नातं

Submitted by गवंडी ललिता on 10 February, 2018 - 01:21

नातं

शमली सारी वादळं
प्रश्नही निरुत्तर झाले
तुझ्या अशा जाण्याने
जीवनच गोठून गेले

हेव्यादाव्याच्या गर्तेत
जीवन सारं गुंफलं
दूर राहूनच मी
नातं असं जपलं

जुळली नव्हती मनं
तरी नाती होती गुंफली
गुंफलेल्या नात्यातून
दोन फुलं बहरली

फुलांचं दान........
पदरात माझ्या टाकलं
तुझं माझं म्हणून मीही
ते आनंदानं स्विकारलं

एवढया साठीच का
नातं तुझं माझं जुळलं?
तू नाही तरी आज
जीवन माझं फुललं

- ललिता गवंडी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults