मायबोलीचे बिग बॉस

Submitted by पाथफाईंडर on 3 April, 2018 - 10:48

१५ तारखेपासून मराठी बिग बॉस चालू होते आहे.
समजा मायबोली ने बिग बॉस चालू केले तर कोणत्या आयडींना आत पाठवायचे

चला घाला राडा.

हेडमास्तर : कृपया धाग्याने पातळी सोडली तर धागा उडवावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेले काही सिझन धार्मिक गुरुंना पण बिग बॉसमध्ये घेत होते. मायबोलीवरचे असे कोणी आहे का?

बाद झालेले आयडी चालतील का? तसे असेल तर हातभर लांब पोस्ट वाले काका आहेत Wink

चम्स

मला सामिल केलेले प्रतियोगींना काय खुद्द बिग बॉस ला पण परवडणार नाही Wink

सलमान सारख होस्टींग च काम रुन्मेष ला द्या रे.त्याला स्पर्धक म्हणुन नका घेऊ.
>>>>

नको नको.. म्हणजे मी पाहिले नाही बिग बॉस, त्यामुळे सलमान काय करायचा ते माहीत नाही, पण बिग बॉस होण्यात काय मजा.. त्यापेक्षा घरात लोकांत चारचौघात राहून किडे करण्यात मजा ना...

आणि माझा जिण्कायचा चान्सही ब्राईट आहे.. शेवटपर्यण्त मी सहज स्पर्धेत राहू शकतो.. कारण शेवटी या गेमला टीआरपीची गरज असणारच.. आणि सर्वांनाच माहीत आहे की मी टीआरपीसाठी का ही ही करू शकतो.. कुठल्याही थराला जाऊ शकतो..

ईथल्या एखाद्या आयडीला आपले नाव वरच्या लिस्टमध्ये आल्याचे वाईटही वाटू शकेल. म्हणून मी माझी लिस्ट देत नाहीये Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 4 April, 2018 - 09:51
>>>
मी माझ्या लिस्टमधे चांगले लोक ही दिले आहेत.

आणि माझा जिण्कायचा चान्सही ब्राईट आहे.. शेवटपर्यण्त मी सहज स्पर्धेत राहू शकतो.. कारण शेवटी या गेमला टीआरपीची गरज असणारच.. आणि सर्वांनाच माहीत आहे की मी टीआरपीसाठी का ही ही करू शकतो.. कुठल्याही थराला जाऊ शकतो..
Submitted by ऋन्मेऽऽष on 4 April, 2018 - 12:01
+999

माझी लिस्ट,
ऋन्मेष आणि एक आरसा.

ऋन्मेष ला बिझी ठेवायला एक आरसा पुरे,
हे बिग बॉस अनंत काळ चालू राहावे,
म्हणजे ऋन्मेष त्या bb वरच राहील आणि बाकी माबो सुखाचा श्वास घेईल

@ च्रप्स आणि पाथफाईंडर,
मला नामांकित केल्याबद्दल धन्यवाद!
फक्त मला कोणत्या category मध्ये टाकलंं आहे ते सांगाल का? आणखी एक, माझ्या नावात दोन शब्दांमध्ये underscore (_) आहे. तेवढा फक्त बदल करा. उगाच या चुकीमुळे माझे नामांकन रद्द व्हायला नको!!!
(विशेष सूचना: उपरोक्त प्रश्न हा केवळ च्रप्स व पाथफाईंडर यांनाच विचारण्यात आला आहे, अन्य कोणाकडूनही त्याचे उत्तर अपेक्षित नाही!)

@विक्षिप्त मुलगा
माझे नाॅमीनेशन "अभ्यासू व्यक्तीमत्व " म्हणून आहे.

शाहरूख लिहिले असते तर शाहरूख म्हणजे बॉलीवूड सुप्पर्रस्टार किंग खान शाहरूख समजावा की आणखी कोणी शाहरूख असा प्रश्न पडला असता का?>>>>>>>> Rofl प्रश्न भारी आहे.. हजरजबाबीपणाची दाद द्यायला हवी.
मी एवढं नसतं विचारलं, शाहरूख के आप बडे फॅन हो हे मला माहीत आहे तुमचे धागे वाचून... मी आपली अशीच गंमत केली हो... तुम्ही कुठेही लिहिलेला एसआरके शाहरूख खान च्या शिवाय दुसरा कोण असू शकतो!!! Happy माबोवर खरा शाहरूख खान जर कधी आला तर तुमची पाठ थोपटूनच जाईल...

ऋन्मेषदादा टाक रे एकदा लिस्ट .. वाचायची आहे... कोणाला वाईट वाटलं तर सांगतील रे ते .. मग डीलीट कर...
बाकी जिंकायचं पोटेन्शीयल आहेच तुझ्यात.. तु किंवा द्वादशांगुलापैकी कोणीही जिंकलं तरी मला आवडेल..

माझी लिस्ट,
ऋन्मेष आणि एक आरसा.>>> आणि शाखा ला घ्या अँचोर म्हणून.. Wink

>>माझी लिस्ट,
ऋन्मेष आणि एक आरसा.>> सिम्बा, इन्फिनीटी मिरर्स नकोत?
त्यात बघून ‘मी मी करते करते, खुद पे मरते मरते‘ हे गाणं म्हणता येऊ शकेल.

ऋन्मेष आणि एक आरसा.>> सिम्बा, इन्फिनीटी मिरर्स नकोत?
>>>>

मी एकट्याच्या जीवावर या शो ला फार टीआरपी नाही मिळवून देऊ शकत.. मला तुम्हा सर्वांची साथ लागेलच.

एकट्याच्या जीवावर या शो ला फार टीआरपी नाही >>>>>
हा मोटिव्ह नाहीये आमचा,
तुला इतर धाग्यांपासून दूर ठेवणे हा मोटिव्ह आहे.

सिम्बा, इन्फिनीटी मिरर्स नकोत?>>>>
नकोत, हा स्वतःच्या इतक्या प्रेमात आहे की आरसाच काय कोणताही चकचकीत सरफेस चालेल त्याला आपल प्रतिबिंब न्याहाळत बसायला.

श्या मला वाटले माबोच्या बिगबॉस बद्दल विशेष टिप्पणी करणारा लेख असेल. हे भलतेच निघाले>>>>

सहमत. मलाही तेच वाटले म्हणून इथे आले.

माझे नाव वाचून आश्चर्य वाटले. आठवणीत ठेवल्याबद्दल आभार मित्रांनो!!!

हा मोटिव्ह नाहीये आमचा,
तुला इतर धाग्यांपासून दूर ठेवणे हा मोटिव्ह आहे.
>>>>

मोटिव्ह म्हणजे? हेतू का?
अवांतरासाठी क्षमस्व, पण यावर मी एक नवीन धागा काढू का? ईथे मराठी शब्द वापरणे किती सहज सोपे होते. तरीही आपण ईंग्लिश शब्द वापरला. हे हल्ली फार आढळते ..

..
..

नकोत, हा स्वतःच्या इतक्या प्रेमात आहे की आरसाच काय कोणताही चकचकीत सरफेस चालेल त्याला आपल प्रतिबिंब न्याहाळत बसायला.
>>>>
मला स्वत:ला न्याहाळायला आरश्याची गरजही नाही. डोळे बंद केले तरी समोर येणारा पहिला चेहरा माझाच असतो. येस्स! मी स्वत:वर प्रचंड प्रेम करतो. कारण या जगात मी पुर्णपणे ओळखू शकलेली व्यक्ती मी स्वत:च आहे. ईतरांना आपण कधीच पुर्णपणे ओळखू शकत नाही. मग त्यांचा राग द्वेष प्रेम लोभ तरी कसा आणि का करावा Happy

मला स्वत:ला न्याहाळायला आरश्याची गरजही नाही. डोळे बंद केले तरी समोर येणारा पहिला चेहरा माझाच असतो. येस्स! मी स्वत:वर प्रचंड प्रेम करतो. कारण या जगात मी पुर्णपणे ओळखू शकलेली व्यक्ती मी स्वत:च आहे. ईतरांना आपण कधीच पुर्णपणे ओळखू शकत नाही. मग त्यांचा राग द्वेष प्रेम लोभ तरी कसा आणि का करावा Happy

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 April, 2018 - 12:52

सहि जवाब Happy
टाळ्या .............................................................................................................................................................

मायबॉली ऑलरेडी एखाद्या बिग बॉस शो सारखीच आहे की. इथे विविध ढंगाचे लोक येतात. शांत, सोज्ज्वळ, सहनशील, खट्याळ, वाह्यात, अहंकारी, उर्मट, तापदायक अशा सर्व प्रकारचे लोक - काहीजण एकमेकांना धरुन राहतात. काही दुसर्‍याला हसवतात, काही रेसिपी करतात, इतर काही काव्यशास्त्रविनोदेन रमतात आणि सर्वांचे मनोरंजन करतात. काही दुसर्‍याला खिजवतात, चिमटे काढतात. भांडणे, मारामार्‍या, उखाळ्यापाखाळ्या असे सारे प्रकार चालतात. ठराविक कालावधीनंतर अ‍ॅडमीन बिगबॉस स्टाईलने घराबाहेर काढत आहोत अशी वॉर्निंग देत / न देताही आयडी उडवतात. अर्थात या लठ्ठालठ्ठीतही सोळा, अठरा वर्षे मायबोलीवरचा आयडी टिकवून ठरलेलेच खरे मायबोली बिगबॉस विनर्स म्हंटले पाहिजेत.

बिग बाॅसच्या घरातील एखादा सदस्य आणि माबोवरीलएखादा सदस्य यातील साम्य दाखवा आणि वविला (स्वत:च्या खर्चाने) जा.

ऋ= थत्ते
कायम लाईमलाईट मधे रहायला आवडणरी व्यक्ती
मोठ्ठा डोमा.

Pages