कापडाचोपडाच्या गोष्टी

Submitted by नीधप on 5 March, 2018 - 02:40

बरेच दिवसांपासून वेशभूषेचा इतिहास या विषयाला धरून काहीतरी लिहायचं मनात होतं. वेशभूषेचा इतिहास शिकताना समाज, राजकारण, अर्थशास्त्र, विज्ञान अश्या सर्व गोष्टींच्या इतिहासाला समजून घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. थोडक्यात आपले कपडे हे आपल्या जगाची कहाणी सांगतात असं म्हणता येईल. हे सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं असतं ते मला फार गमतीशीर आणि महत्वाचं वाटतं.
तर तेच सगळं 'जे जे आपणास ठावे ते ते दुसर्‍यांसी सांगावे' यासाठी वेशभूषेच्या इतिहासावर आधारित एक सदर लिहिते आहे. सकळ जनांना शहाणे करून सोडण्याचा दावा अजिबात नाही पण कदाचित काही माहितीत भर पडेलही. Happy

जानेवारी २०१८ पासून लोकमतच्या सखी पुरवणीमध्ये हा विषय घेऊन सदर सुरू केले आहे. दर महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी हे सदर येईल. सदराचे नाव आहे ‘कापडाचोपडाच्या गोष्टी’. थोडी गम्मत, थोडी माहिती असे काहीसे स्वरूप आहे या सदराचे.

संपूर्ण लेख इथे टाकणार नाहीये. इथे लोकमतच्या लेखांच्या लिंका देते आहे.

"माणसाच्या मूलभूत गरजा तीन - अन्न, वस्त्र आणि निवारा हे आपण शाळेत असताना पाठ केलेले आहे. या तिन्ही गरजांचा इतिहास म्हणजे अख्ख्या मानवजातीचा इतिहास आहे. राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक सर्व प्रकारच्या स्थित्यंतरांचे प्रतिबिंब या इतिहासात पडलेले दिसते. विविध कारणांमुळे मोठ्या प्रमाणावर माणसांचे स्थलांतर होते. अशा स्थलांतरानंतर जी देवाणघेवाण होते त्यातून कपड्यांचा इतिहास नवे वळण घेत जातो."
- २९ जानेवारी २०१८ ला प्रसिद्ध झालेला लेख : हे सर्व कुठून येते?

"आजच्या जगाचा विचार केला तर अंगाभोवती वेगवेगळ्या प्रकारे कापडाचे वेढे घालून बनवायची वस्त्रं ही केवळ भारतीय उपखंडात किंवा भारतीय उपखंडात मूळ असलेल्या लोकांच्यातच दिसतात. त्यामुळे भारतीयांनाच केवळ ही भन्नाट आयडिया सुचलेली आहे असा गैरसमज व्हायला भरपूर वाव असतो."
- २७ फेब्रुवारी २०१८ ला प्रसिद्ध झालेला लेख नेसूचे आख्यान

वाचा आणि प्रतिक्रिया कळवत राहा.

- नी

तटी: पूर्वीसारखे हवे तेव्हा एडिट करता येणार नसल्याने आणि आता पुढचा लेख २७ मार्चला प्रसिद्ध होणार असल्याने पुढच्या लेखांच्या लिंका कमेंट्समधेच टाकत जाईन.
अ‍ॅडमिन तुम्हाला योग्य वाटल्यास त्या हेडरमधे टाकत जा.
हे सगळेच अयोग्य वाटल्यास धागाही उडवू शकता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख निधप,
बऱ्याच दिवसांनी तुमचे लेख वाचायला मिळाले.

थँक्यू!
सध्या वेळेची चणचण आहे त्यामुळे सगळीकडेच जेमतेम असते.

छान माहिती. दोन्ही लेख आवडले. कुठेतरी वाचले होते की, पंधरा वा सोळाव्या शतकात, खिलत म्हणून जे देत त्यात चांगले कापड असे कारण तेव्हा चांगले कापड घेणे हे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचे होते. खरे आहे का? तुम्ही काही प्रकाश टाकू शकाल का यावर?

मायबोलीबाहेरच्या प्रकाशनातले लेखन , त्रोटक लिहून इथे फक्त लिंक देणे/जाहिरातीसारखे लिहिणे मायबोलीच्या धोरणात बसत नाही.

संपूर्ण लेख इथे प्रकाशित करून , मूळ प्रकाशनाला योग्य ते क्रेडीट देताना त्याची लिंक दिली तर हरकत नाही.

त्यामुळे संपादीत करून हा धागा बंद करत आहे.