मुद्द्याला धरून कमेंट न करणार्‍यांना व वैयक्तिक कमेंट करणार्‍यांना कसे टाळावे?

Submitted by जगाच्या कल्याणा on 25 December, 2017 - 10:40

उपद्रवी कमेंटकर्त्यांना ब्लॉक करण्याची किंवा टाळण्याची काही सोय उपलब्ध आहे का? मुद्द्याला धरून कमेंट न करण्याची व वैयक्तिक कमेंट करण्याची काही जणांना सवय असते. अशांना टाळण्याचा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय काही उपाय आहे काय?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Why don't you use your original ID to discuss this ?

ज क, असे तुम्हाला इथे भेटतीलच. कमी आहेत पण आहेत हे नक्की. वर अनेकांनी सांगितल्याप्रमाणे इग्नोर करा. पण होते काय की इग्नोर केले तरी असे काही जण दुसऱ्या धाग्यावर जाऊन घाण करतात. तुमच्या साध्या सोप्या वाक्याचा विपर्यास करून टोकाची कमेंट टाकणारे आहेत इथे. अश्या वेळी जमेल तसे सडेतोड उत्तर द्या. माझाच अनुभव सांगायचा झाल्यास एकाच आयडी कडून दोन वेगवेगळ्या धाग्यांवर विनाकारण पर्सनल अटॅक केला गेला. दोन्ही वेळेस मी सडेतोड उत्तर दिले. पहिल्यावेळी सपाटून मार खाल्ल्यावर देखील (अर्थात शाब्दिक) पुरले नाही म्हणून की काय दुसऱ्या वेळेस पुन्हा पर्सनल कमेंट केली आणि पुन्हा मार खाल्ला.
तुम्ही उत्तर दिले हे पाहून विषय बदलण्यासाठी आणि आपले म्हणणे खरे करण्यासाठी विषय सोडून बोलतील किंवा काहीबाही प्रश्न विचारतील परंतु तुम्ही मुद्द्याला धरून पर्सनल अटॅक परतवून लावा. यामुळे पुढे केवळ तुमच्याच नाही तर इतर धाग्यांवरही असे कमेंट करताना १० वेळा विचार जरूर करतील.

हे जगाच्या कल्याणा स्वतः दुसर्‍या एका संस्थळावर आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या लोकांवर, तेही त्यांच्या पानावर जाऊन सतत पर्सनल अ‍ॅटॅक करत असतात. शेलक्या विशेषणांशिवाय यांचे एकही वाक्य नसते. मुद्द्याला चिकटून राहिले तर तो कपिलाषष्ठीचा योग. याचे मासले इथे द्यायचा मोह टाळतोय. गरजही नाही, कारण त्यांनीच झलक दाखवलीय.

हे प्रॅक्टीकल नाही.
१) दरवेळी दर एकेक पोस्ट स्क्रॉल करत नाव चेक करत वाचणे आणि मग पुन्हा वर येत पोस्ट वाचणे हे अशक्य असह्य आहे.

तेही खरं आहे. मी आजच काही विकृत म्हणता येतील अशा कमेंट वाचल्या. कमेंट ज्यांच्या होत्या त्या लोकांचे प्रशासनाने स्थगित केलेले आधीचे ४-५ आयडी तर मलाच माहीत आहेत. मला माहीत नसलेले आणखी आयडीही असतील. पण तरि या लोकांना पुन्हा नवीन आयडी घेऊन जुनी ओळख न लपवता यायची मुभा प्रशासनाने दिलेली आहे.
यांना थांबवणे अशक्य अजिबात नाही. (जर राहुल आयडी कोणाचा ते ओळखून प्रशासक कारवाई करतात तर तशी tools नक्कीच उपलब्ध आहेत.) पण साईटचे धोरण यांना मुक्तद्वार देण्याचे आहे, which is perfectly fine since this is private site.
सो आय गेस, साईटवर कमी वेळ असणे, मोजकेच धागे वाचणे व स्वतःहून धागा/ प्रतिसाद न लिहिणे हाच विकृत प्रतिसाद avoid करण्याचा एकमेव मार्ग.

काही लोक तोंडावर पडल्यावरही मीच जिंकलो या अविर्भावात सगळीकडे नाचत सुटतात... त्याचा प्रत्यय आलाच इथेही Wink Happy

Pages