डेझर्ट

Submitted by सुप्रिया जाधव. on 15 February, 2018 - 00:26

प्रिय ...

तुझ्यासाठी...
संपूर्ण वाढलेल्या ताटावरून
समाधानाने उठल्यावर
हात धुता धुता
तोंडात टाकण्याचं
डेझर्ट
किंवा
मुखशुद्धीकरणासाठी
पाचकरस वाढवणारी
चिमूटभर सुपारी
म्हणजे मी !
(अर्थात हे ही मलाच वाटतं)

माझ्यासाठी...
असहाय्य भुकेने
आतडं पिळवटल्यावर
उठून चालण्याचं त्राण
गळाल्यावर
माठात तळाशी उरलेल
पेलाभर थंडगार गोड पाणी
म्हणजे तू !
( हे तुला कुठे कळतं ? )

कसं जमणार रे आपलं गणित ?

आणि तसही
गोड वर्ज्य केलयस ना
आजकाल खाण्यातून तू ???

तुझीच,

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users