Submitted by दत्तात्रय साळुंके on 10 April, 2018 - 02:14
( शशांकजींच्या भक्तिमय रचनांच्या प्रेरणेतून )
ताल धरी पांडुरंग
मनातला भक्तिभाव
प्रगटता कागदावं
भाग्योदय त्याचा झाला
आला आला त्याला जीव
ओळ ओळ रखुमाई
अर्थोअर्थी चंद्रभागा
ताल धरी पांडुरंग
साथ देउनी अभंगा
शाई भक्तिरस प्याली
अक्षरांसी वाचा आली
पान बोलता विठ्ठल
पंढरी दुमदुमली
© दत्तात्रय साळुंके
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
डोळ्यांसमोर विठ्ठलाची मनमोहक
डोळ्यांसमोर विठ्ठलाची मनमोहक मूर्ती आली, खूपच सुंदर!
छान आहे कविता.
छान आहे कविता.
श्री. दत्तात्रयजी,
श्री. दत्तात्रयजी,
तुमचा प्रेमभाव लक्षात आला. आपण सारेच मराठी भाषिक हे सार्या संतांबद्दल ृृृऋणी असायला हवे. या सार्या संतांनीच भक्तिभाव स्वतः जगून आपल्या हातात दिला.
आपली सार्यांची मातृभाषा मराठी असल्यानेच माऊली, तुकोबा, समर्थ, इ. सार्या संतांचे साहित्य आपल्याला वाचता तरी येते.... त्यातील भक्तिभाव आपल्या अंतःकरणात तेव्हाच जागृत होईल जेव्हा या संतांची कृपा आपल्यावर पावसासारखी बरसेल....
तुमची ही रचनाही भक्तिमय आहे अगदी...
_______/\______
वैभवजी , भास्कराचार्यजी ,
वैभवजी , भास्कराचार्यजी , शशांकजी खूप धन्यवाद सुंदर प्रतिसादासाठी ...
शशांकजी संतानी फार मोठे धन दिले आहे आपल्याला . माऊलींचे पसायदान असो किंवा विश्वाचे आर्त असो , तुकोबांचे अणुरेणू कवटाळणे असो वा पडखळ समाजप्रबोधन सगळचं खूप मोठं आहे . मी एक यत्किंचित प्राणी हे समजायला तरीपण हे सगळं वाचताना संसारदाह कमी होतो हे निश्चित . जीवनाकडे पाहण्याची एक धीरोदात्त नजर येते .
दसांची नवीन कविता आली तेव्हा
दसांची नवीन कविता आली तेव्हा आठवलं की विठूरायावरही त्यांनी लिहिले आहे. इथे बोटं प्रथम वळल्याने..
शेवटच्या ओळी विशेष सुंदर.
प्राचीन
प्राचीन
खूप धन्यवाद..
आपला प्रतिसाद मनाला उभारी देऊन गेला.