पद्मावतीच्या निमित्ताने - हिरोला खाऊन टाकणारे व्हिल्लन !

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 January, 2018 - 11:56

सचिनने श्रीलंकेविरुद्ध मारलेल्या शतकापेक्षा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मारलेल्या शतकाचे आपल्याला किंचित जास्त कौतुक असते. आणि झिम्बाब्वे वा बांग्लादेशसोबत मारलेले शतक तर गिणतीतही नसते. कारण प्रतिस्पर्धी जितका तुल्यबळ, तितकी त्याला मात देण्यातली मजा भारी असते.

बस्स याच धर्तीवर म्हणायचे झाल्यास पिक्चरमध्ये हिरोची हिरोगिरी तेव्हाच उठून दिसते जेव्हा व्हिल्लन ताकदवर असतो. तो म्हणजे अस्सा पॉवरबाज माणूस असेल तरच त्याला धोपटून हिरो हा सुपरहिरो बनतो. नाहीतरी गल्लीतल्या शेमड्या पोरांना तर आपणही मारतो. त्यात हिरोगिरी ती काय Happy

पण वर दिलेल्या क्रिकेटच्या उदाहरणात ती एक मॅच असते. त्यात ऑस्ट्रेलिया काही सचिनकडून धुलाई करून घेण्यासाठी म्हणून खेळत नसते. त्यांचा मॅकग्राथही एखाद्या सामन्यात आपल्या सचिनचा दांडका काढतोच.
पण पिक्चर मात्र सेट असतात. त्यात व्हिल्लन कितीही ताकदवर असला तरी चित्रपटातून कोणताही चुकीचा संदेश जाऊ नये म्हणून अखेरीस "हमेशा बुराई पे अच्छाई की जीत होती हैय" म्हणत हिरोच व्हिलनला धोपटतो.

पण तरीही... एक संधी असते त्या व्हिलनला जिच्यात तो हिरोला मात देऊ शकतो. आणि ती म्हणजे अदाकारी ! जिच्या जीवावर व्हिलन आपले कॅरेक्टर हिरोच्याही वर उचलून धरतो. आणि चित्रपटगृहातून बाहेर पडताना लोकांच्या तोंडावर हिरोऐवजी व्हिलनचेच नाव असते.

पद्मावतीच्या निमित्ताने हल्ली हिच चर्चा कानावर पडतेय. कोण तो रणवीर सिंग त्याने शाहीद कपूरला खाल्लाय. म्हणजे झाकोळून टाकलेय. हे चित्रपटाच्या ट्रेलरलाच जाणवलेले. कदाचित त्याने खिलजीचे कॅरेक्टर हिरोपेक्षा भारी केले म्हणूनच काही लोकांच्या भावना जास्त दुखावल्या असतील. पण समजा कास्टींग उलट झाली असती तर... तरीही हे असे झाले असते का? म्हणजे शाहीदने खिलजी साकारला असता तर त्याने रणवीरसिंग सारखी धमाल उडवली असती का?
तर याचे उत्तर "नाही" असे आहे. याचाच अर्थ ही रणवीरची स्वत:ची कमाल आहे जे त्याने व्हिलनच्या भुमिकेतही धमाल उडवली. बस्स अश्याच "फटा पोस्टर निकला हिरो" टाईप्स बॉलीवूडी चित्रपटांमध्येही आपल्या अदाकारीने पडदा फाडून धुमाकूळ घालणार्‍या व्हिल्लन लोकांच्या प्रतिभेला सलाम करायला हा धागा.

माझ्यापुरते सांगायचे झाल्यास हिरोला खाऊन टाकणारा हिरो म्हणून डर चित्रपटातील शाहरूख खान हा माझा बेंच मार्क आहे. कारण त्याची भुमिका दिग्दर्शकाने मोठी केली नव्हती. उलट हिरो म्हणून त्यावेळचा सर्वात भारी अ‍ॅक्शन हिरो सनी देओल होता. त्यात त्याला नेव्हीचा शूरवीर ऑफिसरही दाखवला होता. त्याची एंट्रीही एका अ‍ॅक्शन सीननेच होती. याऊलट व्हिलन म्हणून तुलनेत नवखा शाहरूख घेतला होता. त्याचे व्यक्तीमत्वही अगदीच लेचेपेचे अन दुबळे दाखवले होते. तरीही त्याने जो इम्पॅक्ट साधला आणि लोकांच्या मनावर आपल्या त्या कॅरेक्टरचा ठसा उमटवला त्याला तोड नाही. अगदी आजही डर कोणाचा म्हटले तर शाहरूख खानचा हेच डोक्यात येते.

त्यामानाने माधुरीला स्त्रीप्रधान अंजाममध्ये खाणे त्याच्यासाठी सोपा ब्रेकफास्ट होता. जो बाझीगर चित्रपटात ईतकी दुष्कर्मे करूनही अखेरीस हिरो असल्याच्या थाटात मरतो आणि लोकांची सहानुभुतीही मिळवतो तो काहीही करू शकतो. लोकांच्या मनात किळस उत्पन्न न करता, कोणतेही वाह्यात चाळे न करता, ताकदीच्या नकारात्मक भुमिका साकारणे आणि हिरोला खाऊन टाकणे हे शाहरूखच करू जाणे Happy

काही भुमिका अश्या असतात की ज्यात व्हिलन भारी वाटावा अशी दिग्दर्शकाचीच इच्छा असते. लेटेस्ट उदाहरण म्हणजे फास्टर फेणे. त्यात कोवळ्या अमेय वाघ पेक्षा गिरीश कुलकर्णी ड्यांजर वाटावा अशी पटकथेचीच मागणी होती. जसे या पद्मावतीमध्ये खिल्जी क्रूर वाटणे गरजेचे होते. पण अर्थात याने गिरीश कुलकर्णी किंवा रणवीर यांचे महत्व कमी होत नाही. उलट रणवीर देखील शाहरूखच्या पावलावर पाऊल टाकत हिरो असूनही त्या ईमेजमध्ये न अडकता नकारात्मक भुमिका करत आहे याचे कौतुकच आहे.

हे लिहिता लिहिता एक सहजच आठवले, तो आशुतोष राणा म्हणून एक नकारात्मक भुमिका साकारणारा कलाकार होता बघा. त्याने आपल्या सुरुवातीच्या दुश्मन, संघर्ष वगैरे चित्रपटात असेच व्हिलनचे कॅरेक्टर उचलून हिरोच्या वरचढ करायचे कार्य पार पाडलेले. पण नंतर तो कुठे गायब झाला ते समजलेच नाही. बॉलीवूडच्या हिरो मंडळींनी एकत्र येत त्याचा गेम तर नाही ना केला Happy

असो, सध्याचे तापलेले वातावरण पाहता पद्मावत बघायचा योग येईल तेव्हा येईल. त्यावेळी नकारात्मक रणवीर कसा वाटला हे ईथेच जरूर लिहेन. पण तुमच्या आठवणीत असे हिरोला अदाकारीत भारी पडणारे आणि त्या चित्रपटाच्या आठवणींत व्यापून ऊरणारे व्हिलन असतील तर त्यांच्याबद्दल ईथे नक्की लिहा ... त्याने मोगॅंबो खुश होईल आणि गब्बर तुम्हाला शाबासी देईल Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवाना >> कोरेक्ट! यातलं 'सिमटीसी शरमाईसी किस दुनिया से तुम आयी हो' गाणं छान आहे.

जॉनी गद्दार चित्रपटात या परवाना चित्रपटाचे काही सीन दाखवले आहेत. जॉनी गद्दारमधे (आणि जवळपास सगळेच पल्प/डाइट पुस्तक, चित्रपटात) अँटी किंवा व्हिलन हिरो/इन आहेत.

ऋन्मेऽऽष
तुम्हाला शाहरूख खान आवडतो म्हणून तुम्ही अस लिहीलय.
डर शाहरूखसाठीच लिहीलेला होता.
सनी शाहरूखची पहीली मारामारी होते तिथेच चित्रपट संपत होता, पण तो सनीला भोसकतो वगैरे करून तो वाढवला.
विचार करा जर सनी ऐवजी मुळ चॉईस असलेल्या अमिरखानने जर हिरोचा रोल स्विकारला असता तर.....
त्यावेळी वाद झाल्यामुळे अमिर इतके वर्षांनंतर धुम ३ च्यावेळी यशराजकडे आला.

छाप पाडणारे व्हिलन म्हणजे
प्राण, अमरीश पुरी आणि निळू फुले.

Pages