बिझनेस आईडिया हवी आहे

Submitted by गरम मसाला on 20 March, 2018 - 16:38

२-३ लाख रुपये गुंतवणुक करून बरा - चांगला मोबदला देणारा एखादा बिझनेस सुचवा.

शहर: कोल्हापूर

Group content visibility: 
Use group defaults

बिझनेस स्वतः करणार की फक्त पैसे गुंतवणूक करणार?
कोचिंग क्लासेस सुरू करा, त्या धंद्याला मरण नाही. किंवा पानटपरी म्हणजे कॅशचा सगळा पैसा टॅक्स-फ्री.

उदबत्त्या, साबण डिटर्जंट पावडर बनवण्यचे छोटे युनिट टाका. मुंबईहून अत्तर विकत घेउन येउन री बॉटल री पॅकेज करून विकता येइल तुमच्या भागात. सणासुदीच्या काळात चांगल उठाव असतो. ५०००० चे अत्तर घेउन सुरुवात करा
अर्धे तरी फंडस सेफ्टीसाठी बाजूला ठेवाच.

>> चांगला मोबदला देणारा एखादा बिझनेस

ते बिजनेसवर नाही तो कसा केला जातो त्यावर आहे. वरती एका प्रतिक्रियेत चहाचा बिजनेस सुचवला आहे त्यांच्याशी सहमत. बिजनेस करणाऱ्यांनी साध्या चहाच्या टपरीवर कर भरण्याइतका बिजनेस केला आहे (हे कोल्हापुरातलेच तब्बल पंचवीस वर्षापूर्वीचे उदाहरण आहे. सध्या हा चहावाला अजून आहे कि माहित नाही). पुन्हा कोल्हापूरचेच राजाभाऊ प्रसिद्ध आहेत. साध्या भेळच्या बिजनेसवर त्यांनी किती नाव आणि पैसा कमवला ते सर्वश्रुत आहे.

कॊम्प्युटर व इंटरनेट ची बऱ्यापैकी माहीती असेल तर महा ई सेवा केंद्र् चालु करु शकता. तिकीट बुकिंग पासुन सर्व् प्रकारची कामे करता येतील. किंवा इ'करंजी कोपु पासुन जवळ आहे. तिथे बिझनेस ला खुप वाव आहे. तिथे वस्त्रोद्यागाशी लिमिटेड एखादा बिझनेस चालु करु शकता.
पण तुम्ही कोणताही बिझनेस चालु करण्यापुर्वी त्याचा थोडा तरी अनुभव मिळवायला हवा.

तुम्ही तुमचे शिक्षण, वय, आवडनिवड, तुम्हाला असलेला अनुभव, तुम्हाला गुंतवलेल्या पैश्यावर किती दिवसात परतावा पाहिजे या बाबी सांगितल्या तर तुम्हाला बिझनेसविषयी सुचवणे सोपे जाईल.
शिवाय बिझनेससाठी तुम्ही कोणत्या क्षेत्राची चाचपणी/अभ्यास केला आहे का हे सांगितले तर फायद्याचे होईल.

<बिझनेस स्वतः करणार की फक्त पैसे गुंतवणूक करणार?
कोचिंग क्लासेस सुरू करा, त्या धंद्याला मरण नाही. किंवा पानटपरी म्हणजे कॅशचा सगळा पैसा टॅक्स-फ्री.>

सध्या फक्त गुंतवणूक करण्याचा विचार आहे. कोचिंग क्लासेस ची युक्त्ति आवडली. जागा भाड्याने घेऊन १-२ चांगले शिकवणारे भेटले तर याचा नक्की चांगला उपयोग होऊ शकतो. पानटपरीपेक्षा :प

उदबत्त्या, साबण डिटर्जंट पावडर बनवण्यचे छोटे युनिट टाका. मुंबईहून अत्तर विकत घेउन येउन री बॉटल री पॅकेज करून विकता येइल तुमच्या भागात. सणासुदीच्या काळात चांगल उठाव असतो. ५०००० चे अत्तर घेउन सुरुवात करा
या व्यवसायाची आणखी माहिती कुठे मिळेल ? (गुंतवणूक वि. परतावा बघण्यासाठी)

तुमचा आयडी हाच एक चांगला बिझनेस होऊ शकतो.
खरं आहे. माझी आई उत्तम गोडा मसाला बनवते. याचा ही एक चांगला पर्याय म्हणून लक्षात ठेवेन.

कोल्हापूर बस स्टॅड आणि इतर मोक्याच्या ठिकाणी चार/ पाच चहाच्या टपरी घ्या..
१००% नफा आहे..

तिकडे आधीपासूनच खूप टपर्या आहेत..दुसरी एखादी मोक्याची जागा मिळाली आणि चालवणारा माणूस मिळाला तर नक्की शक्य आहे. बहुतेक म.पालिकेचे परवाने लागतात वाटतं यासाठी..

कॊम्प्युटर व इंटरनेट ची बऱ्यापैकी माहीती असेल तर महा ई सेवा केंद्र् चालु करु शकता. तिकीट बुकिंग पासुन सर्व् प्रकारची कामे करता येतील. किंवा इ'करंजी कोपु पासुन जवळ आहे. तिथे बिझनेस ला खुप वाव आहे. तिथे वस्त्रोद्यागाशी लिमिटेड एखादा बिझनेस चालु करु शकता.
पण तुम्ही कोणताही बिझनेस चालु करण्यापुर्वी त्याचा थोडा तरी अनुभव मिळवायला हवा.

महा इ-सेवा चा पर्याय चांगला आहे. धन्यवाद.

तुम्ही तुमचे शिक्षण, वय, आवडनिवड, तुम्हाला असलेला अनुभव, तुम्हाला गुंतवलेल्या पैश्यावर किती दिवसात परतावा पाहिजे या बाबी सांगितल्या तर तुम्हाला बिझनेसविषयी सुचवणे सोपे जाईल.
शिवाय बिझनेससाठी तुम्ही कोणत्या क्षेत्राची चाचपणी/अभ्यास केला आहे का हे सांगितले तर फायद्याचे होईल.

हे अगदी खरं आहे.. पण sleeping partner म्हणून काही करता येईल का अशा विचाराने हा प्रश्न टाकला.

सगळ्यांना प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.

बरा - चांगला मोबदला
: ह्याबद्दल आपल्या अपेक्षा काय आहेत ते स्पष्ट सांगा. प्रत्येकाची बरा चांगलाची व्याख्या वेगळी असू शकते.

व्यावसाय कुठला करावा ? अमक्याने चहाच्या (किव्वा अजुन कुठल्या) व्यावसायात यश मिळवले म्हणुन तसे यश प्रत्येकाला मिळेलच असे नाही. परिस्थिती, वेळ (timing), मुख्य म्हणजे तुमच्याकडे व्यावसायिक वृत्ती (attitude) आहे का हे तुम्हाला स्वत: लाच तपासायचे आहे. व्यावसाय कुठलाही टाका पण त्याच्या अगोदर सभोवतालचा अभ्यास करा. तुम्हाला शुभेच्छा.

१९९० च्या आसपासची गोष्ट असेल. एक क्ष व्यक्तीने कळकट मळकट चहाची टपरी विकत घेतली. जागेचे भाडे शुन्य रुपये (असावे). क्ष खुप कष्ट घेणारा होता. दर-रोज पहाटे ५ वाजता त्याची टपरी उघडलेली असायची. त्यावेळी चहा मिळायचा ७ नन्तर गरमा गरम वडे/ भजी मिळायची. तो रात्री १०- ते ११:३० पर्यन्त टपरी उघडी ठेवायचा. दिवसातले काही तास मागणी प्रचन्ड असायची, काही तास विश्रान्ती मिळायची. ११:३० नन्तर तो टपरी बन्द क्राय करायची तयारी करायचा.... (भान्डी स्वच्छ करणे.... दुसर्‍या दिवशीची तयारी).

काही महिन्यात व्यावसाय वाढला... मग गावावरुन भावाला मदतीला बोलावले. अजुन काही महिन्यात २-३ कच्ची बच्ची पोरे चहा देण्यासठी.... थोडा पैसा साचल्यावर क्ष ने जवळच बेकरी घेतली. क्ष बेकरी साम्भाळायचा आणि लहान भाऊ +३ पोरे चहाची टपरी साम्भाळायचे. याचे अधुन मधुन लक्ष असायचे... क्ष ने बेकरीमधे अमुलाग्र बदल केलेत... यश मिळायलाच हवे होते तसे ते मिळाले... पुढे त्याचा हॉटेल घेण्याचा मानस होता, ते काही वर्षात घेतले. पुढचा प्रवास मला माहित नाही.

यशामधे कष्टाला खुप महत्व आहे पण निव्वळ कष्ट करुन यश मिळवता येत नाही तर जोडीला तुमच्याकडे attitude वृती असावी लागते.

< उदय. त्यांना स्वतः व्यवसाय करायचा नाही आहे. गुंतवणूक करायची आहे. कोणाच्या तरी धंद्यात. >
------- धन्यवाद वन्दन... लक्षात आले.

उदाहरण इतरान्ना उपयोगी पडावे अशी अपेक्षा.

केवळ गुंतवणुकच करायची असेल तर चांगले रिटर्न्स देणार्‍या एखाद्या म्युच्युअल फंडात करा; शेवटी फंड मॅनेजर्स ते पैसे कोणाच्या तरी व्यवसायातच गुंतवतात. २-३ लाख रुपये एखाद्या फुटकळ व्यवसायात गुंतवण्या पेक्षा ते कमी जोखमीचं ठरेल... Happy

डायरेक्ट व्यवसायातंच पैसे गुंतवायचे असतील आणि तुमचा सक्रिय सहभाग त्या व्यवसायात नसेल तर तो रेड फ्लॅग आहे.