माझं बाळ

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 December, 2017 - 13:00

हो माझं बाळ. एका ब्रह्मचारी बापाचे बाळ Happy

खूप प्रेम आहे माझे त्याच्यावर. मी त्याला प्रेमाने लालजी बोलतो. लव अ‍ॅट फर्स्ट साईट. बघताक्षणीच मी त्याच्या प्रेमात पडलो. आणि आजही आहेच.

रोज सकाळी उठलो की सर्वात पहिले डोळे उघडून मी त्यालाच बघतो. माझी तयारी मग त्याच्या जोडीनेच सुरू होते. ब्रश, आंघोळ, दाढी, दूध चहा.. सारे आम्ही सोबतच उरकतो. तसेही आम्हाला एकमेकांशिवाय आहे कोण. नाही म्हणायला एक गर्लफ्रेंड आहे मला. पण ती सुद्धा अशी सतत माझ्यासोबत राहू शकत नाही. लालजीला मात्र मी ऑफिसमध्येही माझ्या सोबतच नेतो. आमच्या ऑफिसमध्ये आपल्या बाळांना आणायला परवानगी आहे हे नशीब. नाहीतर कसे राहिलो असतो आम्ही एकमेकांशिवाय. कामाच्या मध्ये दर अर्ध्या एक तासाने मला त्याच्याकडे बघितल्याशिवाय, त्याच्यासोबत खेळल्याशिवाय राहावतच नाही. ऑफिसमध्ये नाश्ता, जेवण, चहा, सारे काही आम्ही सोबतच घेतो. जेव्हा ऑफिसमध्ये एखादे फंक्शन असते तेव्हा तोच सर्वात पुढे असतो. बरेचदा मी मुद्दाम घरचा डब्बा नेत नाही. मग आम्हाला जेवायला बाहेर जाता येते. तेवढाच त्याच्यासोबत थोडा वेळ घालवता येतो. दिवसभराच्या ऑफिसच्या कामात त्याच्यासाठी म्हणून खास काढलेला एक क्वालिटी टाईम Happy

ऑफिसमध्ये जाताना आणि ऑफिसहून येताना, ट्रेनच्या प्रवासात मी त्याला दोन हातात धरून मांडीवर बसवून खेळवतो तेव्हा सार्‍या नजरा माझ्यावरच रोखल्या आहेत असा भास होतो. ईतके गोंडस लेकरू आणखी कोणाचे नसावे. घरी पोहोचल्यावर मी चटकन कपडे बदलून पटकन फ्रेश होऊन घेतो. मग आमचा प्लेईंग टाईम सुरू होतो. ऑफिसमध्ये दिवसभर माझ्या सोबत असला तरी ऑफिस ते ऑफिसच. तिथे काम करावे लागते. त्याच्याशी सतत खेळता येत नाही. त्यामुळे मग दिवसभराचा कोटा संध्याकाळी पुर्ण केला जातो. जेवतानाच काय ती थोडावेळ विश्रांती. जेवणखाणे, धुनीभांडी, एखादी सिरीअल, मॅचच्या हायलाईटस वगैरे बघून झाल्या की पुन्हा तो आहे आणि मी आहे Happy

माझ्या आईनेही कधी आमच्या नात्यावर आक्षेप नाही घेतला. पहिल्यांदा जेव्हा त्याला घरी आणले तेव्हा तो तिला ईतका आवडला नव्हता. खरे तर तिला न विचारता, तिची परवानगी न घेता असे केले हे तिला आवडले नव्हते. पण हळूहळू तिचेही त्याच्याबद्दलचे मत बदलले.
आणि आता तर रात्रीही तो माझ्या शेजारी, अगदी माझ्या कुशीतच झोपतो. झोपेत तो बेडवरून खाली पडून त्याला लागू नये म्हणून मी बेडच्या चहूबाजूने उश्यांचे कुशन ठेवतो. कारण त्याच्यासोबत खेळताना मलाच कधी झोप लागते हे समजत नाही Happy

तर त्या दिवशी काय झालं, मी माझ्या लालजीसोबत ऑफिसला जात होतो. आम्ही रिक्षातून उतरलो. स्टेशनच्या अगदी समोरच. मी एका हाताने त्याला धरले होते, आणि एक हाताने मागच्या खिशातले पैश्याचे पाकिट काढत होतो. त्या नादात हाताची पकड थोडी ढिली झाली असावी. याचा फायदा उचलत कोणीतरी भामटा माझ्या हाताला हिसका देत लालजीला उचलून पळालाही. माझ्या काही लक्षात येईपर्यंत रिक्षात बसून फरार. भर दिवसा माझ्या डोळ्यादेखत माझे लेकरू माझ्यापासून हिरावले गेले Sad .. मी वेड्यासारखा ओरडत रिक्षामागे पळू लागलो.. लालजी लालजी.. कुठतरी रिक्षा थांबेल.. कुठेतरी सिग्नल लागेल.. कुठेतरी ट्राफिकमध्ये सापडेल.. मी ओरडत सुसाट पळत होतो.. लालजी लालजी.. ओरडतच दचकून उठलो.. मोजून साडेतीन सेकंद लागली ते स्वप्न होते आणि हे सत्य आहे याचे भान यायला. पडल्यापडल्याच टेबल लॅंपचे बटण चालू करून कुशीत वळलो. माझंच बाळ ते, तसेच शांतपणे पहुडले होते जसे मी त्याला डोळा लागण्याआधी सोडले होते. जीवात जीव आला. अलगद त्याच्या अंगावरून एक हात फिरवला, आणि त्याला कुशीत घेत पुन्हा झोपी गेलो.

खरंच, आज अशी परिस्थिती आहे की मी एकवेळ माझ्या गर्लफ्रेंडला न भेटता काही दिवस राहू शकतो. पण माझ्या लालजीपासून फार काळ दूर राहू शकत नाही. तसेच त्याला सोडून कुठे जाऊही शकत नाही. प्रेम म्हणा, वेड म्हणा, किंवा आणखी काही. जे काही आहे ते हे असे आहे Happy

- ऋन्मेष

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसले भारी अंदाज येत आहेत..

चोर पिंपल्स का आणि कसं काय चोरून नेऊ शकेल?? >><>> यातला का जास्त महत्वाचा Lol

चोराचा पॉइंट डोक्यात फिट बसलाय माझ्या) Lol >>>>> Proud बहुतेक तुम्ही चोराच्या डोक्यात बसून विचार करत आहात. मी चोर असते तर या ऋन्मेषचे काय बरं चोरले असते Happy

चष्मा किंवा तत्सम की काय ?
>>>>
तत्सम बोलायचे झाल्यास चष्म्याला दोन डोळे असतात बाजूबाजूला. माझ्या बाळालाही दोन डोळे आहेत.. पण एक पुढे आणि एक मागे Happy
तसेच चष्म्याला दोन काड्या असतात, एक डावीकडे एक उजवीकडे. माझ्या बाळाला मात्र एकही काडी नाही पण त्याचे बाबा काड्या करतात Happy

येनीवेज,
अजूनही ज्या कोणाला वाटतेय बाळं म्हणजे माणसाचे बाळंच असेल जसे मी वीस वर्षांपूर्वी आणि तुम्ही 30-35-40 वर्षांपूर्वी होतात तर त्यांनी हात वर करा...

एक विंग्रजी पिक्चर पाहिला होता ज्यात एकाला इमॅजिनरी मित्र असतो. टोटल मेंटल लोचा दाखविला आहे.

बाळ-बाळ म्हणून तुम्ही जे काही जवळ घेऊन फिरता ते तात्पुरतेच असावे अशी सदिच्छा Happy

L.G. Mobile

बाहुबली कटप्पाच्या उत्कंठेनंतर ऋ चं बाळ कोण ही लागून राहिलीये...हे बाळ म्हणजे एखादा कॅमेरा तर नाही? पुढे-मागे एक एक डोळा व ऑफिसच्या फंक्शनला सगळ्यात पुढे यावरुन आलेली शंका.. Wink

एक विंग्रजी पिक्चर पाहिला होता ज्यात एकाला इमॅजिनरी मित्र असतो. टोटल मेंटल लोचा दाखविला आहे.
>>>>
बोले तो अपना लगे रहो मुन्नाभाई,. उसको भी बापू दिख रहेले थे.. बोले तो मेंटल मे फुल केमिकल लोचा
पण असे काही नाहीये.. जेव्हा मी त्याच्यासोबत फोटो काढतो तेव्हाही तो फोटोकॉपीत दिसतो.. म्हणजे अस्तित्वात आहे, भ्रम नाही

निरु, Happy

हे बाळ म्हणजे एखादा कॅमेरा तर नाही? पुढे-मागे एक एक डोळा व ऑफिसच्या फंक्शनला सगळ्यात पुढे यावरुन आलेली शंका..
>>>
माझे बाळ बहुढंगी बहुरंगी बहुआयामी मल्टीपर्पज हरफनमौला आहे Happy

म्हणजे अस्तित्वात आहे, भ्रम नाही>>> हो पण ते तुमचे 'बाळ' आहे किंवा त्याला तुम्ही 'बाळ' म्हणून घेऊन फिरता Lol

अरे तो नुसते खेळवतोय >>>नेहमीप्रमाणे Happy

अरे तो नुसते खेळवतोय. फुसका बार निघणार. Proud >>> नाही हं, मुळात हे मी काही कोडे बिडे म्हणून लिहिले नव्हते. मी तर फक्त माझ्या भावनांना वाट दिली. आणि लोकांनी आपल्या कल्पनाशक्तीला चालना दिली. एकदा पन्नास झाले की मी काय ते लिहेनच. ऋन्मेषचे बाळं आहे, पन्नास लाईक्स (प्रतिसाद) तर आलेच पाहिजेत Happy

Original persona हे काय असते? सर्च केले तर मोगली आणि ब्याटम्यानच्या मधले काहीतरी आले

आणि लोकांनी आपल्या कल्पनाशक्तीला चालना दिली. एकदा पन्नास झाले की मी काय ते लिहेनच. ऋन्मेषचे बाळं आहे, पन्नास लाईक्स (प्रतिसाद) तर आलेच पाहिजेत Happy
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on
>>>>
पन्नास इतरांचे की तुमचे स्वतचे?

{{{ तसेही आम्हाला एकमेकांशिवाय आहे कोण. नाही म्हणायला एक गर्लफ्रेंड आहे मला. }}}

सख्ख्या आईवडिलांचादेखील विसर पडला? तुमचं बाळ देखील एक दिवस तुमचे असेच पांग फेडणार.

१. लाल Diary.
२. शाखाचा फोटो

ऋन्मेष, तू अचाट आहेस. तुझे नवनवीन धागे काढण्याचं कौशल्य बघून माझे तर डोळेच विस्फारले !
>>>>>
आता फक्त एका क्लिकवर ऋन्मेषचे धागे तुमच्या दारात.
चाहते व्हा बटणावर हलक्या हाताने टिचकी मारा आणि रोज नवनवीन धाग्यांचा लाभ घ्या. टिंगटाँग ! धन्यवाद Happy

आता सांगतो Happy

साधंसच होतं खरे तर...
कोणीही सहजच ओळखावे असे,
आणि तसेच पहिल्याच प्रतिसादाला झालेही...
पियू यांनी चटकन ओळखले,
मोबाईल Happy

पण मी जेव्हा पाहिले तेव्हा त्या खाली अजून २-३ प्रतिसाद आले होते. त्यात लालजी हे नाव का यावर तर्क आलेले.
मॉडेलचा रंग लाल आहे की मोबाईल कव्हरचा?
रेडमी असावा.
वगैरे वगैरे
तर मी या अंदाजांना चुकले म्हणालो.
पुढे लोकांना वाटले की मोबाईल हाच अंदाज चुकला आणि अंदाज बांधायची मालिकाच सुरू झाली.
दुपारी पाहिले तर धागा मजेशीर झाला होता म्हणून लोकांचा गैरसमज कायम राहू दिला.

पण तरीही निरू यांनी लालजी या नावाच्या उकलीसह योग्य ओळखलेच - L.G. Mobile Happy
अभिनंदन निरू !

अशातला प्रकार होता होय...

IMG_1576.PNG

तर मी या अंदाजांना चुकले म्हणालो.
पुढे लोकांना वाटले की मोबाईल हाच अंदाज चुकला आणि अंदाज बांधायची मालिकाच सुरू झाली.
दुपारी पाहिले तर धागा मजेशीर झाला होता म्हणून लोकांचा गैरसमज कायम राहू दिला.>>>>

सगळे कळते पण न कळल्यासारखे करायचे. खोटे बोलायचे नाही पण खरेही सांगायचे नाही. लोकांचा गैरसमज होतोय तर होऊ द्यायचा, आपण मात्र मजा बघत बसायचे. Uhoh

>
आता फक्त एका क्लिकवर ऋन्मेषचे धागे तुमच्या दारात.
चाहते व्हा बटणावर हलक्या हाताने टिचकी मारा आणि रोज नवनवीन धाग्यांचा लाभ घ्या. टिंगटाँग ! धन्यवाद Happy)))))))))
नको रे बाबा !!! आत्मघातकीपणा ठरेल तो.

Pages