हे वागणं बरं नव्हं

Submitted by बिपीन चन्द्र हर... on 9 December, 2017 - 01:08

ओखी वादळाचे संकट आणि मुंबईत सुरू झालेला पाऊस यामुळे दादरच्या चैत्यभूमीवर जमलेल्या जनसमुदायाच्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी मुंबई महापालिकेने दादर परिसरातील ७० शाळा ६ डिसेंबर रोजी खुल्या केल्या होत्या. मात्र, ७ डिसेंबर रोजी जेव्हा शाळेतील शिक्षक, विद्यार्थी दाखल झाले तेव्हा येथील दृश्य किळसवाणे होते. अनेक ठिकाणी दारुच्या बाटल्या पडल्या होत्या, शाळेतील सुविचारांनी सजलेल्या भिंतीवर पानतंबाखुच्या पिचकाऱ्या सोडण्यात आल्या होत्या. कचरा तर संपूर्ण शाळेत पसरला होता. शिवाजी पार्कपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दादर वुलन्स मिल शाळा, सिटी ऑफ लॉस एंजल्स शाळा आणि गोखले रोड शाळा या महापालिका शाळांत हजारो नागरिकांनी मुक्काम केला. पालिकेने याठिकाणी जेवणपाण्याची व्यवस्था केली होती. परंतु, नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे शाळांचे मोठे नुकसान झाले आहे. गोखले रोड शाळेत काही लोकांनी बेदरकारपणे काही वर्गाची कुलुपे तोडून तिथे मुक्काम केला. वर्गातील बाके, तकते यांची अत्यंत निष्काळाजीपणे हाताळणी करून शाळेचे बरेच नुकसान केले.

पूर्ण बातमी इथे वाचावी.

रात्रनिवारा बनलेल्या शाळांची दैना

https://www.loksatta.com/mumbai-news/night-school-in-bad-condition-1597949/

ज्या महामानवाने देशाचा कायदा बनविला त्यांच्याच अनुयायांनी शाळेसारख्या पवित्र सार्वजनिक ठिकाणी अपेयपान आणि अस्वच्छता करुन कायदा पायदळी तुडवावा ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.

या घटनेचा मी तीव्र निषेध करतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी खर्च करणारे, अतिशय उच्च दर्जाचे आयोजन व सुविधा देणारे सरकार ही भीमसैनिकांसाठीची व्यवस्था करण्यात मात्र कमी पडलंय हे हेतुपुरस्सर लपवून एका विशिष्ट वर्गावर मळमळ ओकण्याची इच्छा पूर्ण झाली असावी... शाळा निवासासाठी नसतात. आणि क्षमतेपेक्षा कैक पटीने कोंबले की हे होतेच.

चैत्यभूमीवर येणार्‍यांत समाजातल्या सर्वच स्तरातले, स्वभावाचे लोक आहेत. पण काही कुजकटांना व्यसनाधिनता, गलिच्छपणा हीच बाबासाहेबांच्या अनुयायांची ओळख आहे हे पसरवण्यात जास्त उत्सुकता असते हे काही लपून राहिलेले नाही. यातून आपणच केवळ एकमेव स्वच्छ आणि हुच्च आहोत हे मिरवायची खुमखुमी मिटवली जाते.

काल व्हॉटसपवर याच्या उलट पोस्ट पाहण्यात आली. ईतक्या संख्येने लोकं चौत्यभूमीवर जमा झाले आणि अश्यात पाऊस आला. पण त्यांची सोय करायला, त्यांच्या मदतीला मुंबईकर धावून का आले नाहीत? कुठे गेले मुंबईकरांचे स्पिरीट? ते फक्त ठराविक जातींसाठीच जागे होते का वगैरे वगैरे... अगदी बाष्कळ जातीयवादी मेसेज होता.. ज्याने ग्रूपवर टाकला त्याला ईतका झापला की आयुष्यात पुन्हा असा मेसेज शेअर करायची हिंमत करणार नाही.

ऋ ने आपल्या मुंबईतल्या विस्तीर्ण असलेल्या तीन तीन घरांत अडचणीत सापडलेल्या किती भीमसैनिकांना आश्रय दिला तेही सांगितले की नाही त्याला?

जो अडचणीत सापडतो जो आश्रयाला येतो त्या प्रत्येकाला मुंबईत निवारा सहारा मिळतो. आम्हीही दिलाय आणि मलाही ईतरांचा दोन संकटात चांगला अनुभव आलाय. अश्यावेळी भीमसैनिक शिवसैनिक ब्राह्मण वैश्य मराठा गुजराती हिंदू मुसलमान श्रीमंत गरीब कोण चौकश्या करत बसत नाही.
याऊपर नियोजन करणे हे सरकारचे काम आहे. मुंबईकरांना स्पिरीट दाखवा बोलणे ही काडी आहे.

लोकसत्ता/ महाराष्ट्र टाईम्स सारख्या मनुवादी वर्तमान पत्रांनी 6 डिसेंम्बर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त स्वच्छता आणि आलेल्या लोकांच्या राहण्याच्या ठिकाणा बद्दल अतिशय चुकीची रेपोर्टिंग केली आहे
मुद्दा 1 - एक तर BMC प्रशासनाने अतिशय बेजबाबदार रित्या तिथली व्यवस्था केली होती मंडप पडतो/ इलेक्ट्रिक वायर्स ओपन होत्या वॉर्ड ऑफिसर जागेवर नव्हते
मुद्दा 2 - आलेल्या लोकांची ज्या शाळेत राहायची सोय केली त्याबद्दल सुद्धा मुद्दाम चुकीच्या बातम्या दिल्या तुम्ही जश्या बातम्या दिल्या त्याचे पुरावे द्या आम्ही सामुदायिक तुमची जाहीर माफी मागू पुरावे नाय दिले तर घोडे तयार आहेत..

अख्ख्या मुंबईतील किनाऱ्यांवरून बीएमसीच्या सफाई कामगारांनी कचरा उचलला सात आणि आठ तारखेला. समुद्राने ओक्खी वादळामुळे ओकलेला कचरा होता 80 टनाच्या आसपास. तो जमा झाला होता दादर आणि आसपासच्या किनारी चौपाटीवर. सफाई कामगारांनी तो साफ केला. पण त्यात चैत्यभूमीवर आलेल्या भीमसैनिकांनी केलेला कचरा नव्हताच.
तो तर कार्यकर्त्यांनी स्वतःच वेचला. ओला, सुका, प्लास्टिक असं वर्गीकरण करून. काळ्या बॅगांत भरून स्वतः डंप केला. पहिली मोठी खेप डंप करताना मी स्वतःपाहीलंय. त्यानंतर अनेक हेलपाटे मारले त्यांनी. तो काही सत्तर टन तर नव्हताच. लॉजिकच नाही. बाकी शिवाजी पार्कचा परिसर अधून मधून धुतच असतात आठवड्याकाठी. त्यात नवीन काय. उगाच चकाचक केल्याचा संदर्भ का म्हणून जोडावा?

पत्रकारांना बातमीचा सेंस नाही असे नाही. त्यांची मळमळ अफाट असते. डिजीटल फुटप्रिंटच्या जमान्यात तरी खोटं बोलू नका रे राजांनो.

-वैभव छाया -फेसबुकवरुन

मिडीया शेवटी समाजातल्या माणसांचाह असतो.
हल्ली वाढत्या तंत्रज्ञानामुळे त्याचे हातपाय पसरलेत ईतकेच..

या धाग्यावर लवकरच ८० टन मळमळ जमणार बहुतेक!
>>>>
असे न झाले तर चांगले., अश्या धाग्यांना वा प्रतिसादांना जास्त एंटरटेन करू नये..
साली ही जातीपातींची भानगड मग माझ्यासारख्यांच्या लग्नाच्या आड येते.. फुकट आमचा सैराट होतो

रुणम्या,

फाटे फोडत डबल ढोलकी वाजवीत ट्यारपी जमवायचे बाष्कळ धंदे सोड, स्वतःचा एक नीट स्टँड घे. अन उभा रहा.

इकडूनही बोलेन, तिकडूनही, अन गम्मत पाहीन, हे करायचे दिवस सध्या नाहीत,

अन असलेत तरी,

मी कोण? माझा नक्की आदर्श कोणता व कोण, तत्वं कोणती, हे जमायलाच हवं. इट्स पार्ट ऑफ ग्रोइंग अप. बिकमिंग अ‍ॅन अ‍ॅडल्ट. a MAN.

नवटीनेजर्स, अर्ली ट्वेंटीज मधले "आदर्श भारतीय नागरिक" यांच्यात पापिलवार व्हायला तुझी आयडिया ओके आहे. पण आरशात पाहून मी कोण? हे तुझ्या खर्‍या वयात स्वतःलाच चुकुन कधी विचारलेच तर तुला नक्की काय वाटेल त्याचा जरा विचार कर.

*

नाना,

असा एकट्याने किल्ला लढवताना तुम्ही किरणू आहात, असा माबोकरांचा गैरसमज होतो.

या बिडीकाडी कामुळकरांना ट्यार्पी दिला नसता तर हा धागा आपोआप मेला असताच.

दरच वर्षी भीमसैनिक कसे फुकट मुंबईला जातात, अन कशी घाण करतात असल्या बोंबा मारत रहायचे काम आयटीसेल ट्रेनिंग मिळालेले लोक करितच असतात. तेव्हा जौ द्या ना!

आरारा,
दोन टोकांच्या मतांचा विरोध करणे म्हणजे दोन बाजूंने बोलणे नव्हे Happy
तसेच जेव्हा मला "अ" ही पटत नाही आणि मला "ब" ही पटत नाही तेव्हा त्याला "क" ही बाजू देखील असू शकतेच.

बाकी राहिला प्रश्न तत्वांचा तर मी कुठलीच तत्वे बनवत नाही आणि पाळत तर अजिबात नाही. माणसाने फ्लेक्जिबल असावे. तत्वे बनवली की कर्मठपणा येतो.

जातीयवादी चर्चा नेहमी माझ्या डोक्याला शॉट लावतात. आणि याचे कारण खूपच स्वार्थी आहे. मी सो कॉलड उच्चजातीय आहे आणि माझी गर्लफ्रेन्ड आंबेडकरांच्या अनुयायांपैकी एक. आता ती गोष्ट वेगळी की आम्हा दोघेही जन्माने चिकटलेल्या जातीँची काडीचीही पर्वा करत नाही की त्यांना मानत नाही. पण साला आपला जातपात मानणारा समाज आमच्या लग्नात काड्या केल्यावाचून राहणार नाही हे सुद्धा आम्हाला माहीत आहे.

असो..
हे जरा पर्सनल आहे. तर फुरसतमध्ये माझाच सेपरेट धागा काढतो. जो काही टीआरपीचा खेळ करायचा आहे तो तिथेच करतो Happy
या धाग्याला पुन्हा वर यायला हातभार नको म्हणून ही माझी ईथली शेवटची पोस्ट !

डॉक्टर भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असणं म्हणजे एखाद्या विशिष्ट जातीत जन्माला यावं लागणं हा एक तद्दन संकुचित गैरसमज आहे. आंबेडकर हे संपूर्ण भारताचे नेते होते आणि त्यांनी सार्‍या देशाकरिताच संविधान बनविले; कोणत्या विशिष्ट जातीकरिता नव्हे. त्यांना एका विशिष्ट जातीचे / जाती गटाचे नेते बनवून मर्यादित कोंदणात अडकविणे ही त्यांना निवडणूकीत पराभूत करणार्‍या काँग्रेस पक्षाची खेळी होती. असो. तेव्हा आंबेडकरांचा अनुयायी मी देखील आहे आणि त्याकरिता मला माझी जात आणि धर्म (होय धर्म देखील - कारण आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता आणि मी हिंदू आहे तरीही) अडथळा ठरत नाही.

प्रश्न कुठल्या विशिष्ट जातीतील लोकांना नावे ठेवण्याचा नसून (जसे नानाकळा आणि आरारा यांना वाटत आहे) शिस्तीने वागण्याचा आहे. आंबेडकरांचा अनुयायी असला म्हणून प्रत्येकाने विशिष्ट दिवशी एका विशिष्ट ठिकाणी जमून / गर्दी जमवून प्रशासनावर ताण आणणे संयुक्तिक नव्हे. हेच तत्त्व मी विठ्ठलाचा भक्त म्हणून आषाढी एकादशीला पंढरपुरात गर्दी करणार्‍या आणि सार्वजनिक जागी अस्वच्छता पसरविणार्‍या वारकर्‍यांनादेखील लावतो. अर्थात याकरिता वेगळा धागा काढला नाही कारण याची कोर्टाने स्वतः दखल घेतली असून पंढरपुरात पुन्हा सार्वजनिक अस्वच्छता होतच राहिली तर कितीही जुनी परंपरा असली तरीही वारीवर कायमची बंदी घालण्याचा इशारादेखील दिला आहे.

वर नानाकळा यांनी कुंभमेळ्याचे उदाहरण दिले आहे. तत्वतः तेदेखील मान्य आहे. त्याचवेळी हेदेखील लक्षात घ्यावे की तो बारा वर्षांतून एकदा येतो. सार्वजनिक बेशिस्त आणि अस्वच्छता मग ती कुठल्याही जातीधर्मातील लोकांकडून होत असेल तिचा निषेधच आहे. या धाग्याला जातीय रंग देण्याचे काहीच कारण नाही. मूळ लेख आणि बातमीमध्येही कुठल्याही जातीचा उल्लेख नाही.

ह्या सर्व चारचौघात आपण कसे निधर्मी आणि संतुलित विचारांचे आहोत हे दाखवायला बोलायच्या गोष्टी झाल्या. खासगीत कोण कोण काय बोलतं हे लिहायला सुरुवात करायची का इथेच ?????

बिपीनजी हे तुम्हाला वैयक्तिक म्हणून लिहिले नाही. पण प्रत्येकाचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. खासगीत आणि सार्वजनिक ठिकाणी केल्या जाणाऱ्या कमेंट्स वेगवेगळ्या असतात.

मी तरी फार मोजके लोक पाहिले जे जात धर्म प्रांत वगैरेंच्या पुढे विचार करतात. आपल्याला (समाजाला) अजून जातीधर्माची लेबल न लावता माणसाला फक्त माणूस म्हणून बघण्याइतकी प्रगल्भता आलेली नाही.

{{{

धागालेखक....आवरा आता.
नवीन Submitted by नानाकळा on 11 December, 2017 - 07:30 }}}

आवर घालावा असे माझ्या प्रतिसादातले / मूळ लेखातले आक्षेपार्ह विधान उद्धृत केल्यास मज पामराच्या ज्ञानात भर पडेल.

{{{ मी तरी फार मोजके लोक पाहिले जे जात धर्म प्रांत वगैरेंच्या पुढे विचार करतात. आपल्याला (समाजाला) अजून जातीधर्माची लेबल न लावता माणसाला फक्त माणूस म्हणून बघण्याइतकी प्रगल्भता आलेली नाही.
Submitted by अतरंगी on 11 December, 2017 - 09:13 }}}

होय हे खरे आहे की सामान्य माणसे (काही अपवाद वगळता - आणि जे आता वाढत आहेत) जातीपातीच्या चौकटीत अडकलेली आहेत. परंतु राष्ट्रपुरुषांना जातीपातीच्या चौकटीत अडकवू नये ह्या मताचा मी आहे. गांधींजींचे अनुयायी जर सर्व जातिधर्मात आहेत तर आंबेडकरांचे का नसावेत? निदान मी तरी त्यांना मानतो. सोळा / अठरा तास अभ्यास करुन, केवळ लोणची पापडावर पोट भरुन प्रचंड अभ्यास करुन त्यांनी जे शिक्षण घेतले ते निश्चितच सर्वांकरिता अनुकरणीय आहे.

महापुरुषांचे जातीयकरण झालेले आहेच....

जरा कोणाच्या घरात दर्शनी भागात कोणते फोटो आणि मुर्त्या आहेत हे पाहायला सुरुवात करा.

बिका. तुमच्याकडे वृत्तपत्रातल्या खोट्या बातम्यांखेरिज काहीही नसतांना इथे शहाजोगपणे 'हे वागणं बरं नव्हं' असे आगावू शिर्षक देऊन आंबेडकरी अनुयायांना उल्लेखून लेख लिहिला आहे. हे पुरेसे आक्षेपार्ह आहे. तुम्ही खरोखर आंबेडकरांचे अनुयायी (सोंग न आणता) असला असतात तर घटनेची सर्व सत्यता पडताळून माहिती दिली असती, जे इथे मी केले आहे. एकतर्फी बातम्या देऊन एखाद्या समूहाविषयी मनं कलुषित करण्याचा तुमचा उद्योग कितीही आव आणला तरी लपून राहत नाहीये.

बातमी लोकसत्ताची आहे. खोटी असल्यास त्याखाली तसा एकही प्रतिसाद नाही. बिगूल लोकसत्तापेक्षा अधिक विश्वासार्ह बातमी स्त्रोत कधीपासून झाला? असल्यास बिगूलचा हवाला देऊन लोकसत्तावर खोटी बातमी दिल्याबद्द्ल तुम्ही खटला दाखल करु शकता.

बस बस... हेच हवे होते. धन्स! माझे प्रयत्न सार्थकी लागले. तुमचा खरा चेहरा उघडा पडलाय. आता तो कसा हे तुम्हीच शोधा.

@आरारा. याचसाठी केला होता अट्टाहास बरं का.