काय करावे ??

Submitted by raina on 4 December, 2017 - 19:10

मोहना यांचा "अनुभव" वाचला आणि डोळ्यात पाणी आले. वाटले इथे माझा अनुभव शेयर करावा.
मी ४० + ची आहे. अमेरिकेत येऊन आता ८ वर्षे झाली. भारतात २ वर्षे QA म्हणून Tech Mahindra मध्ये काम केले होते. मग दोन मुली आणि डिपेन्डन्ट व्हिसा यामुळे १० वर्षे काम करता आले नाही.
दोन वर्षांपूर्वी H४ EAD मिळण्याआधी मी खूप खुश झाले, आता आपल्याला काम करता येईल म्हणून. मुली पण आता मोठया म्हणजे कळत्या वयाच्या (८,१३) झाल्या होत्या त्यामुळे मी आता जॉब करायला मोकळी होते. नवऱ्याचा पण सपोर्ट होताच.
मी परत IT मध्ये जायचे म्हणून तयारी चालू केली. परत सगळे रिफ्रेश केले. ISTQB चे सर्टिफिकेशन्स (३) केले. कोर्सेरा वर काही courses पण केले. सगळी जैयत तय्यारी केली. खूप अभ्यास केला.
जानेवारी २०१६ ला EAD मिळाले. वाटले आता अप्लाय केला कि लगेच जॉब मिळेल.
पण लवकरच माझा भ्रमाचा भोपळा फुटला. एकही interview कॉल येईना. भारतीय consultant कॉल करत. पण ७/८ वर्षे fake अनुभव लावावा म्हणून सांगत, मला ते काही पटत नव्हते. मग म्हटले जो जॉब मिळतो तो करावा आणि QA जॉब बघत राहावा. मग math instructor म्हणून after स्कूल प्रोग्रॅम मध्ये लागले.
Substitute Teaching पण करून पहिले पण आवडले नाही. IT जॉब search चालूच होता. मी माझा खरा अनुभव टाकून सगळीकडे अप्लाय करत होते, पण नो लक, एकही interview कॉल आला नाही. सगळे तेच fake resume वाले.
मग दुसरे काही ऑपशन्स बघितले, business म्हणावा तर ग्रीन कार्ड नाही त्यामुळे इन्व्हेस्ट करायची हिम्मत नाही. दुसरे जॉब्स सॅलरी एक्दम कमी, काय करावे कळेना. अजून मी instructor म्हणूनच काम करत आहे.
मोठी लेक आता १०th ला आहे. आतापर्यंत gc मिळेल ती कॉलेज ला जाईपर्यंत असे वाटत होते. पण आताच्या परिस्थितीत असे वाटत नाही. International स्टुडन्ट म्हणून इथल्या कॉलेजच्या फिया प्रचंड आहेत ज्या परवडण्यासारख्या नाहीत आजच्या परिस्थितीत. भारतात परत जावे तर मुलींना अड्जस्ट होणे कठीण आणि तिथे पण NRI फीस. ना घर का ना घाट का अशी हालत.
माझ्या सोबतच्या नॉन technical बॅकग्राऊंड च्या माझ्या मैत्रिणींना QA जॉब मिळाला. लिटरली आयुर्वेद आणि physiotherapy असे बॅकग्राऊंड आहे.
नवरा म्हणतोय आता तू पण कर मग fake अनुभव लावून लेकीसाठी. इथे कॉस्ट ऑफ लिविंग पण खूप आहे. सेविंग म्हणावे तसे नाही. मी फक्त एन्ट्री लेवल जॉब्स पाहत आहे पण काहीही फायदा नाही कारण आताचा (current) experience IT मध्ये नाही म्हणून जॉब मिळत नाही, हे एक चक्र आहे. खूप चिडचिड होतेय आणि कळत नाही काय करावे. मला माहित आहे खूप जणींची अशीच परिस्थिती असेल , तुम्हाला काही मार्ग माहित असेल तर सांगा.

Group content visibility: 
Use group defaults

Pages