मला माझ्या नावाचा अर्थ सांगा / नाहीतर लावा

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 December, 2017 - 10:10

"ज्यांनी नाव ठेवलेय त्यांनाच विचार ना? आपल्या आईबाबांना विचार ना..."

पहिलाच प्रश्न हाच मनात आला असेल तुमच्या. म्हणून विनम्रतेने क्लीअर करू इच्छितो, माझ्या आईवडीलांनी मला एक छानसे गोंडस नाव ठेवले आहे. आणि आजही मी प्रत्यक्ष आयुष्यात कामकाजासाठी तेच नाव वापरतो. पण आंतरजालावर मात्र नाव बदलून वावरतो.

हो, ऋन्मेष हे माझे खरे नाव नाहीये. म्हणूनच कदाचित या नावाने शोध घेणार्‍यांना मी फेसबूकवर सापडलो नसेन Happy

पण हे माझे खोटे नावही नाहीये. म्हणजे हे नाव माझेच आहे. फक्त माझे मीच ठेवलेले आहे.

पण का?

तर तुम्हाला माझ्या आंतरजालावरील वावराची कल्पना असेलच. ईथे चार लोक माझे कौतुक करतात तर चारशे लोकं शिव्या घालतात. शिव्या घालताना साहजिकच माझ्या आईवडिलांनी प्रेमाने ठेवलेल्या नावाचा उद्धार होणारच. बस्स, ते मला नको होते.

म्हणून मग मी नवीन नाव काय घ्यावे या विचारात असताना अचानक मला ऋन्मेष हे नाव सुचले. आता हे कुठून सुचले याची कल्पना नाही. हा शब्द प्रत्यक्षात अस्तित्वात आहे की माझ्याच डोक्यातून आलेला आहे याचीही कल्पना नाही. त्यामुळे मला या नावाच अर्थ काय आहे हे देखील माहीत नाही.

पण मग आताच का नावाच्या अर्थाची गरज का भासली?

तर माझ्या विपूमध्ये वा ईतरही लोकं जे मला आणि माझ्या ऋन्मेष नावाला ओळखतात ते सतत मला या नावाचा अर्थ विचारत असतात. मला तो सांगता येत नाही.
पण गेल्या दोनेक महिन्यात मला मायबोलीवरच्या दोघा जणांनी आणि ऑफिसमधील एकाने या नावाचा अर्थ केवळ यासाठी विचारला की त्यांना आपल्या घरात आलेल्या नवीन पाहुण्याचे, म्हणजेच बाळाचे नाव ऋन्मेष ठेवायचे होते. पण मला त्यांनाही तो अर्थ सांगता आला नाही. आणि अर्थ नसलेले किंवा अर्थ माहीत नसलेले नाव आपल्या मुलाला ठेवायचे की नाही या संभ्रमात ते पडले. आता ते त्यांनी ठेवले की नाही हे मी पडताळायला गेलो नाही. पण कोणालातरी माझे हे नाव आवडले. अपेक्षेने मला अर्थ विचारला. हे नाव निरर्थक आहे हे लक्षात येताच ते हिरमुसले. पर्सनली मला याचे वाईट वाटले. एक गिल्टी फिलींग आली. तीच दूर करण्यासाठी आणि हा अनर्थ पुन्हा घडू नये यासाठी मला तुमची मदत हवी आहे.

याआधी कोणाच्या ऐकण्यावाचण्यात ऋन्मेष हा शब्द आला असेल आणि याचा खरेच काही अर्थ तुम्हाला माहीत असेल तर प्लीज सांगा.
आणि नसेलच तर ऋन्मेष या शब्दाची संधी समास फोड करून, गरज पडल्यास संस्कृत, उर्दू, फारसी, लॅटीन नाहीतर महाराष्ट्रातील ग्रामीण बोलीभाषांचा आधार घेत काहीतरी अर्थ लावा.

** ईतर कोणाला आपल्या नावाचा अर्थ माहीत नसेल आणि तो जाणून घ्यायचा असेल तर हाच धागा वापरला तरी माझी हरकत नाही, पण आधी माझ्या नावाला अर्थ येऊ द्या. जर हे नाव अर्थ नसल्याने कोणी आपल्या मुलांना ठेवलेच नाही तर ते माझ्यासोबतच लुप्त होईल Sad

(या निमित्ताने पडलेला एक प्रश्न - नावाला अर्थाची गरज खरेच असते का? म्हणजे नसलाच नावाला अर्थ तर खरेच काही बिघडते का?)

धन्यवाद ईन अ‍ॅडवान्स,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिषेकचा काहीतरी संबंध आहे. ष हे अक्षर कॉमन आहे.
>>>>

असा संबंध खरंच लागत असता तर मी शाहरूखचा श ठेवला असता नावात Happy
सुपर्रस्टारपुत्रापेक्षा ओरिजिनल सुपर्रस्टार कधीही चांगला...

नावाचा अर्थ माहित नाही, पण हे नाव माबोवर यायच्या आधीपासुन माहित आहे मला.
आमच्या कॉलेज मध्ये एकजण होता ऋन्मेष या नावाचा.

हो, ऋन्मेष हे माझे खरे नाव नाहीये. म्हणूनच कदाचित या नावाने शोध घेणार्‍यांना मी फेसबूकवर सापडलो नसेन Happy

पण हे माझे खोटे नावही नाहीये. म्हणजे हे नाव माझेच आहे. फक्त माझे मीच ठेवलेले आहे.

खोट्या नावाची तुमची व्याख्या काय?
जन्म झाल्यावर आईवडिलांनी ठेवलेले नाव खरे..
लग्नानंतर नवरयाने ठेवलेले नाव खरे..
पण स्वत:च स्वत:चा शोध घेत ठेवलेले नाव खोटे ?

>>>>>हे असे गोल गोल बोलणे छान आहे Happy

आमच्या कॉलेज मध्ये एकजण होता ऋन्मेष या नावाचा.
>>>>
फेसबून लिंकेदिन व्हॉटसप ट्विटर जीमेल फिमेल सारे मार्ग वापरून याला कसेही करून शोधायला हवे. यालाही आणि याचे नाव ठेवणारया आईवडिलांनाही. आता हाच लास्ट होप आहे...

खोट्या नावाची तुमची व्याख्या काय? << माझी खोट्या नावाची व्याख्या (ह्या धाग्या पुरती )म्हनजे जे खरं नाही ते. मला पर्सनली खरंखोटं करायची काही आवशक्ता वाटतं नाही पण तुम्हीच तुमच्या लेखात लिहीलय हे तुमचा खर नाव नाही म्हणुन विचारल.. बाकी काही नाही.

रीया ओके विचारून बघतो

माऊ तुम्ही काढा की लोकांच्या वा तुमच्या नावाचे अर्थ ईथे.. माऊचा अर्थ काय असावा बरे ईथून सुरुवात करूया का Happy

अदिती, ओके.
मी लेखात लिहीलेय हे नाव खरे नाही. पण मीच लेखात लिहीलेय हे नाव खोटेही नाही.
जगात प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात. एक खरी, एक खोटी आणि एक अज्ञात !

आमच्या सोसायटीत एका मुलाचे नाव "तस्मै" ठेवलेय. अर्थ काय तर "तस्मै श्री गुरवे नमः|" मधला "तस्मै"
हे "तद्" या पुल्लिंगी सर्वनामाचे चतुर्थी एकवचन आहे, पण कोण सांगणार त्या पालकांना

Pages