सिअ‍ॅटल महाराष्ट्र मंडळ - रौप्य महोत्सव २०१८ - कार्यक्रमाचे आमंत्रण

Submitted by धनश्री on 14 March, 2018 - 15:29

सिअ‍ॅटलकर - हे घ्या आमंत्रण आणि हो हा ड्रेस कोड आहे बरं का!!

मार्च म्हैन्याची १७ तारीख, येळ हाये सक्काळी ८:३० ची
इसरू नगा मंडळी, लगाबगा तयारी करा नटायची
नेसून पैठनी लफ्फेदार, ल्येवून सोन्याचे अलंकार
केसांमदी गजरा वळसेदार, नाकात नथ पानीदार
कारभारी तुमचं मामलेदार, लई झ्याक शर्ट नि सुरवार
फेटा नेसवा पल्लेदार, पिळा म्हनावं मिशा झुपकेदार,
चिल्ली-पिल्ली न्हावून माखवून, त्यास्नी "डे-केअरला" पाठवून
पोरींना नटवून, धन्याला दटावून, कपाळी कुकवाचा टिळा रेखून,
पायातलं कोल्हापुरी पायतान खटकावून,
खांद्याला "डिझायनर पर्स" लटकावून,
अस्सं नटून थटून, लटकत, मिरवत समद्यांस्नी भल्या पहाट्टं यायचं
हे पिरमाचं, आपुलकीचं आवताण, आपल्या महाराष्ट्र मंडळाचं!!!

लवकरच भेटू. शालू/पैठण्या, पगड्या/फेटे तयार ठेवा!!

मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांची ओळख चित्रफितीच्या माध्यमांतून -
https://www.youtube.com/watch?v=Q2ttQ7Laulg

रौप्यमहोत्सव समिती -
https://www.youtube.com/watch?v=J637ibP3z2I

चित्रफित सहाय्य आणि निर्मिती - अनुष्का खेर आणि अजिंक्य खेर

हे पडद्यामागचे कलाकार तुमच्या पर्यंत यावेत म्हणून हा लेखन प्रपंच.
मतभेदाच्या पाडून भिंती
प्रेमाचे घर एक करूया
हातांमध्ये हात गुंफूनी
एकजुटीचा मंत्र गाऊया

अवघे विश्व एक करूया
एक नवा सेतू बांधुया
आनंदाची वाट धरोनी
सृजनाचे नव स्वप्न पाहुया

मनामनांच्या जुळल्या तारा
मैफल सजली गातां गातां
मराठमोळी वाणी आमुची
सुवर्णपूर्तीची ओढ आता!! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users