ब्लडी मेरी

Submitted by ..सिद्धी.. on 3 April, 2018 - 13:49

संध्याकाळची वेळ होती . नेहा आज रिलॅक्स होती. दुपारीच शेवटचा पेपर देऊन घरी आली होती. नंतर चार तास मस्त झोप काढल्यामुळे मूड फ्रेश झालेला तिचा. आता काय करायचं याचा विचार करत गच्चीत उभी होती . थंडगार वारा सुटल्यामुळे प्रसन्न वाटत होतं . तितक्यात तिला अचानक आठवलं की परीक्षेमुळे बर्याच दिवसात आपण फेसबुक उघडलंच नाहीये. आपल्या स्मरणशक्तीवर खूष होत ती धावत खाली आली . पटकन किचनमध्ये जाऊन काॅफी तयार केली आणि कप  हातात घेऊन फेसबुक उघडल. काॅफी पिता पिता एकेक पोस्ट वाचू लागली . शेवटी स्क्रोल करता करता एका पोस्ट वर येऊन थांबली. त्यावर ब्लडी मेरी बद्दल काहीतरी लिहीलं होतं. पोस्ट वाचून झाल्यावर तिच्या मनात एक थ्रिलींग विचार आला . आज आपण ब्लडी मेरीला बोलवायचं असं तीने पक्क ठरवलं . मग हळूहळू तिला कसं बोलवायचं याची रेसिपी तिने नेटवर शोधली . रात्री बारा ते तीनच्या मध्ये तिला आमंत्रण द्यायचं असतं असं तीने कुठेतरी वाचलेलं . पुन्हा एकदा तीने आपल्या स्मरणशक्तीची दाद दिली .  मेरीच्या स्वागतासाठीचं साहित्य तीने आईपासून लपवून आधीच रूममध्ये आणून ठेवलं . घरात कोणालाही तीने रात्री येणार्या पाहुणीविषयी सांगितलं नव्हतं . शेवटी एकदाचे बारा वाजले . पण अजून जरा वेळ वाट बघूया असं म्हणत एक वाजेपर्यंत थांबली. बरोब्बर एक वाजता तीने मेणबत्ती पेटवली . गरम होत असल्यामुळे घरातले सगळे जणं गच्चीत झोपले होते. दार जरासं उघडून ती पटकन खाली रूममध्ये आली. खरं तर नेहा तशी घाबरलेली . पण मेरीविषयीच्या उत्सुकतेपोटी तीने मनातलं भीतीचं गाठोडं दूर फेकून दिलं .
आता ती आरशासमोर जाऊन उभी राहीली. हातात मेणबत्ती होतीच . ब्लडी मेरीचं नाव तीनदा घेतलं . पाच दहा मिनीटं वाट बघीतली . पण मेरी काही येईना. आता तीला कळलं की भूत वगैरे काही नसतं . तरीही एकदा शेवटचा प्रयत्न करूया असं म्हणत नेहाने पुन्हा एकदा मेरीला आधीपेक्षा जरा जोरातच हाक मारली.  दोन मिनीटं काहीच हालचाल झाली नाही . पण तिसर्या मिनीटाला जिन्यातून पावलांचा पुसटसा आवाज यायला लागला . आता मात्र नेहा खरंच घाबरली . हळूहळू पावलांचा आवाज जवळ यायला लागला . काहीतरी विचीत्र भयानक दिसणार म्हणून नेहाने भीतीने डोळे मिटून घेतले . आता मात्र ते जे काही होतं ते खोलीच्या बाहेर आलेलं होतं . नेहाने पाहुणीला दारातूनच परत पाठवण्यासाठी रामनाम घ्यायला सुरूवात केली . पण घाबरल्यामुळे चुकून पहिल्यांदाच' राम नाम सत्य है |'म्हणाली. पटकन चूक लक्षात आल्यावर तीने त्याचा नाद सोडला आणि सरळ हनुमानचालीसा म्हणायला लागली. खोलीचं दार पूर्ण उघडलं गेलं . डोळे किलकिले करून नेहाने आरशात बघीतलं तर अंधारात गाऊन घातलेली मेरी चालत येताना दिसली . तीने पटकन डोळे घट्ट मीटून घेतले . आता मेरी नेहाच्या मागे येऊन थांबली . नेहाला ते जाणवत होतं . तितक्यात नेहाच्या डोक्यावर दोन टपल्या आणि पाठीत एक धपाटा बसला . नेहा ओरडली; मेरी तुला जीझसची शप्पथ आहे; पटकन परत जा.  आतातर पाठीत पण एक सणसणीत दणकासुद्धा मिळाला . नेहाच्या लक्षात आलं हे काहीतरी वेगळच प्रकरण आहे . तीने डोळे उघडून मागे बघीतलं तर मागे तिची आई उभी होती . काय चाललय विचारल्यावर बिथरलेल्या नेहाने सगळा वृत्तांत कथन केला . ते ऐकून चिडलेल्या आईलाही हसायला आलं . आपली बिनपाण्याची धुलाई होणार म्हणून नेहा थरथरत उभी होती. पण आईची रिअॅक्शन बघून तीचं पण टेन्शन दूर पळालं आणि आईसोबत तीही परत झोपायला गच्चीवर गेली . मनातली भीती हेच एक भूत असतं हे तीला पटलं होतं.
====================================
तळटीप :- भयकथा लिहीण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे.बराच वेळ अभ्यास केल्यावर ब्रेक घेतला.दमलेल्या मेंदुला पटकन ही सुचली आणि पंधरा मिनीटात लिहीली. भूतांविषयी मला तितकी माहिती नाही .त्यामुळे काही चुका असल्यास मोठ्या मनाने माफ करा..

---आदिसिद्धी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली कथा.. Happy
सिद्धी, कथेतील नेहा म्हणजे तूच तर नाही ना ?? Wink

नाही गं मी नाहीये ..पण परीक्षा झाली की ट्राय करणारे एकदा.... आता रात्रभर अभ्यास करत जागी असते ... तर एकदाही नाही दिसली...बघायची आहे एकदा....

भारीच जमलीय कथा.... उत्तम.

बघायची आहे एकदा>>>>> ब्लडी मेरी भयानक असते हं.... एकवेळ काळोख्या खोलीत आरशात तीनदा ब्लडी मेरी बोल, ती तुला दर्शन देऊन निघून जाईल, पण 'आय स्टोल युवर बेबी' कधीच बोलू नको...

मी तर म्हणते कशाला विषाची परीक्षा! माझ्या दीदीला या मेरीचा वाईट अनुभव आलाय. सत्य कथन.

ती एके दिवशी रात्री दोन वाजता आरशात उभी राहून 'ब्लडी मेरी' बोलली होती. पाच मिनिटं झाली, काहीच होत नाही हे बघून ती आरशासमोरून हटली नि लाईटच गेली..... आणि यावर वरकडी म्हणजे तिच्या स्वप्नात चक्क ती मेरी आली होती. दीदी भरपूर घाबरलेली.

तळटीप: विपू बघ.

कथा आणि माहिती दोन्ही छान .. उपयुक्त !

फक्त आरश्यासमोर उभे राहून मेणबत्तीच्या प्रकाशात तीनदा ब्लडी मेरी ये गं बाई बोलायचे... खूप सोपी रेसिपी आहे. आजच करतो ट्राय .. तसेच आय स्टोल युवर बेबी' हे सुद्धा बोलतो.. आलीच खरोखर तर आपल्या देवांची नावे घेऊन जाते का हे देखील बघतो.. भूत आणि देव, दोघांचे अस्तित्व एकत्रच चेक होईल Happy

अरे हो, जर मी उद्या आलोच नाही माबोवर तर असे समजा, या जगात चावणारा भूत आहे पण त्यापासून वाचवणारा देव नाही ..

ऋन्मेषदादा आय स्टोल युवर बेबी बोलल्यावर ती सहसा मारत नाही पण डोळे वगैरे फोडते असं ऐकलंय.... जपून. आणि ट्राय केल्यावर अनुभव सांगायला विसरू नकोस हं. Wink

ए ऋदादा मला खरी रेसिपी माहीत नाहीये... नेटवर बघ एकदा... नाहीतर वेगळच काहीतरी येईल .... जरा हनुमानचालीसा सारखा जिझसचालीसा असेल तर पटकन पाठ कर ... पाश्चात्य भूत आहे...

त्यापेक्षा उद्या इथेच विचारा - "डोळे फुटले काय रे ए " Happy >>>> अहो डोळे फुटल्यावर टाईप कसा करेल तो... कोणी दुसर्याने केलं तर गोष्ट वेगळी... पण आधीच' शुभ बोल नार्या तर आग लागली मांडवाला' अस नको व्हायला...जोक होता हं.. रागावू नका....

मी ओम, क्रॉस, चांदतारा, स्वस्तिक सारे सोबतच घेऊन बसलोय.
ऑक्सफॉर्ड डिक्शनरी सुद्धा सोबत आहे..
तीन पर्यंत चालते तर पावणेतीनलाच बोलावतो.
याचे दोन फायदे, काही गंडले तर पंधरा मिनिटे बोलबच्चन देऊन खेळवेल ब्लडीमेरीला, आणि तीन वाजताच कटवेन.
आणि दुसरे म्हणजे नाही फसली आणि फोडलेच तिने माझे डोळे तर त्या आधी जमेल तितकी मायबोली तरी करून घेतो.. फिर क्या पता कल हो ना हो ..

बाई दवे,
बारा ते तीन म्हणजे हा मी त्या दिवशी कुरीअर कथेवर सांगितलेलाच काळ आहे. १२ ते ३ मध्ये भूत सक्रिय असतात पण ३ वाजता रामाचा रथ निघाला की निष्क्रिय होतात.
थोडक्यात सर्व धर्मांची शिकवण समान आहे तर..

पाफा Rofl
इथे एक प्रश्न आहे... हे पाश्चात्य भूत आहे.. रात्री आपल्याकडे 12-3 म्हणजे त्यांच्याकडची दुपार... मग कसं काय येईल ...ते ही रात्रीच घाबरवत असेल ना.... असो आज रात्री मी पण ट्राय करणार आहे.... काल ज्यांनी बोलवलेलं त्यांनी सांगा अनुभव...

छान !!
असेच काही असेल असे वाटलेले, पण नेहा बाहेर गेल्यावर आरशात खरंच मेरी दिसत असते, असा शेवट आवडला असता.

नाही बोलावले.. Sad

तयारी केलेली सर्व.. मेणबत्ती, आरसा, काडेपेटी, धार्मिक चिन्हे, गरज पडल्यास मेरी सोबत सेल्फी काढायला मोबाईल सुद्धा जवळ बाळगला होता. वाईटात वाईट डोळेच फुटतील यासाठी मनाची तयारीही केली होती..

पण ऐनवेळी अखेरचे डोळसपणे गर्लफ्रेंडशी पाच मिनिटे बोलून घ्यावे म्हणून तिला ठिक 2.40 ला कॉल लावला. तिने मला एकच दम भरला. असं रात्रीच्या वेळी एकटे असताना कोण्या सटवीला घरी बोलावशील तर आपले नाते कायमचे संपले. ब्लडी ब्रेक अप..

बस्स मग 3.40 पर्यंत कशीबशी तिचीच समजूत काढत होतो. शेवटी खड्ड्यात गेली ती ब्लडी मेरी, बस्स एक तूहीच मेरी यावर मांडवली करून झोपलो चूपचाप.

पण नेहा बाहेर गेल्यावर आरशात खरंच मेरी दिसत असते, असा शेवट आवडला असता.
>>>

तिचा कथा लिहिण्यामागचा हेतू अंधश्रद्धा निर्मूलन असावा Happy

ऋन्मेषदादा..
मेरी हे भूत आहे असंच सांगितलेलस ना रे तिला... नाहीतर भूत शब्द गाळल्यामुळे चिडली असेल ती..

किंवा प्रयोग करायच्या आधी तू घाबलास आणि नाही केलंस असं तर नाही ना..( गंमत केली . रागावू नकोस)

कथालेखनाचा हेतू बरोबर ओळखलास..

पण या मेरीबाईंची खरी स्टोरी काय आहे?? म्हणजे भूत का झाली ती.. मला एक 'टायफाॅईड मेरी 'माहितीये बायोलाॅजीतली... ही तीच तर नाही ना.. आणि आय स्टोल युवर बेबी चा काय सिग्निफिकन्स आहे...

नाही . मी सांगते :

मेरी ही एक ब्रिटिश राणी होती. ती म्हणे खूप क्रूर होती. कितव्यातरी एलिझाबेथची बहीण. तिची अशी आख्यायिका आहे की ती सुंदर दिसण्यासाठी तरूणांच्या रक्ताने अंघोळ करायची. म्हणून ती ब्लडी मेरी. ती चार-पाच वेळा प्रेगनंट झाली होती पण काही महिन्यांनी तिच्या पोटातलं बाळ दरवेळी नाहीसं व्हायचं. म्हणून आय स्टोल युवर बेबी बोलल्यावर ती जास्त रागवते. तिच्या अत्याचारांनी क्रोधित होऊन जनतेने तिला मारून टाकलं होतं. तेव्हापासून ती भटकतेय.

हे मी असे वाचले..

ती सुंदर दिसण्यासाठी तरूणांच्या रक्ताने अंघोळ करायची. म्हणून ती चार-पाच वेळा प्रेगनंट झाली होती Lol Lol

एक प्रश्न
जर बाळ जन्मालाच आलं नव्हतं तर आय स्टोल युवर बेबी म्हटल्यावर तीने चिडायला नाही पाहिजे.

Pages