ट्रम्प काकांचा नवा बॉम्ब... या पुढे एच १ बी धारकांच्या जोडीदारास जॉब नाही?

Submitted by बाबा कामदेव on 25 December, 2017 - 00:39

Trump admin plans to end rule that allows spouses of H1-B visa holders to work in US

https://economictimes.indiatimes.com/nri/visa-and-immigration/us-plans-t...
कृपया हि लिंक पहावी.

हे काय आहे? याचे परिणाम काय ? एकूणच भारतीय तंत्रज्ञांबाबत धोरण काय आहे.
नात्यातले एक मुलगी अमेरिकन जॉग होल्डरशी लग्न करून तिथे जॉब करण्याच्या विचारात आहे. हे प्लॅनिण्ग करताना वरील निर्णयाचा काय परिणाम संभवतो. ? सद्या निर्णय झाला नसला तरी ट्रम्प यांची शैली पाहता काहीही होउ शकते.

तसेच एच १ बी विसाबद्दल धोरण काय राहील?
माहीतगारानी , विशेषतः स्टेट्समधील मित्रांनी सद्यःस्थिती काय आहे, भविश्यात काय राहू शकते याबाबत मार्गदर्शन करावे ही विनन्ती...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फा, नवीन काही नाही. व्हाईट हाउसने जो ८०० थाउजंड ऐवजी १.८ मिलियन ना पाथ टू सिटीझनशिप देणार असं पूर्वी सांगितलेलं तेच.
न्युक्लिअर फॅमिलीसाठी (??? :खोखो:) चेन मायग्रेशन बंद करणार आणि व्हिसा लॉटरीही बंद करणार. यातलं फक्त व्हिसा लॉटरी लगेच अमलात येईल. चेन मायग्रेशन ज्यांनी apply केलंय त्यांची रांग संपत नाही तो पर्यंत संपणार नाही. त्यातही व्हिसा लॉट्रीतून कमी दिलेले पीआर चेनमायग्रेशन मध्ये वळते करतील.
या धाग्याशी संबंध नाही, पण adminनी राजचा कॅच ऑल धागा बंद केला आणि एवढ्या तेवढ्यासाठी कुठे धागे विणा!!

ट्रम्प काकांची पुन्हा सटकली वाटते.
http://trak.in/tags/business/2018/02/26/h1b-becomes-tough-again/

H1B Becomes Tough Once Again; US Govt. Makes It Hard To Issue Work Visa!
The new regulations will likely make the process of getting H1B visa at third party locations, tougher

या वर कोणी प्रकाश टाकू शकेल काय?

का नाही ?
या नियमा नुसार नवीन (आणि एक्सटेंशन) H१ अँप्लिकेशन साठी जास्त डोकमेंट्स दाखवावे लागतील.. जर तुम्ही क्लायंट कडे (EVC) काम करत असाल तर.. (ह्यापैकी बरेच आधीही लागायचे आता लागतीलच) .. तुमचा डायरेक्ट मॅनेजर तुमच्या कंपनीचाच असायला हवा (कॅलिएंटचा नाही) etc
बऱ्यापैकी लोकल consulting कंपनीना फरक पडेल (इकडचे कंपनी मालक आणखी सांगतीलच )

यात नविन काहि नाहि; जुनाच कायदा आता नविन कपडे घालुन आला आहे. Happy

एच१ विजाचं प्रयोजनंच मूळात असलेली लेबर गॅप भरण्याकरता होतं. एंप्लॉयरला लेबर डिपार्टमेंटकडे अ‍ॅप्लिकेशन द्यावं लागायच कि "साहेब, माझ्या कंपनीला अमुक-तमुक स्किलचा माणुस हवाय, तो इथे खुप शोधुन हि सापडत नाहि. गेस व्हाट, सुदैवाने हा परदेशातला माणुस अवेलेबल आहे म्हणुन हा त्याच्या विजाचा अर्ज मंजुर करा...". या अर्जात एंप्लॉयरचं नांव, पत्ता, कामाचं स्वरुप, एकुण कार्यकाल वगैरे बरीच माहिती असायची. थोडक्यात, सुरुवातीपासुनच एच१ विजा वाज टाय्ड टु ए गिवन एंप्लॉयर्/लोकेशन, पण त्याची अंमल्बजावणी रिलिजस्ली होत नव्हती. (अपवाद - काहि वर्षांपुर्वि टेक्सस (सॅन अ‍ॅटोनियो) आणि अर्कांसा (बेंटन्विल) इथे आयएनएस्च्या धाडी पडल्या होत्या आणि प्रॉपर डॉक्युमेंटेशन नसलेल्या एच१ धारकांना जेलमध्ये टाकलं होतं). कायदा थोडा वेग असल्याचा गैरफायदा, नोकर्‍या देणारे दलाल (यात बुटिक बॉडिशॉपर पासुन मोठ्या भारतीय कंपन्या सगळे आले) त्यांच्या वकिलाच्या सल्ल्याने/मदतीने घेत होते. ट्रंपने आता त्या कायद्यात जास्त क्लॅरीटी आणुन एच१ विजाच्या गैरवापरावर पाचर मारलेली आहे...

राज +१.
फक्त मला काम करुन घ्यायची रिक्वायरमेंट जानेवारी मध्ये येऊन मी त्यावर ३ महिने लोकल सर्च करुन मग एप्रिल मध्ये एचवन साठी कुणाचा तरी अर्ज फाईल करणार जी व्यक्ती अगदी लवकरात लवकर ऑक्टोबर नंतर काम सुरु करेल. सो मी १० महिने त्या कामाला थांबायला तयार आहे. इतकं कोण थांबणार! मग लोकांनी जुगाड करायला सुरुवात केली असावी.
आताच्या सरकारला लीगल लोक नको आहेत आणि जी इल्लीगल अंडर एज पोरं अजुन एंटर करयची आहेत त्यांना पण अ‍ॅमनेस्टी जाहिर करुन मोकळे झालेत साहेब. असा उफराटा कारभार आहे!

थोडक्यात, सुरुवातीपासुनच एच१ विजा वाज टाय्ड टु ए गिवन एंप्लॉयर्/लोकेशन, पण त्याची अंमल्बजावणी रिलिजस्ली होत नव्हती. >>> यस. आता नियमांत स्पेसिफिक काय काय माहिती व्हिसा अ‍ॅप्लिकेशन मधे असायला हवी हे टाकलेले आहे. काही महिन्यांत कंपन्या त्यातून काहीतरी पळवाटा काढतील Happy

भारतातून जे लोक येउ पाहात आहेत त्यांना:
१. जर "प्रॉडक्ट" कंपनी असेल, किंवा इतर कोणतीही कंपनी, ज्यामधे तुम्हाला भारतातून इथे कोणत्या कामाकरता बोलावले जात आहे त्याची क्लिअर माहिती आणि टाइमलाइन असेल, तर तुम्हाला याने काही फरक पडणार नाही. (प्रॉडक्ट कंपनी: जी कंपनी व्हिसा करत आहे त्याच कंपनी मधे काम आहे, त्यांचेच काम. हे ढोबळपणे. आयबीएम प्रॉडक्ट कंपनी पण आहे आणि त्यांची सर्विसेस डिव्हिजन पण आहे)
२. जर "सर्व्हिस" कंपनी असेल पण तुमचे काम, लोकेशन, क्लायण्ट सगळे ठरलेले असेल, क्लायण्ट ने कामाची माहिती सुद्धा व्यवस्थित दिलेली असेल तर त्यातून तुमचा व्हिसा अडकण्याची शक्यता खूप कमी आहे. (इन्फोसिस, विप्रो ई मोठ्या व "वर्ल्ड ग्लोबल इन्फोटेक" टाइप नावे असलेल्या २-३ लोकांनी चालवलेल्या अनेक इतर कंपन्याही)
३. पण "सर्व्हिस" कंपनी आहे आणि "जनरल" रोल मधे इथे आणून मग जे ३-४ प्रोजेक्ट्स पाइपलाइन मधे आहेत त्यातील कोणत्यातरी प्रोजेक्टवर तुम्ही जाणार असा प्लान आहे - अशा पद्धतीचे व्हिसा आता अवघड होतील.

कारण आता क्लायण्ट ने कामाची माहिती स्पष्टपणे देणे आणि त्या कामाकरता जो प्रवास लागेल त्याचीही डीटेल माहिती असणे दोन्ही आवश्यक केलेले आहे.

एकूण जनरल कामाकरता लोक आणून मिळेल त्या प्रोजेक्ट वर त्यांना पाठवणे, एरव्ही "बेंच" वर बसवणे वगैरेला कंट्रोल करायला हे केलेले आहे.

नात्यातले एक मुलगी अमेरिकन जॉब होल्डरशी लग्न करून तिथे जॉब करण्याच्या विचारात आहे. हे प्लॅनिण्ग करताना वरील निर्णयाचा काय परिणाम संभवतो. ?>>> ह्या माझ्या मूळ प्रश्नाबाबत या नव्या परिप्रेक्षात काय फरक संभवतो?

नवर्‍याचा व्हिसा असेल तर या मुलीला स्वतंत्र व्हिसा काढावा लागेल काम करायला आणि वरचे सगळे तसेच लागू होईल.

नवर्‍याचे ग्रीन कार्ड असेल तर हे अजून कॉम्प्लिकेटेड आहे बहुधा. याचे नियम सध्या काय आहेत माहीत नाही.

नवरा सिटिझन असेल तर तिचेही नागरिकत्व करून घेणे हा सर्वात लौकरचा उपाय असेल. मग व्हिसा ई. काहीच लागणार नाही.

मुलगी अमेरिकन जॉब होल्डरशी लग्न करून तिथे जॉब करण्याच्या विचारात आहे. >>> मुलाचे स्टेटस काय आहे? मुलगा ग्रीन कार्ड होल्डर किंवा अमेरिकन नागरिक असेल तर फारसा फरक पडू नये. जर मुलगा पण एच-१ बी विसावर असेल तर मात्र कठीण आहे.

>>ह्या माझ्या मूळ प्रश्नाबाबत या नव्या परिप्रेक्षात काय फरक संभवतो?<<

काहिहि नाहि. याच धाग्यावरचे आधिचे प्रतिसाद/चर्चा या नियमालाहि लागु आहे...

>>नवीन नियमानुसार १४० अप्रुव्ह झाल्यावर लगेच एच४ विसाधारक वर्क परमिटसाठी अर्ज करू शकते/तो. <<

हा नियम जुनाच आहे. १४० अप्रुव झाल्यावर ४८५, इएडि आणि अ‍ॅडवांस परोल या तिन्हींसाठी अर्ज एकत्र केला जायचा; संपुर्ण फॅमिलिकरता (एच१, एच४ धारक). इएडि, अ‍ॅडवांस परोल २-३ आठवड्यात यायचं पण ४८५ अप्रुव व्हायला वेळ लागायचा. इएडि आल्यावर जॉब चेंज करायला परवानगी होती.

>>आधीचा जो नियम होता त्यानुसार ४८५ झाल्यावर स्टेटस अ‍ॅडज्स्टमेन्ट होइपर्यंत इएडी आणि अ‍ॅडवान्स परोल दोन्ही अ‍ॅप्लिकन्ट्सना एकत्रच मिळायचं. <<

४८५ (अप्रुव) झालं म्हणजेच स्टेटस अ‍ॅडजस्ट झालं. म्हणजेच ग्रीन कार्ड झालं (फक्त फॉर्मॅलिटी करता इंटर्व्युला जावं लागायचं, काहिंना तेहि करावं लागलं नाहि)

>>> १४० अप्रुव झाल्यावर ४८५, इएडि आणि अ‍ॅडवांस परोल या तिन्हींसाठी अर्ज एकत्र केला जायचा <<<
त्यांना कदाचित असे म्हणायचे असेल की आता १४० अप्रुव झाल्यावर लगेच इएडी साठी अर्ज करता येत असेल, पूर्वीसारखे ४८५ ची डेट करंट होण्याची वाट न बघता. (म्हणजे मला तरी तसे वाटले, नक्की नियम माहीत नाहीत).

>>त्यांना कदाचित असे म्हणायचे असेल की आता १४० अप्रुव झाल्यावर लगेच इएडी साठी अर्ज करता येत असेल, पूर्वीसारखे ४८५ ची डेट करंट होण्याची वाट न बघता. <<

अ‍ॅज फार अ‍ॅज आय नो, इएडी आणि अ‍ॅडवांस परोलचा अर्ज १४० अप्रुव झाल्यावर देता यायचा; ४८५ शी त्याचं काहि कनेक्शन (डिपेंडंस) नव्हतं. आय कुड बी राँग, बरीच वर्षं झाली...

<<नात्यातले एक मुलगी अमेरिकन जॉब होल्डरशी लग्न करून तिथे जॉब करण्याच्या विचारात आहे.>>
H1B वाल्यांच्या बायकांना पूर्वी नोकरी करता येत होती, आता बंद करणार आहेत म्हणे. तसे झाले तर बायकांना स्वतःचा H1B मिळवावा लागेल अथवा DBMS करावे लागेल (धुणी भांडी, मुले सांभाळणे)!
घाबरू नका , ट्रंप बर्‍याच घोषणा करतो - त्याला कॉम्प्युटर धंद्यात काय चालते माहित नाही. अ‍ॅमॅझॉन, फेसबूक, गूगल, अ‍ॅपल सगळे जण या H1B वर अवलंबून आहेत. बिल गेट्स ने तर म्हंटले होते की तुम्ही H1B थांबवलेत तर मी मायक्रोसॉफ्ट बंगलोरमधे हलवीन! ते काँग्रेमन्स ला भरपूर लाच देतील.
पूर्वी खरे तर कायदा होता की कमीत कमी अमुक पगार दिला पाहिजे, पण ती लिमिट या लोकांनी कॉंंग्रेसमेन ना पैसे चारून इतकी कमी केली की त्यावर अमेरिकन लोक जगणेच शक्य नाही, फक्त भारतीयांनाच परवडेल (खरे तर त्यांनाही नाही, पण त्यांच्या कडे भारतात तरी पैसे होते).
तर ऑल इज वेल! - संत अमीरखान.

नंद्या Lol - अहो इथे लोक त्यावरून काही निर्णय घेण्याकरता किंवा काय तयारी करावी म्हणून विचारत आहेत. त्यांना सिरीयस माहिती द्या.

एच-१ वाल्यांच्या स्पाउस ना बहुतांश कधी नोकरी करताच येत नव्हती. मध्यंतरी काही नवीन आले असेल तर लक्षात नाही. एच-४ वर करता येत नाही. स्वतंत्र एच-१ करावा लागतो, आणि त्याला आता वरचे सगळे लागू आहे.

ट्रंप बर्‍याच घोषणा करतो >>> इथे नियम आला आहे ऑलरेडी. नुसती घोषणा नाही.

पगाराच्या बाबतीत व्हिसावाल्यांना इन्डायरेक्टली फायदाच आहे. व्हिसा वाल्यांना इतरांपेक्षा कमी पगार देउ शकणार नाहीत.

एच-१ वाल्यांच्या स्पाउस ना कधी नोकरी करताच येत नाही.
बॊ च्या एका नियमामुळे I 140 approve झाल्या नंतर ६ महिन्यात ४८५ ची date आली नाही (आता त्याला ७ ते ७० वर्ष लागतात ) तर H४ EAD साठी अर्ज करू शकतात.. तो रुल असल्यामुळे तात्या त्याच्या मागे पण लागला आहे पण लगेच काही करू शकत नाही..

आता I १४० मिळून १० वर्ष झाले आले तरी ४८५ ची date का नाही हा वेगळा मुद्दा..

नात्यातले एक मुलगी अमेरिकन जॉब >>
मुलाचा L१ असेल तर तिला L२ मिळेल आणि मग L2 EAD घेऊन काम करू शकते.
मुलाचा H१ असेल तर तिला H४ (४ रच) मिळेल पण काम (पैसे मिळणार) वगैरे काही करता येणार नाही..
मुलाचा H१ असेल आणि I 140 approve असेल (६ महिन्यापूर्वी) तर H४ नंतर EAD नंतर काम करता येईल (तात्या म्हणेल तोवर).
मुलाचा GC असेल तर H४ (?) नंतर EAD नंतर काम करता येईल (आल्यानंतर AOS साठी अर्ज करून GC घेता येईल)..

पगाराच्या बाबतीत व्हिसावाल्यांना इन्डायरेक्टली फायदाच आहे. व्हिसा वाल्यांना इतरांपेक्षा कमी पगार देउ शकणार नाहीत>>
H1 वाल्याना नियम प्रमाणे ६५K पेक्षा जास्त पगार लागतो, जो खूप कमी आकडा आहे पण आता लोक (पक्षी राजकारणी) म्हणतात तो १००K हवा.. पण देशातले २ किनारे आणि ४,५ गाव सोडली तर १००क म्हणजे चंगळच (रोज शिकरण, मटारची उसळ वगैरे.. ) आणि किनाऱ्यावर १००k मध्ये कसबसं भागते मधला मार्ग काय म्हणून घोडा अडलं आहे..

हुश्श्य .. आता बोला..

एच-१ वाल्यांच्या स्पाउस ना कधी नोकरी करताच येत नाही.
बॊ च्या एका नियमामुळे I 140 approve झाल्या नंतर ६ महिन्यात ४८५ ची date आली नाही (आता त्याला ७ ते ७० वर्ष लागतात ) तर H४ EAD साठी अर्ज करू शकतात.. तो रुल असल्यामुळे तात्या त्याच्या मागे पण लागला आहे पण लगेच काही करू शकत नाही..

आता I १४० मिळून १० वर्ष झाले आले तरी ४८५ ची date का नाही हा वेगळा मुद्दा..

नात्यातले एक मुलगी अमेरिकन जॉब >>
मुलाचा L१ असेल तर तिला L२ मिळेल आणि मग L2 EAD घेऊन काम करू शकते.
मुलाचा H१ असेल तर तिला H४ (४ रच) मिळेल पण काम (पैसे मिळणार) वगैरे काही करता येणार नाही..
मुलाचा H१ असेल आणि I 140 approve असेल (६ महिन्यापूर्वी) तर H४ नंतर EAD नंतर काम करता येईल (तात्या म्हणेल तोवर).
मुलाचा GC असेल तर H४ (?) नंतर EAD नंतर काम करता येईल (आल्यानंतर AOS साठी अर्ज करून GC घेता येईल)..

पगाराच्या बाबतीत व्हिसावाल्यांना इन्डायरेक्टली फायदाच आहे. व्हिसा वाल्यांना इतरांपेक्षा कमी पगार देउ शकणार नाहीत>>
H1 वाल्याना नियम प्रमाणे ६५K पेक्षा जास्त पगार लागतो, जो खूप कमी आकडा आहे पण आता लोक (पक्षी राजकारणी) म्हणतात तो १००K हवा.. पण देशातले २ किनारे आणि ४,५ गाव सोडली तर १००क म्हणजे चंगळच (रोज शिकरण, मटारची उसळ वगैरे.. ) आणि किनाऱ्यावर १००k मध्ये कसबसं भागते मधला मार्ग काय म्हणून घोडा अडलं आहे..

हुश्श्य .. आता बोला..

मुलाचा GC असेल तर H४ (?) नंतर EAD नंतर काम करता येईल (आल्यानंतर AOS साठी अर्ज करून GC घेता येईल)..

>> GC असेल तर h4 नाही होणार. GC चे स्पाउझ म्हणून पेपर्स करावे लागतील आणि नंबर येइपर्यंत वाट बघावी लागेल किंवा तसे पेपर्स फाईल न करता स्वतःच्या h1 वर इथे येवून मग GC चे स्पाउझ म्हणून पेपर्स करावे.

अमेरीक्न नागरीक असल्यास फियान्सी विसावर येवून मग इथे लग्न करुन ग्रीनकार्डसाठी पेपर्स. EAD आले की काम करता येइल.

@मलुष्टे

म्हणजे 140 approve होऊन ६ महिने झालेत, पण ४८५ ची date आली नाहीये, असा तयार आंबा शोधून पटकन लग्न केल्यास अमेरिकेत पाय ठेवल्या H4 EAD घेता येईल? मज्जाच की!! Happy

>>असा तयार आंबा शोधून पटकन लग्न... <<

थांबा, बावीस-सप्तमांश! १४० अप्रुव्ड पिटिशन्वर बेनिफिशरी म्हणुन डिपेंडंटचं (एच४) नांव असावं लागतं. ते नसल्यास डिपेंडंटना इएडीसाठी अर्ज करता येत नाहि. त्याचबरोबर, १४० अप्रुव्ड पिटीशनवर नंतर डिपेंडंट अ‍ॅड करु शकतो का, याबद्दल माहिती नाहि; बहुदा ती सोय नसावी...

बाबा कामदेव - तो भावी नवरा कोणत्या कॅटेगरीत येतोय? त्यावरून यातले नक्की काय लागू होते ते कळेल.

पण देशातले २ किनारे आणि ४,५ गाव सोडली तर १००क म्हणजे चंगळच (रोज शिकरण, मटारची उसळ वगैरे.. ) >>> नक्कीच ओहायो - ईडियाना मध्ये ५+ वर्ष अनुभव असलेल्या अमेरिकन संगणक अभियन्त्याला ५०क मिळतात. ह्या राज्यात h1B ला ६५ क म्हणजे खुप झाले.
ह्या राज्यात १००के चा नियम केला तर एकही h1B राहाणार नाही. एवढा पगार दिला तर कंपन्या बंद पडतिल नाहीतर सगळे काम बाहेरच्या देशात जाईल.

ती १०० के ची अट सगळ्या कंपन्यांना नाहीये. इथल्या लोकांचा मूळ प्रश्न हा अशा शिक्षणाची संधी नसणे , त्याबाबत बरेच गैरसमज असणे- जसे की मॅथ खूप उच्च दर्जाचे हवे वगैरे होते. या लोकांना जरा कॅचअप करायला वेळ लागला पण नुकताच नवा अभ्यासक्रम बघितला. इथे हळूहळू स्थानिक मनुष्यबळ निर्माण होत आहे. तसेही बरेचसे काम अमेरीकेतील असोशिएट डिग्रीवाली मंडळी करु शकतील असे असते. h1B वर लोकं आणणे परवडणार नसेल तर आपोआप या स्थानिक मंडळींकडून काम करुन घेतले जाईल. सध्या परीस्थिती अशी आहे की जसे काही स्थानिक लोकं अशा प्रकारचे काम करुच शकणार नाहीत असा आव आणून सगळे आउटसोर्स केले जाते. त्याच प्रमाणे लोकल कंपन्याही आउटसोर्स केलेले काम घ्यायला तयार होत आहेत. स्थानिक पातळीवर युद्धावरुन परत येणार्‍या वेटसाठी देखील या संदर्भात बरेच काम सुरु आहे.
बाहेरच्या देशाबद्दल बोलायचे तर आत्ताही निम्मी टिम फ्लोरीडात आणि निम्मी मेक्सिकोत असे सुरु आहेच. खरे सांगायचे तर अमेरीकन युनिवर्सिटीतून मास्टर्स घेवून जी मंडळी बाहेर पडतात ती h1B लॉटरी वगैरे मुळे इंडीया आणि विशेष करुन चायनात परत जातात ते अमेरीकेसाठी जास्त काळजीचे आहे. दुसरे म्हणजे मेटॅलर्जी, मेक, केम, सिविल या क्षेत्रात इथल्या लहान आणि मध्यम कंपन्यांना जे पुढे मॅनेजर होऊ शकतील असे h1B उमेदवार हवे असतात ते सध्याच्या लॉटरीप्रकरणात मिळवणे दुरापास्त झाले आहे. भरपूर अर्ज करुन सिस्टिम फ्लड करणे चालते ते खरेच थांबायला आहे.

अमेरीकन युनिवर्सिटीतून मास्टर्स घेवून जी मंडळी बाहेर पडतात ती h1B लॉटरी वगैरे मुळे इंडीया आणि विशेष करुन चायनात परत जातात ते अमेरीकेसाठी जास्त काळजीचे आहे. >>> स्वाती२ - याकरताच मधे इथे शिक्षण घेतलेले लोक त्या कोट्यातून वगळले होते. ते पुन्हा बदलले का?

>>अमेरीकन युनिवर्सिटीतून मास्टर्स घेवून जी मंडळी बाहेर पडतात ती h1B लॉटरी वगैरे मुळे इंडीया आणि विशेष करुन चायनात परत जातात ते अमेरीकेसाठी जास्त काळजीचे आहे.<<

या काळजीमागचं मुख्य कारण वेगळं आहे - सर्वसाधारण अमेरिकन विद्यार्थी ग्रॅड डिग्रीच्या मागे लागत नाहि. त्यांच्या मते ते वेस्ट ऑफ टाइम आणि मनी असते. शिवाय पगारात असणारा फरक (अंडर्ग्रॅड, ग्रॅड) त्यांच्या मते ग्रॅड डिग्री मिळ्वण्याकरता लागणार्‍या वेळ/खर्चाला जस्टिफाय करत नाहि. ताबडतोब जॉब बघुन, ३-४ वर्षांनी एमबीए वगैरे करुन कार्पोरेट लॅडर चढण्याकडे त्याचा कल असतो. गेल्या काहि वर्षांत झालेल्या टेक्नॉलजी जॉब्स मुळे या अ‍ॅप्रोचला अजुन उभारी आलेली आहे. (यु डोंट रियली नीड अ ग्रॅड डिग्री टु राइट ए पिस ऑफ कोड).

थोडक्यात, हल्ली अमेरिकन्सचा कल उच्चशिक्षणाकडे नसल्याने साहजिकच परदेशातले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इथे येतात. पुर्वि हा रेशो साधारण ७०-३० (अमेरिकन्स-नॉनअमेरिकन्स) होता तर आता तो ३०-७० म्हणजेच रिवर्स झालेला आहे. मागे उठलेली बोंब (स्टेम फिल्ड मध्ये अमेरिकन्स्ची पिछेहाट) याच कारणामुळे होती...

मला वाटतं इथे शिक्षण घेतलेल्या लोकांसाठी वेगळा कोटा होता. पण त्या कोट्यासाठीही एवढे अर्ज येतात की तिथेही लॉटरी वगैरे व्हायची काही वर्षापूर्वी. सध्या काय परिस्थिती आहे माहीत नाही.

थोडक्यात, हल्ली अमेरिकन्सचा कल उच्चशिक्षणाकडे नसल्याने साहजिकच परदेशातले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इथे येतात. >> जर h1 व्हिसा मिळवणे अधिकच कठिण होणार असेल तर परदेशातले विद्यार्थी अमेरिकन विद्यापीठात येण्याचे प्रमाणही कमी होत जाईल असे वाटते.
अमेरिकन लोक जर उच्च शिक्षणाच्या वाटेला जात नसतील तर इथल्या विद्यापीठांना पुरेसे विद्यार्थी मिळणार तरी कसे?

फारेंड,
कोटा तोच आहे पण तो कधीच संपतो. एकेकाळी तो कोटा संपला तर उरलेल्या कोट्यातून नंबर लागे. हे अ‍ॅप्लिकेशन फ्लड/ लॉटरी सिस्टिममुळे योग्य उमेदवार उपलब्ध आहे, त्याला कामावर घ्यायचाय पण लॉटरी प्रकारामुळे घेता येत नाही असे होते. प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा फेरा करत लॉटरी लागेल म्हणून बसावे लागते. बरे हे काही कॉन्ट्रॅक्टचे जॉब नसतात. कायम स्वरुपी लाँगटर्म रिलेशनशिपच्या दृष्टीने हायर करायचे असते. आता २०२२ च्या प्रोटोटाईपवर काम करायला व्यक्ती घ्यायची तर ती ३-४ वर्षाचे जे प्रॉडक्शन सायकल आहे त्या दृष्टीने घेणार ना. या अनिश्चितीमुळे मास्टर्स वाले स्टुडंट आणि त्याना कायम स्वरुपी कामावर घेवू इच्छिणार्‍या कंपन्या दोन्हींचे नुकसान. खरेतर आयटी जॉब आणि नॉन आयटीसाठी दोन वेगळे कोटा ठेवले तर बरे होईल. उद्याचे प्लॅन्ट मॅनेजर म्हणून ग्रुम करता येइल अशा मास्टर्स डिग्री होल्डर्सना हायर करताना हा लॉटरी प्रकार अडचण होवून बसतो. जागा आहे , लायक उमेदवार आहे पण लॉटरी नाही हे अमेरीकन कंपन्या, ज्या लहान गावाच्या इकॉनॉमीत महत्वाच्या आहेत त्यांच्यासाठी आणि पर्यायाने अमेरीकन नागरीकांसाठी चांगले नाही.
अमेरीकन लोकं ग्रॅड स्कूल न करणे हे पूर्वीही होतेच. भारतात खाजगी इंजीनियरिंग कॉलेज नव्हती तेव्हा भारतातूनही मोजकेच लोकं इथे येत होते. पण तेव्हाची स्पर्धा आणि आताची स्पर्धा वेगळी आहे. तेव्हाचा चायना वेगळा होता आणि भारतही. आता परत जाणारे चायनिज हे तिकडे जी स्टार्टप सुरु करतात त्याची काळजी जास्त आहे इथल्या मंडळींना.

>>तर इथल्या विद्यापीठांना पुरेसे विद्यार्थी मिळणार तरी कसे?<<

ती भिती इथल्या विद्यापिठांना आहेच परंतु विद्यापिठातल्या जागा भरण्याकरता, स्टेम फिल्डमधल्या ह्युमन कॅपिटलचा र्‍हास रोखण्याकरता एच१ हे सोलुशन होऊ शकत नाहि...

>>असा तयार आंबा शोधून पटकन लग्न... <<
असच नाही, I 140 असेल तरी तो/ती H१ वरच काम करतात... मग H४ वरच यायला लागेल.. H४ ला डिपेन्डन्ट म्हणूनच यावं लागेल..
सध्याच्या वेट टाईम प्रमाणे दोघांना मुलं होऊन ती २१ वर्षाची झाल्यावर आई बाबांना(पक्षी आंबा व अंबालिका) डिपेन्डन्ट म्हणून लवकर GC मिळेल..

उदाहरणार्थ : युरोप किंवा जपान वगैरे देशातील आज जन्माला आलेला मुलगा/गी शिक्षण घेऊन जर ऊस (US) मध्ये काम करायला आला (~२५ ते ३० वर्षात) तरी त्याला तुमच्या जावयाच्या आधी GC मिळेल..

ती १०० के ची अट सगळ्या कंपन्यांना नाहीये. >> RISE act मध्ये १०० ची अट H१ साठी होती म्हणूनच इतर राज्यतल्यानी ओरडा ओरडी सुरु केली.. आता तो काही पास होत नाही पण मग तोंड वर करून म्हंतातरी येत चहा वाल्याना ...
इथे शिक्षण घेतलेले लोक त्या कोट्यातून वगळले >> त्यांच्या साठी २०k चा आणिक कोटा आहे ६५+२० मिळून ८५ h१.. पण बिचारे OPT वर अडकतात... आता त्यांना भारतात जायचा ऑपशन तरी आहे..

सगळ्यात वाईट अवस्था ज्यांची मुले इकडे (US) मध्ये जन्माला आली नाहीत (म्हणून H४ वर aahet) आणि आता कॉलेज मध्ये आहेत (साधारण २०१० ते २०१५ मध्ये १४० मिळालेले आई बाबा ) त्यांची आहे.. त्या मुलांपेक्षा डाका वाले बऱ्या बोटीत आहेत...
हे सोप्पं करायला एच आर - ३९२ बिल आहे पण अर्थात गाडीतल्या आतले लोक बाहेर असणाऱ्यांना मदत करत नाहीत (मनुष्य स्वभाव)

दुसरे म्हणजे मेटॅलर्जी, मेक, केम, सिविल या क्षेत्रात >> हे मात्र अगदी खरा.. ही सगळी लोक आयटी च्या गर्दीत मागे पडतात.. पण USCIS म्हणतानाच लॉटरी म्हणते त्यातच सगळं आलं ...

मी काही लिगल लॉयर वगैरे नाही हे नमूद करतो ...

"बाबा कामदेव - तो भावी नवरा कोणत्या कॅटेगरीत येतोय?" - ह्या प्रश्नाचं उत्तर अजुनही गुलदस्त्यातच आहे. Wink

स्टेम फिल्ड मधे सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यातही मुलींचा सहभाग वाढावा म्हणून एलिमेंटरी लेवलला प्रयत्न सुरु आहेत. कारण ३री-४थीची विंडो हुकली की गळती रोखणे कठीण जाते. तुटवडा भरुन काढायला h1 ची मदत होतेच पण आज त्यातील बहुतेक भाग हा आयटीचे आउटसोर्स यात जातो. त्यातून काही खरा स्टेमचा तुडवडा भरुन निघत नाही. आजकाल इथल्या अंडरग्रॅड मुलांना कंपन्या ऑनलाईन शिक्षण घेवून मास्टर्स करण्यासाठी सुविधा देवून स्टेममधील तुटवडा कमी करायचा प्रय्त्न करतायत.

सध्याच्या वेट टाईम प्रमाणे दोघांना मुलं होऊन ती २१ वर्षाची झाल्यावर आई बाबांना(पक्षी आंबा व अंबालिका) डिपेन्डन्ट म्हणून लवकर GC मिळेल,>>>
पण तात्या तिथेही बूच मारायला बघतोय. फॅमिली बेस्ड मायग्रेशन स्पाउस आणि मायनॉर चिल्ड्रनना रेस्ट्रिक्ट करायचं म्हणतोय. ईव्हन फॉर सिटीझन्स वाटतं.
(Unless you are Melania's parents! लबाड कुठला!)

कारण ३री-४थीची विंडो हुकली की गळती रोखणे कठीण जाते. >> हे कळले नाही इयता ३/४ म्हणत आहेत का?
आजकाल इथल्या >> म्हणजे कुठल्या ? पूर्ण यु एस का एखादी स्टेट म्हणताय?

हा आयटीचे आउटसोर्स यात जातो >> हे मला अजून पूर्ण कळलं नाही म्हणजे उदा " अँपल जिनिअस" असणारे लोक (स्टोर मध्ये काम करणारी) कोणतातरी ऑनलाईन कोर्से करून IT डेव्हलपर म्हणून का काम करत नाहीत ? पगार जास्त मिळतो का इतर कारण आहेत ?

"बाबा कामदेव - तो भावी नवरा कोणत्या कॅटेगरीत येतोय?" >> बाबा कामदेवांचा भावी नवरा असं वाचलं Happy "not that anything wrong with that" Happy

एक महिती हवी म्हणून विचारतो - हे सगळे फक्त अमेरिकेतच आहे का? इतर अनेक देशांत भारतीय जातात, तिथे त्यांच्या बायकांना नोकर्‍या करता येतात का?
असतील तर तिथे जावे. मग अमेरिका बघायला टूरिस्ट कंपनीतर्फे यावे. किंवा व्हिजिटर्स व्हिसा वर. आजकाल काय भारतातून वाट्टेल तेव्हढे डॉलर्स आणता येतात म्हणे. मग इथे येऊन नोकरी करण्याची काय गरज?? मज्जा करायला, बघायला यावे.

पूर्ण यु एस का एखादी स्टेट म्हणताय?>> पूर्ण युएस मधे. स्टेम क्षेत्रात पुढे करीयर करण्याच्या दृष्टीने या विषयाची गोडी लावणे जे असते ते मुलींच्या बाबतीत तरी ३री -४थीच्या वयात केले तर पुढे त्याचे चांगले परीणाम दिसून येतात. मिडलस्कूलपर्यंत थांबले की पारंपारिक पियर प्रेशरमुळे गळतीचे प्रमाण वाढते.
>>
हे मला अजून पूर्ण कळलं नाही म्हणजे उदा " अँपल जिनिअस" असणारे लोक (स्टोर मध्ये काम करणारी) कोणतातरी ऑनलाईन कोर्से करून IT डेव्हलपर म्हणून का काम करत नाहीत ? पगार जास्त मिळतो का इतर कारण आहेत ?>> ती मुलं हायस्कूल-कॉलेज संभाळून पार्टटाईम काम करतात. शिक्षण पूर्ण झाले की आवडीच्या क्षेत्रात नोकरी करतात.
अवांतरः माझ्या मुलाचा मित्र करायचा तसे काम. त्याने साडेचार वर्षात डबल मेजर केलं. चौथ्या वर्षाच्या सुरवातीलाच जॉब ऑफर हातात होती.

<<< हे सगळे फक्त अमेरिकेतच आहे का? इतर अनेक देशांत भारतीय जातात, तिथे त्यांच्या बायकांना नोकर्‍या करता येतात का?
असतील तर तिथे जावे. मग अमेरिका बघायला टूरिस्ट कंपनीतर्फे यावे. >>>
एकदम मुद्द्याचे बोललात. ग्रीनकार्ड मिळायला इतका त्रास आहे, तर अमेरिकाच कशाला पाहिजे? कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा युरोपातील इतर अनेक देश आहेत की इमिग्रेशनला अनुकूल. जिथे संधी मिळेल तिथे जायचे, वाट बघायची नाही.
https://siia.us ही तर एकदम धमाल साईट आहे. अमेरिकेने काय नियम करावेत हे इतर सांगणार अमेरिकेन गव्हर्न्मेंट्ला. मजा आहे.

बाबा कामदेव, त्या मुलीला सांगा की जिथे संधी मिळेल तिथे जा, अमेरिकाच पाहिजे हा हट्ट नको. नाहीतर तेलही गेले, तूपही गेले हाती धुपाटणे आले, अशी अवस्था होईल.

एक महिती हवी म्हणून विचारतो - हे सगळे फक्त अमेरिकेतच आहे का? >>
आता हे आम्ही तुम्हाला विचारायचा का तुम्ही आम्हाला ? तुम्ही (पक्षी १९८० ते १९९० ? मध्ये ) आलात आणि तिकडे सांगितलं कि मारुतीच्या बेंबीत कस गार वाटतं.. मग सगळे मागे लाईन लावून उभे राहिले आणि इकडे २००० नंतर पैसे वाचवण्यासाठी सगळ्या आय टी कंपन्यांनी झुंडीने लोक आणली.. त्यात त्यांनी आम्हाला सांगितलं गार वाटतं मग आलो.. आता आम्हाला सांगावस वाटतं कि काहीतरी चावतंय विचार करा..

https://www.gcreforms.org/waittimes/

दुसऱ्या देशात (माझ्या माहिती प्रमाणे दोघांना काम करता येत नोकरी असेल तर )

मज्जा करायला, बघायला यावे.>> तेही दिवस येणार तात्यांचं जे काही चालू आहे ते असाच चालू राहील तर १०/१५ वर्षाने "मज्जा बघायलाच" लोक येतील इकडे..
ती मुलं हायस्कूल-कॉलेज संभाळून पार्टटाईम काम करतात >> मी बघितलेल्या स्टोर मध्ये तरी मुलं वाटणारी न्हवती (त्यांची ही काही कारण असतील) म्हणूनच मला काही लॉजिक लागलं नाही..

त्या मुलीला सांगा की जिथे संधी मिळेल >> आता ती मुलगी मुलगा कसा आहे हे बघायच्या ऐवजी कोणता व्हिसा आहे हे बघणार असेल तर काय म्हणायचं?

https://siia.us ही तर एकदम धमाल साईट आहे >>ती lobbying ग्रुप आहे सगळ्या लीगल इमिग्रंट साठी Wink डाका वाल्यांची पण आहे साईट पण.. .आणि RHC vale तात्या रामराज्य आणणार म्हणत असतील तर ह्यांनी काय घोडा मारलाय ? तेच परत आतले बाहेरचे वगैरे वगैरे

मिडलस्कूलपर्यंत थांबले की पारंपारिक पियर प्रेशरमुळे गळतीचे प्रमाण वाढते.>> हे नीटसं कळल नाही. असं कोणतं पियर प्रेशर असतं की ज्यामुळे मुली स्टेम विषयांपासून दूर जातात? आमच्या ऑफिसमधे पण ह्या विषयावर अधूनमधून चर्चा झडत असतात. मी science graduate आहे तेव्हा माझ्या आई-बाबांनी मला science ची गोडी लागावी म्हणून काही खास प्रयत्न केले का? असं पण मला अनेकदा विचारलं जातं. आता असे काही खास प्रयत्न माझ्या आई-बाबांनी केल्याचे मलातरी आठवत नाही. मग भारतासारख्या developing country मधल्या मुली आनंदाने स्टेम विषय शिकायला तयार होतात तर अमेरिकेसारख्या developed/ first world country मध्ये ही समस्या का? असा प्रश्न मला नेहमी पडतो.

ती lobbying ग्रुप आहे* पण त्यांना पावर नाय व पैसे पण नाय व लीगल इमिग्रण्टस व्होट करता येत नसल्याने राजकारणी सुद्धा धूप देत नाहीत पण ५ मिनिटांनपूर्व तरी १st amendment मुळे (इकडच्या लोकांना) वाट्टेल ते बोलता येत होत.. आता गेल्या ५ मिनिटात ट्विटर चेक केला नाही मी Happy ..

फेफ. मुलगा फायनल नाही केला अजून . पन ओफर्स तिकडच्या आहेत. मुलगी इथेच आय टी मध्ये आहे. तिकडे जॉब करता येत नसेल तर जाऊ नये असा निर्णय होतो आहे. नंद्या ४३ यानी विचारलेला प्रश्न महत्वाचा आहे. इतर देशात ऑपॉर्च्यु निटीज कशा आहेत? कारण माबो ची मंडळी यू एस वगळता इतरत्रही आहेत.
एक धमकी: नंद्या यांच्या प्रश्नाचे उत्तर येथे देता की वेगळा धागा काढू ? Happy

मधु,मलिष्टे,
तसलं काही नाही. मी १९७० मधे आलो. तेंव्हा भारतात पेपरांत जाहिराती यायच्या की अमेरिका, कॅनडा यांना इंजिनियर लोकांची गरज आहे. त्या वेळी आम्ही सहज अर्ज केला, आमच्या सवडीने एकदम ग्रीन कार्ड घेऊनच इथे आलो. इथे आल्यावर नोकरी शोधणे कठीण. मिळेल त्या नोकर्‍या घ्यायच्या. बरे तर बरे, त्या काळी कॉम्प्यूटर चे स्पेलिंग येत असले की कोडिंगच्या नोकर्‍या मिळत. नंतरहि बरीच वर्षे, काहीच जमले नाही तर प्रोग्रामर म्हणून नोकरी नक्की. डिग्री बिग्री ची भानगड नाही!
इथे आल्यावर २५ वर्षे भारताशी पाSर संबंध तुटला. फोन सुद्धा करणे कठीण, तारा मिळायला ४ दिवस, परत उत्तर यायला आणखी दोन! पत्र तर १५-२० दिवसांनी मिळायचे. कोण क्रिकेटपटू, कोण नट नट्या काSही माहित नाही. काँग्रेसचे राज्य गेले , इंदिरा नि तिचा पायलट मुलगा यांचे खून झाले म्हणे. अनेक लोक पंतप्रधान होऊन गेले. जाम पत्ता नाही. मग काय? इथलेच खाणे, नि इथलेच सगळे काही.
त्या उलट ९० नंतर आलेले - त्यांचा भारताशी कधी संबंध तुटलाच नाही, ते अजून पक्के भारतीयच आहेत. त्यांचे आमचे विचार वेगळे, बोलायचे विषय वेगळे. आता १९९० नंतर आलेल्या लोकांची आमच्याशी तुलना करू नका. कारण त्यात काहिहि साम्य नाही.
त्यांना खरेच काँप्युटरमधले काही काही कळते म्हणे!

असं मनाला लावून घेऊ नका हो, मला माहित आहे तुम्ही ७० च्या सुमारास आलात आणि तुम्ही म्हणताय तसं ९०/२००० च्या सुमारास माहिती पटापट मिळू लागली.. yahoo/AOL ई-मेल मेसेंजर मुळे .. आणि आम्हाला काय कोणी जबरदस्तीनं आणल नाही .. हे अगं अगं म्हशी सारखा आहे .. पण आता लागणाऱ्या वेळे मुळे अडकल्या सारखा वाटतंय (अडकलो नाही.. तस वाटतंय)
तुमच स्ट्रगल वायल व आमचं (?) वायल.. त्या वेळी लोकल पब्लिक मागे लागलेले आता तात्या मागे लागलेत...

आणि सध्या Scotch and Splenda time असल्याने इकडे लिहायला वेळ मिळाला, म्हणून लिहिल.. तेवढेच आणि दोन लोकांना आत्ताचे प्रॉब्लेम कळतील..

असं मनाला लावून घेऊ नका हो, मला माहित आहे तुम्ही ७० च्या सुमारास आलात आणि तुम्ही म्हणताय तसं ९०/२००० च्या सुमारास माहिती पटापट मिळू लागली.. yahoo/AOL ई-मेल मेसेंजर मुळे .. आणि आम्हाला काय कोणी जबरदस्तीनं आणल नाही .. हे अगं अगं म्हशी सारखा आहे .. पण आता लागणाऱ्या वेळे मुळे अडकल्या सारखा वाटतंय (अडकलो नाही.. तस वाटतंय)
तुमच स्ट्रगल वायल व आमचं (?) वायल.. त्या वेळी लोकल पब्लिक मागे लागलेले आता तात्या मागे लागलेत...

आणि सध्या Scotch and Splenda time असल्याने इकडे लिहायला वेळ मिळाला, म्हणून लिहिल.. तेवढेच आणि दोन लोकांना आत्ताचे प्रॉब्लेम कळतील..

खरे आहे.

खरे आहे.
बोलावल्याशिवाय आल्यावर फारसा चांगला पाहुणचार मिळतच नाही इथे. इथे अतिथीला गोळ्या घालून ठार मारतात. फारच सभ्य व सुसंस्कृत असतील तर पोलीसला बोलावतात!
गेली काही वर्षे जरा आव जाव घर तुम्हारा असे होते, आता तात्याला भारतातून येणारे लोक नि दक्षिण अमेरिकेतून येणारे लोक यांच्यातला फरक कळत नाही. हे भारतीयांचे दुर्दैव.
असे काहीसे म्हणतात की पंडित लोकांच्या सभेत वाद घातले तर ज्ञानवृद्धि होते, गाढवांच्या सभेत फक्त लाथाळ्या!
इथले रिपब्लिकन, डेमोक्रॅट्स नि त्यांना मते देणारे, टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मिडिया हे सगळे मिळून जे काय चालले आहे त्याला फक्त गाढवांचा गोंधळ म्हणणेच योग्य ठरेल.
म्हणून भारतीयांनी सध्या इतर देशांत जावे. गरज त्यांना नाहीये, खुद्द भारतातच कॉम्प्युटर सिस्टिम्स करायला भरपूर वाव आहे. पैसे मिळतील, सुखात रहावे. काही वर्षांपूर्वी मी पण प्रयत्न केला होता पण भारताला नको आहेत लोक. सगळे काही भारतात आहे, ज्ञान, लोक सगळे.

कॅनडात भावी नवरा एका वर्षापेक्षा जास्त रहात असेल तर तो पी.आर. झालाच असेल. स्टूडंट असला तर तो जाउ नये म्हणून त्याला पीआर देतात. वर्क व्हीसावर असला आणि १ वर्षे कनेडिअन अनुभव असला तर पी. आर. ला डायरेक्ट अ‍ॅप्लाय करु श़कता. पण नसला तरी बॉर्डर वर डिपेंडंट स्पाउसचं स्टॅपिंग करताना जॉब करायचाय का विचारतात. हो म्हटलं तर पार्टनरचं पर्मिट संपे पर्यंत वर्क व्हिसा देतात.
पी.आर असेल तर फॅमिली क्लास मध्ये पी.आर. ला अ‍ॅप्लाय करुन, आधी फियॉन्से व्हिसावर जाता येईल.

अमितव>>> +१
कॅनडा मध्ये पी. आर मिळायला सोपे आहे. जर STEM मध्ये डिग्री असेल तर कॅनडामध्ये जायाचा आधी नौकरी नसताना पण पी आर मिळु शकतो.
पण कॅनडा मध्ये अमेरिकेपेक्षा नोकरी मिळणे अवघड आहे. कित्येक कॅनेडियन अमेरिकेत नोकरीसाठी येतात.

Pages