श्रिंप पॅड थाई

Submitted by अदिति on 6 December, 2017 - 03:01
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. राईस नुडल्स १ कप
२. कांदा (शालेट) बारीक कापलेला १/२ वाटी
३. लसुण ३/४ पाकळ्या बारीक कापुन
४. ड्राय श्रिंप्स : २ टेबल स्पुन, ५ मिनीट भिजउन बारीक कापुन घ्या
५. फ्रेश श्रिंप्स : ८/१०
६. अंडे: २
७. टोफु (फर्म): बारीक कापुन तव्यावर थोड्या तेलात फ्राय केले तर नुडल्स मधे मिक्स करताना तुकडे पडत नाहीत
८.बिन्स स्प्राउट्स: २ कप
९. कांद्याची पात बोट्भर लांबीची कापलेली २/३ ते १ कप
१०. रोस्टेड पिनट्सः खलबत्त्यात कुटलेले २/३ कप,
११. फ्रेशलिंबु
१२. चवीला मिठ आणि लाल तिखट पावडर
१३. तेल

सॉस साठी:
१. पाम शुगर: पावडर करुन ३ टेबल स्पुन
२. चिंचेची पेस्ट: २ टेबल स्पुन
३. फिश सॉस:१/४ कप
४. पाणी १/४ कप

सर्व्ह करतांना:
१. बिन स्प्राउट
२. बारीक कापलेली कांद्याची पात
३. दाण्याचा कुट
४. लिंबु चकत्या
५. चिली फ्लेक्स - तिखट हव असेल तर

क्रमवार पाककृती: 

पुर्व तयारी
१. राईस नुडल्स पाण्यामधी भिजत ठेवा - कमीत कमी १ तास तरी
२. सॉस चे साहीत्य एकत्र करुन बाजुला ठेवा
३. फ्रेश श्रिम्प्स चवी पुरत मीठ आणि चमचा भर सॉस टाकुन १० एक मिनीट मॅरीनेट करुन तव्यामधे फ्राय करुन घ्या. बाजुला ठेवा
४. एक मोठी कढई हाय फ्लेम वर ठेउन त्यात २ चमचे तेल टाका
५. तेल तापले की त्यात लसुन, कांदा, ड्राय श्रिम्प्स टाकुन चांगले परतुन शिजवुन घ्या.
६. राईस नुडल्स पाण्यातुन उपसुन घेउन कढईत टाका. त्यावर सॉस टाका. त्या सॉस मधे नुडल्स शिजल्या पाहीजेत. लागल तर थोड अजुन पाणी टाकायला हरकत नाही
७. नुडल्स शिजल्यात की त्यात बिन्स स्प्रॉउट्स, कांद्याची पात टाकुन चांगल मिक्स करा. दाण्याचा कुट टाकुन मिक्स करुन घ्या. ओव्हर कुक होणार नाही ह्याची काळजी घ्या
८. नुडल्स कढईमधेच एका बाजुला करुन त्यात २ अंडी फोडुन टाका. अंड थोड सेट झाल की ते स्क्रॅम्बल करुन नुडल्स मधे मिक्स करा.
९. गरम गरमच सर्व्ह करा
IMG_7930.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जणांसाठी
अधिक टिपा: 

सर्व्ह करतांना प्लेट मधे नुडल्स आणि बाजुला थोडे स्प्रॉउट्स द्या. वर बारीक चिरलेल्या कांद्याची पात आणि दाण्यांच्या कुट टाकुन सजवा. लिंबाच्या फोडी ठेउन सर्व्ह करा.
काही जिन्नस (उदा. ड्राय श्रिंप्स, चिंच पेस्ट) मधे मिठ अस्ते काही ब्रॅड मधे नसतेही. त्यामुळे मिठ टाकतांना काळजी घ्या.

माहितीचा स्रोत: 
नेट आणि ट्रायल अ‍ॅड एरर ने :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद..

बरचस सामान बाहेरून आणावे लागेल. << बिन स्र्पॉउट टिकत नसल्यामुळे - पॅकेट उघडल्या नंतर दुसर्या दिवशीच पाणी होते - एशियन मार्केटला एक ट्रिप होतेच.
अंजली, फिश सॉसला सोया सॉस + वेजी ब्रॉथ चा पर्याय वापरु शकतेस. ड्राय/फ्रेश श्रिम्प न टाकता ब्रॉकली टाकु शकतेस.