उच्च रक्तदाबाचा विकार : एक सर्वसाधारण आरोग्याचा विळखा :भाग 2

Submitted by डॉ रवी१ on 14 April, 2018 - 12:05

उच्च रक्तदाब योग्य जीवनशैली व आवश्यकता असल्यास औषधांची योजना करून
उपचार करून आटोक्यात आणता येतो.

१ वजन नियंत्रणात आणणे

२ योग्य व्यायाम करणे

३ आहारातील संपृक्त चरबीचे प्रमाण कमी करणे

४ ताण-तणावाचे नियंत्रण करणे

५ मिठाचे प्रमाण ५ ग्रामच्या जास्ती न ठेवणे

६ आहारातील इतर बाबींचा अंतर्भाव करणे/बदल करणे

७ धुम्रपान व मद्यपान यांवर नियंत्रण आणणे

८ जरुरीपेक्षा जास्ती आवाजाचे प्रमाण कमी करणे

९ वयाच्या ३० पासून रक्तदाब दर ६ महिन्यांनी तपासणे तसेच सर्व चाचण्या
दर वर्षी करून घेणे.

१० मुळात रक्तदाबाची समस्या असल्यास नियमित तपासण्या करून उपचार करणे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@डॉ रवी१
लेख लिहिताना कृपया "लेखनाचा धागा" ह्या लेखनप्रकाराचा वापर करून लिहावे. तुम्ही सध्या वाहते पान म्हणून लेखन सुरु करता आहात त्यामुळे प्रतिक्रिया वाहून जातील (काही वेळाने नष्ट होतील)

मी पण आहे, बरेच शिकता आले या चर्चेमुळे, सर्वांना धन्यवाद!परत लिहायचे ठरविले तर याचा खूप उपयोग व फायदा होईल असे वाटते.

>>उच्च रक्तदाब योग्य जीवनशैली व आवश्यकता असल्यास औषधांची योजना करून
उपचार करून आटोक्यात आणता येतो.<<

डॉक्टरसाहेब, हल्ली जीवनशैलीत योग्य ते बदल करुन मधुमेहाचं उच्चाटन करता येतं, तसंच रक्तदाबा बाबतहि करणं शक्य आहे का? थोडक्यात, कित्येकांची मधुमेहाची गोळी सुटलेली पाहिली आहे; रक्तदाबाची गोळी सुद्धा सुटु शकते का?..

मी आपणास यथावकाश उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, पण कृपया आपण त्याची थोडी प्रतीक्षा करावी ही नम्र विनंती!

राज, मधुमेहाच्या बाबतीत तसे शक्य आहे, पण बिपीची गोळी क्वचितच वेळेस बंद होऊ शकते.
पूर्व उच्च (१२०-१४०/९० -९९) प्रकारात जीवनशैलीमुळे फरक पडु शकतो. अनुवांशिक असेल तर अजिबात नाही
पडत. पण जीवनशैलीचा आटोकाट प्रयत्न करावा.त्यामुळे फायदा निश्चितपणे होऊ शकतो. प्राथमिक उच्च रक्तदाब
असल्यास(कारण न सापडल्यास) क्वचितच, कारण असेल तर ब-याचा वेळेस होतो.

अशा प्रकारे आता आपल्या उच्च रक्तदाबाच्या प्रदीर्घ चर्चेची अखेर सांगता होत आहे. चर्चा अधून मधून जरी वादग्रस्त झाली तरी ती रंगतदार झाली. चर्चेचे श्रेय तुम्हा सर्वांना आहे, मी मनापासून धन्यवाद देतो, कारण हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा व सामान्य, सर्वसाधारण आहे.पंच्विशितीशीपासून सुरु होऊन वयाच्या अखेरपर्यंत कित्येक जणांची पाठ सोडत नाही. खरे पाहता हा विषय फार मोठा आहे.कोणत्या गोळ्यांचा काय परिणाम होतो, केशवाहिन्यांच्यापेक्षा थोड्या मोठया असणाऱ्या ज्याला arteiols म्हणतात, त्यांचे जाळे असते, त्यावर hormones, केमिकॅल्स इ.चे कसे परिणाम होतात, मानसिक व मेंदूतील अवयवांचे, मूत्रपिंड तसेच हृदयाचे कार्य इ.अनेक factors चे परिणाम कसे होतात यांची माहिती अति प्रचंड आहे.विस्तारभयास्तव ती हेतुपुरस्सर टाळली आहे.

केशवाहिन्यांच्यापेक्षा थोड्या मोठया असणाऱ्या ज्याला arteiols म्हणतात, त्यांचे जाळे असते, त्यावर hormones, केमिकॅल्स इ.चे कसे परिणाम होतात, मानसिक व में>> का? मला वाटले तुम्ही मोठी मालिका लिहून आम्हाला ही माहीती देणार. आता माझ्यावर मानसिक परि णाम होईल.

अहो अमा, असे म्हणू नका हो! हा विषय इतका मोठा आहे की त्यावर एखादे खूप मोठे पुस्तक/ग्रंथ तयार
होऊ शकेल.पण तो येथे नाही न होणार, नाही का?

का नाही होणार?

अहो लिहाच तुम्ही डॉक्टरसाहेब.

मायबोलीवर असे ग्रंथ मराठीतून आहेत म्हणून लोक येऊन वाचतील की. अन वाचून तुम्हाला धन्यवाद देतील. लेखमालेचे संकलन करून पुस्तक करून अमॅझॉनवर विक्रीस ठेवलेत, तर सहज (माझ्यासारखे आगंतुक पाहुणे येतील त्यांचा) चहापाण्याचा खर्च निघेल.

अन्यथा तिकडे गूगल आहेच. तिथे या लेखात तुम्ही १३ ओळींत (८९ शब्द) दिलीत तितकी त्रोटक माहिती तर इंग्रजी वाचता येणार्‍यांना सापडुनच जातेच ...

227 + 89 (word count from 2 articles) = उच्च रक्तदाबाच्या प्रदीर्घ चर्चेची सांगता

अरे आ.रा.रा. specialty,तुम्ही कोण, नाव, ते प्रथम सांगा, कुठल्या batch चे, काय करता?