जुनी गोष्ट आहे. आज या धाग्याने ( https://www.maayboli.com/node/65653 ) खपली काढली म्हणून लिहून काढावीशी वाटली. आठवेल तसे जमेल तसे लिहिलेय. प्लीज व्याकरन सुद्धलेकण तपासू नये.
आमचा छान ग्रूप होता फेसबूकवर. सर्वांची आवड एकच, नवीन नवीन मराठी मित्रमैत्रीण बनवणे आणि आधुनिक मराठी वाचन करणे. अश्यात बरीच जुळवाजुळवी प्रेमप्रकरणे ओघानेच आली. माझी एका संजय नावाच्या मुलाशी छान गट्टी जमली होती. ग्रूव्यतिरीक्त पर्सनल चॅट वर, तसेच फोन नंबर एक्स्चेंज झाल्यावर आम्ही खूप गप्पा मारायचो. चॅट तर रात्र रात्र जागून चालायची. फोनवरही रोजचेच दुपारचे बोलणे असायचे. न थकता, न कंटाळता, एकमेकांशी नॉनस्टॉप बोलू शकायचो आम्ही. तो आणखीही कोणा मुलीशी ईतका बोलत असेल का याची कल्पना नाही मला. पण शक्यता कमीच.
मग एके दिवशी आमच्या फेसबूक ग्रूपचे जीटूजी (स्नेहसंमेलन) ठरले. आम्ही ठरवले असते तर आम्ही एकमेकांना कधीही भेटू शकलो असतो. एकानेही विचारले असते तरी समोरचा त्याला नाही म्हणाला नसता. पण तो आपला नेहमीचा मराठमोळा संकोच आड आला. मग गेटटूगेदरलाच आता भेटूया म्हटले. बरीचशी हूरहूर आणि ईकडचं तिकडचं बरंच काही. मनात सारं काही दाटून आले होते त्या भेटीच्या आधी. पण ती स्नेहसंमेलनातील भेट आमच्यातील गोड नात्याचा शेवट ठरणार होती याची मला कल्पना नव्हती.
त्या दिवशी तो माझ्याशी काही वाईट वागला नाही. पण काही स्पेशलही वागला नाही. ईतर मुलींपैकीच मी एक होते त्याच्यासाठी. कारण स्पेशल कोणीतरी दुसरीच होती. ग्रूपमधील सर्वात हॉट मुलगी. जिच्यासमोर सारी मुले कूल बनायला बघायची. ती शनाया. जिच्यासमोर मी ठरले राधिका.. छे हो, आपट्यांची नाही. तशी असते तर प्रश्नच नव्हता. मग ती सारी मुले आपली अक्कल विकून माझ्या मागे लागली असती.
पण राहिलंच ...
त्यानंतरही आमचे चॅटवरचे बोलणे तसेच चालू राहिले. पण आमचा संजूबाबा आता त्या शनायाचेच गोडवे गाऊ लागला होता. तिने मात्र एकूण एक मुलांना भुरळ घातली होती. त्या दिवशी ती प्रत्येकाशी हसून बोलली होती. जणू काही प्रत्येकाच्या भावनांचा तिने स्विकार केला होता. प्रत्येकाला तिच्यात आता आपली प्रेयसी दिसू लागली होती. सर्वांमध्ये चढाओढ लागली होती.
ती देखील तितकीच हुशार. प्रत्येकासोबत ती कॉफी डेटला जाऊन आली. प्रत्येकाला हे समजत आणि माहीत असूनही वेड्यासारखे आपापसात स्पर्धा करत होते. त्यात एक आमचेही येडे लागले होते.
मग त्यातील एकाला ती मिळाली. अक्षयला. आमच्या ग्रूपमधील सर्वात पैसेवाल्या मुलाला. बहुधा तिने प्रत्येकासोबत कॉफी पिताना याचाच अंदाज घेतला असावा. प्रत्येकाच्या खिश्याचा. ज्याचा खिसा मोठा, तिथेच तिचे प्रेम मावले. ज्याने ते प्रेम मिळवले त्यालाही याच गोष्टीचे कौतुक की जिच्यामागे सर्वांनी नंबर लावले तिला मी मिळवले. पण तिने आपल्यात नक्की काय बघितले, तिचे आपले काय जुळले याचा जराही विचार नाही. आमच्या येड्याने तरी काय केले होते म्हणा. जिथे सारे काही मस्त जुळले होते त्यावर बोळा फिरवून मृगजळाच्या मागे धावला होता. आणि बघितले तरी काय होते, तर जास्तीचे मादक सौंदर्य आणि त्याला साजेश्या अदा.
काळ लोटला, मी त्यातून सहज बाहेर पडले, लाईफमध्ये मूव ऑन झाले. संजयशी चॅटवर एक मित्र म्हणून कधीतरीच असे बोलणे होते. त्याच्याकडूनच मग एके दिवशी समजले की अक्षयचे आणि शनायाचे बिनसले. रीतसर घटस्फोट झाला. आणि आता ती आलोकशी, म्हणजे अक्षयच्याच भावाशी लग्न करून त्याची वहिनी झाली आहे. आमचं येडं मात्र अजूनही हळहळत होते. आलोकच्या ऐवजी त्याला का नाही ती मिळाली म्हणून...
या एकूणच अनुभवावरून एक गोष्ट त्या दिवशी समजली...
एखादी देखणी मुलगी दिसली की मुलांची अक्कल नेहमीच कॉफी प्यायला जाते.
साधना , भारी पोस्ट
साधना , भारी पोस्ट
उगाआअच आहे हा धागा. साधना
उगाआअच आहे हा धागा. साधना मस्त पोस्ट.
बाळ ॠ, नेहमीप्रमाणे फोकस स्वतः वर घेण्याच्या प्रयत्नात, पण यावेळी लोक शाहाणे झालेत त्यामुळे हा प्रयत्न फसलाय.
एक डायलॉग चांगला मारलंय
एक डायलॉग चांगला मारलंय रूनमेश ने.
बाळ ॠ, नेहमीप्रमाणे फोकस
बाळ ॠ, नेहमीप्रमाणे फोकस स्वतः वर घेण्याच्या प्रयत्नात,
>>>>>>>>
आशु, ते माझे बाय डिफॉल्ट होते, कधी विशेष प्रयत्न करत नाही, किंवा पोस्ट लिहिताना तसा हेतू ठेवत नाही. स्वतःबद्दलची उदाहरणे अनुभव आवडीने लिहिणे, चर्चेला घेणे माझा स्वभावच आहे असे म्हणू शकता.
@ च्रप्स, व्हिच डायलॉग? .... गुंतलेल्या मनाला लॉजिक कळत नाही
बरोबर..
बरोबर..
अक्कल विकता येत असेल तर दुकान
अक्कल विकता येत असेल तर दुकान सांगा..
एका दिडशहाण्याची अक्कल विकायची आहे.. सांगणार्यास कमिशन दिले जाईल..!!
अक्कल विकता येत असेल तर दुकान
अक्कल विकता येत असेल तर दुकान सांगा..
एका दिडशहाण्याची अक्कल विकायची आहे.. सांगणार्यास कमिशन दिले जाईल..!!
Submitted by दत्तू on 1 April, 2018 - 13:29>>>>>>
उत्तर
गुगल नावाचे सर्च इंजिन आहे.. जरा कष्ट घेतले तर सगळी माहीती मिळते..
Submitted by दत्तू on 4 March, 2018 - 00:51
(No subject)
हाच तो दिडशहाणा
हाच तो दिडशहाणा, मध्ये मध्ये विक्षिप्तपणाचे झटके येणारा.. सांगा कुठे यांची अक्कल विकू? कि भंगारात देऊ?
हाच तो दिडशहाणा, मध्ये मध्ये
हाच तो दिडशहाणा, मध्ये मध्ये विक्षिप्तपणाचे झटके येणारा.. सांगा कुठे यांची अक्कल विकू? कि भंगारात देऊ?
Rofl
नवीन Submitted by दत्तू on 1 April, 2018 - 15:00
जी गोष्ट अस्तित्वातच नाही, ती तुम्हाला विकता वा, भंगारात देता येते? मानलं बुवा!!!
जी गोष्ट अस्तित्वातच नाही, >>
जी गोष्ट अस्तित्वातच नाही, >>>>
धन्यवाद
शेवटी तुम्ही स्वतः मान्य केले की ती गोष्ट तुमच्याकडेे अस्तित्वात नाही
शेवटी तुम्ही स्वतः मान्य केले
शेवटी तुम्ही स्वतः मान्य केले की >>>>>

अहो, मी तसे मुद्दामच लिहिले आहे. पूर्वी मला कोणी असे बोलले असते तर मला खूप राग आला असता. पण आता ऋन्मेऽऽषचे धागे आणि त्याचे प्रतिसाद वाचून माझा स्वभावदेखील बदलला आहे. (खासकरून त्याच्या त्या रुमालाच्या धाग्यावरील हेटाळणीयुक्त प्रतिसाद आणि त्याला त्याने धागा काढूनच दिलेले उत्तर!)
त्यामुळे ही आता माझ्या सहनशक्तीची परीक्षा नाही तर तुम्ही मला किती भडकवू शकता, राग आणू शकता त्याची परीक्षा आहे!!! पाहूयात उत्तीर्ण होता का ते!!!
(विशेष सूचना: मी सामान्य माणूस आहे, आईनस्टाईन वगैरे नाही. त्यामुळे माझी अक्कल विकून वा भंगारात देऊन आपला सोलापूर-मुंबई-सोलापूर हा प्रवासखर्चही सुटणार नाही, याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.)
[धागा भरकटवल्याचा माझ्यावर आरोप होऊ नये म्हणून - अक्कल विकणे/भंगारात देणे हा विषय मी सुरु केलेला नाही. तसे वाटत असल्यास आजच्या दिवसातल्या या धाग्यावरच्या प्रतिक्रिया पुन्हा एकदा नीट वाचाव्यात. मी केवळ दोन प्रतिक्रिया एकत्र आणण्याचे काम केले आहे! असो, एखाद्याची अक्कल काढणे/विकणे/भंगारात देण्याची 'नीच' मानसिकता माझी नाही.]
<<तुम्ही कुठल्या बाजूला आहात
<<तुम्ही कुठल्या बाजूला आहात यावर बरेच काही अवलंबून असते…>>
नेमका प्रतिसाद!!
<<त्या ऐवजी अभ्यास करावा
<<त्या ऐवजी अभ्यास करावा भरपूर पैसे कमवावेत>>
वा! स्तववादी प्रतिसाद!!
मी धागाकर्त्यांना विचारलेले
मी धागाकर्त्यांना विचारलेले पण मध्ये थोबाड तुम्ही कारण नसताना विक्षिप्तपणे घुसवले.
धागा तुम्हीच फिरवला आहे. जवाबदारी घ्यायला शिका
त्याचा बाप पिताड, शिवाय काम
त्याचा बाप पिताड, शिवाय काम करायचे नाही,,,
भाऊ १०__ पासून देशी पिणारा , चोरी, जुगार, टपोरी गिरी करणे,
आणि रितेश शाळेतले नळ पासून ते सायकल पर्यंत सगळं काही चोरण्याची सवय....
घरात फक्त एक त्याची आई मात्र घर नीट चालावे म्हणून काम करत होती...
शेजारी हि तसेच वातावरण गल्लीत हि तसेच लोक.....
आणि हि मात्र चांगल्या घरातून तिथे गेलेली..... बापाने नाते तोडून दूर केले म्हणून मजबुरीत पडली होती तिथे.....आणि आपला निणर्य चुकला आहे हे तिला माहिती असून हि ती त्या काहीच करू शकत नव्हती...
उदय तूच सांग आत्ता त्या घरात काय शिकतील त्यांचे मुलं..????
सॉरी चुकून झाली पोस्ट झाली आहे कमेंट
उलटी करा..
उलटी करा..
मुलाच्या ईथे मुलगी आणि मुलगीच्या जागी मुलगा करा.. मग या धाग्याला लागू होईल
अरे रूनम्या, या आयडीने धागे
अरे रूनम्या, या आयडीने धागे काढायचे बंद केले आहेस का? >> ह्याच रुनम्या असतील तर !
बाकि गोष्ट छान आहे !
आजकाल सगळे अकला जागेवर ठेऊनच
आजकाल सगळे अकला जागेवर ठेऊनच निर्णय घेतात, मग पोरं असो वा पोरी, सो हा धागा टाईमपास आहे.
साधना , चांगला प्रतिसाद.
अर्चना सरकार माहित होत पण ते
अर्चना सरकार माहित होत पण ते शशिराम वगैरे अपेक्षा नव्हती
विकण्याअगोदर ती वस्तू 'आपली'
विकण्याअगोदर ती वस्तू 'आपली' आणि 'आपल्याकडे' असावी लागते. Clear title.
अॅक्च्युअली साधना ताईंचा
अॅक्च्युअली साधना ताईंचा प्रतीसाद हा प्रियकर प्रेयसी पलिकडे जाऊन जगातल्या सर्व मुद्द्यांना लागू होतो.
तुम्ही रिपोर्टी असला तर तुमचा मॅनेजर हा 'अत्यंत खडूस, डिमोटिव्हेटिंग, बायस्ड' असतो, तुम्ही मॅनेजर असलात तर तुमची टिम ही 'अत्यंत अन प्रोफेशनल, व्हिजन आणि ज्ञान नसलेली आणि नुसतेच बेनेफिट घेणारी' असते Happy Happy >>
Anu छान पकडले आहे तुम्ही.
पण इथेही अपवाद आलेच.
काही managers अत्यंत चांगले अनुभवले.
प्रेयसी निवडताना अनेक मुलांची
प्रेयसी निवडताना अनेक मुलांची अक्कल विकली का जाते?
नाही
मला तर हि स्टोरी खरीच वाटत
मला तर हि स्टोरी खरीच वाटत आहे, त्या मुलाने भाव दिला नाहि म्हणुन जळुन लिहिलि आहे असे वाटते.
जरी जळण्याची भावना असेल तरी ती साहजिक असते ! यात वाइट काहिहि नाहि.
कोणाला कोण आवडेल हे कोण सांगणार ! आणी अक्कल विकत नाहि फुकट्च जाते , कारण भावना अकलेवर हावी असतात.
प्लीज व्याकरन सुद्धलेकण तपासू
प्लीज व्याकरन सुद्धलेकण तपासू नये. >> बाकि हे वाक्य सोडुन सुद्धलेकण च्या फारश्या चुका नाहित. मुद्धामहुन हे वाक्य असे लिहिले असावे !
ऋन्मेष बिचुकले हा आयडी अजून
ऋन्मेष बिचुकले हा आयडी अजून आहे का तुझा ? चोळप्पा, सैप्पुकू उडाले का ? अजून कोणता नवीन आयडी आहे शिवीगाळीसाठी ?
ओ विक्रुत प्रणी विषयाला
ओ विक्रुत प्रणी विषयाला धरुन लिहा नाहितर फुटा इथुन
अरेंज मॅरेजवाल्यांचा कोणी
अरेंज मॅरेजवाल्यांचा कोणी वालीच नसतो, ते बिचारे फक्त टपरवेयरच्या डब्यात वालाची भाजी अन चपाती नेतात झालं.
ऑन अ सिरीयस नोट इतकं कश्याला चिडून लिहायला लागतंय ?
एक निरीक्षण लग्न झालेली स्त्री जसे सौभाग्यदर्शक मंगळसूत्र परिधान करते तसेच लग्न झालेला पुरुष हा टपरवेयरचा डबा अन मिल्टन/ सेलोचा वॉटर फ्लास्क, बॉटल सोबत बाळगतो सौभाग्यलेणी म्हणून
वालाची भाजी >> अगदी अगदी
वालाची भाजी >> अगदी अगदी
विषयाला धरुन लिहा नाहितर फुटा
विषयाला धरुन लिहा नाहितर फुटा इथुन>> एवढा रिस्पेक्ट? हाड म्हणावं
Pages