त क्रियेनुसार ते मीठ जास्तच पडू लागले.हळू हळू मी तक्रार करायचे सोडून दिले. माझा मेंदु तो खारटपणा स्वीकारु लागला. फारच असह्य झाले तरच तो पदार्थ मी खात नसे. एकदा मित्र कॅनडावरुन आला होता. तेव्हा घरी काहीतरी पदार्थ केला होता. तो खाल्यावर तो म्हणाला अरे बापरे एवढे मीठ खाल्ले तर ब्लडप्रेशर मागे लागेल. मला या खारटपणाचे रहस्य उलगडत नव्हते. अचानक एकदा मटा किंवा लोकसत्ता मधे एक डॊक्टरचा वैद्यकीय लेख वजा नोंद आढळली.लो ब्लडप्रेशर वाल्यांना तसेच हार्मोन्स मधील बद्लामुळे मीठाची गरज जास्त वाटू लागते व स्त्रिया आपल्या मेंद्च्या आदेशानुसार नकळत स्वयपाकात मीठ जास्त घालू लागतात असे वैद्यकीय संशोधनात आढळुन आले आहे. मग मला त्याची तर्क संगती लागली. त्या लेखाचे कात्रण करायचे मात्र राहून गेले. पुर्वी बायकोचे ९०/६० ब्लडप्रेशर नोंदले होते. तेव्हा फॆमिली डॊक्टरांनी सांगिलले कि काही लोकांमधे लो ब्लडप्रेशर आढळते पण त्याचा त्रास होत नसेल तर तो प्रकृतीचा भाग असतो. एकदा डॊक्टरांनी माझे ब्लडप्रेशर तपासले. ते थोडे जास्त आढळले. मला तरुणपणातच मायोकार्डियल इन्फार्क्षन झाले होते. त्यामुळे हार्टपेशंट म्हणून माझे कार्डियालॊजिस्ट कडे रेग्युलर चेक अप असायचे. ते फॆमिली डॊक्टरला माहित होते. त्यांनी मला मीठ कमी खाण्याचा सल्ला दिला व महिन्याने परत चेक अप ला बोलावले तेव्हा ब्लडप्रेशर नॊर्मल आढळले. तेव्हा ठीक आहे आत्ताच ब्लडप्रेशर च्या गोळ्यांची गरज नाही. नंतर काही काळाने मीठाचे प्रमाण परत येरे माझ्या मागल्या सारखे झाले. नंतर आमच्या कार्डिऒलॊजिस्टने ब्लडप्रेशर ची गोळी पण चालू केली.फॆमिली डॊक्टर म्ह्णाले की ठीक आहे आता स्पेशालिस्टनेच चालू केली आहे म्हटल्यावर घ्या. इथे एक नोंद करावीशी वाटते. आमच्या फॆमिली डॊक्टर बाई घरातल्या स्वयंपाक तुमचे आहार विहाराचे व कामाचे रुटीन याविषयी विचारतात तसे स्पेशालिस्ट विचारत नाही त्यांना तेवढा वेळही नसतो. खर तर पेशंट ने दिलेल्या अशा माहितीतून काही वैद्यकीय निरिक्षणांना व संशोधनला हातभार लागत असतो. मटा मधील त्या डॊक्टरच्या लेखात मला कसे उत्तर मिळाले तसे काहीसे. माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि गेली पधरा वर्षे मी माझ्या गरजेपेक्षा दुप्प्पट मीठ घेत होतो. किंवा घेतो आहे आपले आंतरजालावरील मिपाकर व मायबोलीकर लेखक .कुमार१ यांनी ही गाउट प्रतिबंधक आहारात मीठ कमीच खाण्याची शिफारस केली आहे. बहुतेक डॊक्टर मीठ कमी खाण्याचा सल्ला देतात पण मग अशा परिस्थितीत काय करावे? असा प्रश्न माझ्यासमोर पडतो.

मी आपणास यथावकाश उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, पण कृपया आपण त्याची थोडी प्रतीक्षा करावी ही नम्र विनंती!

@ प्रकाश घाटपांडे..
माझ्या पण बाबतीत सेम झालेय. मला मिठ्च काय मिरची पण तिखट लागत नाहीये.
कोणत्या डॉक्टर कडे जाउ कळत नाही.

Pages