कुरियर

Submitted by अभिषेक अरुण गोडबोले on 30 March, 2018 - 03:21

स्थळ-इस्लामपूर
दिनांक-१२-०२-२०१७

"हा मी इस्लामपूर कुरियर डेपो मधून बोलतोय,तुम्ही मिस.साठे ना ? हा तुमचं कुरियर आलंय तेवढं घेऊन जा....
हो स्टॅन्डजवळ आहे ऑफिस,हो आहे मी, या दिवसभरात"

"हो निघतीये मी,येता येता कुरियरपण घेऊन येईन,
हो मगाशी आलेला फोन मला कुरियरवल्याचा आणि तू जेवून घे हा,एकदा काम सुरु झालं कि भान राहत नाही तुला.
असूदेत,काळजी आहे म्हणून सांगतीये दहा वेळा.
हो मोपेड घेऊन जातीये..
आता मला कसं कळणार काय आहे कुरियर ते ? बघितल्यावर करते कि फोन.
बरं ठेवतीये मी आता आवरायचंय मलापण ....तू जेवून...ठेवलापण यान फोन"

"इथं सही करा,हो मुंबईचा पत्ता दिसतोय"
"मी तर नव्हतं मागवलं काही"
"काल दुपारी आलंय खरंतरं पण व्यापच इतका आहे कि तुम्हाला contact करायला उशीर झाला"
"ठीके"
"मॅडम मी ऑटो ची सोय करू का ?"
"हो प्लिज,हेवी दिसतंय हे खूपच"

"हां,तिथे त्या कपाटाशेजारी ठेवलं तरी चालेल ,एक मिनिट हा मी पाणी घेऊन येते"

"अरे ओव्हन आलंय !"
"माहितीये मला"
" म्हणजे ?"
"मीच बुक केलेलं...हवं होतं ना तुला ?"
"सांगायचं नाही होय मग ?”
"अगं आई सर्प्राईस सांगतात का ?"
"अरे पण मी घरात असतेच असं नाही,बाहेर गेले असले..."
"बरं आलंय ना आता घरी...आता कर तुझे सगळे पदार्थ.मी येतोच पुढच्या आठवड्यात खायला"

"हॅलो,आई काय ग..अडीच वाजलेत..आत्ता का फोन केलायस ? बरी आहेस ना ?"
"मी बरी आहे पण ते केक करायला temperature किती ठेवावं लागतं रे ?"
"अगं ए...ऑफिस आहे मला उद्या...आणि आत्ता काय केक करतीयेस तू उजाडल्यासारखं ?"
"अरे घरात सामान होतं सगळं आणि झोपपण नाही येते मग म्हणलं करून बघू...सांग ना तेवढंच राहिलंय बाकी सगळं तयार करून ठेवलंय मी"

"काय ग आई,झोपूदे ना मला...सकाळी उठायचंय लवकर.."
"ऐक जरा.."
"काय ऐकू आता,अशी दहा दहा मिनिटांनी फोन केल्यावर कसा झोपू मी..हॅलो...हॅलो आई...चिडली वाटत..हि आई पण ना"

"सुबोध घरात आहे कुणीतरी..."
"काय ? दारं बंद केलेलीस ना सगळी ? कितीवेळा सांगितलंय कि.."
"आज राहतिये का मी एकटी ? सगळं व्यवस्थित बंद केलेलं..तू म्हणालास म्ह्णून ओव्हन ठेवून झोपायला आले.कसलातरी आवाज येतोय "
"कसला आवाज ? शेजारी काकूंना फोन लाव,बोलवून घे कुणालातरी,नाहीतर मीच सोन्याला सांगतो तिथं यायला"
"नको कुणाला उठवत बसू...मला कळूदे नक्की काय होतंय ते..."
"काय होतंय ? कसला आवाज येतोय ? लाईट लावून बघ ना सगळीकडं"
"श्वास घेतंय कुणीतरी..खूप जोरात..मला काहीच कळत नाहीये...स्वयंपाकघरातून येतोय आवाज बहुतेक..."
"काय ?? काहीतरी confusion होतंय तुझं...तू जाऊन बघ आत...काही काय सांगतीयेस ?"
"वेड लागलंय का मला काहीही सांगायला ? आलीये स्वयंपाकघरात इथंच येतोय आवाज..."
"लाईट लावून बघ..'
"लाईट सुरुये,कुणी नाहीये इथं.."
"हा मग,काय कारण आहे घाबरायचं ?"
"अरे मूर्खां इथं कुणी नाहीये म्हणूनच भीती वाटतीये...आवाज येतोय कुठून ?"
"सुबोध..."
"हा बोल...हॅलो...आई...आई बोल ना...आई...हॅलो..."
"अरे भीती वाटतीये मला खूप...तो आवाज ओव्हन मधून येतोय... "
"ओव्हन...ओव्हन मधून ? अरे काय करतीयेस तू ? सोन्याचापण फोन नाही लागते..तू एक काम कर बाहेर जा घरातून...शेजारी काकूंना उठाव...तिथं..."
"हॅलो...हॅलो...आई...आई...ओरडू नको..काय झालं सांग मला...हॅलो आई..अगं रडतीयेस कशाला...काय झालंय ...हॅलो आई बोल कि...तू बाहेर आलीयेस का..."
"सुबो...त्या..त्या...ओव्हन मध्ये मुंडक आहे माणसाचं...सुबो....चक्क..चक्कर येतीये...हाल..हॅलो..सुबो..सुबोध..."
"आई तू बाहेर जा तिथून..मी सोन्याला उठवलंय तो येतोय तिकडं...तू तिथं नको थांबू...हॅलो..हॅलो आई ऐकतियेस का ? हॅलो...सोन्या येतोय...बेल वाजतीये बघ..सोन्या असेल दारं उघड...आई ऐकतियेस का ?"

"हॅलो सुभ्या..."
"हॅलो सोन्या...आईकडं दे.... बरी आहे ना ती ? काय म्हणतीये बघ ती.."
"हॅलो सुभ्या....अरे काकू...काकू गेल्यात..."
"निघतोय ..निघतोय मी"
------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्थळ-सातारा
दिनांक-१६-०२-२०१७

"हॅलो अगं बाळा,तू काही मागवलेलंस का ?"
"हो, का ग ? आलं पण इतक्यात घरी ?"
"आत्ता तो कुरियरवाला घेऊन आलाय..तुमच्या नावे आहे म्हणतोय कुरियर"
"हो ठेवून घे,मीच मागवलंय"
"शहाणीचेस...काय आहे ?"
"मी का सांगू ?..Its Surprise...!!"

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे, डेंजर गोष्ट!

अनु, तुझ्या एकेक शक्यता पण डेंजर आहेत. ह्यातलं काहीही असू शकतं.

धन्यवाद...
खरंतरं हि कथा जशी सुचली तशीच अगदी थोडेफार बदल करून लिहिली...
एखादी व्यक्ती गेल्यावर येणारे अनुभव हे दरवेळी Shocking वगरे नसतात आणि मला 'चला सुटलो' अशी रिअक्शन देणारे पण अनेकजण माहितीयेत...त्या मुलाला आता त्याच्या 'घरी जाणं' एवढंच सुचलंय आणि म्हणून तो एका शब्दात ते संपवतोय...
तुमच्या सगळ्यांची मत माझ्यासाठी तेवढीच महत्वाची आहेत आणि माझी लिखाणात अजून सुरुवात आहे त्यामुळं नक्कीच काहीनाकाही चुका असतील..तुमच्याकडून अश्याच प्रतिक्रिया येत असतील तर अजून खूप लिहायला आणि त्यातून शिकायला नक्की आवडेल...

सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद....

एक राहिलंच.पुढच्या कुरियर केस मध्ये मायक्रोवेव्ह मधलं मुंडकं या कथेतल्या आईचं असेल ही एक शक्यता.>>>>>>आधी खरंतरं तेच डोक्यात होतं पण ते मला कसं मांडावं ते ठरवता येईना म्हणून मग ते वाचणाऱ्यांवर सोडलं...

आईने रात्रीपर्यंत अव्हन उघडुन बघितला नव्हता का? बघितला असेलचना.
मग मुंडकं नंतर ऐनवेळेला आलं का बेक व्हायला अव्हन मधे?
आणि बेक केलेल्या मुंडक्याच्या रेसीपीचं नाव काय?

1. रिक्षावाल्याने पॅक आणून ठेवला हॉल मध्ये.
2. तो गेल्यावर आईने ओव्हन जागेवर ठेवला(जड असूनही)
3. मग पॅक उघडला आणि प्लग इन केला.मायक्रोवेव्ह ला हल्लीच्या फॅशन ची काळी काच असल्याने मुंडकं दिसलं नाही.
4. मुंडकं हे भूत असल्याने त्याच्यातून रक्त वाहणे वगैरे प्रकार झाले नाहीत, ते प्राचीन काळात झाले असेल.
5. मुंडकं दिवसा गप्प बसलं आणि रात्री सनसेट नंतर श्वास घ्यायला चालू झालं.
☺️☺️☺️☺️☺️

मुंडकं दिवसा गप्प बसलं आणि रात्री सनसेट नंतर श्वास घ्यायला चालू झालं.
>>>>>

सनसेट नंतर असे नसते...
भूतांचा प्रभाव रात्री 12 ते 3 असतो..
रात्री 3 वाजता रामाचा रथ निघतो. त्यानंतर ती पळतात. वा निष्क्रिय होतात.
हॉस्टेलला असताना 12 ते 3 दरम्यान कितीही जोराची बाथरूम का लागली असेना आम्ही थांबवून ठेवायचो. आणि 3 वाजले की टणाटण उड्या मारत बिनधास्त जायचो. आम्हाला कोणी तेव्हा पकडले आय मीन झपाटले नाही. याचा अर्थ खरे असावे. जाणकार प्रकाश टाकतील. अवांतराबद्दल क्षमस्व. पण भूतांबाबतचे हे सनसेट गैरसमज वेळीच दूर झालेले बरे. अन्यथा मुलीच काय मुलेही सातच्या आत घरात यायला लागतील..

हॉस्टेलला असताना 12 ते 3 दरम्यान कितीही जोराची बाथरूम का लागली असेना आम्ही थांबवून ठेवायचो. आणि 3 वाजले की टणाटण उड्या मारत बिनधास्त जायचो. आम्हाला कोणी तेव्हा पकडले आय मीन झपाटले नाही.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2018 - 14:19
>>>>
तुमच्या हाॅस्टेलमधे कुणीतरी अफवा पसरवली असेल रात्री ३नंतर भुते येतात. Rofl

पाफा,
रात्री तीन नंतर भूते येत नाहीत तर जातात. 12 ते 3 दरम्यान सक्रिय असतात. आणि हे तुमच्या आमच्या हॉस्टेललाच लागू नाही तर वैश्विक सत्य आहे.
आणि कोणी हेतुपुरस्पर अफवा पसरवण्याचाही प्रश्न नाही कारण या काळात ग्रूपने मुले बाहेर पडायचीच. पण एकटे दुकटे नाही. अपवाद फक्त त्या अजय देवगण लोकांचा..

सस्मित, देवाचा आणि भूताचा आपापसात संबंध काय विचारताय. गंमतच आहे Happy

@ ऋ
हाॅस्टेल लाईफ मधे आपल्याला हवे तसे वागता यावे म्हणून रात्री ३ (टणाटण उड्या मारणारी) नंतर भुते येतात अशी पुडी नक्कीच सोडता येते. आणि एकंदर आपल्या लीला बघता म्होरक्या आपणच असाल अशी मनाला चाटून गेलेली पुसटशी शंका.

12 ते 3 दरम्यान सक्रिय असतात. आणि हे तुमच्या आमच्या हॉस्टेललाच लागू नाही तर वैश्विक सत्य आहे.
>> वैश्विक?
डे लाईट सेविंग टाईम कळतो का त्यांना?

अहो पाथ, मुले एकटेदुकटे जायला घाबरतात, पण ग्रूपने जातातच. म्हणून पुड्या नाहीयेत त्या, हे वरच्या पोस्टमध्ये लिहिलेय बघा.

च्रप्स, डे लाईट सेविंग टाईम असा ईंग्लिश आणि टेक्निकल शब्द वापरला म्हणजे त्या अडाणी भूतांना कळणार नाही असे आहे होय.
अहो भूत म्हणजे काय परग्रहावरून आलेले प्राणी आहेत का? आपलीच माणसं मरून भूतं होतात ना? मग जे तुम्हाला आम्हाला कळते ते तर त्यांना कळतेच प्लस त्या दुनियेत जे काही शिकत असतील ते वेगळेच..

मस्त लिहीली आहे.
अजुन एक उगाच च पॉईन्ट.... मिस साठे म्हटलाय म्हणजे कदाचित आईसाठी नसुन बहिणीसाठीही असेल.

हम्म..पण मित्र काकू गेल्या म्हणाला ना
त्यामुळे मोस्ट लाईकली आई.
किंवा मित्र नसून शेजारचा शाळकरी किंवा कॉलेज करी लहान मुलगा असेल तर तो वयात बरंच अंतर असलेल्या मोठ्या अविवाहित बहिणी ला काकू म्हणून रेफर करू शकतो.

सस्मित, देवाचा आणि भूताचा आपापसात संबंध काय विचारताय. गंमतच आहे>>>> गंमत कसली??? सगळ्याच जाती धर्माची भुतं, आयुष्यभर नासिक असलेल्या माणसांची भुतं, नास्तिक जरी नसली तरी रामाबद्दल काहीही भक्तीभाव नसलेल्यांची , रामाला देवच न मानणार्यांची भुतं ... सगळीच रामाला घाबरतात? रामाच्या शपथेने निघुन जातात? हे गंमतीशीर आहे. Happy

हॉरर टर्मिनॉलॉजी प्रमाणे देव नाम/ओम्/क्रॉस अशी प्रतिके हे भूतांच्या वाटेतले ऑब्स्टॅकल्स मानले तर ते कोणत्या रंगाचे/धर्माचे/मटेरियल चे आहेत याचा संबंध न येता सर्व धर्मीय्/पंथीय्/नास्तिक्/आस्तिक्/कितीही आयक्यू असलेली सर्व भूतं कव्हर होणं अपेक्षित आहे.
उद्या ड्रॅक्युला आला आणि तुम्ही रामरक्षा म्हटली तर त्याला 'मला ही भाषा/हा देव माहित नव्हता' म्हणून तुम्हाला चावायचा हक्क नाही.इट इज एथिकली बॅन्ड इन वर्ल्ड वाईड कोर्ट ऑफ भूताज. Happy Happy

ह्म्म.
ते प्लॅंचेटच्या चर्चेत पण रामाची शपथ घातली की आलेली भुतं किंवा आत्मे निघुन जातात असं वाचलं.
अरे काय? एकतर तुम्ही प्लअँचेट करुन त्यांना बोलावणार. ते येणार. आणि वर तुम्हाला अपेक्षित नसलेलं कुणी आलं किंवा तुमचं काम झालं की त्यांना रामाची शपथ घालुन जा सांगणार. आणि ते जाणार.
कुठल्या तरी भुताने हु द हेल इज राम?? असं म्हणावं Happy

जगात देव आहे तर तो एकच आहे. फक्त प्रत्येकाने हाक मारायचे नाव वेगळे. तो आला की भूत जातेच.

भूत त्याचा जन्म होण्यापूर्वी, म्हणजे ज्या माणसाचे होते तो माणूस मरण्यापूर्वी नास्तिक होता वा आस्तिक याने काही फरक पडत नाही. ज्याचा भूतांवर विश्वास नसतो त्याचेही भूत हे होतेच. आणि मेल्यावर त्याला समजते की देव प्रत्यक्षात आहे. कारण देव माणसांना दिसो न दिसो तो भूतांना दिसतो म्हणून भुते त्याला घाबरतात.

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असे म्हणतात त्यालाच समांतर भूत झाल्याशिवाय देव दिसत नाही असेही म्हणू शकतो.

राम गॉड येशू अल्ला.. बरेच धर्मात देवांची वा देवांना पुकारायची नावे दोन अक्षरी सुटसुटीत ठेवली जातात. जेणेकरून भूताला बघून तंतरलेल्या अवस्थेतही ती पटकन बोलता यावीत..

मी यातला जाणकार नाही. त्यामुळे थोडी माहिती ईकडची तिकडे असू शकते.

एकतर तुम्ही प्लअँचेट करुन त्यांना बोलावणार. ते येणार. आणि वर तुम्हाला अपेक्षित नसलेलं कुणी आलं किंवा तुमचं काम झालं की त्यांना रामाची शपथ घालुन जा सांगणार. << येतांना त्यांना कोणाच्या शपथा लागत नाहीत का? खर तर लॉग ईन करतांना पासवर्ड पाहिजे ना? लॉग आउट करतांना का?? :प

मला वाटलं होत गोष्ट टाकल्यावर त्या गोष्टीखाली त्याबद्दलच चर्चा होते...
राम,प्लँचेट,भुताचा दिनक्रम,भुताचा आणि रामाचं संबंध,भुताच्या भाषा,यायची जायची वेळ...
असो,माझंपण GK नको एवढं वाढलं हि कथा टाकून...

mi_anu+1
आणि धागा अवांतर गेला नाही तर अडगळीत पडतो.

Pages