मुलांचे रिअॅलिटी शो

Submitted by ..सिद्धी.. on 24 February, 2018 - 14:36

नमस्कार. मायबोलीवर हे माझे पहिलेच लेखन आहे. इतके दिवस फक्त वाचत होते पण आज जे टीव्हीवर पाहिले त्यानंतर रहावले नाही.
एका प्रसिद्ध रिअॅलिटी शोचा एपिसोड शूट करताना त्या शोच्या परीक्षकाने एका स्पर्धक मुलीबरोबर गैरवर्तन केले. हे स्पष्ट सिद्ध होऊन सुद्धा ती त्या व्यक्तीच्या वागण्याचे समर्थन करते हे कितपत योग्य आहे.केवळ आपल्याला पैसा मिळतो म्हणून काहीही सहन का करावे? आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जर हीच भूमीका असेल तर स्रियांवर होणारे अत्याचार कसे कमी होतील हा प्रश्न पडतो.
काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमांविरूद्ध टीव्ही इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध व्यक्तीने आवाज उठवला होता.पण त्या वेळी त्याला योग्य प्रतीसाद मिळाला नाही. पण आता हे चित्र पाहून त्याची ती भूमीका योग्य वाटते.
यावर आपण सर्वांनी आपले प्रामाणिक मत द्यावे.
आपल्या प्रतीसादांवर बारावीची परीक्षा संपल्यावर उत्तरे देण्यात येतील. काही चुकले असल्यास माफ करावे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

पपोन का पापोन मी आजच ऐकलं नाव.
>>>>
+786
असे नाव असते हे देखील आज समजले. यापेक्षा ऋन्मेष नाव जास्त प्रचलित असेल.
हा शो सुद्धा मी कधी पाहिला नाही. खरे तर हे सो कॉल्ड रिएलिटी शो बघवतच नाहीत. लहानपणी ईण्डियन आयडॉल अभिजीत सावंत पाहिलेला तेच एक पहिले आणि शेवटचे.
अश्या शो मधूनच हे लोकं सिण्गर बनतात, चार गाणी गातात, आणि अश्याच शो मध्ये जज वा टीचर बनून पोटापाण्याचे पैसे सुटवतात.

On incidence of Papon I have advised CMD of the Company to take stringent action not only against him but others involved. Papon is barred for ever from our group

Subhash Chandra.

हे सर्व कॅमेरा चुकून 'लाईव्ह' चालू असल्याने लोकांना कळलं. असे कितीतरी प्रकार पडद्या आड होत असतील. 'फ्री, ओपन जेश्चर, मेंटर्स बिइंग फ्रेंडली टु देअर बॅच' या नावाखाली बर्‍याच मर्यादा ओलांडल्या जात असतील.
मुलगी आणि तिचे आई बाप 'आता जे व्हायचं ते होऊन गेलंय, निदान जास्त आरडा ओरडा करुन जजेस च्या बॅड बुक मध्ये जाऊन मुलीच्या करीयर चं नुकसान नको' म्हणून 'पपोन सर निष्पाप फादर फिगर' ला जास्तीत जास्त कळवळून क्लिन चीट देतायत.पण गिव्हन अ चॉइस (करीयर आणी प्रसिद्धी वर परीणाम होणार नाही ही हमी) त्या बापाला पपोन ला ठोसा मारुन त्याचे ३ दात पाडायला नक्की आवडलं असतं.

अरे, बारावीची परिक्षा?
तूही मायबोलीची बरीच लहान मेंबर आहेस की! अशी लिहीत रहा. शुभेच्छा.

लोकाना प्रोफेशनल राहायला आणि समोरच्या व्यक्तिच्या मताचा आदर करायला कधी जमणार ? ति मुलगि ११ ची आहे की ४-५ ची ती एक स्वतत्र व्यक्ती आहे आणि तिला तिची मत आहेत , आणी नकार देण्याचा अधिकार सुधा! व्हिडियो मधे चक्क ती मुलगी नाही म्हणत आहे कलरच लावायला, त्यापुढेही सो कॉल्ड "मजे-मजेत" एखादी क्रुती चालुच ठेवण चुकिचच आहे

रीअ‍ॅलिटी शोज मधे स्पर्धक आणि जज (मेन्टर) च्या नात्यात आपलुकी आणी कफर्ट निर्माण होवु शकतो हे मान्य करुनही ह्या क्रुतीच समर्थन होवु शकत नाही .
(या नावाचा कुणि सिन्गर आहे हेच मला या घटनेपर्यत माहित नव्हत , तो माणूस म्हणून उत्तम असेलही पण जेव्हा सेलेब म्हणुन तुम्ही मिडिया समोर येता तेव्हा तुमच्या वागणूकिवर, तुम्ही काय बोलता,वागता, प्रतिक्रिया देता यावर लोकाची अजुन बारिक लक्ष असणारच)

त्या बापाला पपोन ला ठोसा मारुन त्याचे ३ दात पाडायला नक्की आवडलं असतं.
>>>>

एखाद्या बापाला अशी ईच्छा होणे स्वाभाविकच आहे. पण जर तो ती पुर्ण करू शकत नसेल तर ते समाजाचे अपयश आहे.

"एखाद्या बापाला अशी ईच्छा होणे स्वाभाविकच आहे. पण जर तो ती पुर्ण करू शकत नसेल तर ते समाजाचे अपयश आहे." - सिरियसली? कायदा-सुव्यवस्थेचं यश नाही?

जर त्या प्रकरणाची पूर्ण चौकशी होऊन जर दोशी आढळला तर पॅपॉन वर कारवाई न होणं हे मात्र कायदा-सुव्यवस्थेचं अपयश म्हणावं लागेल.

सिरियसली? कायदा-सुव्यवस्थेचं यश नाही?
>>>>

अहो फेरफटका, शब्दशा अर्थ घेऊन चुकीच्या ट्रॅकवर जाऊ नका. कायद्याच्या मार्गाने धडा शिकवणे असा अर्थ घेतला तरी चालेल. पण कसल्याही दबावाशिवाय धडा शिकवता आला पाहिजे. पण पुढे आपल्या मुलीलाच याचा त्रास होईल या विचाराने तो झाले गेले विसरून जात असेल, याच उदाहरणात क कुठेही एखादी महिला सेक्शुअल हॅरासमेंट विरुद्ध लढण्याऐवजी एका मर्यादेपर्यंत इग्नोर करणेच योग्य समजत असेल तर हे समाजाचे अपयश झाले.

हे जरी रिअ‍ॅलिटी शो म्हणत असले तरी ते स्क्रीप्टेड शोच आहेत. कधिचं पाहण सोडून दिलय. बाकी पॅपोन कोण आहे माहिती नव्हता, आणि त्याने जे केलं ते चुकिचंच आहे..

चुकिचच वाटलं व्हिडिओ बघुन..
चुक झाल्यावर इमिजिएट शुटिंग चालु आहे का याकडे त्याच लक्ष गेलं आणि त्याने ते बंद करा असं म्हंटल
एकुण वागणुक पण विचित्रच होती..
मुलीच्या पालकांनी विरोध दर्शवायला हवा होता खरतर

Pages