लॉग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्सचे गुंतवणुकीवर काय परिणाम होतील?

Submitted by अमा on 3 February, 2018 - 03:17

भारतात परवाच्या बजेट मध्ये लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स शेअर्स मधील गुंतवणुकीवर लागू करण्यात आला आहे.
असे होणार अशी कुणकुण गेला महिना भर होतीच. छोट्या प्रमाणात गुंतवणूक करणार्‍या लोकांनी आता कंपनीच्या समभागांत गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी. पूर्वी साधारण पणे एक वर्शा पेक्षा जास्त शेअर्स ठेवायचे नाहीतर शॉर्ट टर्म टॅक्स लागतो असा आडाखा होता. आता हा टॅक्स वाचवण्यासाठी जास्त दिवस शेअर्स ठेवावे लागतील का? म्युचुअल फंड मधील गुंतवणुकीवर काय परि णाम होती? एस टीटी पण काढलेला नाही. एक वर्शापेक्षा जास्त
ठेवलेले शेअर्स मार्च ३१ पूर्वी विकावेत का?

ह्या संबंधाने चर्चा करू या.
https://economictimes.indiatimes.com/markets/stocks/n ws/long-term-capital-gains-tax-heres-all-you-need-to-know/articleshow/62765382.cms

हे वाचले आहे पण मराठीत जास्त चांगले समजेल व शंका विचारता येतील.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान धागा

रु.१०००००/- पेक्षा जास्त परतावा असेल तर त्यावर १०%, हे जरा समजाऊन सांगाल का.
एम एफ युनिट्स रु.२००००० चा फायदा झाले असणार तर १०% कर रु.१०००००/- वर आकारले जाईल कि रु.२०००००/- वर आकारले जाईल.

एका एम एफ मध्ये समजा रु.५००००/- चे फायदा झाले, दुसर्‍या मधे रु.३००००/- चे आणि तिसर्‍या मधे ४००००/- चे तर एकुण फायदा रु.१०००००/- वर आहे , पण दर स्किम गणिक १०००००/- पेक्षा कमी आहे, येथे कर लागेल का.

एम एफ युनिट्स रु.२००००० चा फायदा झाले असणार तर १०% कर रु.१०००००/- वर आकारले जाईल कि रु.२०००००/- वर आकारले जाईल. >>> १०% कर रु.१०००००/- वर आकारले जाईल

पण दर स्किम गणिक १०००००/- पेक्षा कमी आहे, येथे कर लागेल का. >>> एकुण फायदा १००००० च्या वर गेल्यावर जेवढा वर आहे त्यावर लागेल. ( एफ डी सारखाच नियम आहे)

एक वर्शापेक्षा जास्त
ठेवलेले शेअर्स मार्च ३१ पूर्वी विकावेत का? >>> सविस्तर टाइम लाइन दिलेली आहे. ३१ जानेवारीच्या आधी च्या फायद्याला टैक्स नाहिये.

३१ मार्च ला शेअर बाजार खुप वर होता. निअर टर्म मध्ये जास्त फायदा होण्याची शक्यता कमी आहे. मागच्या २ वर्षात शेअर बाजार चा जो फुगा फुगत चालला आहे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. पुढील एक-दोन वर्षात हा कर रद्द होऊ शकतो.
तसेच १०% कराला २०% करुन माहागाई ला जोडण्याची शक्यता आहे. त्यात जास्त कर जाणार नाही. तसा कायदा झाल्यास त्याबद्दल सविस्तर लिहिन.

एक वर्शापेक्षा जास्त
ठेवलेले शेअर्स मार्च ३१ पूर्वी विकावेत का? >>> जर तुमचा कडचे लॉग टर्म शेअर ३१ जान २०१८ ते ३१ मार्च २०१८ ह्या कालावधीत खुप वाढले असतिल तर विकुन टाकण्यास हरकत नाही. दुसर्या दिवशी पाहिजे असेल तर परत घ्या

जर तुमचा कडचे लॉग टर्म शेअर ३१ जान २०१८ ते ३१ मार्च २०१८ ह्या कालावधीत खुप वाढले असतिल तर विकुन टाकण्यास हरकत नाही. दुसर्या दिवशी पाहिजे असेल तर परत घ्या>>>>>
सॉरी प्रतिसाद परत वाचल्यावर काय म्हणायचंय ते कळले, म्हणून संपादित Happy

अमा, शॉर्ट टर्म टॅक्स अशी टर्म ऐकली नाही. शेअर विक्री वर कॅपिटल गेन्स टॅक्स जो असतो तो इतके दिवस फक्त शॉर्ट टर्म सेल वर होता (एक वर्षाच्या आत). आता लाँग टर्म वर ही आला आहे.

पण अशा प्रत्येक सेल वर एक सिक्युरिटी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स असतो असे वाचले आहे. तो आला तेव्हाच या लाँग टर्म टॅक्स च्या "ऐवजी" आला होता. आता लाँग टर्म टॅक्स व तो सिक्युरिटी ट्रॅन्झॅक्शन टॅक्स दोन्ही लागू होतील.

हे सगळे बजेट बद्दल वाचून. प्रत्यक्षात थेट माहिती नाही कारण शेअर्स वगैरे भारतात कधी घेतले नाहीत. इथे अमेरिकेत हा (कॅपिटल गेन्स) कर गेली अनेक वर्षे आहेच.

यात आपण फार काहि करु शकत नाहि (फक्त निषेध करु शकतो). तुमचा जो गुंतवणुकीचा प्लैन आहे ( जर लोन्ग टर्म असेल) तर तसाच ठेवा, कारण शोर्ट टेर्मला टैक्स आहेच. फिक्स डिपोझिट, सोने, रिअल इस्टेट यात फार परतावा नाहि राहिला आता त्यामुळे फार काहि करु शकत नाहि

if you sell shares before one year quite a sum is deducted towatds tax while filing it rerurns because it is seen as trading. now your dmat ac statement has a column for age of shares you know when a purchase is having first birthday. out of 50 shares 10 may be 1 yr old tomorrow and 40 three months from now. i follow warren buffet policy of never selling. unless absolutely necessary. this year the goal was to have entire portfolio age gracefully. looks like that is not of much use now. the demat ac people must be reconfiguring as of now. will check and update here.

एका वर्षात दहा लाखापेक्षा जास्त कॅपिटल गेन बुक केला नाही, तर टॅक्स लागणार नाही, असं वाटतंय. (मी फक्त बजेट भाषण ऐक्लंय, बाकी काही अजून वाचलेलं नाही).

१०% कॅपिटल गेन्स टॅक्स विदाउट इन्डेक्सेशन.

एका वर्षात दहा लाखापेक्षा जास्त कॅपिटल गेन बुक केला नाही, तर टॅक्स लागणार नाही, असं वाटतंय. (मी फक्त बजेट भाषण ऐक्लंय, बाकी काही अजून वाचलेलं नाही).

१०% कॅपिटल गेन्स टॅक्स विदाउट इन्डेक्सेशन.

बाकी हा टॅक्स गेल्या बजेटमध्येच अपेक्षित होता. या बातम्या वाचा.
२५ डिसेंबर २०१६ : Those who profit from financial markets must make a fair contribution to nation-building through taxes, For various reasons, the contribution of tax from those who make money on the markets has been low, Low or zero tax rate is given to certain types of financial income."इति आदर्णीय पंतप्रधान नरेंद्र मोदी.

त्याच दिवशी संध्याकाळी : The speech has been misinterpreted in some sections of the media which have started speculating that this is an indirect reference to the fact that there could be long-term capital gains (tax) on securities transactions, आदर्णीय अर्थमंत्री अरुण जेटली
Now, this interpretation is absolutely erroneous, the Prime Minister has made no such statement directly or indirectly," ..therefore I wish to absolutely clarify that there is no occasion or opportunity for anybody to reach such a conclusion because this is not what the Prime Minister said, nor is the intention of the government as has been reported,"

पल्बिक मेमोरी इज श्रॉट.

>>एका वर्षात दहा लाखापेक्षा जास्त कॅपिटल गेन बुक केला नाही, तर टॅक्स लागणार नाही, असं वाटतंय.<<

लाँगटर्म कॅपिटल गेन टॅक्स लागु होण्याची मर्यादा एक लाख आहे, दहा लाख नाहि. तसंच तुमचा गेन एक लाख ३० हजार असेल तर टॅक्स फक्त ३० हजारावर लागेल असं दिसतंय वरील लेखावरुन.

माझ्यामते सरसकट १०% टॅक्स लागु करण्या ऐवजी या टॅक्सचं प्रमाण इंडिविज्युल टॅक्स ब्रॅकेटवर अवलंबुन असायला हवं. असं केल्याने सामान्य गुंतवणुकधारांना बसणारी झळ थोडी कमी करता आली असती... (उदा: १०-१५% टॅक्स ब्रॅकेटवाल्यांकरता ५%; १५-३०% ब्रॅकेटवाल्यांकरता १०% आणि ३०% च्या पुढे ब्रॅकेटवाल्यांकरता १५%)

निवडणूकीच्या आधीच्या बजेटमध्ये हा टॅक्स लागेल असे वाटले नव्हते..... याचा कदाचित भाजपाला फटका बसू शकतो!
पण अजुन एक आख्खे वर्ष मध्ये आहे त्यामुळे इतक्यातच काही बोलणे योग्य नाही!

बाकी या टॅक्स मुळे investors कमी होउन traders वाढतील असे वाटते कारण आता या दोन्हीतल्या Tax मधला फरक फक्त ५% उरला आहे!

ओह. माझ्या डोक्यात दहा लाख कुठून आले? एक लाख असेल तर कठीण आहे.

स्वरुप, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्सवर तुम्हाला अ‍ॅप्लिकेबल असलेला टॅक्स स्लॅब लागेल. तेव्हा पाच टक्के फरक कसा? जर मी ३०% स्लॅबमध्ये पोचलो असेन तर ३०% लागेल, अशी माझी समजूत आहे.

जीएसटीचे रेट्स जसे आधी वाढवून कमी केले आणि त्यांची क्रेडिट घेतलं, तसं करतील बहुतेक.
रच्याकने भाजप-१ च्या काळातले अर्थमंत्री रोलबॅक सिन्हा म्हणून ओळखले जात. अरुण जेटली बहुतेक स्वतःच्या अखत्यारीतले निर्णय स्वतःच्या मर्जीने न घेणारे मंत्री म्हणून ओळखले जातील.

डेमो पासून जे काय सुरु आहे ते बघता ह्या अर्थसंकल्पाला तसा काही अर्थच नाही. आज बोललेले उद्या बदललेले असते. तेव्हा संसदेत काही बोलु देत दहा दिवसांनी अध्यादेश काढून नियम बदललतात. पेट्रोलवर दरदिवशी रेट बदलतात. जीएसटीचे रेट दर धा दिवसाला बदलतात. हे सरकारचे अर्थधोरण अजाईल मोड मध्ये आहे.

धाग्याशी अवांतर आहे तरी विचारते.मी काही शेयर्स घेऊन २ दिवसात विकले आहेत.त्यात झालेल्या नफ्यातून दुसरे शेयर्स घेतले आहेत.तर झालेला नफा टॅक्सेबल असेल की नफ्याची पुनर्गुंतवणूक केल्यामुळे कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही? माझ्या मते नफा टॅक्सेबल असेल.

Taxable

झालेला नफा टॅक्सेबल असेल की नफ्याची पुनर्गुंतवणूक केल्यामुळे कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही?>>>> झालेला नफा करंट अ‍ॅसेटमधला असल्याने टॅक्सेबल आहे.

नफ्याची पुनर्गुंतवणूक इक्विटीज मध्ये केली तर टॅक्सेबल पण एखाद्या गवर्न्मेंट अप्रुव्ड बाँड (नॅशनल हायवे ऑथरिटी इ.) मध्ये केली तर टॅक्स्फ्री. स्टार्टप्स मध्ये केलेली गुंतवणुक हि टॅक्स्फ्री आहे असं वाचल्याचं आठवतंय...

टॅक्स सेविंग्स फंड मध्ये गूंतवणुक केलं असेल आणि त्याचे परतावा रु.१०००००/- पेक्षा जास्त आहे तर त्यावर ltcg कर आकारले जाईल का.

डिव्हीडंड वर पण ltcg कर आकारणार आहे असे ऐकले आहे. वार्षिक रु.१०००००/- डिव्हीडंड मिळाले असेल तर त्यावर ltcg आकारले जाईल कि एकुण त्या स्किम मधुन जेव्हढे डिव्हीडंड मिळाले आहे (३ ते ४ वर्षात) त्यावर ltcg आकारले जाईल.

धन्स.