मला माझ्या नावाचा अर्थ सांगा / नाहीतर लावा

Submitted by ऋन्मेऽऽष on 17 December, 2017 - 10:10

"ज्यांनी नाव ठेवलेय त्यांनाच विचार ना? आपल्या आईबाबांना विचार ना..."

पहिलाच प्रश्न हाच मनात आला असेल तुमच्या. म्हणून विनम्रतेने क्लीअर करू इच्छितो, माझ्या आईवडीलांनी मला एक छानसे गोंडस नाव ठेवले आहे. आणि आजही मी प्रत्यक्ष आयुष्यात कामकाजासाठी तेच नाव वापरतो. पण आंतरजालावर मात्र नाव बदलून वावरतो.

हो, ऋन्मेष हे माझे खरे नाव नाहीये. म्हणूनच कदाचित या नावाने शोध घेणार्‍यांना मी फेसबूकवर सापडलो नसेन Happy

पण हे माझे खोटे नावही नाहीये. म्हणजे हे नाव माझेच आहे. फक्त माझे मीच ठेवलेले आहे.

पण का?

तर तुम्हाला माझ्या आंतरजालावरील वावराची कल्पना असेलच. ईथे चार लोक माझे कौतुक करतात तर चारशे लोकं शिव्या घालतात. शिव्या घालताना साहजिकच माझ्या आईवडिलांनी प्रेमाने ठेवलेल्या नावाचा उद्धार होणारच. बस्स, ते मला नको होते.

म्हणून मग मी नवीन नाव काय घ्यावे या विचारात असताना अचानक मला ऋन्मेष हे नाव सुचले. आता हे कुठून सुचले याची कल्पना नाही. हा शब्द प्रत्यक्षात अस्तित्वात आहे की माझ्याच डोक्यातून आलेला आहे याचीही कल्पना नाही. त्यामुळे मला या नावाच अर्थ काय आहे हे देखील माहीत नाही.

पण मग आताच का नावाच्या अर्थाची गरज का भासली?

तर माझ्या विपूमध्ये वा ईतरही लोकं जे मला आणि माझ्या ऋन्मेष नावाला ओळखतात ते सतत मला या नावाचा अर्थ विचारत असतात. मला तो सांगता येत नाही.
पण गेल्या दोनेक महिन्यात मला मायबोलीवरच्या दोघा जणांनी आणि ऑफिसमधील एकाने या नावाचा अर्थ केवळ यासाठी विचारला की त्यांना आपल्या घरात आलेल्या नवीन पाहुण्याचे, म्हणजेच बाळाचे नाव ऋन्मेष ठेवायचे होते. पण मला त्यांनाही तो अर्थ सांगता आला नाही. आणि अर्थ नसलेले किंवा अर्थ माहीत नसलेले नाव आपल्या मुलाला ठेवायचे की नाही या संभ्रमात ते पडले. आता ते त्यांनी ठेवले की नाही हे मी पडताळायला गेलो नाही. पण कोणालातरी माझे हे नाव आवडले. अपेक्षेने मला अर्थ विचारला. हे नाव निरर्थक आहे हे लक्षात येताच ते हिरमुसले. पर्सनली मला याचे वाईट वाटले. एक गिल्टी फिलींग आली. तीच दूर करण्यासाठी आणि हा अनर्थ पुन्हा घडू नये यासाठी मला तुमची मदत हवी आहे.

याआधी कोणाच्या ऐकण्यावाचण्यात ऋन्मेष हा शब्द आला असेल आणि याचा खरेच काही अर्थ तुम्हाला माहीत असेल तर प्लीज सांगा.
आणि नसेलच तर ऋन्मेष या शब्दाची संधी समास फोड करून, गरज पडल्यास संस्कृत, उर्दू, फारसी, लॅटीन नाहीतर महाराष्ट्रातील ग्रामीण बोलीभाषांचा आधार घेत काहीतरी अर्थ लावा.

** ईतर कोणाला आपल्या नावाचा अर्थ माहीत नसेल आणि तो जाणून घ्यायचा असेल तर हाच धागा वापरला तरी माझी हरकत नाही, पण आधी माझ्या नावाला अर्थ येऊ द्या. जर हे नाव अर्थ नसल्याने कोणी आपल्या मुलांना ठेवलेच नाही तर ते माझ्यासोबतच लुप्त होईल Sad

(या निमित्ताने पडलेला एक प्रश्न - नावाला अर्थाची गरज खरेच असते का? म्हणजे नसलाच नावाला अर्थ तर खरेच काही बिघडते का?)

धन्यवाद ईन अ‍ॅडवान्स,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या नावाचा काहीही अर्थ नाहीये. केवळ ऐकायला/वाचायला चांगलं वाटत असावं. ऋ पासून सुरु असल्याने कदाचित! जसं की ऋत्विक, ऋतुजा, ऋत्विज, ऋषित वगैरे नावांना जबरी अर्थ आहे संस्कृतमधे आणि उगीचच ऐकायला भारी वाटतं, तसंच उन्मेष या शब्दाला ऋ जोडून हा नवीन शब्द तयार केला गेला आहे. हे सांगायचं कारण असं की आमच्या माहितीतल्या एकांना मुलगा झाला आहे आणि बाळाचं नाव काय ठेवायचं त्या शॉर्ट्लिस्ट मधे ऋन्मेष हे नाव होतं. त्याला काही अर्थ आहे म्हणून नव्हे तर वडिलांचं नाव उन्मेष आणि आईचं नाव ऋजुता त्यामुळे आपल्या नावांवरून त्यांनी ऋन्मेष हे नाव ठरवलं, पण त्याचा वेगळा अर्थ त्यांना सापडला नाही त्यामुळे ते नाव बारगळले Happy

बाकी कोणाला या नावाचा खरोखर काही अर्थ सापडला तर नक्की कळवा Happy

मलाही लोक माझ्या आंतरजालीय नावाचा अर्थ विचारात असतात.काय माहीत एखाद्याने नव शिशु चे नावही ठेवले असेल ☺️
बाकी आंतरजालीय नावात अर्थ काढत बसण्यात काय पॉईंट आहे.

वडिलांचं नाव उन्मेष आणि आईचं नाव ऋजुता
>>>>
असे नाव ठेवल्यास मुलाचे नाव ऋन्मेष उन्मेष पुढे आडनाव असे यमकात झाले असते Happy
बादवे, उन्मेषचा अर्थ काय आहे? निदान तो तरी कळू दे.
तसेच उन्मेष या नावात षटकोनातील ष येतो का? मला शहामृगातील श वाटायचा. उमेश तसे उन्मेश..

बाकी आंतरजालीय नावात अर्थ काढत बसण्यात काय पॉईंट आहे.
>>>
मान्य आहे. पण कोणी ते प्रत्यक्षात ठेवायचा विचार करतेय म्हणून अर्थ विचारला ईतकेच.

बाकी प्रत्यक्ष नावालाही अर्थाची गरज खरेच असते का? म्हणजे नसलाच नावाला अर्थ तर खरेच काही बिघडते का?
(याला उपप्रश्न म्हणून लेखात घेतो)

ऋन्मेष,
जस्ट एक निरीक्षण म्हणून लिहितोय,
अलीकडे तुझ्या लेखनात मी, मला, माझे, हे खूप वेळा येत चालले आहेत.

फक्त माझ्या मतानुसार..

ऋण म्हणजे कर्ज आणि मेष म्हणजे मेंढा..

कर्ज असलेला मेंढा.. Happy

गमंतीत लिहलयं. ...हलके घ्या..

अलीकडे तुझ्या लेखनात मी, मला, माझे, हे खूप वेळा येत चालले आहेत.
>>>
सिंबा निरीक्षण अचूक आहे, पण यातले अलीकडे हे चुकले आहे. माझ्या लिखाणात ईसवीसन पलीकडे पासून मी मला माझे असते. ईन अदर वर्डस ते आत्मकेंद्रीत की काय म्हणतात तसे असते Happy
जोपर्यंत मला स्वत:ला याची जाणीव आहे तोपर्यंत धोका नाही.
तरी आपला मुद्दा समजला आहे, आणि आपण दाखवलेल्या काळजीबद्दल मनापासून धन्यवाद Happy

अजय चव्हाण Lol
मी वाटच बघत होतो हा अर्थ कोण काढतेय
अवांतर ऋणानुबंध मधील ऋणचा अर्थ सुद्धा कर्ज असाच होतो का? नसल्यास त्या ऋणचा अर्थ काय?

"ऋणानुबंध" च्या ऋणचा नेमका अर्थ मलाही माहीत नाही..

पण तो "ऋणी" म्हणजे आपण म्हणतो ना "हे परमेश्वरा तु हा जन्म दिलास त्याबद्दल मी ऋणी आहे..

त्या "ऋणी" चा अर्थ ऋणानुबंधतल्या ऋणचा असावा असा माझातरी अंदाजच आहे..

तुमचा इथला एकंदर वावर आणि अविर्भाव पाहता तुमच्या नावाचा अर्थ 'उच्छाद' किंवा मुंबईच्या भाषेत स्पष्टपणे सांगायचं तर 'डोक्याला शॉट' असा असावा.

रविना टंडन च्या आई वडिलांचे नाव रवी आणि वीणा आहे.
त्यांची नावे मिक्स करून रविना नाव जन्मास घातले आहे

ऋण =कर्ज
मेष=मेंढका
आता तू अर्थ लाव.

ऋन्मेऽऽष >>>>

ऋण =कर्ज
मेष=मेंढका
मेSSष म्हणजे लांबडा मेंढका

ऋण. कर्ज.. मेष .. मेंढा..
ऋण काढून सण साजरा करू नये..
ऋण काढून मेंढा विकत आणू नये..
ऋण काढून बकरी विकत आणू नये..
ऋण काढून बकरी ईद साजरी करू नये..
ऋन्मेष हे नाव ईस्लामिक आहे ?? Uhoh
माझा नकळत आयडी जिहाद झाला?? Sad

रविना टंडन च्या आई वडिलांचे नाव रवी आणि वीणा आहे.
त्यांची नावे मिक्स करून रविना नाव जन्मास घातले आहे >>>>>> धन्यवाद सिंबा!!!

प्रत्येक नावाला काहीतरी अर्थ असतोच अस नाही, रूनम्या.... जाऊ दे आता!

What's There is in Name? नावात काय आहे?? जे काय आहे ते मानसात आहे.. नावाला मोठा अर्थ असला म्हणजे माणूस मोठा होत नाही..अन नाव अर्थहीन असले म्हणजे काय मानुस अर्थहीन थोडीच् होतो.

(माफ़ करा, फार विचार केला नावचा अर्थ लावण्याचा.. पण काहीच बोध झाला नाही. मग ही पळवाट शोधली)

ऋ= सत्य
उन्मेष= प्राप्त करण्यासाठी तीव्र प्रयत्न करणारा

काय रे ऋ , काही ही काय धागे काढतोयस ?
आणि पब्लिक तरी काय... देतच आहे प्रतिसाद तुझ्या या धाग्यावर ही... अर्थात मी ही त्यातलीच एक ( स्मित ).

मनीमोहोर, कुठलेही ज्ञान आणि कुठलाही धागा व्यर्थ नसतो. जगात प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो.
वर बघा कसला झंकार अर्थ निघाला आहे..
सत्याच्या प्राप्तीसाठी वणवण करत फिरणारा एक जीव - ऋन्मेष Happy

मनीमोहोर, कुठलेही ज्ञान आणि कुठलाही धागा व्यर्थ नसतो. जगात प्रत्येक शब्दाला एक अर्थ असतो.
वर बघा कसला झंकार अर्थ निघाला आहे..
सत्याच्या प्राप्तीसाठी वणवण करत फिरणारा एक जीव - ऋन्मेष Happy

जर हे नाव अर्थ नसल्याने कोणी आपल्या मुलांना ठेवलेच नाही तर ते माझ्यासोबतच लुप्त होईल Sad>>> असे काही होणार नाही. जग मोठे आहे त्यात अर्थ नसलेले नाव असणारे लोकही आहेत, असणार.

सत्याच्या प्राप्तीसाठी वणवण करत फिरणारा एक जीव - ऋन्मेष >>>>
सद्ध्यातरी भराभर धागे काढणारा जीव - ऋन्मेष..... हेच येते मनात.

ऋ - त्रु (गमतीत) असेच वाचले जाते
म्हणून त्रुन्मेष......आणि त्याची फोड..... तरुण मेष Proud

गमंतीत लिहलयं. ...हलके घ्या..>+१

खोट्या नावाची तुमची व्याख्या काय?
जन्म झाल्यावर आईवडिलांनी ठेवलेले नाव खरे..
लग्नानंतर नवरयाने ठेवलेले नाव खरे..
पण स्वत:च स्वत:चा शोध घेत ठेवलेले नाव खोटे ?

Pages