माझं बाळ

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 December, 2017 - 13:00

हो माझं बाळ. एका ब्रह्मचारी बापाचे बाळ Happy

खूप प्रेम आहे माझे त्याच्यावर. मी त्याला प्रेमाने लालजी बोलतो. लव अ‍ॅट फर्स्ट साईट. बघताक्षणीच मी त्याच्या प्रेमात पडलो. आणि आजही आहेच.

रोज सकाळी उठलो की सर्वात पहिले डोळे उघडून मी त्यालाच बघतो. माझी तयारी मग त्याच्या जोडीनेच सुरू होते. ब्रश, आंघोळ, दाढी, दूध चहा.. सारे आम्ही सोबतच उरकतो. तसेही आम्हाला एकमेकांशिवाय आहे कोण. नाही म्हणायला एक गर्लफ्रेंड आहे मला. पण ती सुद्धा अशी सतत माझ्यासोबत राहू शकत नाही. लालजीला मात्र मी ऑफिसमध्येही माझ्या सोबतच नेतो. आमच्या ऑफिसमध्ये आपल्या बाळांना आणायला परवानगी आहे हे नशीब. नाहीतर कसे राहिलो असतो आम्ही एकमेकांशिवाय. कामाच्या मध्ये दर अर्ध्या एक तासाने मला त्याच्याकडे बघितल्याशिवाय, त्याच्यासोबत खेळल्याशिवाय राहावतच नाही. ऑफिसमध्ये नाश्ता, जेवण, चहा, सारे काही आम्ही सोबतच घेतो. जेव्हा ऑफिसमध्ये एखादे फंक्शन असते तेव्हा तोच सर्वात पुढे असतो. बरेचदा मी मुद्दाम घरचा डब्बा नेत नाही. मग आम्हाला जेवायला बाहेर जाता येते. तेवढाच त्याच्यासोबत थोडा वेळ घालवता येतो. दिवसभराच्या ऑफिसच्या कामात त्याच्यासाठी म्हणून खास काढलेला एक क्वालिटी टाईम Happy

ऑफिसमध्ये जाताना आणि ऑफिसहून येताना, ट्रेनच्या प्रवासात मी त्याला दोन हातात धरून मांडीवर बसवून खेळवतो तेव्हा सार्‍या नजरा माझ्यावरच रोखल्या आहेत असा भास होतो. ईतके गोंडस लेकरू आणखी कोणाचे नसावे. घरी पोहोचल्यावर मी चटकन कपडे बदलून पटकन फ्रेश होऊन घेतो. मग आमचा प्लेईंग टाईम सुरू होतो. ऑफिसमध्ये दिवसभर माझ्या सोबत असला तरी ऑफिस ते ऑफिसच. तिथे काम करावे लागते. त्याच्याशी सतत खेळता येत नाही. त्यामुळे मग दिवसभराचा कोटा संध्याकाळी पुर्ण केला जातो. जेवतानाच काय ती थोडावेळ विश्रांती. जेवणखाणे, धुनीभांडी, एखादी सिरीअल, मॅचच्या हायलाईटस वगैरे बघून झाल्या की पुन्हा तो आहे आणि मी आहे Happy

माझ्या आईनेही कधी आमच्या नात्यावर आक्षेप नाही घेतला. पहिल्यांदा जेव्हा त्याला घरी आणले तेव्हा तो तिला ईतका आवडला नव्हता. खरे तर तिला न विचारता, तिची परवानगी न घेता असे केले हे तिला आवडले नव्हते. पण हळूहळू तिचेही त्याच्याबद्दलचे मत बदलले.
आणि आता तर रात्रीही तो माझ्या शेजारी, अगदी माझ्या कुशीतच झोपतो. झोपेत तो बेडवरून खाली पडून त्याला लागू नये म्हणून मी बेडच्या चहूबाजूने उश्यांचे कुशन ठेवतो. कारण त्याच्यासोबत खेळताना मलाच कधी झोप लागते हे समजत नाही Happy

तर त्या दिवशी काय झालं, मी माझ्या लालजीसोबत ऑफिसला जात होतो. आम्ही रिक्षातून उतरलो. स्टेशनच्या अगदी समोरच. मी एका हाताने त्याला धरले होते, आणि एक हाताने मागच्या खिशातले पैश्याचे पाकिट काढत होतो. त्या नादात हाताची पकड थोडी ढिली झाली असावी. याचा फायदा उचलत कोणीतरी भामटा माझ्या हाताला हिसका देत लालजीला उचलून पळालाही. माझ्या काही लक्षात येईपर्यंत रिक्षात बसून फरार. भर दिवसा माझ्या डोळ्यादेखत माझे लेकरू माझ्यापासून हिरावले गेले Sad .. मी वेड्यासारखा ओरडत रिक्षामागे पळू लागलो.. लालजी लालजी.. कुठतरी रिक्षा थांबेल.. कुठेतरी सिग्नल लागेल.. कुठेतरी ट्राफिकमध्ये सापडेल.. मी ओरडत सुसाट पळत होतो.. लालजी लालजी.. ओरडतच दचकून उठलो.. मोजून साडेतीन सेकंद लागली ते स्वप्न होते आणि हे सत्य आहे याचे भान यायला. पडल्यापडल्याच टेबल लॅंपचे बटण चालू करून कुशीत वळलो. माझंच बाळ ते, तसेच शांतपणे पहुडले होते जसे मी त्याला डोळा लागण्याआधी सोडले होते. जीवात जीव आला. अलगद त्याच्या अंगावरून एक हात फिरवला, आणि त्याला कुशीत घेत पुन्हा झोपी गेलो.

खरंच, आज अशी परिस्थिती आहे की मी एकवेळ माझ्या गर्लफ्रेंडला न भेटता काही दिवस राहू शकतो. पण माझ्या लालजीपासून फार काळ दूर राहू शकत नाही. तसेच त्याला सोडून कुठे जाऊही शकत नाही. प्रेम म्हणा, वेड म्हणा, किंवा आणखी काही. जे काही आहे ते हे असे आहे Happy

- ऋन्मेष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे कळते पण न कळल्यासारखे करायचे. खोटे बोलायचे नाही पण खरेही सांगायचे नाही. लोकांचा गैरसमज होतोय तर होऊ द्यायचा, आपण मात्र मजा बघत बसायचे. Uhoh
>>>>>>>

मी नरो वा कुंजरोवा केले.. (हे रंग नवा साजनवा सारखे वाटते ना!) युधिष्टरानेही हेच केले होते. मी तरी मजा बघितली लोकांना मजा करू दिली. युधिष्टराने मात्र नरो वा कुंजरोवा करत जीव घेतला एका बापाचा. तरी तो स्वर्गात गेला आणि मी मायबोलीवर शिव्या खातोय. युधिष्टराने तेव्हाही कौरवांवर अन्याय केला होता आणि आजही माझ्यावर करत आहे.

युधिष्टराने तेव्हाही कौरवांवर अन्याय केला होता आणि आजही माझ्यावर करत आहे.>>> तो कसा काय तुमच्यावर अन्याय करत आहे?

खरे तर आता आमच्यावर अन्याव होत आहे. आता काय नवीन लिहिले असावे असे वाटते नेमका त्याच गोष्टीचा फायदा घेऊन धाग्यांचा मारा केला जातो. जीव जाईल अश्याने वाचकांच्या सहनशीलतेचा Happy
Light 1

युधिष्टराने मात्र नरो वा कुंजरोवा करत जीव घेतला एका बापाचा. तरी तो स्वर्गात गेला आणि मी मायबोलीवर शिव्या खातोय.
>>> हसून हसून वाट लागली हे वाचून..

ऋ उद्या तुझ्या बाळाला घेऊन विलेपार्ले keshavrao ghaisas auditorium ला ये.
स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे यांना भेटून घे उद्या Wink

कऊ थॅन्क्स फॉर इन्फॉर्मेशन Happy
पण फ्रॅन्कली स्पिकींग मला सई स्वप्निल शाहरूख यांना प्रत्यक्षात कधी बघायचे नाहीये. का ते नेमके सांगता येणार नाही. सांगता आलेच तर वेगळ्या धाग्याचा विषय होईल तो.

{{{ पण फ्रॅन्कली स्पिकींग मला सई स्वप्निल शाहरूख यांना प्रत्यक्षात कधी बघायचे नाहीये. का ते नेमके सांगता येणार नाही. }}}

याला म्हणतात खरी भक्ती. खरा भक्त आपल्या देवाला कधीच प्रत्यक्षात बघू इच्छित नसतो. त्याला प्रत्यक्षात भेटल्यावर तो आपल्या कल्पनेइतका थोर नसला तर आपल्या भक्तीभावनेला तडा जाईल अशीच भीती त्याला सतावत असते.

लाल पट्टा आहे का Wink

पण लेखक लोकल ट्रेन मध्ये पट्टा मान्डीवर घेउन कसा खेळवत असतील बर? (विचार करणारी बाहुली)

लेखक रात्री पट्टा कुशीत घेऊन झोपत असतील ? (भरावलेली बाहुली)

(दिवा घ्या)

Pages