मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - शब्दशॄंखला - १ मार्च

Submitted by मभा दिन संयोजक on 28 February, 2018 - 23:50

शब्दशॄंखला

लोकहो, घेऊन येत आहोत मागच्या वर्षी मायबोलीवर लोकप्रिय झालेला खेळ - शब्दशॄंखला.

आम्ही एक शब्द देऊ.
पहिला खेळाडू त्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा दुसरा शब्द देईल.
दुसरा खेळाडू दुसर्‍या शब्दाच्या (पहिल्या खेळाडूने दिलेल्या शब्दाच्या) शेवटच्या अक्षरावरून सुरू होणारा पुढील शब्द देईल.
या प्रकाराने एकापुढे एक शब्द देत देत एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे.

१. वाक्य पूर्ण करायला कमीतकमी पाच शब्द हवेत.
२. वाक्याचा शेवट क्रियापदाने व्हायला हवा.
३. एक अक्षरी शब्द वापरता येणार नाहीत. (जसे व, तो, रे इत्यादी)
४. सगळे शब्द मराठीच हवेत.
५. प्रश्नार्थक वाक्य चालणार नाही.
६. प्रत्येक खेळाडू एका वेळी एकच शब्द देऊ शकतो.
७. शेवटचे अक्षर जोडाक्षर असेल तर त्यातले कुठलेही अक्षर वपरता येईल.
८. एका वेळेस दोन खेळाडूंनी शब्द दिल्यास पहिल्या खेळाडूचा शब्द ग्राह्य धरावा.
९. वाक्य अर्थपूर्ण व्हावे म्हणून एका वाक्यात जास्तीत जास्त १२ शब्द असावेत.

शब्द - रणाणत्या
वाक्य - रणाणत्या तळपत्या येणार्या यच्चयावत तंत्रशुध्द दिलदार रथस्वाराला लपवूया.

शब्द - विकास
वाक्य - विकास सर्वांचा चमकवत तांडव वज्राने नित्य योजला.

शब्द - धगधगत्या
वाक्य -धगधगत्या तलवारीने नंदकुमार राजपुत्राचा चमकता तेजपुंज जिरेटोप पाडला.

शब्द - शतकानुशतके
वाक्य - शतकानुशतके कुढत, तळतळाट, टक्केटोणपे पचवत तुषारने नम्रपणे नकार रिचवला.

शब्द - सभोवताली
वाक्य - सभोवताली लुडबुडणारे रंगीत तवटवीत तांबटपक्षी क्षणभर रोखून नजरा राजबिंडासारखे खेळत तरंगला.

शब्द - मंडळातील
मंडळातील लकाकणारे राजस सोबती, तोर्‍याने नाचत तमाशा शिकणार्‍या यमदूतांचे चेले लाजले.

शब्द - राजघराण्यातील

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकरांनो, मोठ्या संख्येने खेळात सहभागी व्हा आणि खेळाचा आनंद लुटा Happy

र र र .

रणाणत्या तळपत्या येणार्या यच्चयावत तंत्रशुध्द दिलदार रथस्वाराला लपवूया युधिष्ठिरपासून

मला लक्शात आले नाही म्हणून खालील वाक्य लिहिले.

रणाणत्या तळपत्या येणार्या यच्चयावत तंत्रशुध्द दिलदार रथस्वाराला लपवूया युधिष्ठिरपासून नकळत सर्वांच्या

रात्री कोणी नवीन शब्द द्यायलाच नाहीये का, की वाक्य अर्थपूर्ण वाटत नाहीये.

Pages