गुजराथ निवडणुक २०१७ आणि अन्वयार्थ

Submitted by नितीनचंद्र on 21 December, 2017 - 08:22

गुजराथ निवडणुक २०१७ आणि अन्वयार्थ

गुजराथ निवडणुक संपली धुरळा खाली बसतोय. दोन्ही पक्ष निकालाच अवलोकन करत आहेत. भाजपला या निवडणूकीत सत्ता टिकवण्यापुरते यश मिळाले तर कॉग्रेसचे आमदार वाढून विश्वास वाढला. याला ते नैतीक यश म्हणतात.

दोन्ही पक्षांना ही निवडणुक महत्वाची आहे हे समजत होत यासाठी निवडणुक पुर्व हालचाली १-२ वर्षे आधीच सुरु झाल्या असाव्यात. यात कॉंग्रेसने आघाडी घेऊन पाटीदारांना चुचकारले. हीच कृती महाराष्ट्रात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसने सरकारने २०१४ च्या आधी केली होती. मराठा आरक्षणाला प्रोत्साहन देऊन या सत्ताधारी पक्षाने अनेकांना आशेला लावले. इतकच नव्हे तर विधानसभेत ठराव करुन अध्यादेश काढून ही मंडळी निवडणुकीला सामोरे जाण्याचे स्वप्न पहात होते. मराठा आरक्षण बरोबर की चुक या वादात मला जायचे नाही. पण असे आरक्षण संविधानीक नाही. आता घटनेने ५० टक्के पेक्षा जास्त आरक्षण देता येत नाही ही त्यातली कायदेशीर अडचण आहे. महाराष्ट्रात एका व्यक्तीने या आरक्षणाच्या अध्यादेशाला हायकोर्टात चॅलेंज देऊन तो आदेश गुंडाळावा लागला.

त्याआधी मराठ्यांना ओबीसी करावे व ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे या हालचालींना छ्गन भुजबळ यांनी पक्षात राहून तर विरोधात असलेले स्व. गोपीनाथजी मुंढे यांनी विरोध केला. यामुळे ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची चाल बाद झाली होती.

या पार्वभुमीवर कॉंग्रेसने बाद ठरलेल्या चालीचा वापर करत पाटीदार नेता हार्दीक पटेलला उभा करुन एक अभुतपुर्व आंदोलन उभे केले. महाराष्ट्रात जशी मराठा शेतकरी अल्पभुधारक कुटुंबाची अवस्था आहे तशी गुजराथ मधे नाही. हा समाज व्यापार आणि शेतीच्या मार्गाने बराच सधन आहे तसाच तो सुशिक्षीतही आहे. कुठेतरी अल्पभुधारक असेलही पण महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ते प्रमाण नाही. म्हणुनच की काय या समाजाच्या मागणीला भाजपच्या गुजराथ सरकारने चर्चेने सामोरे जाऊन पाहिले. मग त्यांनी कायद्याचा बडगा दाखवून हार्दीक पटेल आणि अनेक नेत्यांना अटक करुन ठेवली. यातून विद्रोहाचा सुर पुढे आला. याच बरोबर त्यांच्या आरक्षणाला विरोध दर्शविणारे समाज कॉंग्रेसने जोडुन एक तीन तरुण नेत्यांची एक फ़ळी भाजप विरोधात उभी केली. या पैकी एक नेता कॉंग्रेस मधे सामील झाला तर दुसरा स्वतंत्र राहीला.

भाजपने ही सुरवातीला शंकरसिंह वाघेला या मोदींच्या एकेकाळच्या भाजपमधील प्रतिस्पर्धी नंतर कॉंग्रेसवासी होऊन अनेक काळ गुजराथ प्रदेशाध्यक्ष राहीलेल्या तसेच अल्पकाळ कॉंग्रेसचे मुख्यमंत्रीपद भोगलेल्या नेत्याला फ़ोडले. त्यांनी गुजराथ कॉंग्रेस अध्यक्षपदाचा आणि प्रार्थमीक सदस्यात्वाचा सुध्दा राजीनामा दिला. कारण साहजीक होते. मोदी, वाघेला आणि माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल हे जुने संघ स्वयंसेवक. सुरवातीला भाजप गुजराथेत उभा करण्यासाठी तिघांनी जीवाचे रान केले होते. यापैकी मागच्या निवडणुकीत आपल्या राजकीय आकांक्षा पुर्तीसाठी केशुभाई पटेलांनी भाजप सोडुन स्वतंत्र पक्ष उभारुन हार पत्करुन माघार घेतली होती तर शंकरसिंह वाघेला लोकसभेतले भाजपचे यश पाहून थंड पडले असावेत. जुना संघाचा संदर्भ त्याचे मत परिवर्तन करताना कामी आला असावा.

भाजपने कितीही नाही म्हणले तरी निवडणुक सोपी नाही म्हणल्यावर गुजराथ निवडणुका पुढे ढकलण्याची खेळी मात्र निवडणुक आयोगाला बरोबर घेऊन भाजपने जिंकली. यात काही बाबी अश्या असतात जसे राज्य सरकारचे प्रतिनीधीच निवडणुका पार पाडतात त्यामुळे जोवर ते निवडणुकीच्या प्रक्रियेची तयारी पुर्ण करत नाहीत तोवर निवडणुकांच्या तारखा स्वतंत्र असलेल्या निवडणुक आयोगाला जाहीर करता येत नाहीत. त्यामुळे निवडणुक आयोगाचे अस्तित्व हे राज्य सरकारच्या किंवा पोलीसांच्या बाबतीत केंद्र सरकारच्या सहकार्यावरच अवलंबून असते.

भाजपने गुजराथमधील कॉंग्रेसचे चाणाक्य अहमद पटेलांच्या राज्यसभा निवडणुकीत त्यांना पाडण्यासाठी काही आमदार फ़ोडले ज्यांची टर्म संपत आली होती. यापैकी दोघांनी भाजप प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवत मतदान केले. नेमका हाच आधार उचलून अहमद पटेलांनी ती मते बाद करत आपली राज्यसभेतली खासदारकी टिकवली. यातून भाजपने काय साधले माहीत नाही पण जीवावर बेतलेली मांजर माणसाच्या मानेला पकडून जीवघेणा हल्ला करते म्हणतात तसेच काहीसे झाले असावे.

या सगळ्या पार्श्वभुमीवर राहूल गांधी यांनी केलेला प्रचार आत्मविश्वास पुर्ण होता. मिडीया मॅनेज करत या प्रचाराला मिळालेली प्रसिद्धीने भाजपच्या तोंडचे पाणी पळविले. भाजप मुळे अनेक राज्यस्तरावरील पक्ष बाद होण्याचा सिलसीला सुरु झाल्याने त्या सर्वांनी मोट बांधून आपली पारंपारीक मते विभाजन न होता कॉंग्रेसच्या पारड्यात टाकायची निती केल्याने भाजपला अनेक जुन्या आमदारांना पुन्हा तिकीट देण्याचे ठरवावे लागले. असे न करावे तर ते बंडखोर होऊन भाजपची मते खातील ही भिती होतीच.

भाजपने परदेशी दौर्यात डॉ. मनमोहन सिंग जसे खाजगी वाहिन्यांचे पत्रकार घेऊन जात ते बंद केल्याने खावखुजाव पत्रकारांची मोठी फ़ौज कदाचीत अल्प पॅकेज घेऊ्न व स्वत: चा मोदी विरोधी अजेंडा घेऊनच कॉंग्रेसच्या मदतीला या निवडणुकीत आली त्यामुळे भाजपला आपल्या कार्यकर्ते बरोबर घेऊनच निवडणुकीत अपप्रचाराला तोंड द्यावे लागले. सोशल मिडीयात अपप्रचार करण्याची संधी कॉंग्रेसने द्वडली नाही आणि कॉंग्रेसने त्याचाही फ़ायदा कॉग्रेसने मिळवला.

कपडा मार्केटमधले व्यापारी जी एस टी मुळे विरोधात तर शेतकरी तात्कालीक कारणे घेऊन विरोधात अश्या असंख्य अडचणीला तोंड देत भाजपला आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागली. विकास होणे यासाठी गुजराथच्या जनतेला रस्त्यावर यावे लागले नाही इतक्या वेगाने मोदी मुख्यमंत्री असताना विकास झाला ज्याची किंमत गुजराथमधील मतदारांनी कॉंग्रेसला हरवून तीन वेळा मोदींच्या पारड्यात टाकली तर लोकसभेत एकही जागा कॉंग्रेसला मिळू न देता मोठे संख्याबळ मोदींना पंतप्रधान होताना दिले. त्यांच्या मते मोदींनी त्यांना काय दिले तर नोट बंदीने दिलेल्या अडचणी तर पाठोपाठ जीएसटी ची किचकट प्रक्रिया. यातून मोदींना थोडे कापायचे पण आडवे पाडायचे नाही असा चंगच अनेकांनी बांधला. देशभरातले रेरा या जाचक अटींनी त्रासलेले बिल्डर्स आपले राजनितीज्ञ आणी साधने घेऊन कॉग्रेसच्या मागे उभे राहीले.

बुलेट ट्रेनच्या उदघाटनाचे औचीत्य साधात मोदींनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला पण त्यात फ़ारसे यश आले नाही. तर दुसर्या बाजूला २८ मंदीरातून दर्शन घेत मी हिंदुच आहे असे दाखवण्याचा प्रयत्न राहूल गांधींनी केला. यावर निवडणुक निकालाच्या वेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी टीका केली असली तरी ती महाराष्ट्रात हे करु नका सांगण्यापुर्ती होती. निकालानंतर अखिलेश यादव यांनी राहूल गांधींची तारीफ़ केली. अन्य कोणत्याही कॉंग्रेस सहयोगी पक्षाने किंवा भाजप विरोधी राज्यस्तरीय पक्षाने पुढील निवडणुकात या मुद्यावर आपले जमणार नाही असे म्हणलेले नाही इतपत राजकारण सर्वांना समजते.

मोदींनी विकासचा मंत्रा आळवायचा प्रयत्न करताच विकास वेडा झाला आहे असे म्हणत त्या मंत्राची कॉंग्रेस, सोशल मिडीया किंवा पत्रकारांनी वाट लावली. हा मंत्र न कंटाळता आळवला गेला. अमित शहांनी एका मुलाखतीत साबरमती रिव्हर फ़्रंटला बसुन विकास झालच नाही असे राहूल गांधी कसे म्हणू शकतात यावर टीका केली. पण गुजराथी मतदार हे जाणुन होता की या सर्व विकासाची किंमत आम्ही आधीच मोजली आहे आता पुढे बोला. मग जीएसटी मधे सुधारणा करुन तसेच शेअर मार्केटमधील गुजराथी बांधवांना आम्ही हरलो तर शेअर मार्केट पडणार याची भिती दाखवत जिंकली. मुंबईच्या स्टॉक मार्केटमधे गुजराथी लॉबी हा आपला फ़ायदा जाणुन प्रचाराला लागली. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेव्हा भाजप हरतो की काय अशी भिती दिसताच १००० पॉइंटनी शेअर मार्केट १८ तारखेला सकाळी पडले जे भाजपच सत्तेवर येणार याची खात्री झाल्यावर शुक्रवार पेक्षा १०० पॉइंटनी वधारुन बंद झाले.

राहूल गांधींना मोदी त्यांच्यावर केलेल्या टीकेचा ऐनवेळी फ़ायदा घेत निवडणुक जिंकतील हे माहित होते त्यामुळे कुठेही अपमानास्पद भाषा न वापरता प्रचार करण्याचा आदेश त्यांनी काढून उत्साही कॉंग्रेसजनांची घोडी लगाम लाऊन खेचली होती. पण भाजपच्या केंद्रातल्या कामगीरीने अस्वस्थ होत मणीशंकर अय्यरांनी एक वेगळाच फ़्रंट उघडला. एक वर्ष आधी ते पाकिस्थानात जाऊन तिथल्या मिडीयाला चुचकारुन आले. काश्मिरमधल्या अलगाव वादी नेत्यांना भेटुन त्यांना अतिरीकी कारवाया वाढवा अशी सुपारी देऊन आले की काय असे वागत गुजराथ निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्थानी हायकमिशनर, माजी परराष्ट्रमंत्री , भारताचे माजी सेनाध्यक्ष आणि माजी उपराष्ट्रपती यांना भोजनाला बोलावले. त्या भोजनाच्या वेळी काय काय घडले हा तपशील आता भाजप सरकार हळू हळू गोळा करेल. पण त्यानंतर मोदी कसे नीच आहेत, गंदे नालीके किडे आहेत हे शब्द मात्र त्यांच्या तोंडून निसटले आणि तेंव्हा निवडणुकीचा पहिला टप्पा संपला होता. या टप्यात भाजपला फ़ारसे मतदान झाले नाही हे भाजपला ही समजले असेल तोच आयते कोलीत मोदींच्या हातात मिळाले.

दुसरा टप्पा संपायच्या आत उसंत न घेता, अगदी घसा बसे पर्येंत मोदींनी प्रचार केला आणि विजय आपल्या बाजूला खेचून आणला. ही निवडणुक सोपी नव्हती. एकतर्फ़ी झाली नाही. विजय नेमका कोणाचा हे एक्झीट पोलने दाखवले असले तरी त्याची विश्वासार्हता किती यामुळे भाजप नेते हवालदील झाले होते.

याचा अन्वयार्थ सांगायचा झाला तर

१. कॉग्रेसने आपली मते पक्की केली तर अन्य विरोधी पक्षाने कॉंग्रेसच्या पारड्यात ती मते टाकून ही निवडणुक चुरशीची केली.
२. या निवडणुकीत कॉंग्रेसची मदार आपल्या स्वत:च्या स्ट्रेटीजीस्ट वर अवलंबुन होती. नवलकिशोर शर्मा या भाडोत्री स्ट्रेटीजीस्ट ने
आखणी केली नसावी कारण उत्तर प्रदेश निवडणुकात त्याची स्ट्रेटीजी फ़ारच अपयशी ठरली.
३. कॉग्रेसने आपल्या पारंपारीक समधर्मसमभाव किंवा अल्पसंख्यांकाना जाहीर कुरवाळ्ण्याचा कार्येक्रम केला नाही.
४. मणीशंकर अय्यर यांना पक्षातून काढून ताबडतोब डॅमेज कंट्रोल केला पण ज्याचा उपयोग झाला नाही.
५. मोदींना गुजराथमधे हरवता येऊ शकते तर भारतात सुध्दा येऊ शकते हा आत्मविश्वास कॉंग्रेसजनांनी हार खाऊनही मिळवला.
६. भाजपसाठी आता येणारी कोणत्याही राज्यातील निवडणुक सोपी नक्कीच नाही तर २०१९ लोकसभा अतितटीची होऊ शकते.
७. यापुढे भाजप राज्यस्तरीय पक्षांशी मिळते जुळते घेईल किंवा अडगळीत गेलेले किंवा अल्प अस्तीत्व असलेले पक्ष मोठे करेल.
८. २०१९ ची लोकसभा कोण जिंकणार यावर कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यात कॉंग्रेस किती यश मिळवते
यावर अवलंबुन असेल. कर्नाटक मधे सत्ता भाजपला मिळवता आली तर आणि मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यात टिकवता आली तर भाजपचे केंद्रामधील स्थान मजबूत होईल.
९. तात्कालीक प्रश्न मोठे ठरतात आणि विश्वासार्हता नसलेले पक्ष आणि नेते सुध्दा मोठा लढा देऊ शकतात हे अधोरेखीत झाले.
१०. जनता आज काय मिळते याकडे पहाते आणि दिर्घकाळ विश्वास ठेवायला भाजपवर अजुनही तयार नाही.

पाहूया पुढे काय घडते ?

नितीन जोगळेकर

माझ्या नावासकट पुढे करायला माझी अजिबात हरकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून निवडणुकीची सुत्रे हलविणरा नवलकिशोर शर्मा नसून प्रशांत किशोर होता अशी माझी माहिती असावी.

तुम्हाला बर्‍याच आतल्या गोटातल्या गोष्टी माहीत आहेत असं दिसतं. जसं पाटीदार आंदोलन काँग्रेसने उभं केलं. (अर्थात देशात मोदीसरकारविरोधात जे जे असतं, ते सगळं काँग्रेसच घडवून आणतं)

निवडणुका ढकलण्याची भाजपची 'खेळी' होती, हे मान्य केल्याबद्दल अभिनंदन.

भाजपच्या बाजूचेही मीडिया आणि पत्रकार आहेतच की. त्यांचा बिचार्‍यांचा अनुल्लेख का? निकालानंतर (पराभवानंतर) सहा तासांत राहुल गांधी सिनेमा बघायला कसे काय जाऊ शकतात असा प्रश्न त्यांना पडलाय.

सोशल मीडियात अपप्रचार? भाजपकडूनच शिकली असेल काँग्रेस.

हुसेन दलवाई काँग्रेसमध्ये आहेत. राकॉ नाही.

<त्या भोजनाच्या वेळी काय काय घडले हा तपशील आता भाजप सरकार हळू हळू गोळा करेल> तपशील यायच्या आधीच माझ्यासाठी सुपारी दिली असले काय काय आरोप करून मोदी मोकळे झाले? याला अपप्रचार म्हणत नसावेत.
गंदे नालीका कीडा म्हटलेलं का?
नीच किस्म का आदमी म्हटलं ते डॉ आंबेडकर का नाम काँग्रेस मिटा रही है, असा आरोप मोदींनी केला त्यासंदर्भात. आंबेडकरांचं योगदान कॉंग्रेसने दडपलं असा त्यांचा(मोदी) शोध आहे.
नवलकिशोर शर्मा भाडोत्री स्ट्रॅटजिस्ट? तुम्हाला प्रशांत किशोर म्हणायचं असावं. ते २०१४ मध्ये भाजपचे भाडोत्री स्ट्रॅटेजिस्त होते आणि बिहार विधानसभा निवडणुकांत जदकडे होते.
<२०१९ ची लोकसभा कोण जिंकणार यावर कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यात कॉंग्रेस किती यश मिळवते यावर अवलंबुन असेल.> हे उलट आहे. विधानसभा निवडणुका आधी आहेत.

विश्वासार्हता नसलेले पक्ष आणि नेते - हे सापेक्ष असतं हे लक्षात आलं तरी पुरे.

भरत साहेब
भक्ताने मलमपट्टी साठी सुदोपसुंदी लेख लिहिला आहे
इतका काय त्यात चुका काढत आहे?
जरा शतक हुकल्याचे दुःख समजून घ्या.

हाय्ला!

चक्क चंद्रूभौ!

राम्रामो दादा. लय दिवसानी, ते पण राज्कियवर! चान चान.

भाजपने परदेशी दौर्यात डॉ. मनमोहन सिंग जसे खाजगी वाहिन्यांचे पत्रकार घेऊन जात ते बंद केल्याने >>>>>>>> कोणत्या तोंडाने नेणार जर अम्बानी, अडानी बरोबर असतील तर

Submitted by भरत. on 21 December, 2017 - 10:35 >>> या पोस्टला पुर्ण सहमती.

डेविल लाइज इन द डिटेल्स...;-)

प्रशांतकिशोर, जुगलकिशोर, नवलकिशोर..... आणि तोही शर्मा?
इथंच घोडं पेंड खातंय... तर बाकीचा लेख किती अभ्यासपूर्ण असेल याची कल्पना येतेच.

इथंच घोडं पेंड खातंय... तर बाकीचा लेख किती अभ्यासपूर्ण असेल याची कल्पना येतेच. >>> खुप चुका आहेत लेखात.

उदा. -
१. कॉग्रेसने आपली मते पक्की केली तर अन्य विरोधी पक्षाने कॉंग्रेसच्या पारड्यात ती मते टाकून ही निवडणुक चुरशीची केली. >>>>> जवळजवळ सगळिकडे कांग्रेस हरण्यात राष्ट्रवादी आणी बसपा चा कसा हात होता या वर चर्चा झाली आहे आणी सगळ्यांनी हे मान्यहि केले आहे.

अश्या बर्याच चुका आहेत ज्या खुप मोठ्या आहेत. अजुन अभ्यास करणे जरुरी आहे लेख लिहिण्याआधी.

राहुलका, हा लेख केवळ मतप्रदर्शन आहे. अभ्यासपूर्ण विवेचन-विश्लेषण नव्हे. अनेक अगदी ऑब्वियस (आणि पक्षभूमिकानिरपेक्ष) गोष्टीसुद्धा लेखकाला माहित नाहीत असे दिसते.

<गुजराथ निवडणुकीच्या तोंडावर पाकिस्थानी हायकमिशनर, माजी परराष्ट्रमंत्री , भारताचे माजी सेनाध्यक्ष आणि माजी उपराष्ट्रपती यांना भोजनाला बोलावले. त्या भोजनाच्या वेळी काय काय घडले हा तपशील आता भाजप सरकार हळू हळू गोळा करेल. >

यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात विचारणा केली गेली तेव्हा या सांगोवांगीच्या बाता आहेत, असं सांगितलं गेलं.
अर्थात अशा बाता करणं हा प्रधानप्रचारकाला मिळालेला वैचारिक वारसा असल्याने त्याचे नवल वाटत नाही. पण पंतप्रधानपदावरची व्यक्ती जनमत वळवण्यासाठी, ज्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हायला हवे, असे देशद्रोहाचे, भक्तांच्या नजरेतील (कारण सरकारने तसे घोषित केलेले नाही) शत्रूराष्ट्राशी संगनमत केल्याचे आरोप प्रचारसभेत करते आणि तरीही ते विचारी म्हणवल्या जाणार्‍या भक्तांना खटकत नाही, यात बरंच काही येतं.
पार्टी विथ अ डिफरन्स, राष्ट्रीय चारित्र्याचं निर्माण, यंव आणि त्यंव.

<< शत्रूराष्ट्राशी संगनमत केल्याचे आरोप प्रचारसभेत करते आणि तरीही ते विचारी म्हणवल्या जाणार्‍या भक्तांना खटकत नाही, यात बरंच काही येतं. >>
------- भक्त म्हणा किव्वा विचारी.... भक्त विचार करत नसतो.... खरा विचारी कुणाचाही भक्त नसतो.

कुठल्याही मार्गाने सत्ता मिळायला हवी, मार्ग महत्वाचे नाही आहेत... असे मेन्दूला सान्गायचे.