Submitted by मभा दिन संयोजक on 26 February, 2018 - 05:06
सवाल जवाब
मनामनातील खेळ असती निराळे
हर एक खेळाचे नवे रंग नवे तराणे
खेळाचा सामना असतो मोठा चुरशीचा
खेळ रंगता सवाल नसतो मर्जीचा.
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांची कोडी सोडवत असतो. कधी वर्तमानपत्रातले, मासिकातले तर हल्ली मोबाईलमध्ये आणि रोज आयुष्यात. या खेळात आपण खेळणार आहोत सवाल-जवाब.
नियम -
१. संयोजक रोज एक विषय देतील.
२. विषयाला अनुसरून एक कोडे देतील.
३. जो सगळ्यांत आधी बरोबर उत्तर लिहील तो पुढचे कोडे देणार.
४. एखादे कोडे अडल्यास जमेल तसा क्लू द्यावा.
पहिला विषय : मराठी चित्रपट
सवाल -
तर ऐका सवाल फेकतो पहिला, चित्रपट कोणता ओळखा ओ
सुरांचा तो खेळ जुना
वाटतो आज का पुन्हा नवा
मनी सजले गाणे धुंद संगीत तराणे
जणू मनात जागले स्वप्न रेखीव देखणे
_ _ _ _ _ _ _ _ _ _ (१० अक्षरी)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कट्यार काळजात घुसली..
कट्यार काळजात घुसली..
बरोबर असेल तर कोणीतरी पुढचे कोडे द्या.
इला, बरोबर
इला, बरोबर
प्रथमेशा तू तुच गजानन
प्रथमेशा तू तुच गजानन
चरणी तुझिया अखंड वंदन
विघ्न्हारा तव रूप मनोरम
रिद्धी सिद्धीचा इथेच संगम
_ _ _ (तीन अक्षरी)
मोरया
मोरया
बरोबर, द्या पुढले कोडे.
बरोबर, द्या पुढले कोडे.
हायला, हे कोडे पद्यात
हायला, हे कोडे पद्यात विचारायचे कि गद्य चालेल?
गद्य, पद्य कसेही चालेल.
गद्य, पद्य कसेही चालेल.
सोडुनिया नाती गोती, निघून
सोडुनिया घर नाती गोती, निघून जावे तया संगती
कुठे तेही न ठावे....
नटसम्राट
नटसम्राट
सोडुनिया घर नाती गोती, निघून
सोडुनिया घर नाती गोती, निघून जावे तया संगती
कुठे तेही न ठावे....>>>
मुंबईचा जावई
कृष्णा बरोबर.
कृष्णा बरोबर.
कृष्णा बरोबर.
कृष्णा बरोबर.
मी अशीच हासते, उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते,
मग डोळे मिटुनी तुला बाहते,
तुझ्याचसाठी सजते,
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्न का हे जागतानाही मला....
क्ल्यू लागेल साधना किंवा
क्ल्यू लागेल साधना किंवा सिनेमाच्या नावाची अक्षरसंख्या?
यंदा कर्तव्य आहे
यंदा कर्तव्य आहे
ममो, ___/\____ गं...
ममो, ___/\____ गं...
नवीन कोडं द्या
नवीन कोडं द्या
वळणावरी तुझ्या, पाऊस मी उभा
वळणावरी तुझ्या, पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा, वाहून जाऊ दे
डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ तुला
कठीण आहे
कठीण आहे
गेल्या चार वर्षात रिलीज
गेल्या चार वर्षात रिलीज झालेला आहे. ठीकठाक चाललेला.
दोन शब्द असलेले नाव : - - - - -
प्रेमाची गोष्ट
प्रेमाची गोष्ट
बरोबर अक्षय.
बरोबर अक्षय.
हाच तो स्वाद आहे मैत्रीचा
हाच तो स्वाद आहे मैत्रीचा
अन न तुटयच्या खात्रीचा
दुनियादारी
दुनियादारी
बरोबर Mishti
बरोबर Mishti
Mornings are just magical...
Mornings are just magical...
शामेंभी है सुरमयी...
कॉफी आणि बरंच काही...
कॉफी आणि बरंच काही...
बरोबर अक्षय
बरोबर अक्षय
चांदण रात्री झगमगता तारा
चांदण रात्री झगमगता तारा तुटताना दिसता अंबरात मन म्हणते काही, चुकले तर नाही आन् काहूर उठते अंतरात कधी तू हलवी हलवीच्या पावलात
माझ्या नव्या फुला? म्हणजे
माझ्या नव्या फुला? म्हणजे जुनी फुलं होती? किती?
मैत्रीचा आणि खात्रीचा स्वाद.
हलवीच्या पावलात.
मला ही मराठी भाषा शिकायला हवी.
टीप : कमेंट प्रतिसाद देणाऱ्या मायबोली सदस्यांवर नाही, तर त्या चित्रपटांतल्या गाण्यांवर आणि संवादांवर आहे.
मुंबई पुणे मुंबई २
मुंबई पुणे मुंबई २
Pages