ब्लेड

Submitted by छल्ला on 3 January, 2018 - 02:55

आय ए एस च्या इंटरव्ह्यू मधे विचारलेला एक प्रश्न :
दाढीच्या ब्लेड चे डिझाईन विशिष्ट पद्धतीचे - नागमोडीच का असते? काही विशेष कारण ?
मला तरी याचे समाधान कारक उत्तर माहिती नाही म्हणून मायबोली करांना विचारत आहे.

blade.jpg

ही मधली वेलबुट्टी अशीच का असते? साधी स्लिट चालली असती किंवा /आणि मधे फक्त एक होल ज्यात रेझर फिट होईल.

Group content visibility: 
Use group defaults

केसांच्या ग्रोथ च्या विरुद्ध दिशेला इतकेच कारण असावे.
नागमोडी म्हणजे काय?
४५ अंश तिरकी खालच्या दिशेला वळलेली ब्लेड रेझर ला पाहिली आहेत.

नागमोडी म्हणजे चपट्या ब्लेडच्या मध्यभागामध्ये असलेली नागमोडी छिद्राची डिझाईन म्हणताय ना तुम्ही!!!?

माझ्या मते ब्लेड ला खोर्‍यात बसविताना त्याला विशिष्ट कोन आणि व्यवस्थित पकड मिळावी म्हणून असावे जेणे करुन ब्लेड खोर्‍यात बसल्यावर हलणार नाही.

IAS personal interview मध्ये असले मुळीच प्रश्न विचारत नाहीत. IAS च्या नावावर खपवलेले अनेक प्रश्न आंतरजालावर सापडतील, जाणकारांनी प्रकाश टाकावा.

तुम्ही नक्की कुठल्या मुलाखतीला गेला होतात ?? ... IAS च्या नावावर खपवलेला अजून एक प्रश्न

स्वतः दाढी करण्यासाठी जे razor वापरले जाते (जुन्या पद्धतीचे) त्यात हे ब्लेड पूर्ण वापरले जाते परंतु सलून मध्ये जो वस्तरा वापरला जातो त्यात ते ब्लेड अर्धे तोडून वापरले जाते. तेव्हा असे तोडलेले ब्लेड आत - बाहेर किंवा वर - खाली सरकू नये म्हणून कदाचित अशा प्रकारची नक्षी असावी.

गरम मसाला यांची माहीती कोणीतरी मला मराठीत सोप्या भाषेत सांगेल का?

तसेच आपल्या बांधकामाच्या विटा असतात त्यावर सुद्धा काहीबाही नाव वा डिझाईनचा खड्डा असतो. तो असाच टाईमपासला असतो की त्याचाही काही फायदा असतो?

बाकी पर्सनली मला ब्लेडमधील खाचखळग्यांचा नेमका उपयोग माहीत नाही. पण लहानपणी आम्ही त्यात जीभ अडकवून फिरायचो... आईचा धपाटा पडेपर्यंत !

सौ. गुगल (परत एकदा)

कॅपमध्ये काही प्रकारचे तणाव होते ज्याने फक्त प्रोबॅकच्या गार्डवर असलेल्या वेगवेगळ्या आकाराचे स्टड स्वीकारले. तसेच अधिक जटिलता आणण्यासाठी, कॅप मध्ये कोपरेशन ब्लेड-संरेखन पिन जो संरक्षणातील उदासीनतेमध्ये नेस्टेड होते. ब्लेड फिट करण्यासाठी, ब्लेडला प्रोट्रुरीज आणि कॉर्नर पिन स्वीकारण्यासाठी उद्घाटन केले.

ही नवीन रचना गिललिटल कंपनीसाठी एक गंभीर समस्या बनली आणि अशा आव्हाने सोडवण्यासाठी, ते नवे ग्रंथोत्सव ब्लेड आले. जुन्या तीन छिद्राचे ब्लेड नवीन न्यू गिल्टाट रेझरमध्ये फिट होत नाहीत, परंतु नवीन डिझाइन आणि पेटंट केलेले ब्लेड अद्याप सर्व जुन्या जिलेट रेज़रमध्ये कार्य करतील.

आणि नवीन जोड्या ब्लेड आणि रेझर आणण्यासाठी, ब्लेडचे उत्क्रांती डिझाइनमध्ये बदलले. पेटंटची झुंज अखेरीस गेली आणि शेवटचे स्वीकारलेले ब्लेड डिझाइन जे सर्व वस्तरा स्वीकारेल ते तयार होते. हे बघा.

ब्लेड वर अशा उत्कीर्ण भोक (नाही असाधारण डिझाइन) यासाठी आणखी एक कारण म्हणजे, हे सिद्ध झाले की तयार केलेले पहिले ब्लेड क्रोम स्टीलचे बनलेले 0.20 मिमी पातळ होते. बर्याच काळासाठी तीक्ष्ण धार धारण करण्याकरिता उष्णता शेंगाने केली जाते आणि ही उष्णता उपचाराने कठीण आणि ठिसूळ साहित्य तयार केले यामुळे एखाद्याला तो अगदी थोड्या प्रमाणात विखुरलेला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तोडण्यासाठी साहित्य नेऊन टाकले. त्यामुळे भोक च्या खोदकाम ब्रेकिंग न लवचिकता प्रदान होते. हे लवचिकता सह स्थिरता दिली

Happy @ गरम मसाला, सौ गुगलना भाषांतराची कला अवगत नाही असे दिसते. तर श्री गुगल / चि गुगल यांना एकदा संपर्क साधून पाहता का?

संरक्षणातील उदासीनतेमध्ये नेस्टेड

नाही असाधारण डिझाइन
(काय करील शिंपीण) Happy

उष्णता शेंगाने केली जाते

तोडण्यासाठी साहित्य नेऊन टाकले

नवे ग्रंथोत्सव ब्लेड

भाषांतरामुळे मज्जा आली!! बर्‍याच दिवसांनी निर्मळ विनोद वाचायला मिळाला.
(हा ब्लेड चा इश्यु मला पहिला प्रतीसाद देताना कळलाच नव्हता..मी रेझर मधले काळे ब्लेड समजत होते. हे नॉर्मल ब्लेड इमेज दिल्यावर लक्षात आले.)

तसेच आपल्या बांधकामाच्या विटा असतात त्यावर सुद्धा काहीबाही नाव वा डिझाईनचा खड्डा असतो. >>
ज्याने विटांसाठी मातीचे रॉयल्टी भरून परमिट घेतले असेल त्याची आद्याक्षरे असतात. माती गौण खनिज आहे..

अनु, ..:-) इंग्लिश वाचायचा प्रयत्न केल्यावर थोडी माहिती मिळाली...पण तरीही ते "ट्रांसव्हर्स स्लॉट्स" अ‍ॅड करण्याचे कारण काही कळले नाही. थोडक्यात 'सर्व समावेशकता' हेच उत्तर असावे. सौंदर्यीकरण (असे मला जे वाटत होते ते) नाही!

असो. पण आता मला प्रत्येक ब्लेड निर्मिती नंतर मधली नक्षीदार स्टील ची पट्टी निघत असेल ना.... त्याचे काय काय शो पिसेस बनतील हा विचार पडला आहे! Happy

आता गं बया! त्ये काय टिकल्या काढून उरलेले कापड हाय व्हय शोपीस नि पायपोस बनवाया....
परत वितळवायला दिले ब्लेड च्या गुर्‍हाळात तरी चालतंया की Happy

आम्ही शाळेत असताना वहीवर ब्लेडच्या मधल्या नागमोडी छिद्रातून वेगवेगळी सुंदर सुंदर नक्षी काढायचो.

हे पहा! रेझरच्या मधल्या तीन खिळ्यांमध्ये ब्लेड व्यवस्थित बसावे म्हणून ब्लेडला तशी नागमोडी वळणाची नक्षी दिलीय. रेझरमध्ये ब्लेड बसवताना फ्लेक्सीबिलिटी असावी म्हणून नक्षीमध्ये त्या तीन छिद्रांसमवेत चार खाचाही दिल्यात.

images (3).jpeg

ज्याने विटांसाठी मातीचे रॉयल्टी भरून परमिट घेतले असेल त्याची आद्याक्षरे असतात.
>>>
विटांवर वीटा रचताना मध्ये जी सिमेंट माती भरतात त्याचा चांगला बॉन्ड (जेम्स नाही हं) तयार व्हायला तो खाचा-खळगा ठेवायचा असतो असे वाचनात आले.

सचिनजी....बरोबर! खाचा मला वाटतं.. की ब्लेड ला गालाच्या अनुषंगाने फिरण्याला अधिक 'प्ले' मिळावा म्हणून असाव्यात. ! Happy

विटांवर वीटा रचताना मध्ये जी सिमेंट माती भरतात त्याचा चांगला बॉन्ड (जेम्स नाही हं) तयार व्हायला तो खाचा-खळगा ठेवायचा असतो असे वाचनात आले. >>

वाह ऋन्मेष सर
तुम्ही स्थापत्य अभियांत्रिकीची पुस्तके वाचल्येत?

गेल्या दोन-अडिच वर्षात सौ गूगल ह्यांनी मराठी भाषा आणखीन शिकून घेतलेली दिसते, तरीपण सुधारणेस अजून वाव आहे. वरील इंग्रजी वाक्यांचे आजचे ताजे भाषांतर असे होते:

कॅपमध्ये निराशाची एक जोडी होती ज्याने केवळ प्रोबॅकच्या गार्डवर असलेल्या विविध प्रकारच्या आकाराचे स्टड स्वीकारले. तसेच अधिक जटिलता आणण्यासाठी, टोपीने कोपरा ब्लेड-संरेखन पिन बसविले जे गार्डच्या उदासीनतेमध्ये घरट्यात होते. ब्लेड फिट करण्यासाठी, ब्लेडला प्रोट्रेशन्स आणि कोपरा पिन स्वीकारण्यासाठी योग्यरित्या सलामी दिली पाहिजेत.

हे नवीन डिझाइन गिलेट कंपनीसाठी एक गंभीर समस्या बनली आणि अशा प्रकारच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ते नवीन गिलेट ब्लेड घेऊन आले. जुन्या तीन होल ब्लेड नवीन नवीन जिलेट रेजरमध्ये बसत नाहीत, परंतु नवीन डिझाइन आणि पेटंट केलेले ब्लेड अद्याप सर्व जुन्या जिलेट रेझरमध्ये कार्य करेल.

आणि ब्लेड आणि रेझरची नवीन जोडणी आणण्यासाठी, ब्लेडची उत्क्रांती डिझाइनमध्ये बदल घडवून आणली. पेटंट मारामारी चालू राहिली आणि शेवटी, अखेर स्वीकारलेल्या ब्लेडची रचना जी सर्व वस्तरा स्वीकारेल तयार केली गेली. हे बघा.

अशा खोदकाम भोक (अशा चमत्कारिक डिझाइन नसलेल्या ब्लेड) चे आणखी एक कारण म्हणजे, तयार केलेला पहिला ब्लेड केवळ ०.२० मिमी पातळ होता जो क्रोम स्टीलने बनलेला होता. दीर्घ काळापासून तीक्ष्ण कडा राखण्यासाठी, श्वासोच्छ्वासाद्वारे उष्णतेचा उपचार केला गेला आणि या उष्णतेच्या उपचारांनी सामग्री कठोर आणि ठिसूळ बनविली. जेव्हा एखाद्याने त्यास अगदी किंचित विकृत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा यामुळे सामग्री खंडित झाली. तर छिद्रांचे कोरीव काम न करता लवचिकता प्रदान करणे होय. यामुळे लवचिकतेसह स्थिरता मिळाली.

@हरचंद पालव
मला हे मराठी असूनही कळले नाही Lol
जेव्हा एखाद्याने त्यास अगदी किंचित विकृत करण्याचा प्रयत्न केला >>> किंचित कुठे फारच विकृत भाषांतर आहे. Biggrin

मराठीत सांगाल का?
मग ते मराठी भाषांतर Rofl
आणि मग: मी करतो इंग्लिश भाषांतर (गरम मसाल्याचा भयंकर तडका) Rofl