विशाल भारद्वाजने मनावर घेतलेली भारतीय प्रेम कहाणी- भाग 3

Submitted by डोनाल्ड डक on 11 December, 2017 - 02:05

विशाल भारद्वाजने मनावर घेतलेली भारतीय प्रेम कहाणी- भाग २

आजचा दिवस दुपार

सकीना आपल्या किल्लीने दरवाजा उघडून आत आली, समोर सोफ्यावर शोभनाला पाहून तिला आश्चर्य वाटले,

“आज लायब्ररी नही गई तुम?“ तिने विचारले , रोज कॉलेज आटपून सकीना घरी यायची तेव्हा शोभना युनिवर्सिटीच्या लायब्ररीमध्ये अभ्यासाला गेलेली असायची.
“ चल आज मिलके खाते है, डब्बेमें अंडाकरी दिया है” टेबल वर खानावळीचा डबा ठेवत ती म्हणाली.

“ अंडा बिंडा छोड, इधर देख क्या मस्त मुर्गा मिला है”

“ ना बाबा, तेरे मुर्गे तू रख अपने पास, मेरेको उस सब में नही पडना”

“ अरे बाबा, देख तो सही, सिर्फ देखनेसे जहन्नम नही चली जायेगी तू .” सोफ्यावर आपल्या शेजारी हात आपटत शोभानाने तिला बोलावले. Laptop ची स्क्रीन तिला दिसेल अशी अडजस्ट करत ती म्हणाली,“ साला सिर्फ दिखने मै मर्द था, खेल शुरू होते ही १० मिनिट मै फट के हात मै आ गयी उसकी, जे सांगेन ते करायला तयार होता, यार, इससे तो औरते ज्यादा टफ होती है”

“ तेरे को डर नाही लगता?”५ सेकंदात स्क्रीन वरची नजर हटवत सकीनाने विचारले

“ डर? किस चीज का ?पकडे जाने का? तुला खरेच वाटते हे सगळे पोलिसात जाऊन तक्रार करतील? आणि काय तक्रार करतील? मी ठोकायला एक पोरगी घेऊन आलो आणि तिने मला नागडे करून माझे फोटो काढले?” शोभला या कल्पनेने पण हसु यायला लागले. “ कुठला पुरुष स्वत:च्या तोंडाने माझ्यावर बलात्कार झाला म्हणून दुनियेला सांगेल? तरी मी हे फोटो कुठेही पोस्ट करत नाही, फक्त मूड आला तर एखादा फोटो त्याला मेल करते, पूर्ण जिंदगीभर हि बेइज्जत होण्याच्या भीतीची दिमक त्यांना खात राहील.”

“ नही, पोलिसांची भीती नाही , पण यातला एखादा मुलगा तुला शोधात येईल याची भीती, कभी सोचा है तू त्याच्या हातात पडलीस तर काय होईल तुझे? “

“ अरे जानू, साकीनाच्या मेकअपवर मला तेव्हडा विश्वास आहे कि मला कोणी ओळखणार नाही. तुझ्या हातांची जादू पार्लर मध्ये पहिली,म्हणूनच तर दादा, मौसीच्या मर्जीविरुध्ध तुला बिन भाड्याची पेइंग गेस्ट म्हणून ठेवली ना इकडे आणि दादाच्या एरियामध्ये खुद्द दादाच्या घरी शिरून मला हात लावायची कोणाची हिम्मत आहे का?”

बोलता बोलता तिने ती ऑडिओ क्लीप प्ले केली.

तिचे धमकावणे, शिव्या, त्याच्या शरीराबद्दलच्या अचकट विचकट कमेंट्स, सुरवातीला त्याचे रागीट सुरात बोलणे, मग काकुळती ला येऊन केलेली याचना, मागितलेली भिक, रडणे सगळे ऐकत असताना सकीनाच्या अंगावर काटा आला, दोन्ही कान झाकत ती तिकडून उठली, “या अल्ला, नही सुना जाता मेरे से, प्लीज,प्लीज बंद कर दे ”

“नही सुना जाता? रेखा याच्या कित्येकपट किंचाळली,रडली; याच्या कित्येकपट जलील झाली, आणि मी तिच्या समोर बसून ते सगळे ऐकत होते, कैसा सुना होगा मैने? ७ साल कि थी मै, जेव्हा लोक माझ्या छाती-मांड्यावरून हात फिरवून लाड करायचे, कैसे सही होगी मै? आणि आज या लौन्ड्याची ४ भिंतींच्या आत थोडी मजा काय केली, तुला त्याची दया यायला लागली ? जाने दे, स्वत:च्या आईच्या किंचाळ्या ऐकताना काय वाटते तुला काय कळणार?” शोभनाचे डोळे कोरडे होते पण आवाज भरून येत होता.

“शोभा, क्या जानती हो तुम मेरे बारे मे?” साकीनाने दुखावलेल्या आवाजात विचारले.तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, स्थिर आवाजात ती बोलत होती” अपनी सगी बेहेन को इस हैवानीयत का शिकार होते देखा है मैने. ५ कदम कि दुरीपर, एक टोकरी मे छुपकर बैठी थी मै, फिर भी कुछ ना कर पायी, थोडी भी हिलती, तो पकडी जाती. दुख,दर्द फक्त कामाठीपुर्याच्या पत्त्यावरच राहत नाही, काश्मीर मध्ये छोट्याश्या गावात राहणाऱ्या मुलींचा पत्ता शोधत पण ते येते.”’ नंतर बराच वेळ सकीना तिच्या काश्मीरमधल्या पुर्वायुष्यावर बोलत होती.

तिची माहित नसलेली हि बाजू ऐकून शोभना वरमली, हलकेच तिला मिठीत घेऊन तिचे डोके थोपटत राहिली.

भावनांचा कढ ओसरल्यावर समजावणाऱ्या आवाजात सकीना परत बोलू लागली , “ देख शोभा, इस बात पर हम पेहेले भी बोल चुके है, तुझ्या आई बरोबर जे झालं ते खूप बेकार झाले, पण तू हे जे काही करतेस त्याने तिला इन्साफ मिळणार आहे का? एका २४-२५ वर्षाच्या पोराला असे छळून, त्याला धमकावून तुझ्या आई बरोबर जे झाले त्याची भरपाई होणार आहे का?”

“ एएए पोरगा वगैरे नव्हता तो... नर होता तो नर, प्रत्येक बाई आपली खाज शमवायला या जगात आली आहे असा माज असणारा नर, बाई नाही म्हणाली तर तिला दुखापत करून ,मारून, तिच्याकडून हवे ते मिळवणारा हरामखोर होता तो, मला हे पुरुष पहिले कि डोक्यात सणक जाते. ते जेव्हा माझ्या समोर रडतात ना तेव्हा मला तसल्ली मिळते, माझ्या आई ला रडवणाऱ्या माणसाचा बदला घेतल्या सारखे वाटते मला. एकएक का वो हाल करूंगी कि दस बार सोचानेपर भी औरत कि तरफ आंख नाही उठा पायेगा.

“कितनोंको बद्लोगी तुम?" सकीनाने उसळून विचारले " दस? पंधरा? सौ? वेक अप शोभा, तुम्हारी उम्र गुजर जायेगी लेकीन इन लोगोंकि तादात कम नही होती. आणि तु हे सगळे केल्याने कामाठीपुर्यात तुझ्या आई सारख्या ज्या शेकडो बायका आहेत त्यांच्या आयुष्यात काही फरक पडेल असे वाटते का तुला?
“मी, माझ्या बहिणीच्या गुन्हेगारांना शोधून, त्यांच्या सारख्या लोकांना मारण्यात जिंदगी घालवली पाहिजे? कि उरलेले कुटुंब जिकडे त्यांना तकलीफ होणार नाही अशा ठिकाणी घेऊन जाण्यासाठी माझी लायकी वाढवली पहिले? मी खुप साधी आहे शोभना, मला माझे कुटुंब, मी सुखात असलेले पहायचे आहेत, आणि मी खूनखराबा करून ते सुखी होणार नाहीत हे मला पक्के माहिती आहे.” “तू स्मार्ट आहेस, पढीलिखी आहेस, लॉयर बन, NGO काढ, या बायकांना मदत कर. जरा सोच, तेव्हा तुला शाळेत घेऊन जाणारी ताई, तुला शाळेत घेऊन जाण्याऐवजी असले काही करत बसली असती तर तू कुठे असतीस? तेरा गुस्सा उसकी जगह ठीक है शोभा, लेकीन जो गुस्सा किसीकी जिंदगी खाक कर दे , वो गुस्सा किस काम का?" “ और हा, हर मर्द वैसा हि होता है ये दिमाग से निकाल दे. माना, तेरे बाप ने तुम दोनो को बेचा, लेकीन रेखा को उस दोजख से निकालनेवाले दादा भी तो मर्द ही है ना? तू तो उनकी सगी बेटी भी नही है, पण तुझ्या मां नंतर ते तुझ्याकडे पूर्ण लक्ष देतात ना?, त्यांच्या गुन्हेगारी आयुष्याची सावालीपण पडू देत नाही तुझ्यावर. तुझ्या आईच्या फक्त सांगण्यावरून ते मौसी ला इकडे घेऊन आले, इतकी वर्षे झाली कधी तिच्याकडे डोळे वर करून पाहिलंय त्यांनी?? और पक्याभाई? वो भी तो मर्द है ना? उसको भी तू वैसाच समझती है क्या?”
“समझा कर शोभना, कल को तेरे को लडका होगा, तू उसको भी साप समझकर मार देगी क्या?”

शोभनाशी आज पाहिल्यांदाच कोणीतरी इतके भीडभाड न ठेवता बोलत होते.
एरवी तिच्या वर्तुळात तिच्या बद्दल आधी सहानुभूती असे आणि नंतर दादाची मुलगी म्हणून भीती, सापळ्यात पकडलेल्या मुलांच्या किंकाळ्या,रडणे तुला समाधान देते, पण ती विकृती आहे,आणि त्याहून महत्वाचे हे सगळे केल्याने कोणालाच मदत होत नाहीये इतक्या सरळ सरळ आरसा तिला कोणी दाखवलाच नव्हता.

आपल्यावर भयंकर अन्याय झाल्यामुळे आपण असे आहोत, आणि आपले वागणे कुठल्याही परिस्थितीत बरोबरच आहे या घट्ट पकडून ठेवलेल्या थिअरीला आपल्यासारख्याच परिस्थितीतून आलेले कोणीतरी आव्हान देते आहे, आणि आपल्याकडे त्याच्या विरोधात फारसे काही बोलण्यासारखे नाही हि जाणीव शोभनाला अस्वस्थ करून गेली.

“ देख, तेरेको देखना नही है तो मत देख, खाली फोकट मेरे को लेक्चर मर झाड,” ती सकीनावर डाफरली पण त्यातला पोकळपणा तिच्यादेखील लक्षात येत होता.

सकीना उठली, सोफ्याच्या मागे उभी राहिली, वाकून तिने शोभनाच्या गळ्यात हात टाकले. शोभनाच्या गालाला गाल लाऊन ती म्हणाली ” मान ले मेरी बात, उमर हो गयी है तेरी शादि की, अच्छासा लडका देखकर शादी बना दे, शौहर और बच्चेके साथ रहेगी तो दिमाग सही रास्तेपर रहेगा तेरा.”

“ जा ना अब, एक वो मौसी है ओर दुसरी तू है, मौका मिला नाही कि शादि की बाते करने लगते हो” सोफ्यावरची उशी सकीनाच्या डोक्यात मारत लटक्या रागाने शोभना म्हणाली.

भरभर जेवण आटपून सकीना बाहेर पडली. जिन्याच्या landing मध्ये पक्या खाट आणून ठेवताना तिला दिसला.

“ क्या हुआ पक्याभाई? आप इधर सोओगे क्या?” तिने पक्याला विचारले.

“ हा, आजकल ये दादरसे ट्राफिक कुछ बढ गया है, तो दादा बोले थोडा नजर रखो”

सकीनाने मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला आणि खाली उतरल्या उतरल्या ‘पक्या अगदी दाराबाहेरच आहे; काही मुर्खपणा करू नको’, म्हणून शोभनाला whts app केले.

विशाल भारद्वाजने मनावर घेतलेली भारतीय प्रेम कहाणी- भाग ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉलिड
शेवट चांगला व्हावा(असं उगीच वाटतं.)

जबराट!!!!!
शेवट चांगला व्हावा(असं उगीच वाटतं.)>>>+१

छान सुरु आहे कथा
शेवट चांगला व्हावा(असं उगीच वाटतं.) >> +१

धन्यवाद मंडळी,
>>>>>
चांगला म्हणजे कसा?
ते सुखाने नांदू लागले टाईप्स ??

शेवटच्या भागाचे लिखाण चालू आहे, एकाच भागात संपवायचे असल्याने तो थोडा मोठा होईल.

मस्त चालली आहे.
सुखाने नांदू का कसा शेवट कराल तो करा. पण वाचक कनव्हिन्स होईल ते मात्र बघा. मुद्दाम टेलरमेड करु नका.
पुलेशु.

मस्त..
विशाल भार्द्वाज चा काय रेफरन्स आहे?

विशाल भार्द्वाज चा काय रेफरन्स आहे?..>>>>>
खरे तर डायरेक्ट रेफ काहीच नाही.
"कालिदासाने मनावर न घेतलेल्याकाही भारतीय प्रेमकहाण्या" कथा वाचली.
एक उपवर मुलगी मुलांना भुलवते, त्यांना आपल्या नादी लावते आणि त्यांचा हृदयभंग करून निघून जाते.
यथावकाश तिला खरे प्रेम करणारा मुलगा भेटतो.
साधारण हे कथासूत्र होते.
हेच कथासूत्र जर आजच्या रेफरन्स ने मांडायचे झाले तर काय कथा होईल याचा विचार करत होतो.
हिंदी चित्रपट सृष्टीत असे प्रयोग मोप झाले आहेत , जसे ऑथेल्लो चा ओमकारा, hamlet चा हैदर., देवदास चा देव-डी.
एकंदर सुरवातीला कथा लिहिण्याचा अप्रोच बराच कॅजुअल होता, आणि एक - फार तर २ भागात विडम्बना च्या अंगाने जाणारी कथा लिहायचे डोक्यात होते, त्यामुळे नाव ठेवायला फारसा विचार केला नाही. वरच्या चित्रपटांच्या दिग्दर्शकाचे नाव देऊन टाकले
पण पात्र कन्विन्सिंग करायच्या नादात कथा वाढतच गेली , आणि विडम्बनाच्या ऐवजी सिरिअस कथा आकाराला आली.

मला कथा लेखनाचा अजिबात अनुभव नाही. क्रमशः कथा लिहिण्याचा कॉन्फिडन्स सुद्धा नव्हता, वर संदर्भ बदलताना त्या कथेचे भजे झाले तर शिव्या बसायला नकोत म्हणून नवीन id काढून कथा पोस्ट केली Happy

तुमच्या प्रतिसादांनी हुरूप वाढला आणि पुढे लिहित गेलो. पुढचे भाग माझ्या ओरीजीनल id ने टाकेन.

तुमच्या तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल परत एकदा धन्यवाद.

चांगला म्हणजे कसा?
ते सुखाने नांदू लागले टाईप्स ??

नाही हो, टेलर मेड चांगला शेवट करा असे म्हणत नाहीये. जनरली अश्या घटनांमध्ये पात्रांचे चांगले व्हावे असे मनाला वाटत असते.पण रियल लाइफ मध्ये ते होतेच असे नाही,पण आपण कायम काहीतरी चांगले होईल, जगात न्याय आहे असे विशफुल थिंकिंग करुन आशा जिवंत ठेवत असतो.

त्या अर्थाने म्हटले.