बुद्ध बिघडला आहे

की बुद्ध बिघडला आहे

Submitted by बेफ़िकीर on 2 February, 2018 - 11:06

गझल - बुद्ध बिघडला आहे

दशकांचा पाचोळा झडला आहे
वारा नक्की कोणीकडला आहे

पुढच्या वेळी स्वतःस सोबत नेऊ
एक नवा रस्ता सापडला आहे

लपाछपी हा खेळ राहिला नाही
अन हा वेडा अजून दडला आहे

मुलगा साताऱ्याला शिकतो तुमचा?
मुलगी अजूनही म्हसवडला आहे?

बुद्धाला शोभतात का ह्या पोस्टी
की सध्याचा बुद्ध बिघडला आहे?

-'बेफिकीर'!

Subscribe to RSS - बुद्ध बिघडला आहे