राॅकी

Submitted by द्वादशांगुला on 18 February, 2018 - 02:30

राॅकी

अलार्म वाजला. नेहमीप्रमाणे अनीतानं हातानं बटण दाबून तो बंद केला. ' काय कटकट ए ' अशा अविर्भावात ती डोक्यावर उशी घेऊन परत झोपून गेली. एव्हाना मोठ्यानं वाजलेल्या अलार्मने राॅकी उठला होता. त्यानं कानोसा घेतला. ती अजूनही झोपलेलीच असल्याचं त्याला जाणवलं. तो उभा राहिला आणि त्यानं मस्तपैकी आळस दिला. आपली झोपायची जागा त्यानं सोडली. तिच्या बेडवर आपले पुढचे दोन पाय ठेवून त्यानं मान पुढे केली आणि तो शेपटी हलवत तिला चाटू लागला. तिनं हसत हसत त्याचं तोंड पकडलं. पांघरुणातून बाहेर पडत त्याच्या मानेला खाजवलं. तसा तो तिचा चेहरा चाटू लागला. "नाॅटी बाॅय..." असं म्हणत तिनं त्याला हलकेच टपलवलं आणि बाथरूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेली. तिची आजचीही सकाळ नेहमीप्रमाणे प्रसन्न झाली होती.

तिनं आपलं आवरलं. बेडजवळ ठेवलेली आपली फोल्डिंगची काठी घेतली. चाचपडत नेहमीच्या जागी राॅकीची चैन शोधली. त्याच्या मानेवरच्या बेल्टवर हात फिरवत हूक शोधला आणि त्याच्या बेल्टला ती चैन अडकवली. आपला काळा गाॅगल शोधायला ड्राॅवर खोलला, पण तो काही केल्या मिळेचना. तेवढ्यात राॅकीचा भुंकण्याचा सूचक आवाज तिला आला. तिनं त्याच्या डोक्यावरून फिरवायला हात पुढे केला तर त्यानं तिचा गाॅगल तिच्या हातावर ठेवला. ती उद्गारली, " याच्याकडे कसा बरं हा आला........... अरे हो , काल कुरियर आलं होतं तेव्हा मी गडबडीत तिथेच विसरले होते नाही का. " ती खाली गुढग्यांवर बसली. ती राॅकीला थोपटत थॅक्स बोलली.

तिची तयारी झाली होती. तिनं बॅग घेतली आणि दाराला कुलुप लावलं. राॅकीची चैन हातात घेतली. तशी त्याची गरज राॅकीसारख्या ट्रेन्ड कुत्र्याला नव्हती पण अनीताला होती. तिला राॅकीच्या रूपाने लहानपणी गेलेले डोळे परत मिळाले होते. तो तिला रस्त्याने बरोबर न्यायचा. नीट रस्ता क्राॅस करून न्यायचा. ट्रेनमध्ये नीट चढवायचा, उतरवायचा. तिच्या एडवर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ती ज्या ज्या क्लासमध्ये लेक्चर द्यायला जायची, त्या त्या प्रत्येक रूमपर्यंत तिला सोडायचा, आणि लेक्चर होईपर्यंत बाहेरच बसून रहायचा. त्याला बोललेलं समजायचं. ती त्याच्याशी छान गप्पा मारायची. तोही देहबोलीतून, आवाजातून प्रतिसाद द्यायचा. तिचा जीवश्च कंठश्च मित्रच झाला होता तो. जेव्हा जेव्हा ती रडायची तेव्हा तो तिला हसवायचा. तिचे अश्रूमय गाल चाटायचा.

लहनपणी कसल्याशा आजारात तिचे डोळे निकामी झाले होते. तेव्हापासून तिची काठी तिची गरज बनली होती. तिला हिणवलं जायचं लहानपणापासून. कमी लेखलं जायचं. तिच्याकडे कुशलता असतानाही तिच्या प्रावीण्यावर शंका घेतली जायची. तिला काहीही तिच्या आवडीचं काम करू दिलं जायचं नाही. यामुळे ती अधिकच एकलकोंडी होत गेली . तिच्यातला न्यूनगंड आणखीनच बळावत गेला. तिला यावेळी साथ मिळाली होती राॅकीची. तिच्या बाबांनी तिला एका वाढदिवसाला हा गिफ्ट केला होता. लवकर गट्टी जमली होती दोघांची. तो रोज दोन तास ट्रेनिंगला जायचा सात महिने. पटकन शिकला होता तो सर्व. राॅकी गोल्डन रीट्रायव्हर जातीचा भुर्या केसांचा समंजस, हुशार कुत्रा होता. असेच वार्याच्या वेगाने दिवस जात होते. त्या दोघांतली मैत्री आणखी घट्ट होत होती.

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

आज ती खूप खूश होती. जेना - तिच्या एका कलिगसोबत ती डाॅ. विल्यम्स कडे जात होती. अर्थात राॅकीची सोबतही होतीच. आज ती ऑपरेशनसाठो जात होती. आधीच्या अपाॅइंटमेंटमध्ये इतर चाचण्यांचे सोपस्कार पार पडले होते. आजचं ऑपरेशन सक्सेसफुल होईल याची डाॅ. ना, तिलाही खात्री होती.तिला आता दिसणार होतं हे जग पुन्हा, स्वतःच्या डोळ्यांनी. ती आयुष्यात पहिल्यांदा एवढी खूष होती. तेवढ्यात कसलासा भरधाव गाडीचा आवाज आला. काही कळायच्या आतच राॅककनं तिला उडी मारून ढकलल्याचं तिला जाणवलं. अनीता काही करणार इतक्यात करकचून गाडी वळवल्याचा, राॅकीचा जिवाच्या आकांताने ओरडण्याचा, गाडीच्या भरधाव वेग घेत जाण्याचा आवाज एकत्र आला. अनीताला गाडीने दुखापत पोहोचवू नये म्हणून राॅकीने आपल्या जिवाची पर्वा केली नव्हती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो पंचत्वात मिसळून गेला होता, अनीताच्या जाणार्या अंधत्वासोबत.

♢समाप्त♢

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहीलंय!
मला वाटतं, 'पंचतत्वात' हवंय का?

ही देखिल कथा छान होती

जितकी साथ आणि प्रेम आपल्याला मानसांकडन मिळत नाही

तितक आपल्याला मुक्या प्राण्यांकडण मिळत.

कदाचीत

कारण त्यांच प्रेम हे निस्वार्थी असत.

जाग ही कथा वाचली मी

खरच हे सगळ स्वप्न आहे
2 दिवस ह्या गोष्टींचा विचार केला

कदाचीत तसं असेलही

पण ते सत्य कधी कळेल का????

तुम्हाला काय वाटत???

जाग कथा? ही कोणती कथा आहे?

द्वादशनगुला - ही कथा मला फार साधी वाटली, नॉट युअर
फॉल्ट.. तुमच्या बाकीच्या कथा वाचून कदाचित माझेच एक्सपिकतेशन जास्त झालेत .

टीना, हम्म...... लिहितानाही वाईट वाटत होतं.

Happy धन्यवाद आनंद, मी पंचत्वात लिहिलंय कारण एक कुत्रा असूनही माणसापेक्षाही जास्त योग्य पद्धतीने त्याने आपली जबाबदारी पार पाडली. त्यासाठी त्याला योग्य तो आदर दाखवणं मला गरजेचं वाटलं.

धन्यवाद अक्की, Happy
जितकी साथ आणि प्रेम आपल्याला मानसांकडन मिळत नाही
तितक आपल्याला मुक्या प्राण्यांकडण मिळत.
कदाचीत
कारण त्यांच प्रेम हे निस्वार्थी असत.>>>>>> होय. अगदी सहमत. मुके प्राणी बिचारे फार मायाळू असतात. ते हेवेदावे, स्वार्थ न बाळगता सोबत करतात. आपल्याला खूश ठेवायचा प्रयत्न करतात. आपण जरी त्यांना फटकारलं, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, तरी ते स्वामिनिष्ठेने आपल्याला जपतात. एकदा माझ्या पायाचा अंगठे सुजला असताना आमच्या क्युटीनं (कुत्री) हलकेच आपल्या पुढचा डावा पंजा त्यावरून फिरवल्याचं, अंगठा मायेने चाटल्याचं अजून आठवतंय. राग मानणं त्यांच्या गावीही नसतं. एखादवेळी ते लहान बाळांप्रमाणे थोडेसे रागावतील, फुरगंटून बसतील, पण ते तात्पुरतं. खरंच प्राण्यांची सोबत मलातरी माणसांपेक्षा श्रेष्ठच वाटते.

आणि हो ही जाग कोणती कथा आहे? जर तुमची शीर्षकात गफलत झाली असेल तर प्लिज एकदा चेक करा. अन्यथा मला लिंक द्या प्लिज.

च्रप्स - कथेबद्दल मनापासून काय वाटतं, ते लिहिल्याबद्दल धन्यवाद. Happy मला अशीच सुचली. सोशल साईटवर अंध व्यक्तीसाठी स्पेशल ट्रेन केलेल्या कुत्र्यांबाबतची एक पोस्ट वाचली. त्यावरून सुचलं हे खरंतर. गोष्ट टाकायची की नाही विचारात होते, पण मनाचा हिय्या केला नि टाकलं मायबोलीवर. मनापासून सांगायचं झालं, तर मला यथातथाच वाटलेली.

नॉट युअर
फॉल्ट.. तुमच्या बाकीच्या कथा वाचून कदाचित माझेच एक्सपिकतेशन जास्त झालेत .>>> ये तारीफ होगी तर धन्यवाद. एवढंही काही खास नाही लिहीत हो मी. आता कुठे सुरुवात केलीय. अजून बरंच इंप्रुव्ह करायचंय स्वतःला. Happy

धन्यवाद शमिका Happy
खरंच . मुके प्राणी फार जीव लावतात. वर दुःखद गोष्ट म्हणजे त्यांचं आयुष्यही कमी असतं. त्यांचं असं जाणं ह्रदयाला पीळ पाडणारं असतं. मीही अनुभवलंय तीनदा. आधी आमचा फुटबाॅल ( कुत्रा. त्याला हे नाव कसं पडलं, यावर स्वतंत्र लेख होईल.) चारचाकीखाली सापडून मेला; तेव्हा आधी मी लहान असल्याने अंधारातच ठेवलं होतं. पण जेव्हा कळलं, तेव्हा मी फार रडले होते. अन् दुसर्यांदा आमचा राॅकी, तो फोरेट खाऊन मेला होता. तेव्हा जेवले नव्हते मी. मग स्वीटी. ती दिवाळीत गायब झालेली नि नंतर जखमी अवस्थेत, पोटाला खड्डा पडलेल्या अवस्थेत परतलेली. तीही मेली. ही सारी तशी पिल्लंच. सह महीने ते एक दीड वर्षांदरम्यानची. तरीही फार माया लावली त्यानी

छान लिहिलंय...
आमच्या ब्लॅकी माउची आठवण आली.. ती पण लहान पिल्लू असतानाच मेली Sad
खरंच . मुके प्राणी फार जीव लावतात.>> +१११

Happy धन्यवाद सायुरी .

आमच्या ब्लॅकी माउची आठवण आली.. ती पण लहान पिल्लू असतानाच मेली >>> बापरे. फार वाईट झालं हो.https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif. फार वाईट वाटलं असेल तुम्हाला. कशीकाय मेली हो ब्लॅकी ? आजारी वगैरे होती का?

ब्लॅकीचा फोटो टाका ना असेल तर.

अजून एक श्वान कथा Happy
लोकं प्राण्यांवर कसा जीव लावतात हे माझ्या आकलनापलीकडचे..
पण श्वान मात्र असे करतात हे नक्की

ऋन्मेष,
अजून एक श्वान कथा Happy>>>>> अं हो की........... Happy एकूण तीन. वर तिन्ही ईकारान्त............ काय चाललंय माझं .... Happy

लोकं प्राण्यांवर कसा जीव लावतात हे माझ्या आकलनापलीकडचे..>>>> बापरे हो का ....... कठीण आहे. एक काम करा, तुम्ही एक कुत्रा नाहीतर मांजर पाळा. [ हत्ती, घोडा ,जिराफ पाळलात तरी माझं काऽऽही म्हणणं नाही. तुमच्या मोठ्ठ्या घरात भरपूर जागा आहे नाहीतरी Happy ( संदर्भ : https://www.maayboli.com/node/63317 ) ] जास्तीत जास्त दोन आठवड्यातच तुम्हाला प्राण्यांच्या निःस्वार्थी प्रेमाची प्रचीती येईल. Happy Happy

पण श्वान मात्र असे करतात हे नक्की>>>> होय . कुत्र्यांचा मला प्रत्यक्ष अनुभव आहे. फार मायाळू ,निरागस असतात ते. *अपवाद वगळता.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. Happy

कावठीचाफा यांची होती
तो जो प्रश्न मी त्यांच्यासाठी होता

चुकुन ईथे कमेंट झाली साँरी
"जाग" कथा ही त्याच्या लिखाणावर उपलब्ध आहे
साँरी तिथल कमेंट ईथे पोस्ट चुकुन

धन्यवाद अदिति Happy
हम्म लिहिताना मलाही वाईट वाटत होतं.

अक्की, अच्छा हो का. इट्स ओके. Happy

सस्मित, प्रतिसादाबद्दल धन्यवाद Happy
हम्म मलाही सुमारच वाटलेली लिहिताना,...मला अशीच सुचली. सोशल साईटवर अंध व्यक्तीसाठी स्पेशल ट्रेन केलेल्या कुत्र्यांबाबतची एक पोस्ट वाचली. त्यावरून सुचलं हे खरंतर. गोष्ट टाकायची की नाही विचारात होते, पण मनाचा हिय्या केला नि टाकलं मायबोलीवर. मनापासून सांगायचं झालं, तर मला यथातथाच वाटलेली.. प्रयत्न करेन इंप्रूव्ह करायचं स्वतःला. Happy

तेरी महरबानिया आठवला.>>>>>>>> तो जॅकी श्राॅफचा का,? मला वाटतं तोच असावा. १९८५ मधला ना? अतिरंजित वाटतो. ( गूगलून स्टोरी वाचली.)