मुद्द्याला धरून कमेंट न करणार्‍यांना व वैयक्तिक कमेंट करणार्‍यांना कसे टाळावे?

Submitted by जगाच्या कल्याणा on 25 December, 2017 - 10:40

उपद्रवी कमेंटकर्त्यांना ब्लॉक करण्याची किंवा टाळण्याची काही सोय उपलब्ध आहे का? मुद्द्याला धरून कमेंट न करण्याची व वैयक्तिक कमेंट करण्याची काही जणांना सवय असते. अशांना टाळण्याचा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय काही उपाय आहे काय?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मायबोलीवर ते कठीणच आहे - तुम्ही कधी भारतात नाटक सिनेमांच्या प्रवेशदारापाशी धक्का लागू न देता गेला आहात का?

कारण क्यू, शिस्त, नियम या बंधनकारक गोष्टींचा स्वतंत्र भारतीय नागरिकांना प्रचंड तिटकारा आहे. मग मायबोलीवर तरी नियम का पाळायचे?
जाउ तिथे घाण करू हे भारतीयांचे ब्रीदवाक्य आहे.

आपला ब्लॉग चालू करून किंवा आपल्या fb वॉल ची सेटिंगस बदलून हे करत येईल,
जिकडे या सुविधा नसतील त्या फोरम वर जाणे टाळावे.

नन्द्याजी,
मायबोली आणि भारतीय असणे याचा आपसात संबंध समजला नाही.
भारतीयच्या जागी महाराष्ट्रीय वा मराठी माणसं करणार का?

आपला ब्लॉग चालू करणे खूप सोपे आहे
पण ईथे जितके वाचक मिळतात तितके आपल्या ब्लॉगवर मिळवणे यासाठी तितकीच प्रतिभा हवी.
जर नसेल तर नाईलाजाने ईथले अनावश्यक कमेंट झेलावे लागणार.
अर्थात हे कथा कविता गझल साहित्याबद्दल बोलत आहे. चर्चेचा, माहितीचा धागा काढायचे असेल, कोणाशी तरी बोलायचे असेल तर मायबोलीला पर्याय नाही...

सिम्बा,
मला वाटते मी येथे काही सोय आहे का असे विचारले हे कळणे फार अवघड नाही. स्वत:चा ब्लॉग अथवा फेबु चा येथे काही संबंध? सिम्बा की असंबद्ध सिम्बा?

अ‍ॅडमिन त्यांचं क्षेपणास्त्र डागत नाहित तो पर्यंत इग्नोरास्त्राचा वापर करा. अ‍ॅड्मिनने दिलेल्या वराचा (व्यक्त होणे) गैरवापर करता-करता हे भस्मासुर स्वतःच्याच डोक्यावर हात ठेऊन भस्म होतात; त्यासाठी कुणा मोहिनीची गरजच लागत नाहि... Happy

राज,
इग्नोरास्त्राचा वापर हाच योग्य मार्ग दिसतो. धन्यवाद.

मला वाटते मी येथे काही सोय आहे का असे विचारले हे कळणे फार अवघड नाही. >>>>>>
तूमच्या मागच्या माबो अवतारात या सोई बद्दल तुम्ही शोध केला होतात, आणि अडमीन ने ते शक्य नाही असे सांगितले होते. हे विसरले नसाल असे वाटते.
सुदैवाने अजूनही अडमीन एखाद्याला ब्लॉक करायची सोय देण्यास टेक्निकल कारणांमुळे तयार नाही आहेत.
एखाद्याला ब्लॉक करायच्या मी विरोधात आहे, पण तशी सोय उपलब्ध असती तर अपवाद करून तुम्हाला मी ब्लॉक केले असते.

<<<<मायबोली आणि भारतीय असणे याचा आपसात संबंध समजला नाही.>>>>

काहीहि संबंध नाही. मायबोली असो किंवा काही असो,
कारण क्यू, शिस्त, नियम या बंधनकारक गोष्टींचा स्वतंत्र भारतीय नागरिकांना प्रचंड तिटकारा आहे. जाउ तिथे घाण करू हे भारतीयांचे ब्रीदवाक्य आहे.
हे सर्व भारतीयांच्या बाबतीत खरे आहे. महाराष्ट्रीय किंवा मराठी यांची त्यावर मक्तेदारी नाही!

कारण क्यू, शिस्त, नियम या बंधनकारक गोष्टींचा स्वतंत्र भारतीय नागरिकांना प्रचंड तिटकारा आहे. जाउ तिथे घाण करू हे भारतीयांचे ब्रीदवाक्य आहे.
हे सर्व भारतीयांच्या बाबतीत खरे आहे. महाराष्ट्रीय किंवा मराठी यांची त्यावर मक्तेदारी नाही!
>>>>>>>

मायबोलीवर येणारी जनता भारतीय नसून महाराष्ट्रीय आणि मराठी माणसे असतात म्हणून ती सुधारणा करायला सांगितले.
एखादा उपद्रव मायबोलीवरची मराठी माणसे घालत असतील तर गरज नसताना सरसकट सर्वच भारतीयांना दूषणे देणे मला योग्य वाटत नाही. भले मग ते खरे असो वा खोटे, तो मुद्दाच नाहीये.

कमेंट न वाचता आधी खाली स्क्रोल करून आयडीचं नाव वाचा. मग आयडी आवडत नसेल तर कमेंट वाचूच नका.
इग्नोअर करा.

जे लोक तुम्हाला बोलायला ठीक वाटतात त्यांनाच रिप्लाय द्या.

कमेंट न वाचता आधी खाली स्क्रोल करून आयडीचं नाव वाचा. मग आयडी आवडत नसेल तर कमेंट वाचूच नका.
>>>

हे प्रॅक्टीकल नाही.
१) दरवेळी दर एकेक पोस्ट स्क्रॉल करत नाव चेक करत वाचणे आणि मग पुन्हा वर येत पोस्ट वाचणे हे अशक्य असह्य आहे.
२) तसे केलेही तरी एखाद्या आयडीची पोस्ट काय आहे हे वाचल्यावरच समजते. जर एखाद्याची जेन्युईन पोस्ट इग्नोर झाली, आणि त्याने विषयासंदर्भात जेन्युईन शंका उपस्थित केली असेल आणि आपण न वाचल्याने त्याचे उत्तर दिले नाही तर ईतर वाचकांचा गैरसमज होऊ शकतो की बघा याकडे उत्तरच नाही, किंवा हा टाळतोय.

अशांना टाळण्याचा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याशिवाय काही उपाय आहे काय?
>>> आहे ना उपाय.. हृन्मेष प्रमाणे हँडल करायचे आशा वेळी. पेशन्स पाहिजे पण.

हायला! मज्जा येणार इथे.
सिम्बा की असंबद्ध सिम्बा?>>>>>>> कल्याण्मुर्ती हे असं लिहुन तुम्हीच वर अशा कमेंटना इग्नोर कसं करायचं विचारता.
कालच कळलंय की तुम्ही राकु आहात.
मागच्या अवतारात पण हेच कार्य केलं होतंत ते आठवत नाहीये का?

मुद्द्याला धरून कमेंट न करणार्‍यांना व वैयक्तिक कमेंट करणार्‍यांना कसे टाळावे? >>> ह्याला वेमांनी 'त्यांचा आयडी डिलीट करावा' हे उत्तर दिलेलं दिसतंय.

चालू घडामोडी भारतात हा ग्रूप सर्व सक्रिय सभासदांनी जॉईन करायला हवा. राजकारण ग्रूप वेगळा असल्याने हा ग्रूप त्या वादापासून सेफ आहे.

Pages