प्रायव्हेट ऑफिस आणि सरकारी कार्यालय !

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 January, 2018 - 12:43

गेले तेरा महिने मी ज्या जागेवर बसत आहे तिथे माझ्या शेजारीच एक पोपडे निघालेली आणि रंग उडालेली भिंत आहे. मला तसा तिचा काही त्रास नाही, कारण ती माझ्या थेट नजरेस पडत नाही. फक्त माझ्या जागेचा शो जातो ईतकेच. दुरून कोणी पाहिले की मी छानपैकी स्वदेशच्या शाहरूखसारखा फॉर्मल आणि टापटीप कपड्यात बसलो असतो. पण ती भिंत माझ्या सौंदर्याची पार्श्वभूमी खराब करत असते. मला दसरा दिवाळीच्या मुहुर्तावर एखादा फोटो काढायचा झाल्यास उठून दुसर्‍याच्या जागेवर जावे लागते. आणि एकदोनदा केसांवर काही पांढरे पांढरे पडले होते. म्हटलं तर हाच तुरळक त्रास. तरी लोकांच्या आग्रहास्तव मी काही वेळा एच आर आणि मॅनेजमेंटकडे तक्रार केली. चौथ्या तक्रारीनंतर एकदा येऊन त्या भिंतीचे फोटो काढून गेले, ईतकेच काय ते त्यांनी केले. पुढे ते फोटो फेसबूकवर टाकले की व्हॉटसपवर शेअर केले याची कल्पना नाही. बाकी ती जागा माझ्या कामाच्या आणि जॉब प्रोफाईलच्या दृष्टीने मोक्याची आहे म्हणून मला दिली गेली आहे. कारण तिथून मी माझ्या टीमशी योग्य प्रकारे संपर्क आणि समन्वय साधू शकतो. हे मलाही सोयीचे आहे. म्हणून मी आजवर मुन्नाभाई सारखे "Sir what is the procedure to change the room?" म्हणून अर्ज टाकला नाहीये.

पण अशीच एक तक्रार माझ्या एका महिला सहकर्मचारी पद्मिनीने नोंदवून झाली आहे. तिच्या शेजारच्या भिंती्ला चक्क एक क्रॅक, मराठीत तडा गेला आहे. तुलनेत तिचे सौंदर्य, म्हणजे त्या भिंतीचे सौंदर्य माझ्या शेजारच्या भिंतीईतके खराब झालेले नाही. पण लोकं तिला गंमतीने ती भिंत एक दिवस तुझ्या डोक्यावर कोसळणार आणि तुला कायमची सुट्टी मिळणार असे म्हणून घाबरवत असतात. जेव्हा माझ्या भिंतीचे फोटो काढण्यात आलेले तेव्हा तिच्याही भिंतीसमोर काही सेल्फी काढले गेलेले. पण मॅनेजमेंटला त्या भिंतीतही काही धोकादायक वाटले नसल्याने त्यावरही आजवर काही कारवाई झाली नाही. बहुधा त्या फटींतून पिंपळपाने उगवायची वाट बघत असावेत.

असो, हा झाला भूतकाळ !

पण अखेर आमचा तेरा महिन्यांचा खंडरवास संपला. आमचा पडका वाडा अचानक गेल्या रविवारी शनिवारवाडा झाला. सोमवारी सकाळी आम्ही तासभर वेड्यासारखे स्वत:चीच जागा शोधत होतो ईतका त्या भिंतीचा कायापालट करून टाकला. जेव्हा समजले तेव्हा ईतका आनंद झाला, काय सांगू! ईतका आनंद तर आमची चाळ पाडून टोलेजंग ईमारत उभी राहिली तेव्हाही झाला नव्हता.

हे असे का? याचा विचार करेस्तोवर आणि काही सुचेस्तोवर दहा वाजता ईनबॉक्सवर मेल येऊन थडकला....
पुढच्या आठवड्यात आमच्या ऑफिसमध्ये कंपनीचे ग्लोबल सीईओ येणार आहेत !

म्हणजे एखादे मंत्री संत्री येणार म्हणून रस्त्याची डागडूजी करा. एखादे पंतप्रधान येणार म्हणून परीसराची स्वच्छता पाळा. एखादे मोठे शैक्षणिक अधिकारी येणार म्हणून शाळेची डागडूजी करा...
आधी जेवढा आनंद झाला होता, तेवढाच आता त्रास झाला.
आम्ही अश्या परीस्थितीत राहत होतो, काम करत होतो त्याचे कोणाला काहीच पडले नव्हते, पण एक दिवस येणार्‍या साहेबांच्या डोळ्यांना छान दिसावे म्हणून तातडीने उपाययोजना केली गेली.

फक्त म्हणायला एमेनसी, पण एखादे सरकारी कार्यालय आणि खाजगी कंपनी यांची या भारतात जवळपास सारखीच अवस्था आहे. भारतीय कर्मचारी कोणत्या परीस्थितीत काम करत आहेत. याचे मॅनेजमेंटला काहीही पडले नसते. तसेही ईंडियन्स आर चीप लेबर. यांना फुकटात किंवा निम्म्या किंमतीत जेवण वा सकाळचा नाश्ता दिला तरी हे खुश.. मग कश्याला कोणाला काय पडले असेल.. खाजगी असो वा सरकारी, ईथे तुम्ही मॅनेजमेंटसमोर आवाज उठवू शकत नाहीत. ज्या देशात लोकशाही असून जिथे लोकांची चालत नाही, तिथे कंपनीत कशी चालणार...

असो, नाव बदलून लिहिण्याचा एक फायदा तर आहे, ईथे हे बिनधास्त शेअर करू शकतो........

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परदानशी को बेपरदा ना कर दू तो अकबर मेरा नाम नही?
हुमायून का बेटा अकबर..
मी अकबर आहे?
माझे नाव अकबर आहे?
मी तर कालपर्यंत स्वत:ला बिरबल समजायचो Sad

असो.. किती हे अवांतर...

कमीत कमी
कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है केहेना
इतपत तरी चेंडू टोलवता येईल अशी आशा होती. आता सेंटीं किंग रुन्मेश म्हटलं पाहिजे तुम्हाला.

कुछ तो लोग कहेंगे... अमर प्रेम.. मी अमर आहे.. की प्रेम आहे? राजश्रीचा??
अरे किती अवांतर ...
मी सोडतोय हा धागा Happy

अरे किती अवांतर ...
मी सोडतोय हा धागा>>>>
नहीं नहीं, अभी नहीं, अभी करो इंतज़ार…

चलो छोडो, कहा थे हम लोग?

>>> मला वाटते ज्या सरकारी नोकरीत वरची कमाई आहे तिलाच फक्त डिमान्ड आहे. जिथे ती नाही तिथे आराम असूनही काय फायदा असा मतप्रवाह तरुणांमध्ये आहे. अर्थात ज्याच्याकडे चॉईस नाही त्याला मिळेल ते पावन.>>>>
कुठल्या सरकारी नोकरीत वरकमाई नाही असं वाटतंय???

अरे किती अवांतर ...
मी सोडतोय हा धागा>>>>
नहीं नहीं, अभी नहीं, अभी करो इंतज़ार… >>>> Rofl

मस्तेय हा धागा फुल्ल TP, आता फक्त याला विनोदी मध्ये हलवा

ऋ तुस्सी जा रहे हो?
तुस्सी ना जावो
>>>
तुम्हारे धागा छोडनेके कल्पना से कुछ कुछ होता है ऋ तुम नही समझोगे

Rofl

पाफा Rofl
धागा धागा अखंड विणूया
ऋन्मेष ऋन्मेष मुखे म्हणूया ...

कुठल्या सरकारी नोकरीत वरकमाई नाही असं वाटतंय???
>>>
माझे आईवडिल दोघे केण्द्र सरकारचे कर्मचारी होते. तार ऑफिस वगैरे. त्यांना काही वरकमाई नव्हती.
तसेच जे फिल्डवर असतील त्यांना चिरीमिरी चहापाणी मिळत असेल त्याबद्दलही मी बोलत नाही. जिथे पगार तुच्छ वाटावा अशी वरकमाई खरी वरकमाई..

यांना चिरीमिरी चहापाणी मिळत असेल त्याबद्दलही मी बोलत नाही.>>>हो ना तो हक्कच असतो की!

जिथे पगार तुच्छ वाटावा अशी वरकमाई खरी वरकमाई..>>> आता कसं बोललास! वो(चिरीमिरी) कमाई क्या कमाई है बाबू!

या २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला मला समजले की खाजगी कंपन्यातही चिरीमिरी वरकमाई असते...

म्हणजे आमच्या कंपनीत सकाळचा नाश्ता आणि दुपारचे थाली जेवण असते. अर्धे पैसे आपले, तर अर्धे कंपनीचे. आधी दोघांचे कॅटरर्स वेगवेगळे होते. तसेच एक चहावाला आणखी वेगळा होता..

पण काही महिन्यांपूर्वी एका नवीन चहावाल्याने एंट्री मारली..मग नाश्तावाला हटवून त्या चहावाल्यालाच त्या जागी कॉन्ट्रेक्ट दिले.. मग जेवणाचा कॅटरर्सही हटवून ते सुद्धा यालाच दिले.. आता तर २६ जानेवारीच्या निमित्ताने २५ जानेवारीला ऑफिस कार्यक्रमात जे खानपान रिफ्रेशमेंट असते त्याचे कॉन्ट्रेक्ट देखील यालाच दिले.. बाकी काही नाही, तीच तीच चव जरा बोर होते म्हणून नाही आवडले..

आणि मग कामानिमित्त मी काल रात्री ऑफिसमध्ये उशीरा थांबलेलो .. निघताना बाहेरच जेवण करून जाऊया म्हणून स्टेशनजवळच्या एका बारम्ध्ये शिरलो. तर तिथे आमच्या कंपनीचा एच आर आणि त्या कॅटरर्र्सचा मालक ग्लासाला ग्लास भिडवताना दिसले.

अर्थात तिथे आमच्या एचआरला कमिशन असेल हा एक अंदाजच आहे.... पण थोडी बहुत दुनिया मी सुद्धा बघितली आहे. ते असेलच..

या २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला मला समजले की खाजगी कंपन्यातही चिरीमिरी वरकमाई असते...>>>>
हो हे तर असतंच!
त्याचबरोबर 'आपल्या'च लोकांना कामे दिली जावित यासाठी एक 'विशिष्ट' लॉबी कार्यरत असते.

त्याचबरोबर 'आपल्या'च लोकांना कामे दिली जावित यासाठी एक 'विशिष्ट' लॉबी कार्यरत असते.
>>>
हे तर जगाच्या पाठीवर कुठेच कोणालाच चुकले नाही.

{{{ ऋन्मेष माझे नाव आहे. पण ते मी स्वतः ठेवलेले आहे. घरच्यांनी ठेवलेले वेगळे आहे. पण सध्या ते देखील मला ऋन्मेष या नावानेच हाक मारतात.
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 24 January, 2018 - 22:26 }}}

लिंक शोधत बसणार नाहीये पण मी मागे एका धाग्यात वाचलेले की हे नाव तुमच्या आजींनी ठेवलेय.

लिंक शोधत बसणार नाहीये पण मी मागे एका धाग्यात वाचलेले की हे नाव तुमच्या आजींनी ठेवलेय.>> आता तसे त्यांनी गमतीने लिहिले असेल. Happy

लिंक शोधत बसणार नाहीये >>>> कानून सबूत मांगती है. Happy

आय एम सॉरी, पण लिंक दिल्याशिवाय मी त्यावर काही प्रकाश टाकू शकणार नाही. ते वाक्य नक्की मी लिहिले होते का? असल्यास कश्याच्या संदर्भाने लिहिले होते? हे सारे बघावे लागेल.

बार मध्ये जेवणा साठी हे म्हणजे केशकरर्तनालयात सिनेमा बघण्या साठी गेल्या सारख वाटत ( दिवे घ्या)

खाजगी कार्यालयात चिर मीरी प्रकरण आसू शकत विशेषता procurement मध्ये ही शक्यता जास्त असते

https://www.maayboli.com/node/52461

{जन्मपत्रिकेनुसार माझ्या नावाचे आद्याक्षर ‘ड’ आले होते. पण त्यावरून चांगले नाव न सुचल्याने ‘ऋन्मेष’ हे पर्यायी नाव ठेवण्यात आले होते. }

व्यत्यय धन्यवाद !
बिपीनचण्द्र, आता क्लीअर झालेच असेल. ते क्रमश: कथेत शेवटचा ट्विस्ट द्यायला लिहिले होते.

व्यत्यय तुमची शोधक वृत्ती खरंच कौतुकास्पद आहे, पण तुम्ही दिलेल्या लिंकमधला लेख सोडून अजुनही एक लेख आहे ज्यात ऋन्मेष हे नाव आजीने ठेवले असून, मित्र त्या नावामुळे हसतात असा स्पष्ट उल्लेख होता.

ऋन्मेष अजुन तो लेख सापडला म्हणजेच ऑल क्लीअर होईल. अर्थात त्यानंतरही थापा मारणे ही आपली वाईट सवय असल्याची बतावंणी करीत वेळ मारुन नेता येईलच म्हणा.

जाऊ द्या ना बरे
एखाद्या ड्यु आयडी ला किति ते खरेखोटे करायचे.
ते कोण ते गडकरी गोविंदाग्रज म्हणून आणि अत्रे केशवकुमार म्हणून आणि कोणीतरी अजून बी कवि (म्हणजे 'कवी व्हा' नसून '(हनी) बी व्हा' या अर्थी आणि ते कोणीतरी अजून सख्याहरी म्हणून लिहायचे तेव्हा त्यांना कोणी असे प्रश्न विचारलेत काय Happy )

तेव्हा त्यांना कोणी असे प्रश्न विचारलेत काय?
>>
तेव्हा त्यांनी इतके बोर केले काय?
तेव्हा त्यांनी इतरांच्या धाग्यांना / लेखांना हायजॅक केलेत काय?
तेव्हा त्यांनी विषय सोडुन भलत्याच विषयावर नेऊन धागा भरकटवलाय काय?
तेव्हा त्यांनी जिथे तिथे स्वस्तुती आरंभली काय?
तेव्हा त्यांनी नको तिथे शाखा सइ पोतं आणलं काय?
तेव्हा त्यांनी गंभीर चर्चेमधे मधेच येऊन गंभीर मुद्दे मांडण्या-यांन वेडावुन दाखवले काय?
तेव्हा त्यांनी १०^(अनंत) इतक्या वेळा आपल्याच वाक्यांवरुन पलटी मारली काय?
ई. ई.
धन्यवाद.
दिवे घ्यालचः Light 1 Light 1 Wink

तुम्ही दारु पिण्याच्या इतक्या विरोधात असूनही जेवायला बारमध्ये जाता? जे लोक दारू पीत नाहीत त्यांना बारमध्ये जेवायला जायचे सुचणे शक्य नाही. आणि त्या वातावरणात बसून जेवण घशाखाली जाणं तर त्याहून अशक्य!

Pages