मुलांचे रिअॅलिटी शो

Submitted by आदीसिद्धी on 24 February, 2018 - 14:36

नमस्कार. मायबोलीवर हे माझे पहिलेच लेखन आहे. इतके दिवस फक्त वाचत होते पण आज जे टीव्हीवर पाहिले त्यानंतर रहावले नाही.
एका प्रसिद्ध रिअॅलिटी शोचा एपिसोड शूट करताना त्या शोच्या परीक्षकाने एका स्पर्धक मुलीबरोबर गैरवर्तन केले. हे स्पष्ट सिद्ध होऊन सुद्धा ती त्या व्यक्तीच्या वागण्याचे समर्थन करते हे कितपत योग्य आहे.केवळ आपल्याला पैसा मिळतो म्हणून काहीही सहन का करावे? आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत जर हीच भूमीका असेल तर स्रियांवर होणारे अत्याचार कसे कमी होतील हा प्रश्न पडतो.
काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमांविरूद्ध टीव्ही इंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध व्यक्तीने आवाज उठवला होता.पण त्या वेळी त्याला योग्य प्रतीसाद मिळाला नाही. पण आता हे चित्र पाहून त्याची ती भूमीका योग्य वाटते.
यावर आपण सर्वांनी आपले प्रामाणिक मत द्यावे.
आपल्या प्रतीसादांवर बारावीची परीक्षा संपल्यावर उत्तरे देण्यात येतील. काही चुकले असल्यास माफ करावे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आपण काय काय लोकांना लाईव्ह दाखवणार याचा गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. तुमचे आयुष्य तुम्ही हजारो जणांना फुकट पाहायला दिले तर त्यावर हजारो उलटसुलट प्रतिक्रिया येणार.

पपोनचा विडिओ मी मुद्दाम त्याच्या फेसबुक पेजवर जाऊन पाहिला. बाकी जे विडिओ फिरताहेत ते एडिट करून फिरताहेत. बॅकस्टेज मुलांची व इतर सर्व लोकांची धमाल सुरू होती, हे सर्व लाईव्ह फेसबुकवर दाखवत होते, त्यात ज्या दृश्यावर आक्षेप घेतला जातो ते मेन फोकसमध्येही नाही तर बॅकग्राउंडला घडले, स्वच्छ दिसत नाही. तरीही त्या सुतावरून कोणी स्वर्ग गाठून पपोन हा अतिशय गलिच्छ माणूस असल्याचे चित्र निर्माण केले. अजून यात कसले कसले रंग भरले जातील हे कोणाला कसला फायदा उठवायचा यावर अवलंबून आहे.

या वादात कोण कुणाची बाजू घेतेय हे ज्याच्या त्याच्या परसेप्शनवर अवलंबून आहे. काय घडले असणार असे तुम्हाला वाटतेय त्यावरून तुम्ही निकाल देणार. तुमचे वाटणे तुम्ही या आधी असल्या बातम्या वाचल्या, त्यात अमुक गुन्हेगार हे तुम्हाला मीडियाने सांगितले या बाबींवर अवलंबून आहे. प्रत्यक्ष काय घडले याच्याशी ना तुम्हाला काही देणेघेणे ना मीडियाला.

जे लोकांना दाखवणे गरजेचे नाही, ते दाखवणे बंद करा.

साधनाजी तुम्ही नीट विडिओ पाहिला नाही बहुतेक. ट्विटर वर आहे.
मुलगी uncomfortable दिसते आहे. आणि किस घ्यायचा तर गालावर घेऊ शकला असता किंवा माथ्यावर. ओठांवर किस घेतलाय आणि जेंव्हा कळले की लाईव्ह अजून चालू आहे कट कर म्हणतोय तो.

आपल्या भावना व्यक्त करणं आणि ते चुकीच्या पद्धतीने दिसणं यात एक thin line असते. ती इथे ओलांडली गेली. भावनेच्या भरात काहीही वागणं ही चुकीचीच गोष्ट आहे.आणि त्यावर जी केस दाखल केली ती याच सर्व गोष्टींचा अभ्यास करून केली.

ब्रेकिंग न्युज साठी सगळे 'उंबरातले किडे मकोडे - उंबरी करीती लिला ' झाले आहेत>>>>

हेच अंतिम सत्य आहे.

त्याने एकदा माफी मागितली तर प्रकरण थांबेल. तो अजून म्हणतोय माझी चूक नाहीय☺️>>>>

त्याने लिहिलेय की त्याची चूक झाली म्हणून.

मुलगा/मुलगी मायनर असल्यास अशा प्रकारची शारीरिक जवळीक अयोग्य! घडलेल्या घटनेबद्दल मुलीला काही आक्षेप नाही याला काही अर्थ नाही कारण ती मुलगी मायनर आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांचे शोषण होवू नये म्हणून जे कायदे आहेत त्यानुसार बघता जे झाले ते अतिशय गैर आहे. अशा प्रकारात मुलांच्या पालकांनी आक्षेप घेतला नाही तरी कायद्यानुसार योग्य ती कारवाई करुन मुलाचे संरक्षण करणे गरजेचे. भावनेच्या भरात वगैरे बचावही मान्य करु नये. शो मधे जज म्हणून काम करणार्‍या व्यक्तीचे हे वर्तन जर कुणाला सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन वाटत नसेल तर कठीण आहे.

लग्न झालेले असणे, दोन मुले असणे याचा काय संबंध. त्यामुळे व्यक्ती गैरवर्तन करणार नाही? Uhoh मी तर म्हणेन दोन मुलं असतील तर लोकांच्या मुलांशी कसे वागू नये हे माहित असायला हवे.

Papon gave a peck on the girl's lips, it is guru-shishya parampara, what is wrong in that?? Consent of child is not important."
- Papon's lawyer Gaurang Kanth tells Times Now

आर यु सिरीयस????

ओठांचे चुंबन, तेही लहान मुलीच्या, आता दोन परस्परविरोधी भूमिका घेतल्या जातील असा विषय ठरणार का?

धन्य

Sexual harassment awareness training मध्ये ,महत्त्वाचा मुद्दा असतो -- intent Vs impact .

Clip बघितली , disgusting !!
लग्न झालेले असणे, दोन मुले असणे याचा काय संबंध. त्यामुळे व्यक्ती गैरवर्तन करणार नाही? Uhoh मी तर म्हणेन दोन मुलं असतील तर लोकांच्या मुलांशी कसे वागू नये हे माहित असायला हवे. >>>>> +10000

मला तर वाटते त्याला तुडवून मारायला हवे.

फेसबूक आणि यू ट्यूब चेक केले आताच. काही लोकं या कृत्याचे समर्थन करत आहेत वा येनेकेनप्रकारे या कृत्याला सौम्य दाखवायचा प्रयत्न करत आहेत. उद्या हीच लोकं दुसरीकडे कामाच्या जागी स्त्रियांवर होणार्‍या लैंगिक शोषणाबद्दल वा सेक्शुअल हॅरासमेंटबद्दल गळे काढताना दिसतील. म्हणजे एखाद्या रस्त्यावरच्या मवाल्याने काढली तर ती छेड, आणि हे असले सोफेस्टीकेटेड बुरखे ओढलेले हरामी मॉडर्न कल्चरच्या गोंडस नावाखाली काहीही धंदे करून सुटू शकतात..

मला तर वाटते त्याला तुडवून मारायला हवे.

मला असा कोणी गायक आहे, असा कोणी शो आहे हे हा धागा वाचल्यावर कळतेय.व्हिडीओ पाहिला.
अगदी कितीही मजेच्या मूड मध्ये असलं तरी १४-१५ वर्षाच्या मुलीचा लिप किस घेऊन नंतर 'आम्ही मजेत केलं हो, तुम्ही त्याचे वाईट अर्थ घेतले' म्हणणं मला पटलेलं नाही. एका लिप किस ने मुलीला फरक पडणार नाही, तिला आवडला नसला तरी कॉम्पीटिशन मध्ये टिकायला ती आणि पालक पपोन ची बाजू घेतील.म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो.'मिडीया वर्ल्ड मध्ये हे सर्व चालतं' किंवा 'कोयले की दलाली मे हाथ काले' 'मजेत झालं, चालतं' 'हे इतकंही चालत नसेल तर बॉलीवूड मध्ये कसं सरव्हाइव्ह करणार' वगैरे अर्थाचा जो माइंडसेट बनत जातो, बनवला जातो हे योग्य चालू नाही.

हे असं काही घडलंय हे हा धागा वाचून समजलं. व्हिडिओ पाहिलेला नाही.
नक्की कोणत्या रिअ‍ॅलिटी शो मध्ये घडले? Uhoh
आणि १४-१५ वर्षांच्या मुलिच्या ओठाचा किस? जरा जास्तच

हे असं काही घडलंय हे हा धागा वाचून समजलं. व्हिडिओ पाहिलेला नाही.
नक्की कोणत्या रिअ‍ॅलिटी शो मध्ये घडले? Uhoh
आणि १४-१५ वर्षांच्या मुलिच्या ओठाचा किस? जरा जास्तच>>>>>>>+१००
टीव्ही बघण्म्च सोडलंय मी. अतिशय असह्य फालतुगिरी झालीये रीयालिटी शो म्हणजे आणि त्या भिक्कार सिरीयली.

Papon?? हा भारतातील गायक आहे? काय गातो? एखादे फेमस गाणे?? >>
दम लगा के हैश्या मधलं "मोह मोह के धागे" मेल व्हर्जन.
हमारी अधुरी कहानी मधलं - ऐ हमनवा मुझे अपना बना ले
बेबी मधलं मै तुझसे प्यार नही करता

पपोन का पापोन मी आजच ऐकलं नाव.
त्याची गाणी पण ऐकली नाहीत. मोह मोह के धागे फीमेलच ऐकलंय. बाकी दोन माहितच नाहीत.
आजकाल ४ गाणी गायली की जज होतात. डॅन्सच्या शोमधे तर कधी न ऐकले पाहिलेले कोरीयॉग्राफर दिसतात.
सिढार्थ जाधव पण जज असतो. Happy
गाण्याच्या शो मधे डायरेक्टर जाधव असतो. त्याचं नाव येईना मला. टाईमपास पिच्चर वाला.

करेक्शन - 14-15 नाही 11 आहे वय मुलीचे. Doesnt मॅटर स्टील मायनर आहे.. परेन्ट्स प्रेशर मध्ये आलेत.
पपोन तो गया अब.

ह्या धाग्यावरती मुलीचे वय वाढून 14-15 पर्यंत पोचले. बाहेर मीडियात अजून काय काय झाले असेल देव जाणे. ही केस खरेच क्लासिक केस आहे.

मुलगी uncomfortable दिसते आहे. आणि किस घ्यायचा तर गालावर घेऊ शकला असता किंवा माथ्यावर. ओठांवर किस घेतलाय आणि जेंव्हा कळले की लाईव्ह अजून चालू आहे कट कर म्हणतोय तो.>>> हे जर का खरे असेल तर मग १००% दोष त्याचाच म्हणावा लागेल. हे तर मिकाच्या मुक्यापेक्षाही भयंकर आहे.

पोरी पटवा, फिरवा, मजा करा.. ईटस ओके.. तुम्ही स्टड आहात
पण पोरीवर जबरदस्ती करत आहात.. तर तुम्ही बास्ट#ड
बिचारी मुलगी भांबावून गेलेली दिसत आहे. एवढीही लहान नाही वाटत. अश्या हलकट माणसांचा स्पर्श कळायची अक्कल आली असणार.
पण आता बिचारी पुढे काय करणार याची कल्पना नाही. तिचे पालक कदाचित स्वार्थापोटी वा नाईलाजाने प्रकरण पुढे नेणार नाहीत.
पण ईतर मुलांच्या पालकांनी वेळीच सावध व्हायला हवे. तो जर असा खुलेआम अशी हरकत करत असेल तर एकांतात संधी मिळताच काय थराला जात असेल..
अश्या शो मध्ये किमान लहान मुलांची काळजी घेण्याचे सुरक्षेचे नियम बनायला हवेत. तसेच या केसमध्येही वचक बसावा अशी शिक्षा व्हायला हवी.

आणखी एक महत्वाचे म्हणजे या फिल्मी लाईनला वा चण्देरी दुनियेत हे असेच चालते, ही कॉमन प्रॅक्टीस आहे असे टुच्चे विचार आधी आपण सर्वांनीच डोक्यातून काढून टाकायला हवेत. करणारे करतही असतील स्वखुशीने, पण ज्यांना हे रुचत नाही त्यांना सन्मानाने आपली अब्रू वाचवत जगायचा अधिकार हवाच..

Pages