आज परत एकदा लिहण्याचा प्रयत्न केला आहे,कारण सध्या तोच माझ्या मागे लागतो काहीतरी लिही. माझ्या कडे लिहिण्या सारखं खूप आहे पण मला वाटत शब्दांनी मला साथ द्यायला हवी ... अशी साथ जशी तो मला देत आहे ..खरं तर मी काय लिहिते ते त्याला वाचता ही येत नाही आणि कळत ही नाही....
हा तो कोण?? तो म्हणजे हरी ..
हरी म्हंटल कि डोळ्या समोर जे येते ते रूप किती सुंदर असत ना.. लहानपणी आजी रामाची गाणी म्हणायची .. त्यातली एक ओळ खूप आवडायची "म्हणती गौळणी हरीची पाऊले धरा !!!! रांगत रांगत आला हरी हा राज मंदिरा !!!! तेव्हा पासून हरी म्हणजे छोटासा छान बाळकृष्ण अस वाटायचं ... पण मला जेव्हा हरी दिसला / भेटला तेव्हा तो रस्ताच्या त्या बाजूला गोबर्या गालांचा सावल्या वर्णाचा ६ फूट उंचीचा होता.. माहित नाही कसा पण नकळत मी रस्ता ओलांडताना त्याचा हाथ धरला आणि त्याने ही मोठ्या विश्वासाने तो तसाच धरून ठेवला.. अजूनही अस वाटत कि मी जर तो मला भेटला नसता तर मी तो रस्ता मी कधीच ओलांडू शकले नसते.मी तशीच उभी असते ... . कदाचित हे खूप अविश्वसनीय वाटेल किव्हा फिल्मी सुद्धा पण खरंच आपल्या आयुष्यात सुद्धा फिल्मी गोष्टी घडतात च ना !!!
माझ्याही आयुष्यात तसच काहीस घडलं .. माझ्या आयुष्यातले सगळे hopes संपले होते ..i was thinking that i never get good in life .. अगदी तेव्हाच तो आला .. अस म्हणतात देव तुमची तेव्हडीच परीक्षा घेतो जितकी तुम्ही देऊ शकता.. माझ्या त्या phase बद्दल बोलेन कधी तरी ,कारण ते मी विसरले नाहीये पण मला ते जाणीव पूर्वक आठवायचं नाहीये ,आता तरी मी त्यातून बाहेर पडले आहे.इतकंच .. फक्त आणि फक्त हरी मुळे .कारण अजूनही मला काय हवाय ते कळत नाहीये . त्याच्यात आणि माझ्यात काहीच सारखं नाहीये आमची भाषा ( मी मराठी तो मल्याळम ) ,आमचा प्रदेश ,आमचं खाणं ,आमच्या आवडी ,अगदी आमचा रंग सुद्धा ..चेतन भगत च्या " TWO STATES" सारखं... पण तरी असा काहीतरी आहे जे आम्हाला जोडून आहे .. तो आहे म्हणून मी आहे ( फिल्मी नाही अगदी खर मनापासून).. जेव्हा भेटला तेव्हा पासून आता पर्यंत रोज नवीन काही तरी कळत मला आणि समजत जात ..
तोच हरी आहे ज्याला कधीच कुठल्या शंका ,प्रश्न पडत नाहीत.. आता वाटत आहे मला लहानपणी वाटलेला हरी हाच आहे
त्याने मला त्याच केल आहे अगदी मनापासून .. भरभरून देतो आहे .. म्हणूनच तो आहे म्हणून मी आहे .. इतकंच
कधी पासून कुठे तरी सांगावस वाटत होत म्हणून हे सगळं ..
छान मनोगत.
छान मनोगत.
धन्यवाद दक्षिणा
धन्यवाद दक्षिणा
भारी लिहीलय
भारी लिहीलय
धन्यवाद Mr. Pandit
धन्यवाद Mr. Pandit
भावना शब्दांत व्यक्त करण्यात
भावना शब्दांत व्यक्त करण्यात आपण यशस्वी झाला आहात
धन्यवाद Sandeep
धन्यवाद Sandeep
छान मनोगत. >>>> +१११११
छान मनोगत. >>>> +१११११
धन्यवाद VB
धन्यवाद VB
सुंदर लिखान..
सुंदर लिखान..
ह्यावेळी तुम्हाला शब्दांनी
ह्यावेळी तुम्हाला शब्दांनी बर्यापैकी साथ दिलीये
लिहीत राहा काहीना काहीतरी होइल हळुहळु सवय लिहीण्याची
पु ले शु
अभिनंदन. छान लिहिलंय.
अभिनंदन.
छान लिहिलंय.