मृत्यू

Submitted by अभिषेक देशमाने on 7 March, 2018 - 11:16

भाग - १

लिंगायत धर्मियांना मरणे पावणे किंवा लिंगैक्य होणे उत्सवासारखे आहे. तो का उत्सव आहे याचे वर्णन करताना बसवलिंग महाराज अभंगात म्हणतात,

मरणा भीणे भीती जीव।

आम्हा मरण्याचा उत्सव ।।१।।

कधी मरु कधी मरु।

कधी देहाते विसरू ।।२।।

हेचि आमचे चिंतन।

मागू सांबापासी दान ।।३।।

बसवलिंग म्हणे मरा।

ऐशा मरणे चुके फेरा ।।४।।

बसवलिंग महाराज मृत्यूची सुंदर कल्पना मांडतात, बसवलिंग महाराज म्हणतात, मरणाला भिणारा भित्रा जीव मी नाही, आमच्यासाठी मरण हा उत्सव आहे. आपल्या उत्कट भावना व्यक्त करण्यासाठी पुढे म्हणतात, कधी मी मरण पावेन आणि कधी या नश्वर नाशवंत देहाला विसरेन.

याचे चिंतन मी नेहमी करतो, हेच दान मी भ. शिवापासी मागतो. बसवलिंग म्हणतात अस मरा की त्या मरणाने जन्म मृत्यूचा फेरा चुकेल. शेवटच्या ओळीत बसवलिंग जन्ममृत्यूच्या फेऱ्याबद्दल पर्यायाने पुनर्जन्माबद्दल बोलतात पण लिंगायतांना पुनर्जन्म मान्य नाही.

मरणांनंतर रडणे वर्ज्य

संत या गोष्टीला दुजोरा देतात, " जगा दावती रडून । घेती भूषणे काढून।। ", म्हणून रडणे वर्ज्य आहे.

भाग - २

श. उरलिंगपेद्दी मृत्यूच्या संकल्पनेचे वर्णन करतात, ते म्हणतात,

लोकांपरी येत नाहीत, लोकांपरी राहत नाहीत, लोकांपरी जात नाहीत, पहा देवा.

पुण्यापरी येतात, ज्ञानापरी राहतात, मुक्तीपरी जातात, पहा देवा.

उरलिंगदेवा, तुमचे शरण उपमातीत आहेत, नाहीच अन्य उपमा.

अतिशय संमर्पक शब्दात उरलिंगपेद्दी शरणांच्या जीवनाचे वर्णन करतात, शरणांचा जन्म इत्तर व्यक्तिसारखा झाला नाही, फक्त आणि फक्त परोपकार करण्यासाठी शरणांचा जन्म झाला आहे. ते इतर लोकांसारखे ऐच्छिक गोष्टीत सुख शोधात बसत नाहीत, ते ज्ञान मिळविण्यासाठी जगतात.  इतर लोकांप्रमाणे ते मरत सुध्दा नाहीत. मुक्तीसाठी म्हणजेच याचा अर्थ असा की मी ज्या साठी जन्मलो ते इच्छित काम मी पूर्ण केले अशा अर्थाने ते मृत्युलोकाचा त्याग करतात.

भाग- ३

पंचमहाभूतापासून निर्माण झालेले शरीर एक ना एक दिवस मातीत मिसळून गेले पाहिजे हा निसर्गाचा नियम आहे. लिंगभक्त लिंगैक्य झाल्यानंतर बसवादि प्रमथांच्या वचनांच्या आधारे क्रिया करणे उत्तम होते. या प्रसंगी हालगी वाद्य वाजवू नये. वचनपठण करावे.

बसवादि प्रमथांची आज्ञा घेऊन । भूमीवर उतरून पूर्ण बसवमय  होऊन बसवतत्त्व समजून घेऊन पूर्ण आचरण करीत ।

वाममार्ग  सोडून शरण पथावर चालून | गुरु लिंग जंगमाची गुप्त भक्ती करून |

बसव तत्व प्रचार करीत सज्जन शरणांची शरणांची सेवा करून सात्विक झाला।

देह कर्मेद्रियांचा धिक्कार करून इष्ट प्राण भाव लिंगात लिन होऊन शून्य झालेल्या शून्य मूर्तीला शरणूशरणार्थी.

लेखक: अभिषेक देशमाने

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users