किंकाळी - द्विशतशब्द भयकथा

Submitted by किल्ली on 23 March, 2018 - 06:27

त्या दिवशी अंधारून आले होते. भर दुपार असुनही काळोख दाटला होता. वारा सुटला होता. खिडक्यांची तावदान एकमेकांवर आपटून आवाज होत होता. भरीस भर म्हणून झाडांच्या पानांची सळसळ चालूच होती!!
मीना घराच्या आतल्या खोलीत एकटीच पुस्तक वाचनात मग्न होती. वाचन सुरु झाले की तिला कशाचेही भान राहत नसे. अचानक तिने पाहिले की समोरच्या भिंतीजवळ एक अभद्र आकार वळवळ करत होता. त्याचा रंग कसलातरी विचित्र, गडद तपकिरी प्रकारात होता. काहीतरी किळसवाणं होतं ते !! हे नक्केच सामान्य नव्हतं. वेगळं होतं ! त्या आकाराला काळ्या रंगाच्या मिशांसारखं काहीतरी होतं. वेगाने वळवळणारा तो आकार आता भिंतीवर चढला होता. भिंतीवर आणि जमिनीवर लीलया फिरत होतं ते विचित्र रूप !! त्याची हालचाल पाहणं मीनासाठी भयप्रद होतं. ती जीव मुठीत घेऊन कोपऱ्यात सरकून बसली. जोपर्यंत तो आकार जवळ येत नाही तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत ही भावना तिच्या मनात होती. पण पुढे हीच परिस्थिती कायम राहणार नव्हती. नशिबाच्या मनात काहीतरी वेगळं होतं.

अत्यंत घाबरलेल्या मीनाला स्वतःच्या श्वासांचा आवाजही धडकी भरवत होता. सर्वांग आक्रसून बसली होती ती त्या कोपऱ्यात !! पुस्तक केव्हाच बाजूला कुठेतरी पडलं होतं. थोड्या वेळाने घडू नये ते घडायला सुरुवात झाली आणि पाहता पाहता तो आकार वेगात मीनाच्या जवळ येऊ लागला. घाबरून कानावर हात ठेवत तिने जोरदार किंकाळी फोडली!!!!

मीनाचा आवाज ऐकून 'तो 'आत आला. त्याच्या हातात आयुध दिसलं आणि रक्षणकर्ता भासला 'तो' मीनाला!!
त्यांना आयुधांचा वार केला आणि ते जे काही अमंगल होतं त्यातून सुटका झाल्याचं समाधान मीनाच्या चेहऱ्यावर झळकलं!!
'तो' बाहेर आल्यावर इतरांकडे पाहत म्हणाला, "आपली मीनाताई झुरळाला घाबरून ओरडली. दिला एक झाडूचा फटका ठेवून !! खिडक्या लावायला पाहिजेत, पाऊस पडेल आता ".

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy Happy ..... ते मिशांवरूनच वाटलेलं झुरळ असणार म्हणून.... भारी लिहिलंय हं...... मस्त जमलाय सस्पेन्स ठेवायला.

छान सस्पेंस ठेवलाय .मला शेवटपर्यंत कीडा असेल एवढच वाटलेल.झुरळ आहे ते शेवटी कळल. मस्त आहे कथा.

मला थोडी सॅड वाटली ही कथा.
मीनाताई ही मेंटली डिस्टर्ब्ड असून झुरळाला प्रचंड मोठा आकार समजली.
ज्याने कुणी झाडू मारला तो झुरळाला मारला की मीनाताई ला हे स्पष्ट लिहिलेलं नाही.
त्यामुळे मला समजलेली कथा अशी की मीना ही साधारण वेडसर बाई, झुरळाला मोठा प्राणी समजून घाबरली आणि तिने किंकाळी फोडली, घरच्यांना तिच्या ह्या वागण्याचा कंटाळा आल्याने नेहमीप्रमाणे त्यांनी तिला झाडूने फटकारले.
तिला मारल्याचे काही नाही पण पावसाने खिडक्यातून पाणि आत येऊन आतल्या वस्तू खराब होऊ नयेत याची जास्त काळजी घरच्यांना वाटते आहे हा विषाद जाणवला.

@दक्षिणा.. कथेचा अर्थ विविध context ने काढता येऊ शकतो.. तो context कोणता घ्यायचा हे वाचकांवर सोडलंय. त्यामुळे फार स्पष्टीकरण दिलं नाही.
तुम्ही घेतलेल्या context ने विचार केल्यास तुमचं मत योग्यच आहे.
छान प्रतिक्रिया दिलीत.. धन्यवाद Happy

आणखी एक context ..
बघा पटतोय का..
तिथे खरंच अमानवीय काहीतरी होतं .. पण दादाने "झुरळ दिसलं फक्त , असं घरचे घाबरू नयेत म्हणून त्यांना सांगितलं, आणि मंतरलेल्या आयुधाने उर्फ झाडूने त्या भुताचा नायनाट केला!! "

छान आहे Happy

झुरळ हाच मुळात एक घाणेरडा डरावणा भितीदायक किळसवाणा प्रकार आहे.. त्यात भिंतीवरचे झुरळ कधीही उडत फडफडत आपल्याजवळ येणार या कल्पनेनेच अंगाचे काटापाणी होते.. त्यामुळे कथेत आणखी भयानक अर्थ शोधू नका.. Happy

मी तर म्हणतो 198 शब्द उगाच उधळले आहेत.. दोनच शब्द "उडते झुरळ" लिहिले असते तरी मी घाबरलो असतो Happy

सर्व वाचकांचे आणि प्रतिसादांचे आभार !!! Happy

मी तर म्हणतो 198 शब्द उगाच उधळले आहेत.. दोनच शब्द "उडते झुरळ" लिहिले असते तरी मी घाबरलो असतो >>>>>
तुम्हाला काय वाटतं ऋन्मेऽऽष ?? तुम्ही एकटेच घाबरता ?? Lol Lol
ही सत्यकथा आहे हो !! Proud Lol

मी नाही घाबरत झुरळाला
पालीला घाबरते... घाबरते म्हणजे किळस वाटते मला (एकूण सर्व त्रिकोणमितीय प्राण्याचीच) उदा सरडा, साप, मगर इ.

मी तर म्हणतो 198 शब्द उगाच उधळले आहेत.. दोनच शब्द "उडते झुरळ" लिहिले असते तरी मी घाबरलो असतो Happy>>>>>>> पाल मारता नि झुरळाला घाबरता....... काय हे ! Happy Wink

झुरळ हाच मुळात एक घाणेरडा डरावणा भितीदायक किळसवाणा प्रकार आहे.. त्यात भिंतीवरचे झुरळ कधीही उडत फडफडत आपल्याजवळ येणार या कल्पनेनेच अंगाचे काटापाणी होते.. >>>>>>>>आणि माझी खात्री आहे उद्या जर कोणी 'झुरळ माझ्या आवडीचा' नावाचा धागा काढला तरी तुम्ही त्यावर झुरळ किती निरूपद्रवी, भोळा कीटक आहे नि तुमची नि त्याची कशी गट्टी आहे हे उदाहरणासहीत पटवून देऊ शकता. समर्थन करण्याची नि रंगवून सांगण्याची (भयानक) दुर्मिळ हातोटी आहे तुमच्याकडे..... Happy

तिथे खरंच अमानवीय काहीतरी होतं .. पण दादाने "झुरळ दिसलं फक्त , असं घरचे घाबरू नयेत म्हणून त्यांना सांगितलं, आणि मंतरलेल्या आयुधाने उर्फ झाडूने त्या भुताचा नायनाट केला!! ">>>>>>>> हेही भारी आहे... याच बेसिसवर भारी भयकथा लिहू शकता तुम्ही. छान रंगवलंत नि भयप्रद वर्णन केलंत तर तीन भाग सहज निघू शकतात......

वर्णन छानच(भयप्रद) केलय त्यांनी.शाॅर्ट अॅन्ड स्वीट भयकथा.अगदीच प्रेडीक्टेबल नाहीये.सस्पेन्स बराच टिकवलाय.

कथा आवडली..
दक्षिणा+१ मी पण असाच अर्थ लावला !

पाल मारता नि झुरळाला घाबरता....... काय हे !
>>>>

पाल मारतो म्हणून पालीला घाबरत नाही असे नाही. किंबहुना घाबरतो म्हणूनच मारतो. अन्यथा तिला तिच्या जगात सुखाने बागडू दिले असते. तसेच झुरळांनाही घाबरतो पण मारतो देखील. त्यांच्या भितीने आपल्याच घरातून पळून तर जाऊ शकत नाही ना.

बेसिकली माणूस किंवा कुठलाही जीव दुसरया कुठल्याही जीवाची हत्या तीन कारणांनी करतो.

सजा, पोटपूजा, मौजमजा..

1) सजा - पाल, झुरळ, डास, ढेकूण, मुंग्या, भटके कुत्रे, बिबट्या, पिसाळलेला लांडगा, नरभक्षक भेडीया वगैरे..
2) पोटपूजा - कोंबड्या, बोकड, ससे, डुक्कर, गायबैल, मासे, खेकडे वगैरे..
3) मौजमजा - सलमानने मारलेला हरंण, बागेतले चतुर आणि फुलपाखरं, विहीरीतली बेडकं .. वगैरे..

Pages