सैरभैर

Submitted by Harshraj on 6 February, 2018 - 05:25

बाहेर अजूनही कर्फ्यू लागलेला होता..त्याचं डोकं सुन्न झालेलं...त्यानं स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं. जे घडलं होतं, त्यात त्याचाच सगळा दोष आहे याची भयंकर जाणीव होऊन तो हादरला होता. सकाळचा प्रसंगच तसा होता, डोळ्यापुढे अंधारी आणणारा.

आजचा दिवस..मंदारच्या आयुष्यातला सुंदर दिवस ठरणार होता. बाबांशी सकाळीच त्याने तिच्याबद्दल विषय काढला.

" बाबा प्लिज, एकदा तुम्ही तिला बघा, तुमची खात्री पटेल कि माझ्यासाठीच तिला देवाने बनवलं आहे. तिच्या माझ्या सगळ्या आवडीनिवडी जुळतात. तिचा स्वभाव तर अगदी मनमोकळा आहे. माझं खात्री हं बाबा आपल्या घराला सांभाळणारी तीच असणारे. आपल्या सुधा ला ती बहिणीच्या वर माया करेल. आणि तुमची काळजी सुद्धा घेईल."

मंदारला माहित होतं कि बाबा नकार देणार नाहीत. तसे त्याचे बाबा त्याच्याशी वडिलांसारखे कधीच वागले नाहीत. त्यांचं नातं इतर बापलेकांपेक्षा थोडं वेगळंच होतं. त्यात मोकळेपणा आणि पारदर्शकता कायम टिकून होती. मंदारच्या मित्रांना सुद्धा खूप भारी वाटायचं हे . हा कसा काय स्वतःच्या बाबांशी इतका मोकळेपणाने बोलतो. ट्रीप असुदे, पार्टी असू दे किंवा अगदी थेट एखादी डेट असू दे..हा पट्ठ्या बाबांना न लपवता सगळ्या गमतीजमती सांगायचा.त्यामुळे त्याच्या मनावर कधीच ओझं नसायच कि, बाबाना कळलं तर काय होईल? तो विश्वास त्याने कमवला होता. आणि म्हणूनच कोणतीही गोष्ट आडपडदा ना ठेवता तो त्यांना सांगू शकत होता. आजही तेच करत होता. पण तिच्याविषयी सांगताना जरा भावूकच झाला होता.

बाबा म्हणाले ," मंदार, तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुला आवडलेली मुलगी नक्कीच सुशील आणि चांगली असेल. पण तू स्वतः निर्णय व करून घे. तू या जबाबदारी साठी तयार आहेस का ? त्यामुळे सुधा च्या बाबतीत असलेली तुझी जबाबदारी..त्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. पोर लहान आहे. आणि त्या अनाथ पोरीला घरी आणण्याचा हट्ट सुद्धा तुझाच होता. त्यामुळे ती माझ्यापेक्षा जास्त तुला मानते. मंदार दादा म्हणजे तिचा जीव कि प्राण आहे. मला माहित आहे की तू सगळं निभावशील नक्कीच."

थोड्या अंतराने पुन्हा गमतीनं म्हणाले ," तुझी आई गेल्यापासून आपण दोघेच पार्टनर होतो, पण आता तुझा नवीन पार्टनर आल्यावर मला म्हाताऱ्याला विसरू नका म्हणजे झालं!"

"थँक्यू! थँक्यू सो मच बाबा! "

बाबांचा इन्डायरेक्ट होकार ऐकून मंदार एक्साइट झाला..आणि " लव्ह यु बाबा " म्हणत घाईतच ऑफिसला निघाला. गाडीत बसता बसता विचार केला, जाता जाता छानसा गुलाब आणि एक तिच्या आवडीचा निशिगंध यांचं कॉम्बिनेशन असलेला एक बुके घ्यावा. तिच्याशी काय काय बोलायचं, लग्नाचं काय काय प्लॅनिंग करायचं या विचारात तो नाक्याजवळच्या फूल शॉपी जवळ आला. गाडीबाहेर उतरून पाहिजे तसा बुके ऑर्डर करून तिला फोन लावला, तेवढ्यात मागून आवाज आला,

" दादा ओ दादा....इकडं इकडं.."

त्यानं मागे वळून पाहिलं, एक साधारण उंचीचा, दाढीवाला अशक्त माणूस आवाज देत होता. काय ? असा प्रश्नार्थक चेहरा करून मंदार ने त्याच्याकडे पाहिलं.

तो म्हणाला," त्या बसमधल्या निळया साडीच्या बाईला एवढी बॅग जरा देता का ? माझा पाय लचकलाय. मी जाईपर्यंत बस जाईल निघून."

मंदार ने ठीक आहे म्हणून खांदे उडवले. त्याच्या हातून बॅग घेतली आणि बसमधल्या बाईला दिली.आणि इकडं पुनः फोनवर बोलू लागला. अगदी सहज प्रसंग होता तो. बुके घेतला आणि पैसे दिले. गाडी रिव्हर्स घेताना सहज मिरर मध्ये पाहिलं तर मघाशीचा तो माणूस आणि ती जिला बॅग दिली ती बाई गडबडीने चालली होती. आणि मुख्य म्हणजे तिच्या हातात बॅग नव्हती.

असेल काहीतरी असे म्हणत तो गाडी रिव्हर्स घेत असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. सगळी कडे धावा धाव झाली. आणि त्याच्या लक्षात आलं, कि ज्या बसमध्ये त्यानं बॅग दिली होती त्यात बॉम्बस्फोट झाला होता. सुन्न झाला तो...सैरभैर झाला..घाबरून गोंधळून तसाच घरी आला. आणि स्वतःला त्याने खोलित कोंडून घेतलं. बाबानी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न केला पण काही न बोलता तसाच रूममध्ये गेला. संध्याकाळ झाली तरी सुन्न अवस्थेत बसून राहिला.

इकडे बाबा सुद्धा अस्वस्थ झाले होते. संध्याकाळ झाली तरी सुधा अजून घरी आली नव्हती. रोज यावेळेला तिने कॉलेजधून येऊन बाबांसाठी चहा टाकलेला असायचा. पण सकाळची स्फोटाची बातमी आणि बाहेर लागलेला कर्फ्यू यामुळं क्षणोक्षणी त्यांच्या अस्वस्थतेत भर पडत होती. न राहवून शेवटी त्यांनी मंदारच्या खोलीचं दार ठोठावलं, " मंदार, मंदार दार उघड. सुधा अजून अली नाही रे घरी. बघतो का जरा बाहेर जाऊन ?"

बाबांच्या आवाजाने मंदार भानावर आला. लगेच त्याने खोलीचं दार उघडलं, " काय सांगताय बाबा ? तिच्या मैत्रिणींना फोन केला होता का? तिकडे कुठे थांबली तर नाही ना ?"

बाबा, "मला जेवढे माहित होते तेवढे सगळे फोन करून झाले पण तिकडे कुठेच नाही. गेली तरी सहसा फोन करते. टेन्शन आलंय रे. काय करावं सुचेना. "

आता मात्र मंदार अजूनच घाबरला. सकाळचा प्रकार त्याला खरं तर बाबांना सांगायचा होता पण तो गप्प राहिला. त्यात सुधा अजून परतली नव्हती घरी. मग त्यानेही एक दोन फोन लावले पण त्याची निराशाच झाली. इकडे टी व्ही वर स्फोटाबद्दल च्या सणसणीत बातम्यांना ऊत आला होता. व्हाट्स अप ला त्या घटनेचे वर्णन करणारे निरनिराळे फोटो येत होते. ते पाहुन त्याला अजूनच वाईट वाटत होते. रात्रीचे ११ वाजले होते. कर्फ्यू मुले बाहेरही जाता येईना सुधा ला शोधायला. तो पोलिसांना फोन लावणार इतक्यात सुधा सामोरुन येताना दिसली.

आल्या आल्या तिने"दादा .." म्हणून हंबरडा फोडला. तिचा अवतार बघून मंदार आणि बाबा दोघेही चरकले. काय झाले काहीच कळेना. सुधाला बोलता सुद्धा येत नव्हते..तशातच तिची शुद्ध हरपली. सुदैवाने सोसायटी मध्ये एक डॉक्टर होते. त्यानं लगेच त्यांना बोलावलं. सुधाची परिस्थिती बघता डॉक्टरांनी लगेच ताडलं, कि तीच्यासोबत गैरव्यवहार झाला आहे. त्यांनी तशी मंदार ला कल्पना दिली. आता मात्र मंदार पुरता कोसळला. आपल्या बहिणीची ती अवस्था त्याला बघवत नव्हती. त्याच्या मनात संमिश्र भाव दाटून येत होते. बाबांना तर मोठा धक्काच बसला. काय बिघडवल होतं माझ्या निरागस पोरीने कोणाचं?औषधांच्या परिणामाने सुधा हळू हळू शुद्धीवर आली आणि पुन्हा रडायला लागली..मंदार ने तिला कुशीत घेतलं, आणि खूप प्रयत्नाने ती बोलायला लागली. कर्फ्यू लागल्यामुळे कॉलेजला सुट्टी दिली गेली. बाहेर वातावरणात फारच टेन्शन होतं. ती मैत्रिणीबरोबर निघाली, मैत्रिणी, घरे मागे पडल्यावर सुधा एकटीच चालत होती रस्त्यावरून. भर दुपारीसुद्धा रस्ता अगदीच सुनसान होता. ती घाबरून तशीच चालत होती, लवकर घरी पोहचायचे या विचाराने तिने छोट्या गल्लीतून शॉर्टकट घेतला आणि तिथेच घात झाला. एक टवाळ मुलांची टोळी बिड्या फुंकत उभारली होती. सुधा ला एकटीला पाहून त्यानीं आधी तिची छेड काढली आणि शेवटी तिच्यावर रेप केला ..सगळं सांगताना आठवून पुन्हा पुन्हा ती रडत होती.

बाबानी ठरवले, सकाळ झाली कि लगेच पोलिसात तक्रार करायची. पण...सकाळीच त्यांच्या दाराची बेल वाजली. मंदार ने दार उघडले तर समोर पोलीस! मंदार ला अटक करायला आले होते ते. फ्लॉवर शॉपी मधील cctv मध्ये कालचा प्रसंग रेकॉर्ड झाला होता. आणि ती बॅग बसमध्ये मंदारनेच दिली हे सिद्ध होतं त्यावरून..बाबांना हा अजून एक नवीन धक्का होता..पोलीस मंदार ला घेऊन गेले..आणि बाबा त्या धक्क्याने कोसळले ...कोणी कोणाला सावरायचं होतं ? कोणाचीही चूक नसताना एक कुटुंब उद्वस्त झाले...सैरभैर झाले ..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बापरे!!! Sad
पुढे नाही का काही??