मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - सवाल जवाब - २७ फेब्रुवारी - मराठी चित्रपट

Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 05:06

सवाल जवाब

मनामनातील खेळ असती निराळे
हर एक खेळाचे नवे रंग नवे तराणे
खेळाचा सामना असतो मोठा चुरशीचा
खेळ रंगता सवाल नसतो मर्जीचा.

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांची कोडी सोडवत असतो. कधी वर्तमानपत्रातले, मासिकातले तर हल्ली मोबाईलमध्ये आणि रोज आयुष्यात. या खेळात आपण खेळणार आहोत सवाल-जवाब.

नियम -
१. संयोजक रोज एक विषय देतील.
२. विषयाला अनुसरून एक कोडे देतील.
३. जो सगळ्यांत आधी बरोबर उत्तर लिहील तो पुढचे कोडे देणार.
४. एखादे कोडे अडल्यास जमेल तसा क्लू द्यावा.

पहिला विषय : मराठी चित्रपट

सवाल -
तर ऐका सवाल फेकतो पहिला, चित्रपट कोणता ओळखा ओ
सुरांचा तो खेळ जुना
वाटतो आज का पुन्हा नवा
मनी सजले गाणे धुंद संगीत तराणे
जणू मनात जागले स्वप्न रेखीव देखणे

_ _ _ _ _ _ _ _ _ _ (१० अक्षरी)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इला, बरोबर

प्रथमेशा तू तुच गजानन
चरणी तुझिया अखंड वंदन
विघ्न्हारा तव रूप मनोरम
रिद्धी सिद्धीचा इथेच संगम
_ _ _ (तीन अक्षरी)

मोरया

कृष्णा बरोबर. Happy

मी अशीच हासते, उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते,
मग डोळे मिटुनी तुला बाहते,
तुझ्याचसाठी सजते,
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला....

वळणावरी तुझ्या, पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा, वाहून जाऊ दे
डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे

सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ तुला

गेल्या चार वर्षात रिलीज झालेला आहे. ठीकठाक चाललेला.

दोन शब्द असलेले नाव : - - - - -

Mornings are just magical...
शामेंभी है सुरमयी...

चांदण रात्री झगमगता तारा तुटताना दिसता अंबरात मन म्हणते काही, चुकले तर नाही आन् काहूर उठते अंतरात कधी तू हलवी हलवीच्या पावलात

माझ्या नव्या फुला? म्हणजे जुनी फुलं होती? किती?
मैत्रीचा आणि खात्रीचा स्वाद.
हलवीच्या पावलात.

मला ही मराठी भाषा शिकायला हवी.

टीप : कमेंट प्रतिसाद देणाऱ्या मायबोली सदस्यांवर नाही, तर त्या चित्रपटांतल्या गाण्यांवर आणि संवादांवर आहे.

Pages