सिअ‍ॅटल् महाराष्ट्र मंडळाचा रौप्यमहोत्सवी कार्यक्रम - १७ मार्च २०१८

Submitted by धनश्री on 27 February, 2018 - 17:46

मंडळी, नमस्कार. आज २७ फेब्रुवारी. मराठी भाषा दिवस!

रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
चारी वर्णातून फिरे, सरस्वतीची पालखी
अशा शब्दांत मराठीची थोरवी सांगणार्‍या कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस. मराठी काव्य-नाट्य-साहित्य क्षेत्रांतील या तळपत्या सूर्याला वंदन आणि मराठी भाषा दिनाच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा!! आज एका विशेष कार्यक्रमाची तुम्हांला माहिती देणार आहे.

SMM SJ Logo.JPG

सिअ‍ॅटल् - अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील एक बलाढ्य महानगर!! चार मराठी माणसे एकत्र आली की मंडळाची स्थापना होते असं गमतीनं म्हणलं जातं. पण खरोखरच ७०, ८० च्या दशकांत किंवा त्याहूनही आधी अमेरिकेत अगदी अशीच स्थिती होती. सिअ‍ॅटल् देखील याला अपवाद नाही. १९९३ साली काही हौशी मराठी बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सिअ‍ॅटल् महाराष्ट्र मंडळाला आता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शनिवार, १७ मार्च २०१८ रोजी एक दिमाखदार रौप्यमहोत्सवी कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्री सादर होण्यार्‍या बहारदार मैफलीचे आयोजन धडाक्यात सुरू आहे.
या कार्यक्रमाच्या तयारीविषयी हे हितगुज. कार्यक्रमाच्या सगळ्या नियोजनाविषयी तसेच सिअ‍ॅटल् भागाच्या माहितीपूर्ण लेखांसाठी इथे नक्की भेट द्या.

आपल्या सर्वांची लाडकी मायबोली म्हणजेच मायबोली.कॉम या अधिवेशनाची ऑनलाईन माध्यम प्रायोजक आहे.

वामन हरी पेठे ज्वेलर्स हे कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक आहेत.
WHP ad 2.JPG

चला तर मग, इथे हितगुज करण्यासाठी या आणि अमेरिकेच्या उत्तरपश्चिम किनार्‍यावर वसलेल्या आमच्या मराठमोळ्या कुटुंबात सामील व्हा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा.
मायबोली.कॉम या अधिवेशनाची ऑनलाईन माध्यम प्रायोजक आहे म्हणजे नक्की काय करणार?

उपाशी बोका - आमच्या कार्यक्रमाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी हे माध्यम उपलब्ध करून दिले आहे. काही दिवसांत इथे जाहिराती पण दिसतील. Happy

मोसा - आहेत ना तिकीटे. पण कार्यक्रम फक्त मंडळाच्या सभासदांसाठी खुला आहे. तेव्हा मेंबरशिप आणि तिकिटे घेऊन तुम्ही नक्की पाहू शकता. Happy