की बुद्ध बिघडला आहे

Submitted by बेफ़िकीर on 2 February, 2018 - 11:06

गझल - बुद्ध बिघडला आहे

दशकांचा पाचोळा झडला आहे
वारा नक्की कोणीकडला आहे

पुढच्या वेळी स्वतःस सोबत नेऊ
एक नवा रस्ता सापडला आहे

लपाछपी हा खेळ राहिला नाही
अन हा वेडा अजून दडला आहे

मुलगा साताऱ्याला शिकतो तुमचा?
मुलगी अजूनही म्हसवडला आहे?

बुद्धाला शोभतात का ह्या पोस्टी
की सध्याचा बुद्ध बिघडला आहे?

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जबरदस्त गझल बेफी.
लपाछपी, सातारा म्हसवड वाले शेर विशेष आवडले.

माझे काही जुने शेर वाचायची तसदी घ्यावी लागू नये म्हणून येथे देत आहे.

म्हणाले जानवे पेला जरा थोडा भरा माझा
तशी जाणीव झाली की असावी आज संकष्टी

सोवळे नेसुनी तरी मारू
देवळातून आणली दारू

ज्या क्षणापासून माझे त्यागले मी जानवे
जीवनाचे रंग सारे बोलती माझ्यासवे

मी त्या जातीचा आहे, जी मीही पाळत नाही

कर्तृत्व ब्राह्मणाचे मी, दाखवेन ह्या दुनियेला
कंजारभाट नशिबाचा, बस मदिरा गाळत राहो

कुणी सव्यापसव्याने झिजवली जानवी त्यांची
मला ब्राह्मण्य आल्यावर नशीले आचमन झाले

'संकष्टी'वाला सोडून सर्व शेर मायबोलीवर आहेत. तेव्हा अशा शंका उपस्थित झाल्याचे स्मरत नाही.

असो!

सर्वांचे आभार!