बोर न्हाणामागील अर्थ व महत्व बद्दल माहिती हवी आहे

Submitted by रंगासेठ on 15 January, 2018 - 04:02

नमस्कार

बोर न्हाणामागील अर्थ व महत्व बद्दल माहिती हवी आहे. आमच्या शेजारी पंजाबी परिवार राहतोय, त्यांना याबद्दल कुतुहल आहे. तसेच त्यांच्या ६ वर्षाच्या मुलीचे बोर न्हाण करता येईल का याची पण माहिती हवी होती.

बोर न्हाण हे शक्यतो १-५ वर्षा दरम्यानच्या मुला-मुलीन्चे करतात हे माहिती आहे पण आणखी माहिती मिळाली तर त्यांना कळवता येईल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगवेगळ्या आकाराची आणि वजनाची बोरे डोक्यात टणाटण पडल्याने डोक्यातील प्रेशर पॉईंट्स ऍक्टिव्हेट होतात, आणि मुलाची हुशारी वाढते.

15 वर्षाच्या मुलाचे पॉईंट्स ऍक्टिव्हेट करायला थोडे जास्त वजन लागेल, ते सफरचंद किंवा पेअर वापरून हा प्रयोग करु शकतात.

जमलेल्या मुलांना गोळ्या पेरू गोळा करायला परस्परांशी स्पर्धा करायला लागते, त्यामुळे ते आयुष्याच्या खऱ्या स्पर्धेस तोंड देण्यास सक्षम होतात.

जमलेल्या 10 12 लहान मुलांना कंट्रोल करून आई बाप निर्वाण अवस्थेत पोचतात.

६ वर्षाच्या मुलीचं हौस म्हणून एखाद्या वर्षी बोरन्हाण करता येईल..छोटे गाजर तुकडे, फलेरो,लिमलेट गोळ्या,लो शुगर चॉकलेट कुरमुरे आणि फुटाणे स्वच्छ गालिच्यावर उधळता येतील.
त्यांना आधीच डिस्क्लेमर देऊन ठेवा की आजूबाजूच्या अती भोचक मराठी 'ऐसा नही करते.सिर्फ पहले ५ साल ही करते है' वाल्यांना गप करायला उत्तरं शोधून ठेवा.
आमच्या इथल्या सिंधी काकू हौस म्हणून दिड दिवसाच्या गणपती आणतात.सर्व व्यवस्थित करतात.बादलीत विसर्जन करतात.
(सुदैवाने आम्ही (आणि बहुधा रंगासेठ सुद्धा )राहत असलेला एरिया 'पुण्याचे गुरगाव' असल्याने कोणी 'अगं बाई, दिड दिवसाचा गणपती फक्त त्या ह्यांच्यात आणतात ना' असा ममवभो पणा करत नाहीत Happy )

जे लोक पाच वर्षे वाला प्रश्न विचारणार नाहीत त्यांना बोलवायचे. मला नाही वाटत काही शास्त्र असेल. जुन्या काळातले सोशलायझिंग ला अजून एक कारण. सुगीचा उत्सव, हौस, लहान मुलांना natural produce खायची एकमेकांना बघून सवय करायची. मुलगी लहान चणीची आणि cute असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांना सांगा आजकाल मराठी पण सहसा पाहिलं बोरन्हांण झोकात करतात, कोणी अजूनही पाच वर्षे करत का?

आता दात घट्ट व्हावे म्हणून डेंटिस्ट प्लास्टिकचे तुकडे चघळायला सांगतात. चिंचा बोरे खाऊन सी विटमिन मिळत नाही.

आमच्या ईथे एका मुलाचे बोरन्हाण केले होते. त्याच्या डोक्यावर सगळा मेनू ओतल्यावर मुलांनी झडप घातली त्याच्यावर. घाबरले ते पिलू, खूप रडले, बिचारे!!! असे करु नये.

त्याच्या डोक्यावर सगळा मेनू ओतल्यावर मुलांनी झडप घातली त्याच्यावर. घाबरले ते पिलू, खूप रडले, बिचारे!!! असे करु नये.
>>>>
मला तुळशीचे लग्न आठवले.
शेवटचे शुभमंगल सावधान म्हणताच आम्ही तुळशीत ठेवलेले बोरं चिंचे आणि उसाचे तुकडे तसेच प्रसादाचे दिवाळीचे उरलेले लाडू करंज्या वगैरे लुटायला असे झडप घालायचो की तुळशीची ऐसी की तैसी होऊन जायची..
आणि मग अर्थात थोरामोठ्यांचा मार खायचो.

बाकी हे बोरन्हाणं कधी पाहिले नाही. महाराष्ट्राच्या कुठल्या भागात होते? आणि काही ठराविक जातीत होते का? आमच्यात कधी पाहिले नाही..

>>बाकी हे बोरन्हाणं कधी पाहिले नाही. महाराष्ट्राच्या कुठल्या भागात होते? आणि काही ठराविक जातीत होते का? आमच्यात कधी पाहिले नाही..
अय्यो, ग.फ्रे.ला विचार, तीचे झाले होते का ? Wink

ज्यांनी कधी पाहिले, ऐकले नाही अर्थात त्या समाजात पूर्वी होत नसेल. वर लिहिल्याप्रमाणे हौशीचा भाग जास्त आहे. पंजाबी कुटुंबियांना त्यांच्या लहान मुलीचं करायचंय आणि वर कोणीही त्यावर काही आक्षेप न घेता उलट आनंद व्यक्त केलाय. तर इच्छा, हौस आणि स्वतः:च्या घरातल्या बाळाचं कौतुक असेल तर कोणता समाज वैगेरे न बघता बोरन्हाण करायला हरकत नसावी Happy
मराठी लोकांनी नाही का हिंदी सिनेमे पाहून त्यांच्या लग्नातल्या चालीरिती आता करायला सुरुवात केली आहे.
उगीच सारख काय जात!

मी-अनू आणी राजसी यांचे प्रतीसाद खरच मस्त आहेत. ऋन्मेस भाई सू करे छे, काडी मत डालो ना! माझ्या मुलीचे आणी पुतण्याचे बोरन्हाण झाले आहे. आमचे पाहुन सोसायटीत बर्‍याच जणांनी सुरुवात केली. त्यात जातीचा काही संबंध नाही. हौस महत्वाची.

हल्ली सगळ्ं हौस म्हणून करतात.'आयुष्याच्या दगदगीतून बदल म्हणून सेलिब्रेशन' इतका एक अर्थ हनुमान जयंती, नवरात्र, संगीत, मेहंदी, लोहरी ,संक्रांत, गणपती, ईद, ख्रिसमस या सर्वांना लागतो.ज्याला जसं जमतं तसं सेलिब्रेट करतात.
मोठ्या शहरात त्याला जाती धर्माची लेबलं लागत नाहीत(बहुधा लागत नसावीत, मी ज्या एरियांमध्ये राहीले तिथे लागली नाहीत.)
खरं तर आता कोअर गावातल्या एरियात, जिथे या गोष्टी नीट प्रोसेसनेच कराव्या लागतात अश्या एरियात जायला मला थोडे सफोकेटिंग वाटते.
ज्याला त्याला आणि निमंत्रितांना साजरे करण्यात मजा आली म्हणजे झालं.

लोहरी >>
हे लोहड़ी किंवा लोढ़ी आहे. स्पेल्लिंग Lohri.
अरोरा - अरोडा सारखे.
चंडीगड - Chandigarh
मी चंदीगड ला असताना लोहरी म्हटलं होतं तर सगळे खूप हसत होते.
चंदीगड पण चंडी / चण्डि देवीचा गड आहे त्यामुळे चंडीगड़

पाच वर्षापर्यंत करतात तेच बरे आहे. उगीच सूरज बडजात्याला कळलं हौस असेल तर कधीही चालतं तर सिनेमात सलमानचेही बोरन्हाण करेल Wink .

हो लोहरी हे सारी सारखं इंग्रजी स्पेलिंग ने दिलेलं रुप आहे.
आमचा पंजाबी क्लासमेट लोढी म्हणायचा.

खरं तर आता कोअर गावातल्या एरियात, जिथे या गोष्टी नीट प्रोसेसनेच कराव्या लागतात अश्या एरियात जायला मला थोडे सफोकेटिंग वाटते. --- असं मला आजकाल मराठी लोकांच्या गृपमध्ये होतं. इतकी वर्षे इथे मराठी माणसं मिळायची मारामार होती. नाही म्हणायला कित्येक वर्षणपूर्वी इथे नविन आलो होतो तेव्हा रस्त्यात मराठी बायका दिसल्या, त्या महाराष्ट्र मंडळात ऍक्टिव्ह होत्या, म्हणे. इतके तेवर की म्हंटल राहू दे तुमचं मंडळ. नव्या कॉम्प्लेक्स मध्ये मोठा असल्याने अचानक मराठी whatsapp ग्रुप झाला मग मराठी बायकांचं gtg. अचानक एकीने मला तुझं आडनाव काय विचारलं- एवढा वैताग आला मला, सरळ तोंडावर सांगितलं हिंमत असेल तर डायरेकत जात विचार. माझ्याकडे काय विचित्र बाई आहे बघून निघून गेली.

हौस बघायची असेल तर आमच्या पुण्यात खाऊवाले पाटाणकरांची पोस्टर बघा,
हलव्याच्या पुरुषांच्या दागिन्यांनाची इतकी रेंज आहे, खऱ्या सराफाकडे तरी इतके दागिने मिळतील का शंका आहे,
आणि आपला धंदा चालावा म्हणून परत एकदा जावयाला हलव्याचे दागिने घालणे वगैरे प्रथांना उजाळा दिला जातोय (की नवीन चालू केल्या जात आहेत??)

बोर न्हाणामागील अर्थ व महत्व बद्दल माहिती हवी आहे.>>>>>> याला अर्थ वगैरे काही नाही.आपली हौस करणे इतकाच अर्थ आहे.लहान मुले,त्यांच्या समवयस्कांत रमतात इतकेच.मग त्यांना खाऊ म्हणून ,हा प्रकार आहे.
विमुंनी दिलेल्या व्हिडियोतील कारणे ओढूनताणून आणल्यासारखी वाटतात.

पाच वर्षापर्यंत करतात तेच बरे आहे. उगीच सूरज बडजात्याला कळलं हौस असेल तर कधीही चालतं तर सिनेमात सलमानचेही बोरन्हाण करेल Wink . >>> कॉफी अलमोस्ट फुर्रर्रर्रर्र झाली होती. कसंबसं कंट्रोल केलं. Lol

>> वर कोणीही त्यावर काही आक्षेप न घेता उलट आनंद व्यक्त केलाय
>> कोणता समाज वैगेरे न बघता बोरन्हाण करायला हरकत नसावी

कोणी आक्षेप घेतला तरीही तो फाट्यावर मारुन मी मला जे करायचंय ते करेनच. कोणाची परवानगी नकोय.
ऋन्मेष चा प्रश्न साधा सोपा सरळ आहे "महाराष्ट्राच्या कुठल्या भागात होते? आणि काही ठराविक जातीत होते का?"
त्याला सरळ उत्तर द्यायच्या ऐवजी बचावात्मक गोल गोल फिरवण्यात काय अर्थ आहे?

पुण्याचे गुरगाव ही आमच्या कुटुंबात एका एरियाचा उल्लेख करायला वापरली जाणारी मर्यादित टर्मिनॉलॉजी आहे.
यात आम्ही स्पॉट १८ मॉल रहाटणी ते कोकणे चौक रहाटणी ते गोविंद गार्डन चौक पिंपळे सौदागर हा काल्पनीक त्रिभुज प्रदेश पकडतो.(आम्ही या प्रदेशापासून अर्धा किलोमीटर वर राहतो.)

"महाराष्ट्राच्या कुठल्या भागात होते? आणि काही ठराविक जातीत होते का?"

मला याचे बरोबर ऊत्तर माहीती नाहीये हा शोध आज लागला.
आजूबाजूला बोलावायचे, आणि मी जायचे इतकेच माहिती होते. कम्युनिटी स्पेसिफिक आहे का मराठी सर्व लोकांत होते की काही गावे/रिजन ओरिजिन असलेल्या सर्व लोकात होते हे माहित नाही. (पेपर मध्ये दिनविशेष वाचून अभ्यास करावा लागेल.)

(या धाग्यावर पण जाती पाती प्रतीसाद वॉर चालू होणार या विचाराने अंमळ घाबरायला झाले.)

राजसी, ऑन सेकंड थॉट आडनाव रेकॉर्ड ला ड्युप्लिकेशन नको म्हणून विचारलं असू शकेल.माझ्या फोन बुक मध्ये ५ प्रसाद आहेत.
ऑफिस मध्ये एकाने 'जी' म्हणजे कंपनीचे आधीचे नाव प्रिफिक्स करुन सर्व कंपनी कलिग ची नावं स्टोअर केली आहेत फोन वर. त्यामुळे 'गनुराधा', 'घर्षल', 'ग्निरज' वगैरे आम्ही चालवून घेतो कोणाचा फोन आलेला पाहताना.

>> मला याचे बरोबर ऊत्तर माहीती नाहीये
फेअर एनफ, नो प्रॉब्लेम.

{हल्ली सगळ्ं हौस म्हणून करतात.........ज्याला जसं जमतं तसं सेलिब्रेट करतात. मोठ्या शहरात त्याला जाती धर्माची लेबलं लागत नाहीत..........ज्याला त्याला आणि निमंत्रितांना साजरे करण्यात मजा आली म्हणजे झालं.}

हा सगळा फापटपसारा कशासाठी?

आपला धंदा चालावा म्हणून परत एकदा जावयाला हलव्याचे दागिने घालणे वगैरे प्रथांना उजाळा दिला जातोय (की नवीन चालू केल्या जात आहेत??----- काय माहीत नाही. मी तरी माझ्या (का आमच्या ! - my document, our document ला स्मरून) संक्रांत सणाच्या आधी कोणत्या जावयाचे हलव्याचे दागिने घातलेले फोटो पाहिले नव्हते Happy माझ्याच आईनी करुन आणल्याने मला सगळ्यातले सगळं कळत नाही अशी खूणगाठ पक्की केली. पण त्यानंतर कदाचित मी त्या वयोगटातील crowd मध्ये असल्यामुळे सगळ्या जावयाचे हलवा दागिने लाड पाहिलेले आहेत, अजूनही सुरूच आहेत. कदाचित कुठंतरी जगाच्या पाठीवर कुठल्या तरी जावयाने माझे संक्रांतीला हलव्याच्या दागिन्यांचे लाड का नाही अशी कुरकुर केली असणार Happy

पाच वर्षापर्यंत करतात तेच बरे आहे. उगीच सूरज बडजात्याला कळलं हौस असेल तर कधीही चालतं तर सिनेमात सलमानचेही बोरन्हाण करेल Wink . हे साहिये Happy

ऑन सेकंड थॉट आडनाव रेकॉर्ड ला ड्युप्लिकेशन नको -- मेबी. दुसरी राजसी ग्रुप मध्ये नाहीये!

बाकी पाटणकर खाऊवाले हलवा दागिने हा मेजर सिझनल बिझनेस आहे.जावयाला दागिने हा शुद्ध हौस आणि फेसबुकवर जावई माणसाच्या मित्रांना कमेंट मध्ये वात्रटपणा करायला मिळावा म्हणून असलेला मामला आहे.
(आता साईट वर पाहिले जावयासाठी जय मल्हार सेट ७००० चा आहे Happy हौसेला मोल नाही.) ढेपे वाडा मध्ये पण विथ कॉस्च्युम्स आणी विदाउट कॉस्च्युम्स (म्हणजे आपलेच साधे कॅज्युअल कपडे घालून) असे २ वेगळे रेट आहेत. मराठी आउटफिटस ना बाजीराव मस्तानी नंतर मिळालेले ग्लॅमर बघून चांगले वाटते आहे.
सध्या टाटा हेक्झा घेणार्‍यांना चावी देताना पुणेरी पगडी देतायत.
त्यांच्या(जावयांच्या नाही लहान मुलांच्या) बेस्ट दागिने वेअर स्पर्धा पण होतात.आता काहीतरी इव्हेंट मॅनेजमेंट पण चालू केले आहे.

माझी मुलगी ६ वर्षाची झाली आहे. आणी तीची ईच्छा म्हणा किंवा माझी हौस म्हणा, आता तीचे बोरन्हाण करणार आहे..
यापुर्वी ती२-३ वर्षाची असताना केलेले आहे.
सुदैवाने अजुनतरी कोणी आत्ता का , कशाला असा सुर लावलेला नाहीये... लावला तरी हरकत नाही Happy

Submitted by सिम्बा on 15 January, 2018 - 15:14 >> हा प्रतिसाद बेष्ट आहे Biggrin

===
त्याच्या डोक्यावर सगळा मेनू ओतल्यावर मुलांनी झडप घातली त्याच्यावर. घाबरले ते पिलू, खूप रडले, बिचारे!!! असे करु नये. >> मीपण असलीच बोंबाबोंब पाहिली बोरनहाणला. मुलगी फारच लहान होती. करायचेच असेल तर ४+ वर्ष वयात करावे.

===
(आम्ही या प्रदेशापासून अर्धा किलोमीटर वर राहतो.) >> मीपण तिथेच राहते

माझ्या पोराने मस्त एन्जॉय केले होते, वर कुणीतरी म्हणल्याप्रमाणे मुले दंगा करतात आणि रडतात हे माहीती असल्याने आम्ही आधीच सगळ्यांना सांगितले होते की बाळ घाबरेल असे करायचे नाही. त्यामुळे सगळे जरा संयम पाळून होते आणि सगळ्यात दंगा आमच्याच बाळाने केला. तो सव्वा वर्षाचा होता तेव्हा. त्याला ते मुकुट, दागिने घातल्यामुळे आणि सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे असल्याने भारी वाटत होते आणि दोन्ही बोरन्हाण घातल्यावर दोन्ही हातानी बकाणे भरून मुरमुरे खात होता. धमाल आलेली.

>>>
जमलेल्या 10 12 लहान मुलांना कंट्रोल करून आई बाप निर्वाण अवस्थेत पोचतात.<<<<
आणि नंतरचा पसारा आवरताना पण.
एक दोन दिवसाने कुजलेले सोफ्याच्या खाली गेलेली बोरं मिळतात आणि नेमकं पोरगं खाताना दिसते. पोरगं बोरन्हाणं झाल्यापासून सोफ्याच्या खाली काय वाकून बघतं ह्याचा शोध. Proud
बाकी, माझं पोरगं बिथरलं तो कल्ला पाहून. तेव्हा ४-५ वय असताना केलेलं बरं. आणि त्याच वयाचीच मुलं अस्स्लेली बरं. तो खाउ खायला, पोरं अगदी ढकलाधकली करत, कुठेच न बघत उड्या मारतात..

खूप लहान मुल असेल तर एखादे बोर डोक्यावरून घालून बाकी चाळण किंवा छोटी परडी ठेऊन वरून सर्व बाकीचं ओततात, असंही बघितलं आहे.

ऋन्मेष चा प्रश्न साधा सोपा सरळ आहे "महाराष्ट्राच्या कुठल्या भागात होते? आणि काही ठराविक जातीत होते का?"> +१

मी ही आजच ऐकलं बोर न्हाण.

आई-आजी पैकी कोणीतरी बाळाला मांडीवर घेऊन बसायचं, बाळाच्या डोक्यावर तळहात ठेऊन डोकं protect करायचं चुकून एखाद बोर टणकन लागून नये, एखादा चुरमुरा डोळ्यात जाऊ नये. असं घेऊन बसलं तर झडप घालणे वैगरे प्रकार होत नाहीत.

ऋ, बोरन्हाण आमच्या ब्राह्मण समाजात असतं. मला हे शेजाऱ्यांनी सांगितलं, तोपर्यंत मी सर्व मराठी समाजात ही प्रथा आहे समजत होते. पण आमच्या शेजारी लहान मुल होतं तेव्हा मी विचारलं की बोरन्हाण नाही का करणार, तेव्हा त्या सहज म्हणाल्या अग आमच्याकडे नसते ही प्रथा, तुम्हा ब्राह्मण लोकांत असते. पण नंतरच्या वर्षी त्यांनी हौसेने केलं.

आता सगळीकडे करतात मराठी समाजात हौसेने असं दिसतं.

हे ऋ च्या प्रश्नाचं सरळ उत्तर. जर हा प्रतिसाद जातीवाचक वाटला, कोणाला खटकला तर उडवला तरी चालेल.

आई-आजी पैकी कोणीतरी बाळाला मांडीवर घेऊन बसायचं, बाळाच्या डोक्यावर तळहात ठेऊन डोकं protect करायचं चुकून एखाद बोर टणकन लागून नये, एखादा चुरमुरा डोळ्यात जाऊ नये. असं घेऊन बसलं तर झडप घालणे वैगरे प्रकार होत नाहीत. >>> हो माझ्या मुलाला त्याच्या मावशीने मांडीवर घेऊन हात ठेवलेला तसा.

बहुधा कोकणात बोरन्हाण करत नाहीत. मी तरी कोणत्याही कोकणी घरात बोरन्हाण वगैरे पाहिलेले नाही.

देशावर हा प्रकार बहुतेक समाजात करतात. आमच्या सोसायटीत एक सोलापुर भागातले कुटुंब होते (ब्राम्हण समाजातले नव्हते) , त्यांच्याकडे मुलं अगदी तिसरी-चौथी पर्यंत होईपर्यंत बोरन्हाण करत असत. त्यात पण ते हलव्याचे दागिने वगैरे प्रकार नव्हता. मी कधी गेलो नाही, पण भाचवंड जायची. प्रत्येकाला मुठ मुठ बोरे देऊन घरी पाठवायचे.

हलव्याचे दागिने सध्या अपट्रेंड आहेत. नवरात्रीचे नऊ रंग सारखे हे पण मार्केटिंगने जन्माला घातलेले फॅड वाटतेय.

बहुधा कोकणात बोरन्हाण करत नाहीत. मी तरी कोणत्याही कोकणी घरात बोरन्हाण वगैरे पाहिलेले नाही. >>> आम्ही कोकणातलेच आहोत. आमच्याकडे करतात. हलव्याचे दागिने पण करतात बाळाला तसंच लग्न झाल्यावर नवीन जोडप्यासाठी पण हलव्याचे दागिने करतात पहिल्या संक्रांतीला.

दोन्ही प्रथा फार जुन्या आहेत आमच्याकडे.

मग बहुतेक हा प्रकार कोकणस्थ आणि देशस्थ या दोन्ही ब्राम्हण समाजात होत असावा. देशावर ब्राम्हणेतर समाजात पण होत असेल.

बोराची झाडं कमी पावसाच्या प्रदेशात वाढतात त्यचबरोबर ऊस ,चिंचा घाटावरच फार. अर्थात कोकणात असण्याचे कारण नाही. करवंद,कोकमाचं मार्केटिंग करायला पाहिजे.

. अर्थात कोकणात असण्याचे कारण नाही.>> बोरीची आणि चिंचांचीही झाडं कोकणात असतात. करवंद आणि कोकमं उन्हाळ्यात असतात.

अरे देवा, माझा प्रश्न चुकीच्या वळणावर गेला का आधी... नंतर ज्यांनी साधा सरळ अर्थ लावला त्यांचे धन्यवाद. आधीच्यांचे गैरसमज मिटले असतील अशी आशा. मला हलक्याफुलक्या काड्या करायला आवडतात.. शाखा, सई, एमेनसी वा आस्तिक-नास्तिक मांसाहारी वगैरे.. पण जातीयवादी काड्या करत नाही, कारण येत्या काळात सो कॉलड उचनीच जातीतील तेढच आमच्या लग्नातील सर्वात मोठी अडचण ठरणार आहे याची मला कल्पना आहे. त्यामुळे ती नाहीशीच व्हावी अशी माझी ईच्छा आहे. पण ती जादूची कांडी फिरवल्यासारखी कमी होणार नाही याचीही कल्पना आहे. तरी माझ्यातर्फे मी त्यात आणखी पळीभर तेल टाकेन असा मुर्खपणाचा विचार मी स्वप्नातही करू शकत नाही Happy

असो, मी कोकणातला आहे. मी ब्राह्मण नाही. किंवा मी आणखी कोणीही असेन नसेन, पण आमच्यात बोरन्हाण पाहिले नाही. म्हणून चौकशी केली ईतकेच. कारण बहुतेकदा अश्या प्रथा ठराविक प्रांत वा जातींशी निगडीत असतात. आणि यात काहीही गैर नाही Happy

अर्थात माझ्या अज्ञानाला मीच जबाबदार आहे. मी स्वतः गावाला आयुष्यात मोजून तीनदा गेलो असेन. तिथे शेजारच्या घरात वा वाड्यांत ब्राह्मण राहतात की मराठे की आणखी कोणी याचीही कल्पना नाही. आणि ईथे दक्षिण मुंबईत किती घरांत हे बोरन्हाण साजरे केले जात असावे याचीही शंकाच आहे. बालपण मुंबईतल्या चाळीत गेल्याने मी उत्सवप्रिय प्राणी आहे. त्यामुळे अश्या समारंभातील लॉजिक न शोधता लोकांनी एकत्र यावे आणि मौज करावी याच मताचा मी सुद्धा आहे. साधे ते मार्गशीर्षातील एखादा गुरुवार सर्व लहान मुलांना जमवून त्यांना फळ फूल प्रसाद द्यायचे त्यातही धमाल वाटायची Happy
बस्स काय, ख्रिस्ती लोकांचा नाताळ साजरा करायला मी भर मध्यरात्री वसईला गेलो. तर शेजारच्या घरात बोरन्हाण झाले असते तर हे आपल्या जातीतले, प्रांतातले नाही म्हणून घरातच दारेखिडक्या मिटून बसून राहिलो असतो का Happy

अर्थात कोकणात असण्याचे कारण नाही. >>>
काहीही! कोकणात भरपूर बोरं आणि चिंचेची झाडं आहेत, आणि भरपूर 'बोर'न्हाणे होतात. 'चॉकलेट'न्हाणाची गरज नसते :p

{मला हलक्याफुलक्या काड्या करायला आवडतात.. शाखा, सई, एमेनसी वा आस्तिक-नास्तिक मांसाहारी वगैरे..}

मिलार्ड, ये पॉईंट फ्युचर रेफरन्स के लिये नोट किया जाये.
धागा भटकू नये म्हणून सध्या इतकंच.

मिलार्ड, ये पॉईंट फ्युचर रेफरन्स के लिये नोट किया जाये.>>>> Proud

ऋ, तू काडी करु नकोस हे पण गंमतीतच लिहीले होते पण दुर्दैवाने ते तुला वा बाकीच्याना समजलेच नाही. असो!

आमच्या सोसायटीत आम्ही एकमेव ब्राह्मण, बाकी मराठा, माळी. पण या सर्वांकडे पण बोरन्हाण करतात. आजही शेजारी एका सव्वा वर्षाच्या बाळाचे आहे. या प्रथा नव्हेत, ती हौस आहे. त्या निमीत्ताने लहान मुले एकत्र येतात, खाऊ खातात. बायका हळदी कुंकुवाच्या निमीत्ताने मिरवतात.
आणी या निमीत्ताने का होईना पण बोरे, ऊसाचे करवे ( छोटे तुकडे) हरबरा, चुरमुरे मुलांच्या पोटात जात असतील तर बरे. फक्त काही ठिकाणी त्या बोरे, चुरमुर्‍यावर पाय पडुन ते खाण्याच्या लायकीचे रहात नाही. त्यामुळे शास्त्रापुरते थोडे मुला/ मुलीच्या डोक्यावर टाकुन बाकी मुलांना ते खायला द्यावेत हे उत्तम.

Pages